प्रायव्हेट ऑफिस आणि सरकारी कार्यालय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 January, 2018 - 12:43

गेले तेरा महिने मी ज्या जागेवर बसत आहे तिथे माझ्या शेजारीच एक पोपडे निघालेली आणि रंग उडालेली भिंत आहे. मला तसा तिचा काही त्रास नाही, कारण ती माझ्या थेट नजरेस पडत नाही. फक्त माझ्या जागेचा शो जातो ईतकेच. दुरून कोणी पाहिले की मी छानपैकी स्वदेशच्या शाहरूखसारखा फॉर्मल आणि टापटीप कपड्यात बसलो असतो. पण ती भिंत माझ्या सौंदर्याची पार्श्वभूमी खराब करत असते. मला दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर एखादा फोटो काढायचा झाल्यास उठून दुसर्‍याच्या जागेवर जावे लागते. आणि एकदोनदा केसांवर काही पांढरे पांढरे पडले होते. म्हटलं तर हाच तुरळक त्रास. तरी लोकांच्या आग्रहास्तव मी काही वेळा एच आर आणि मॅनेजमेंटकडे तक्रार केली. चौथ्या तक्रारीनंतर एकदा येऊन त्या भिंतीचे फोटो काढून गेले, ईतकेच काय ते त्यांनी केले. पुढे ते फोटो फेसबूकवर टाकले की व्हॉटसपवर शेअर केले याची कल्पना नाही. बाकी ती जागा माझ्या कामाच्या आणि जॉब प्रोफाईलच्या दृष्टीने मोक्याची आहे म्हणून मला दिली गेली आहे. कारण तिथून मी माझ्या टीमशी योग्य प्रकारे संपर्क आणि समन्वय साधू शकतो. हे मलाही सोयीचे आहे. म्हणून मी आजवर मुन्नाभाई सारखे "Sir what is the procedure to change the room?" म्हणून अर्ज टाकला नाहीये.

पण अशीच एक तक्रार माझ्या एका महिला सहकर्मचारी पद्मिनीने नोंदवून झाली आहे. तिच्या शेजारच्या भिंती्ला चक्क एक क्रॅक, मराठीत तडा गेला आहे. तुलनेत तिचे सौंदर्य, म्हणजे त्या भिंतीचे सौंदर्य माझ्या शेजारच्या भिंतीईतके खराब झालेले नाही. पण लोकं तिला गंमतीने ती भिंत एक दिवस तुझ्या डोक्यावर कोसळणार आणि तुला कायमची सुट्टी मिळणार असे म्हणून घाबरवत असतात. जेव्हा माझ्या भिंतीचे फोटो काढण्यात आलेले तेव्हा तिच्याही भिंतीसमोर काही सेल्फी काढले गेलेले. पण मॅनेजमेंटला त्या भिंतीतही काही धोकादायक वाटले नसल्याने त्यावरही आजवर काही कारवाई झाली नाही. बहुधा त्या फटींतून पिंपळपाने उगवायची वाट बघत असावेत.

असो, हा झाला भूतकाळ !

पण अखेर आमचा तेरा महिन्यांचा खंडरवास संपला. आमचा पडका वाडा अचानक गेल्या रविवारी शनिवारवाडा झाला. सोमवारी सकाळी आम्ही तासभर वेड्यासारखे स्वत:चीच जागा शोधत होतो ईतका त्या भिंतीचा कायापालट करून टाकला. जेव्हा समजले तेव्हा ईतका आनंद झाला, काय सांगू! ईतका आनंद तर आमची चाळ पाडून टोलेजंग ईमारत उभी राहिली तेव्हाही झाला नव्हता.

हे असे का? याचा विचार करेस्तोवर आणि काही सुचेस्तोवर दहा वाजता ईनबॉक्सवर मेल येऊन थडकला....
पुढच्या आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये कंपनीचे ग्लोबल सीईओ येणार आहेत !

म्हणजे एखादे मंत्री संत्री येणार म्हणून रस्त्याची डागडूजी करा. एखादे पंतप्रधान येणार म्हणून परीसराची स्वच्छता पाळा. एखादे मोठे शैक्षणिक अधिकारी येणार म्हणून शाळेची डागडूजी करा...
आधी जेवढा आनंद झाला होता, तेवढाच आता त्रास झाला.
आम्ही अश्या परीस्थितीत राहत होतो, काम करत होतो त्याचे कोणाला काहीच पडले नव्हते, पण एक दिवस येणार्‍या साहेबांच्या डोळ्यांना छान दिसावे म्हणून तातडीने उपाययोजना केली गेली.

फक्त म्हणायला एमेनसी, पण एखादे सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपनी यांची या भारतात जवळपास सारखीच अवस्था आहे. भारतीय कर्मचारी कोणत्या परीस्थितीत काम करत आहेत. याचे मॅनेजमेंटला काहीही पडले नसते. तसेही ईंडियन्स आर चीप लेबर. यांना फुकटात किंवा निम्म्या किंमतीत जेवण वा सकाळचा नाश्ता दिला तरी हे खुश.. मग कश्याला कोणाला काय पडले असेल.. खाजगी असो वा सरकारी, ईथे तुम्ही मॅनेजमेंटसमोर आवाज उठवू शकत नाहीत. ज्या देशात लोकशाही असून जिथे लोकांची चालत नाही, तिथे कंपनीत कशी चालणार...

असो, नाव बदलून लिहिण्याचा एक फायदा तर आहे, ईथे हे बिनधास्त शेअर करू शकतो........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी,
ते बारमध्ये बसून पिणार्‍यांचं प्रबोधन करीत असतील.

जाऊ द्या ना बरे
एखाद्या ड्यु आयडी ला किति ते खरेखोटे करायचे.
ते कोण ते गडकरी गोविंदाग्रज म्हणून आणि अत्रे केशवकुमार म्हणून आणि कोणीतरी अजून बी कवि (म्हणजे 'कवी व्हा' नसून '(हनी) बी व्हा' या अर्थी आणि ते कोणीतरी अजून सख्याहरी म्हणून लिहायचे तेव्हा त्यांना कोणी असे प्रश्न विचारलेत काय Happy )>>>+१

तुम्ही दारु पिण्याच्या इतक्या विरोधात असूनही जेवायला बारमध्ये जाता? जे लोक दारू पीत नाहीत त्यांना बारमध्ये जेवायला जायचे सुचणे शक्य नाही. आणि त्या वातावरणात बसून जेवण घशाखाली जाणं तर त्याहून अशक्य!>>>मित्र पीत असतील ना, त्यांना सोबत म्हणून गेले असतील.

तेव्हा त्यांना कोणी असे प्रश्न विचारलेत काय?
>>
तेव्हा त्यांनी इतके बोर केले काय?
तेव्हा त्यांनी इतरांच्या धाग्यांना / लेखांना हायजॅक केलेत काय?
तेव्हा त्यांनी विषय सोडुन भलत्याच विषयावर नेऊन धागा भरकटवलाय काय?
तेव्हा त्यांनी जिथे तिथे स्वस्तुती आरंभली काय?
तेव्हा त्यांनी नको तिथे शाखा सइ पोतं आणलं काय?
तेव्हा त्यांनी गंभीर चर्चेमधे मधेच येऊन गंभीर मुद्दे मांडण्या-यांन वेडावुन दाखवले काय?
तेव्हा त्यांनी १०^(अनंत) इतक्या वेळा आपल्याच वाक्यांवरुन पलटी मारली काय?
ई. ई.>>
एव्हढे करूनही त्यांचा ID उडालेला नाही. कारण ते कोणाचीही अक्कल काढत नाही, पर्सनल लेव्हलवर टिका करत नाही Happy
बर्‍याचदा प्रतिसादांची संख्या वाढवायचा हेतू दिसतो, तेव्हा मी सरळ पास करते. तुम्हीही करा Happy
त्यांनी लिहिलेले सगळेच खरे असते असे वाटावे यावर सक्ती नाही Happy

{{{ (डिसक्लेमरः माझा ड्यु आयडी ऋन्मेष नाही Happy )>>>+१ }}}

ह्यावरुन एक चिनी कथा आठवली. एका गरीब चिनी तरुणास काही सोन्याची नाणी सापडतात. कुठेतरी लपवायची म्हणून तो स्वतःच्या खोलीची एक भिंत फोडून त्यात ती सोन्याची नाणी लपवून पुन्हा भिंत लिंपून टाकतो. लिंपलेला भाग भिंतीच्या इतर भागांपेक्षा वेगळा दिसत असल्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून तो त्यावर लिहितो - "या भिंतीत सोन्याची नाणी लपविलेली नाहीत."

तेव्हा त्यांनी जिथे तिथे स्वस्तुती आरंभली काय?
>>>>
स्वस्तुतीचा आरोप मान्य Happy

तुम्ही दारु पिण्याच्या इतक्या विरोधात असूनही जेवायला बारमध्ये जाता? जे लोक दारू पीत नाहीत त्यांना बारमध्ये जेवायला जायचे सुचणे शक्य नाही. आणि त्या वातावरणात बसून जेवण घशाखाली जाणं तर त्याहून अशक्य!
>>>>
शालेय कालापासून आमच्या पार्ट्या बारमध्येच होतात. पिणारे पितात. न पिणारे चकणा खातात. माझ्यासारखे मांसाहार करतात. लोकं गिलासच्या गिलास रिचवत असतात, खारवलेल्या काजूशेंगदाणा आणि हिरव्या चटणीत बुडवलेल्या लाल चकलीचा फडशा उडत असतो आणि माझ्यासमोरील ताटातून एक कोंबडी शांतपणे माझ्या पोटात प्रवेश करत असते.

माझ्यासमोरील ताटातून एक कोंबडी शांतपणे माझ्या पोटात प्रवेश करत असते.
<<
व्हाया तोंड मार्गे, आय होप. Wink

हम्म!
शालेय काळात मला आई-वडिलांनी कश्यासाठीच पैसे हातात द्यायची फॅशन नव्हती. काय हवं ते मागा, ते घरांत आणून मिळेल. कॉलेजमध्ये गेल्यावर गाड्या पावसात बंद पडल्या तर रिक्षाने घरी येता येईल इतके पैसे मिळायचे. नोकरीला लागल्यावर लग्न होईपर्यंत घरी पगार आणून द्यायचा त्यातून मग मला वडा-पाव, पाणीपुरी, पावभाजी अशी ऐश करायला पॉकेटमनी मिळायचे. Shopping ला जायचे असेल तर मागू तेवढे पैसे, उरलेले हिशोब करुन आईला परत. कधीही मैत्रिणींना घरीच बोलावलं जायचं वाढदिवस किंवा ग्रॅज्युएशन किंवा नोकरीची पार्टी (? हा शब्द तेव्हा प्रचलित नव्हता) त्यांनी त्या पैशांनी माझ्या नावानी फ्लॅट घेऊन ठेवलाय आणि decent corpus ज्याचा जीवावर मला I care a damn! हा attitude गरज असेल तिकडे दाखवता येतो.

भरपूर विषयांतर झालेच होते, my 2 cents!.

हम्म. असेल!
अजुनही पॉकेटमनी आमच्याकडे दिला जात नाही. डबा नाहीतर कुपन. वाढदिवसाला मित्र जेवायला, खेळायला, सिनेमा बघायला एकमेकांच्या घरी जातात.

आमच्या कंपांऊंडमध्ये मी १०-१२ वर्षांची पोरे क्रिकेट खेळताना पाहतो. खेळून झाल्यावर थंडा, बर्गर, काय ती आपली फ्रँकी वगैरे चरत असतात. प्रत्येकाच्या खिश्यात पैसे असतात. विशेष म्हणजे रोजच ... आता उद्या माझा पोरगा त्यांच्यात खेळायला गेला आणि मी एवढ्या लहान वयात ईतका पॉकेटमनी नाही म्हणून त्याला रिकामा खिसा पाठवला तर.. नक्कीच त्याच्या बालमनावर परीणाम होईल.

रोज असले बाहेरचे खाल्यावर शरिरावर परिणाम होईल.

आमच्याकडे शाळेतून घरी आल्यावर भरपेट नाश्ता मग खेळ, अभ्यास, ट्युशन आणि रात्रीचे जेवन. त्यामुळे बाहेर चरायल वेळच मिळत नाही.
आणि लागतील तसे पैसे दिले जातात त्यामुळे आले मनात कि बाहेरचे खा असे होत नाही. तसेच बाहेर काही खायचे असेल तर सगळ्या मुलांना आधिच प्लॅन करुन घरी कळवावे लागते. अजून तरी त्यांच्या बालमनावर परिणाम झालेला नाही, ते नॉर्मल आणि आनंदी आहेत.

वर रोज म्हटलेय ते रोजच असे नाही. सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळताना दिसतात तेव्हाच... सांगायचा मुद्दा हा की काही खावेसे मनात आले की त्यासाठी पुरेसे पैसे खिश्यात खुळखुळत असतात.
बालमनावर परीणाम यासाठी की आपल्या सोबतचे मनात येईल तेव्हा खाऊपिऊ मौजमजा ऐश करताहेत आणि आपल्याला मन मारून चोरून अश्यावेळी कुठेतरी बसावे लागते याने परीणाम होऊ शकतो. मुलांचे फ्रेण्ड सर्कल त्यांच्यापेक्षा फार गरीब वा फार श्रीमंत असू नये हे देखील याचसाठी. अन्यथा तुम्ही हौसेने आपल्या मुलाला आपल्या ऐपतीबाहेरच्या शाळेत घातले. फी तर परवडली, पण तिथे येणारया हायफंडू मुलांची लाईफस्टाईल मॅच करू शकला नाहीत तर त्याला काही अर्थ नाही.
बाकी घरातले खाणे आहारविषयक सवय म्हणून नेहमीच चांगले.
पण प्रत्येकाच्या हे नशीबी नसते. मी अगदी ईयत्ता बालवाडीपासून लांबच्या शाळेत जायचो. शाळा सुटल्यावर घरी आलो आणि नाश्ता केला ईतके सोपे नसायचे. त्यामुळे वडापाव, बर्गर, हॉटडॉग हेच आपले सोबती..

Pages