'फँटॅस्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम' यामधील गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्रासाठी जॉनी डेपची निवड केल्याबद्दल फॅन्सचा जो गदारोळ चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत या चर्चेसाठी हा धागा.
हॅरी पॉटर फ्रंचायझीचा हा नवा चित्रपट जेव्हा रिलीझ झाला तेव्हाच जॉनी डेप च्या बायकोने अम्बर हर्डने त्याच्याविरुद्ध कौटूंबिक हिंसाचाराची केस दाखल केली आणि त्यावर उतारा म्हणुन पैशांची मागणी केली.
हॅरी पॉटर युनिव्हर्सचे चाहते, जे के रोलिंगला फॉलो करणारे अधिक तिचे चाहते सगळ्यांच्या नजरा या बातमीवर लागल्या आणि त्यानंतर हरेक चित्रपटात कलाकारांच्या निवडीबद्दल जागरुक असलेल्या तिच्यावर सर्वबाजूने प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.
तिने लिहिलेल्या पुस्तकातील पात्रांप्रमाणे त्या त्या नागरिकत्वाचे कलाकार ती निवडत असताना जॉनी डेप या अमेरिकन अभिनेत्याला तीने इतका मोठा रोल का द्यावा ?
ती स्वतः ज्या वाईट दिवसातून गेली आहे, तसेच हॅरीचं बालपण तिने पुस्तकात ज्याप्रकारे मांडलेलं आहे, आणि कौटूंबिक हिंसाचाराबाबत स्वतः जे के रोलिंग इतकी संवेदनशील असताना तीने ज्या व्यक्तीवर हा आरोप लागला आहे त्या व्यक्तीला स्वत:च्या चित्रपटात प्रमुख पात्राची भूमिका का द्यावी?
यावर तिने जॉनी डेपला चित्रपटातून काढून टाकावं अन्यथा आम्ही चित्रपटावर, हॅरी पॉटर फ्रंचायझीवर बहिष्कार टाकू असे बरेच चाहते तिला सुचवताना दिसत आहे..
या सर्व गदारोळात जॉनी डेपचे चाहते मात्र त्याच्या निवडीबद्दल खुप खुष आहे आणि त्याबद्दल जे के रोलींगचे अभिनंदन सुद्धा करत आहे.
#JohnnyDeppIsMyGrindelwald हा हॅशटॅग वापरुन ते रोलिंग आणि डेपला समर्थन देत आहे.
आरोप सिद्ध झाल्याशिवाय कुठलाही व्यक्तीवर आरोपी असा आरोप करणे हे न्यायाला धरुन नाही, तसेच अम्बर हर्ड हि स्वतः खुप अब्युझिव्ह आहे असे या द्वयीच्या जवळचे लोक म्हणतात.
तीने त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी जो विडीयो सोशल मिडीयावर टाकला त्यात तो त्रागा करताना आणि आदळापट, शिव्या देताना दिसतोय पण हात उचलताना नाही यामागे डेपच्या आईचा मृत्यु झाल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बरोबर नसलेल्या त्याने दारुच्या अंमलाखाली हे कृत्य केलं होतं असे सगळे त्याचे फॅन्स म्हणताहेत.
या सर्वांवर कडी म्हणजे जॉनी डेप कधीच अब्युझिव्ह नव्हता याउलट तो खुप प्रेमळ आहे अशी त्याची एक्स वाईफ्/पार्टनरचा दावा आहे.
अम्बर हर्डने उभ्या केलेल्या दाव्यातून तिला मिळणारे पैसे ती समाजसेवेकरीता दान देईल असे तिने जाहीर केले आणि या दोघांनी हा मुद्दा सल्लामसलतीने सोडवायच ठरवून हर्डला ७मिलीयन डॉलर एवढी रक्कम डेप देईल असे ठरवले. यावर तीने त्याच्यावर केलेली केस मागे घेतली आणि आमच्या दोघांमधले संबंध हे प्रेमाचेच होते असे जाहीर करुन एकमेकांशी फारकत घेतली.
एवढं सगळं रामायण लिहायच कारण हे कि, काल जे के रोलिंग ने जॉनी डेपची निवड ती ग्रींडलवाल्ड म्हणुन कायम ठेवत आहे अस जाहीर केलं आणि परत एकदा हॅरी पॉटर युनिव्हर्स आणि जे के रोलींग च्या चाहत्यांमधील जॉनी डेप हेटर्स आणि जॉनी डेप लव्हर्स हे एकत्रितरित्या तिच्यावर तुटून पडले.
स्वतःच्या निवडीबाबत रोलिंग म्हणते कि,
"हॅरी पॉटरच्या सभोवताल जी एकमेकांना समजुन घेणारी इतकी मोठी कम्युनिटी तयार झाली आहे त्याबद्दल मला खुप आनंद वाटतो. या सर्व घटनांबाबत मी माझ्या चाहत्यांशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही हे माझ्यासाठी फार कठिण आणि क्लेषदायक आहे. पण त्या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याला त्यांच्यापुरत सिमीत ठेवण्याबद्दल त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा सर्वांनी आदर करायला हवा. या सर्व घटनेला अनुसरुन मी आणि सर्व चित्रपट निर्माते आम्ही निवडलेल्या कलाकारांनाच पुढे कायम ठेवणार आहोत तसेच जॉनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल याबाबत आनंदी आहोत."
तुम्हाला काय वाटते?
रोलिंगच्या निवडीवर तिच्या चाहत्यांनी घेतलेला आक्षेप चुकीचा आहे कि बरोबर?
माझं मत म्हणाल, तर एखाद्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याला धरुन त्याच्या पडद्यावरील, स्टेजवरील कलेला जज करणं मला पटत नाही. हरेक कलाकार हा एक माणुस असतो. तुम्हाला त्याचं काम आवडत म्हणुन त्याने त्याच्या आयुष्यात काहीच चुका करु नये आणि अगदी परिटघडीप्रमाणे आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायलाच पाहिजे अशी अपे़क्षा ठेवण्याला काही अर्थ नाही. पैसा आणि प्रसिद्धी तुम्हाला सुख किंवा मनःशांती मिळवून देऊ शकत नाही हे काही दिवसांपूर्वी चेस्टर बेनिंग्टनच्या आत्महत्येवरुन कळून येते. मला स्वतःला जॉनी डेपचं काम आवडतं. त्याने निरनिराळ्या चित्रपटात साकारलेले सगळे पात्र कन्विंसिंग वाटतात त्यामुळे माझ्या आवडत्या हॅरी पॉटर पुस्तकातील गुढ वलय लाभलेल्या गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्राला पडद्यावर जिवंत करण्याचं काम जॉनी डेप करतोय हे माझ्यासाठी सोने पे सुहागा आहे.
हॅरी पॉटर हा त्याच्या चाहत्यांसाठी फार संवेदनशील विषय आहे. त्यावर असलेलं प्रेम, प्रत्यक्ष आयुष्यात त्याचं असलेलं स्थान हे सर्व मान्य पण म्हणुन रोलिंगला एखाद्या चाहत्याला ट्विटरवर ब्लॉक करेपर्यंत वेळ यावी इतपत तिच्या निर्णयाला कोसणं वा आक्षेप घेणं हे बरोबर आहे का?
एका कल्पोकल्पित जगातील पात्रांप्रती असलेल्या प्रेमामुळे त्याच्या निर्मिकाला धारेवर धरणे हे कितपत चांगलय?
तसेच हॅरीचं बालपण हे सगळ
तसेच हॅरीचं बालपण हे सगळ कौटूंबिक हिंसाचारामधे येत असताना >> हे काही कळलं नाही?
===
बाकी लेखातील प्रश्नाबद्दल मी द्विधा मनस्थितीत आहे.
नुकताच केविन स्पेसि आणि रोमन पोलन्सकी बद्दल हा विचार करून डोकं खराब झालं पण उत्तर मिळालं नाहीच
अरे त्याचे पालक (काका मावशी)
अरे त्याचे पालक (काका मावशी) हे त्याला वाईट वागणूक द्यायचे ना म्हणुन.. लोक त्यालाही हिंसाचाराच्या लेबलखाली टाकतात भले तो मानसिक का असेना म्हणून लिहिलयं..
बाकी लेखातील प्रश्नाबद्दल मी द्विधा मनस्थितीत आहे.
नुकताच केविन स्पेसि आणि रोमन पोलन्सकी बद्दल हा विचार करून डोकं खराब झालं पण उत्तर मिळालं नाहीच Uhoh>>हं
मला वाटतं ते child abuse गटात
मला वाटतं ते child abuse गटात येईल. domestic violence मधे जोडीदार असतो abuser आणि victim.
बरोबर
बरोबर
माझे हे मत फक्त कास्टिंग
माझे हे मत फक्त कास्टिंग विषयी आहे.
जॉनी डेप हा कलाकार मला आधीपासूनच आवडतो. आणि जर त्याचं टीम बर्टन बरोबर काम बघता ही व्यक्ती गेलर्ट ग्रींडलवाल्डचा रोल चांगला करेल याची खात्री वाटते.
पण माय फर्स्ट प्रेफरन्स वाज बेनेडिक्ट कंबरबाच.
जॉनी डेप माझे मत कधीपण. तो
जॉनी डेप माझे मत कधीपण. तो माझ्याच वयाचा आहे. मुलगी माझ्या मुलीच्या वयाची. म्हणून मी त्त्याला फॉलो करते. हर्ड ने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डिवोर्स घ्ययला लावून स्वतः लग्न करवले. गोल्ड डिगर मेली. तेव्हाच ये तो हो के रहेगा जी डिवोर्स असे मनात आले होते.
जे के रॉलिन्ग कास्टिंग चे निर्णय घेते का? का स्टुडिओ घेते? एकदा हक्क विकून पैसे ब्यांकेत आल्यावर तिचा त्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीवर काय हक्क राहतो? हक्क सोड्म बाईगं मंत्रम. लेट द कास्टिंग डिरेक्टर डिसाइड.
पण माय फर्स्ट प्रेफरन्स वाज
पण माय फर्स्ट प्रेफरन्स वाज बेनेडिक्ट कंबरबाच.>> मला मात्र तो डेपच्या मानाने नवखा वाटतो.. अधिक रोलिंगच्या मनातली गेलर्ट ची प्रतिमा यातपन तो फीट बसायला हवा ना.. कंबरबॅच खुप मस्त कलाकार आहे पण त्याच्या मानाने जॉनी डेपने फार वर्साटाईल भूमिका केल्या आहे अस मला वाटत.
हर्ड ने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डिवोर्स घ्ययला लावून स्वतः लग्न करवले. गोल्ड डिगर मेली.>> अमा
जे के रॉलिन्ग कास्टिंग चे निर्णय घेते का? का स्टुडिओ घेते? एकदा हक्क विकून पैसे ब्यांकेत आल्यावर तिचा त्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीवर काय हक्क राहतो? हक्क सोड्म बाईगं मंत्रम. लेट द कास्टिंग डिरेक्टर डिसाइड.>>माझ्या माहितीप्रमाणे हो.. हॅपॉ पूर्ण सिरीज काढताना तिने नेटाने सगळे ब्रिटिश कलाकार घ्यायला लावले होते. सेवरस च्या भूमिकेसाठी अॅलन रिकमन्चा पाठपूरावा सुद्धा केला होता. काहीतरी हिस्सा असेलपन ना प्रोडक्शन मधे तिचा अस मला वाटत.
ओह येस अमा..
ओह येस अमा..
जे के रोलिंग निर्मात्यांपैकी एक आहे.
फँटॅस्टीक बीस्ट अँड व्हेअर टू
फँटॅस्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम... हा खुपच सुमार सिनेमा वाटला.
१. तेच ते कथानक व कच्चे दुवे...
२. ओढुन तानुन केलेले विनोद...
३. उत्सुकता ताणुन धरन्याचा अभाव...
खुपच प्लॅट वाटला हा चित्रपट
आपल्याकडे संजय दत्त एका
आपल्याकडे संजय दत्त एका राष्ट्रीय गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना जेलमधून आतबाहेर करून फुल विनम्रता के साथ मुन्नाभाई आणि लगे रहो सारखे बापूपट करू शकतो आणि लोकं त्या चित्रपटांचा स्विकारही करतात ... हेच सलमानबाबतही म्हणू शकतो. सदोष मनुष्यवधाचा अपराध केला असतानाही नुसत्या नावावर चित्रपट चालतो त्याच्या.. अजूनही छोटीमोठी उदाहरणे देता येतील. तर मॉरल ऑफ स्टोरी - कलेला कलेच्या जागी ठेवणे भारतीयांकडून शिकायला हवे !
हर्ड ने त्याला प्रेमाच्या
हर्ड ने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डिवोर्स घ्ययला लावून स्वतः लग्न करवले. गोल्ड डिगर मेली >> किंवा जॉनी डेप ला म्हातारचळ लागलेला असेही म्हणू शकतो
जॉनी डेप त्याच्या पायरेट्सच्या इमेजमधून बाहेर पडून काम करणार असेल तर सुदैव.
किंवा जॉनी डेप ला म्हातारचळ
किंवा जॉनी डेप ला म्हातारचळ लागलेला असेही म्हणू शकतो >> का ते का? हर्डला भरीस पाडल होत का त्याने लगीन कर म्हणून?
जॉनी डेप त्याच्या पायरेट्सच्या इमेजमधून बाहेर पडून काम करणार असेल तर सुदैव.>> ओह कमॉन पायरेट्स सुरु असताना त्याने कित्येक चित्रपटात काम केलं त्याच कुठं दिसला तो पायरेट इमेज मधे?
Charlie and the Chocolate Factory, Finding Neverland, Alice in Wonderland, The Tourist, Black Mass आणिक कितीतरी.. यातले तुम्ही किती पाहिले? बरं असे तसे पण नाही उलट हे असे मुव्हीज ज्याकरता त्याला बरेच नॉमिनेशन आणि अवॉर्ड भेटले..उग्मलातरी यात कुठे त्याची पायरेट इमेज जाणवली नाही..
(जोनिभाई का नाम सुन के आयला
(जोनिभाई का नाम सुन के आयला इधर, पर कुछ अलगीच दुनिया मालूम पडती बाप, खिस्को इधर से, नै तो ये लॉग तुमको भी ब्लॉक करके छोडेगा..... )
अॅमी शी सहमत.
अॅमी शी सहमत.
स्पेसी आणि इतर केसेस मध्ये कन्फेशन किंवा अनेक व्हीक्टीम असल्याने दोष देऊन काट मारणं सोपं गेलं. इकडे तसं नाही. त्यामुळे दिली भूमिका तर चांगलंच आहे.
कलेला कलेच्या ठिकाणी या मुद्द्याला मात्र पूर्ण विरोध. अत्याचार करून कसली डोंबलाची कला !!!
माझं मत म्हणाल, तर एखाद्या
माझं मत म्हणाल, तर एखाद्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याला धरुन त्याच्या पडद्यावरील, स्टेजवरील कलेला जज करणं मला पटत नाही.≥>>>>>>>>
आपल्याकडे याच्या उलट होतं. लोक लेखक/गायक/खेळाडू/नट यांच्या पब्लिकला दिसत असलेल्या प्रतिमेला खरे मानतात. स्वतःच्या घरात हे लोक इतर सामान्यांसारखेच आहेत हे कळले की टीकेची झोड उठवतात. हे टीका करणारे कितपत स्वतःशी प्रामाणिक असतात?
मला डेपने केलेलं
मला डेपने केलेलं ग्रिंंडेलवाल्डचं काम खूप आवडलं ... मी त्याच्या चाहत्यांपैकी आहे त्यामुळे मारहाणीच्या आरोपांवर विश्वास बसला नाही .. पण जर ठोस पुरावे समोर आले असते तर डेपचे जुने आणि नवे सिनेमे परत पहावलेच नसते .....