पारुबायची खाज –
पारुबायला एक झ्यांगडी सवय होती!
खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंबा ठोकत, अंगावरचे कपडे काढत, गावभर सुसाट धावायचे!
पारुबाय बोल्ड! तिला मानणारे चिक्कार घोळके होते.
मग काही घोळके, 'बाई इथ्थं खाजवतंय का, तिथ्थं खाजवतंय का?'असं विचारून विचारून तिला विविधांगी खाजवायचे!पारुबायला इतकं बरं वाटायचं! काय विचारू नका.
पण नंतरनंतर घोळक्यांच्या लक्षात यायला लागलं,मायला, हिला खाजवता खाजवता आपल्या हाताबोटांची आग व्हाय लागलीय.मग हळूहळू घोळक्यांनी खाजवायचे थांबवले.तशी पारुबाय जास्त आक्रस्ताळेपणा करू लागली!
गावच्या वेशीवर एक फकीर पडीक असायचा! तो ही नाटकं चिलीम ओढता ओढता रोज पहायचा.
एके दिवशी पारुबाय अशाच बोंबा ठोकत वेशीपर्यंत पोहचली.कपडे काढायची सवयच असल्याने, वेशीपर्यंत पोहचता पोहचता बिचारी पूर्ण विवस्त्र झाली.
त्यात कुणी लक्षच न दिल्याने, आणखी संतापली. तिला वाटले, आता या फकिराने तरी खाजवावे!
फकिराने एक मस्त झुरका मारला, खाजकुयलीची पुडी तिच्यासमोर टाकीत म्हणाला,
'पारुबाय, ही पावडर अशा ठिकाणी लावून घे, जिथं खाजवायला कुणालाच जमणार नाही!'
तेव्हापासून पारुबायचे काय झाले असेल बरे?
-शिवकन्या शशी.
काहीही... नाही आवडली.
काहीही... नाही आवडली.
जबरी कथा. खूप आवडली.
जबरी कथा. खूप आवडली.
काये हे?
काये हे?
हाहा
हाहा
काही कळलंच नाही मला तर
काही कळलंच नाही मला तर
मलापण.
मलापण.
माबोवरचे लिखाण हल्ली फारच
माबोवरचे लिखाण हल्ली फारच बोल्ड व्हायला लागलेय
ज्यांना आवडली, ज्यांना अगदी
ज्यांना आवडली, ज्यांना अगदी काहीही वाटली, त्या सर्वांना, वाचून प्रतिक्रिया दिल्या धन्यवाद.
मायबोलीने हा धागा जिवंत ठेवला, उडवला नाही, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
ही रूपक कथा आहे. झुंडी बाळगून आपले महत्व वाढवणाऱ्या प्रवृत्ती बद्दल.
बाकी अनेक अर्थ यातून निघू शकतात. रूपक कथेत या शक्यता असतात.
मला कळली . ती दोघांनाही लागू
मला कळली . ती दोघांनाही लागू आहे पारू बाई आणि पारू बुवा . ज्यांना कोणाला फार दिवस लिहिल्याशिवाय गप्प बसवत नाही त्यांच्या साठी आहे हि . मागे कोणीतरी तांबे या आयडींचे ( कदाचित नाव चुकत असेल ) भारंभार धागे आणि सोप्प्या सोप्प्या रेसिपी यायला लागल्यावर " फ्रीजमध्ये थंड गार पाणी कस तयार करावं" या वर एक धागा काढला होता त्याची आठवण झाली. तो धागा असाच रूपकात्मक होता फक्त त्याच स्वरूप विनोदी होत आणि हा थोडा बोल्ड आहे एवढाच काय तो फरक. तो आणि हा धागा काढणार्यांना एकच सांगायचं असावं
ही रूपक कथा आहे. झुंडी बाळगून
ही रूपक कथा आहे. झुंडी बाळगून आपले महत्व वाढवणाऱ्या प्रवृत्ती बद्दल.
बाकी अनेक अर्थ यातून निघू शकतात. >>>>>>>>> ओके
@सुजा : धन्यवाद... नाहीतर हे लेखन आमच्यासाठी हे विमानच होतं
माबोवरचे लिखाण हल्ली फारच
माबोवरचे लिखाण हल्ली फारच बोल्ड व्हायला लागलेय>> अंजली हाहाहा...
मायबोलीने हा धागा जिवंत ठेवला, उडवला नाही, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.>> मलापन कौतुक वाटले वेब मास्तरांचे
टाळ्या.
मला खरतर आवडली, नाही आवडली यामधल काहीच वाटल नाही. कोरड्या भावना होताय वाटत दिवसेंदिवस माझ्या.. असो.
पुलेशु.
माबोवरच्या लेखनात हल्ली खुपच
माबोवरच्या लेखनात हल्ली खुपच व्हरायटी आहे, नवीन लेखक मंडळी छान लिहिताहेत
innovative
innovative