भयाण शांतता, अधून मधून येणारी वाऱ्याची एखादी झुळूक, दिवसभर असह्य ऊन, अंगातून वाहून वाहून सुकलेला घाम, सुकलेले तोंड, समोर भकास वाळवंट आणि खूप खूप रिकामा वेळ. समोरच्या रखरखणार्या वाळवंटाकडे बघायला पण त्रास होतोय. जास्त हालचाली करून एनर्जी वाया घालवायची नाही म्हणून एका जागी बसून बसून जाम कंटाळा आलाय. दुपारी AC साठी गाडी चालू केली तेव्हा लावलेली गाणी तेवढाच एक विरंगुळा. बाकी पूर्ण वेळ करायला काही काम नाही आणि रिकाम्या वेळात डोक्यात चालू सतत असलेले विचार, विचार आणि विचार....
ते आईनस्टाईनचे वाक्य आहे तेच खरं, माणूस किती मूर्खपणा करू शकतो याला मर्यादा नाही. कंपनीने इतकी सगळी सिस्टीम व्यवस्थित बनवली आहे त्या सगळ्यावर मी माझ्या मुर्खपणाने मात केली. सगळ्या महत्वाच्या सेफ्टी गाईडलाईन्स कडे ओव्हर कॉन्फिडन्स आणि घाई घाई मध्ये दुर्लक्ष केलं.
रेडिओ शिवाय बाहेर पडू नका. डेस्टिनेशन,जाण्याचे आणि येण्याचे रूट बोर्ड वर एन्ट्री करून तुमच्या कलीग ला इन्फॉर्मेशन देऊन जावा. गाडीचा टॅंक कायम अर्ध्या पेक्षा जास्त भरलेला हवा. लंच नंतर डिप डेझर्ट मधल्या व्हीसीट टाळा. गाडीत एक शोव्हेल कायम असू द्या, एक ना अनेक... या सगळ्या चुका करून मी अजून भरीत भर म्हणजे वापरात नसलेल्या रोड वर गाडी घातली.
इतका सगळा मूर्खपणा पण पचला असता जर मी यासीनच्या रेडिओ वरून इसिड्रोला किंवा सुरेशला सांगितले असते की मी 67 ला चाललो आहे. मी नवीन रूट वर सापडलो नसतो तरी कोणाचे तरी डोकं चाललंच असतं जुना रूट चेक करायचे. आतापर्यंत मी मस्त जेवण करून रूमवर झोपलेलो असतो. सकाळ पासून काही काम नसल्यामुळे तेच तेच विचार डोक्यात घोळत होते. विचार ही गोष्ट पण किती वैतागवाणी आहे. काही झालं तरी थांबू म्हणून थांबवता येत नाही.
चला डिनरची वेळ झाली.....
अर्धी स्निकर्स, 4 ड्राय फ्रुट आणि थोडेसे पाणी. आजचा कोटा संपला !
सकाळ पासून सव्वा लिटर पाणी संपलं. आज जितका कोटा घ्यायचा ठरवलं होतं त्यापेक्षा थोडं जास्तच ! काल रात्री लघवीला जाऊन आलो. सकाळ पासून एक दोन वेळा आलेले लघवीच्या फिलिंग कडे मुद्दाम दुर्लक्ष केले. नंतर जरी त्रास होणार असेल तरी आत्ता शक्य तेवढे पाणी शरीरातून बाहेर टाकणे टाळायला हवे. गाडीतला पोर्टेबल कम्प्रेसरची पाईप कापून आणि क्लिनिंगचे कापड फाडून बाटल्या जोडल्या आहेत. बघू या डिस्टीलेशन होईल का ! घाम तरी साठवता येत नाहीये बाटलीत टाकला की लगेच वाळून जातोय. पहाटे पहाटे वायपर साठी ठेवलेले पाणी ओढून काढायला हवे. ते जितके जास्त निघेल तितकं बरं.
दुपारी गाडी खूप वेळ चालू ठेवावी लागली, पेट्रोलचा काटा बऱ्यापैकी खाली गेलाय. फारतर उद्या दुपार पर्यंत पेट्रोल पुरेल. AC मुळे पाण्याचे आणि जेवणाचे प्रमाण कमी असून पण जास्त विकनेस जाणवत नाहीये. पेट्रोल संपल्यावर खरी परीक्षा चालू होणार आहे. परवा पासून गाडीतले सीट फाडून जाळायला सुरुवात करायला लागेल. रेस्क्यू टीमला धूर दिसला तर शोधाशोध करायला बरे पडेल.
रात्री टॉर्च चालू करून आजूबाजूला काही प्राणी दिसले तर पकडायचा प्रयत्न करावा का ? ह्या भुसभुशीत वाळूत ते पटकन आत घुसू शकतील. पकडणे जमेल का? पकडताना चावले तर ? विषारी असतील तर? खाताना त्यांचा विषारी भाग कोणता हे न कळून खाल्ला गेला तर ?
पण आपला प्रॉब्लेम खाणं नाहीचे, पाणी आहे. न खाता आपण जगू शकू पण पाण्याशिवाय नाही. पाणी कसं वाचवायचे किंवा मिळवायचे हा विचार केला पाहिजे. डिस्टीलेशन जमायला पाहिजे, बरेच पाणी वाचवता येईल. पण बाटली गार न करता डिस्टीलेशन होईल का ? ढग गार झाल्याशिवाय पाऊस पडत नाही. पाण्याची वाफ फक्त दुसऱ्या बाटलीत गेली तर फायदा नाही. ती गार व्हायला पाहिजे. बाटल्यांमध्ये ट्यूब फक्त भोक पाडून खुपसली आहे. कापडाने बांधली आहे. या सगळ्यातून वाफ लिक झाली तर? आपल्याकडे सिलंट किंवा डक्ट टेप पण नाही. याला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. सीट मधला कापूस काढून त्याच्या आजूबाजूला कोंबून मग ट्यूब बांधावी का ? दुसरं काय आहे जे सील करायला वापरता येईल. च्युइंग गम? येस्स च्युइंग गम वापरता येईल. चार आहेत. पण च्युइंग गम चावून चावून नंतर जास्त तहान लागेल का ? लागेल कदाचित. पण हा प्रयत्न वर्थ आहे. करून बघायलाच हवा.
आता बाटली गार कशी करणार. AC समोर धरून ? जमू शकेल. पण पेट्रोल संपल्यावर काय करणार ? AC चा कुलंट काढता येईल का ? तो मुळात थंड असतो म्हणून वापरतात की फक्त त्याची heat transfer efficiency जास्त असते म्हणून वापरतात? अरे नाही यार, कुलंट तर रेडीएटर मध्ये असतो. गाडीत AC साठी गॅस असतो. AC चे कुलिंग कमी झाले की मेकॅनिक गॅस भरायला सांगतो. आतमधली हवा त्या गॅसच्या संपर्कात आणून गार करत असतील. तो गॅस काढता येईल का ? तो कुलिंग करू शकेल का ? एखाद्या बॉक्स मध्ये तो स्टोअर करता येईल का evaporate होईल? च्यायला असले प्रश्न मला त्या इंजिनिअरिंगच्या रेफ्रिजरेशनच्या लेक्चरला का नाही पडले ? तेव्हा पोरींकडे बघत बसण्यापेक्षा जरा शिकवण्याकडे लक्ष दिलं असतं तर आत्ता फायदा झाला असता
दुसरं काय आहे जे गार करायला वापरता येईल? Fire extinguisher? तो वापरून पण थंड पणा आणता येते ना ? पण तो CO2 वाला असतो, गाडीतला पावडरचा आहे. त्याचा उपयोग होणार नाही. अजून काय आहे जे थंड करायला वापरता येईल? पोर्टेबल कम्प्रेसर ? येस तो पण वापरता येऊ शकेल. हवा कम्प्रेस करून रिलीज केली की थंड असते. विमानाचा ac तसाच चालतो. पण ती हवा एकदम छोट्या वेंच्युरी मधून रिलीज करतात म्हणून गार असावी. गाडीच्या टायर मधून हवा सोडताना पण गार लागते. कम्प्रेसरची हवा वापरून बघू या. पण प्रॉसेसिंग प्लांट मध्ये जी कम्प्रेसड एअर असते ती कुठं गार असते ? काही चुकतंय का ? नाही. प्लांट मधली एअर कम्प्रेशन नंतर आफ्टर ड्रायर मधून जाते ते त्यातलं सगळं moisture काढून घेण्यासाठी असतं. म्हणजे पोर्टेबल कम्प्रेसरने बाटली थंड करता येईल. नाही. पोर्टेबल कम्प्रेसर साठी गाडी चालू पाहिजे. आपण पेट्रोल संपलं की काय करायचं हा विचार करतोय.
fire extinguisher कम्प्रेस्ड असणारच त्याशिवाय तो चालेल कसा ? त्यातून हवा आणि पावडर बाहेर पडली की ती पण थंडच असू शकेल. ती वापरता येईल का ? ती खूप फोर्स ने बाहेर येईल, इतकीशी प्लॅस्टिकची बाटली कुठच्या कुठं उडून जाईल. एखादं कापड किंवा सीट मधला स्पंज दारावर बांधून गार केला आणि तो लगेच बाटली ला लावला तर ? नाही. उपयोग होणार नाही, युसलेस आयडिया. फोर्स कमी करायला काय वापरता येईल? स्टीलचा इमर्जन्सी बॉक्स ? त्यात fire extinguisher ने हवा आणि पावडर सोडून बाटली टाकली तर ? बॉक्सच्या वरच्या बाजूने बाटली आत सोडता येण्यासारखे भोक करून हा प्रयन्त करता येईल. पण तो वापरून किती वेळा डिस्टीलेशन करता येईल? हा पर्याय नाही चालला तर दुसरं काय? पोर्टेबल कम्प्रेसर गाडी बंद असताना चालवता येईल का ? डायरेक्ट बॅटरी ला जोडला तर ? येस करून बघता येईल. बॅटरी किती वेळ तो कम्प्रेसर चालवू शकेल ? गाडी चालू असताना डायनमो बॅटरी परत चार्ज करतो ना ? आता ते होणार नाही म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होत राहणार. बॅटरीची आणि कम्प्रेसरची कपॅसिटी यात काय रिलेशन असेल ? किती वेळात बॅटरी किती खाल्ली जाईल? शिवाय या इतक्या छोट्या कम्प्रेसर मधून गार हवा येईल का ?
अरे यार सगळ्यात बेसिक गोष्ट आपण विसरलो, बाटली गार करून उपयोग नाही. ट्यूब गार करायला पाहिजे. वाफ बाटलीत येणार नाही. ती वरच्या ट्यूब मध्ये साचून राहणार. ज्या बाटलीत युरिन आहे त्याचे आणि ट्यूबचे सील पक्के पाहिजे म्हणजे वाफ ट्यूब मध्ये येईल आणि ट्यूब गार केल्यावर त्या वाफेचे पाणी होऊन ती बाटलीत पडेल.
एवढा सगळा उद्योग करून किती पाणी वाचेल नक्की? जेवढं वाचेल तेवढं वाचेल. दुसरा पाण्याचा काही सोर्स नाही. हे सगळं वर्क आउट नाही झालं तर युरिन प्यायला लागेल.
आपल्याला इथे ड्राय आईस बनवता येईल का ? इंजिन मधून CO2 वगैरे बाहेर पडत असतो त्यातल्या CO2मधून ड्राय आईस बनवता येईल का ?
"च्यायला काहीही !!!! अजून थोड्या वेळाने म्हणशील की गाडीचे इंजिन वापरून रॉकेट बनवून इथून बाहेर पडता येईल का?"
"हा हा हा व्हेरी फनी !"
"मी फक्त ब्रेन स्टोर्मिंग करतोय. अशाच गोष्टीतून एखादी जीव वाचविणारी आयडिया सापडू शकेल"
" इतक्या प्रोफेशनल आणि हुशार लोकांना जे सुचलं नाही ते तुला इथे बसून सुचणार आहे का ?"
"ते माहीत नाही. पण इतकं नक्की आहे की जो काही विचार आणि जुगाड करायचाय तो आज आणि उद्या पर्यंत. एकदा AC बंद पडला, पाण्याचा आणि अन्नाचा सप्लाय कमी झाला की मेंदू पण धड लॉजिकली विचार करू शकणार नाही. शिवाय मेंदूला वेगवेगळे भास होतात असे मी ऐकले आणि वाचले आहे, तसं काही झालं तर?"
मी स्वतःशीच बोलतोय का ? आणि का? दुसरं काय करणार? कोण आहे इथे? दुसरा कोणी माणूस बघून सुद्धा तीस ते पस्तीस तास होऊन गेले. अजून किती दिवस या वाळवंटात असणार आहे देव जाणे. स्वतःशीच बोलण्यापेक्षा त्या कास्ट अवे मधल्या हिरो सारख एखाद्या वस्तूला मित्र मानून गप्पा मारत बसावं का ? पण कशाला ? गाडीला ? नको यार उद्यापर्यंत रेस्क्यू टीम आली नाही तर ह्यातलेच ऑइल काढायचे आहे, सीट्स कार्पेटस फाडायचे आहेत. दुसरं काय ? तो बॅटरी संपलेला मोबाईल ? येस तो चालू शकेल. नाहीतरी आपले सगळे सिक्रेट त्याला माहित आहेत. बोअर झालो की आपण त्याच्यासोबतच टाईमपास करतो. काही पटकन हवं असेल तर मोबाईल वरच गुगल आपल्याला उत्तरं शोधून देतो. हां हे बरंय. बॅटरी डेड झालेला आपला मोबाईल... काय नाव द्यावं त्याला?
सॅम ?
"चला, सूर्य उगवायच्या वायपर साठी असलेलं पाणी ओढून काढू या! "
नंतर आहेच परत दिवस भर हे सुंदर वाळवंट, तळपत्या सूर्याने निर्माण केलेलं आल्हाददायक वातावरण आणि मैं और मेरी तनहाई!
सही..भारी.. उत्सुकता तर आहे
सही..भारी.. उत्सुकता तर आहे ह्यातुन कसे पार होणार ह्याची , पण ही प्रोसेस पण मस्त वाटत आहे.
उत्कंठावर्धक!
उत्कंठावर्धक!
पण खुप लहान भाग लिहिता.
मस्तच. उत्सुकता वाढली आहे.
मस्तच. उत्सुकता वाढली आहे. पुढे काय होणार याची.
च्यायला असले प्रश्न मला त्या
च्यायला असले प्रश्न मला त्या इंजिनिअरिंगच्या रेफ्रिजरेशनच्या लेक्चरला का नाही पडले ? तेव्हा पोरींकडे बघत बसण्यापेक्षा जरा शिकवण्याकडे लक्ष दिलं असतं तर आत्ता फायदा झाला असता >>>
हायला!! किती रिलेट झालं!
जबरदस्त. पुभाप्र.
जबरदस्त.... वाचता वाचता असे
जबरदस्त.... वाचता वाचता असे वाटतेय की आपणच वाळवंटात अडकून पडलोय...
मस्त चाललीय कथा..!
मस्त चाललीय कथा..!
तुमच्या कथेमुळे आता आम्ही पण अडकलोय वाळवंटात! काढा आम्हालाही बाहेर... लवकर!!
उत्कंठावर्धक! मस्त्
उत्कंठावर्धक! मस्त्
छान !
छान !
मस्त चाललीय कथा..!
मस्त चाललीय कथा..!
तुमच्या कथेमुळे आता आम्ही पण अडकलोय वाळवंटात! काढा आम्हालाही बाहेर... लवकर!! + ११११
मस्त !!!
मस्त !!!
जबरा चाललीय गोष्ट!
जबरा चाललीय गोष्ट!
मस्तंच.. पुभाप्र...
मस्तंच.. पुभाप्र...
जबरा चाललीय गोष्ट!
जबरा चाललीय गोष्ट!
मस्त चाललीय कथा...
मस्त चाललीय कथा...
अवांतर : कंप्रेसर, fire extinguisher, Moisture, डिस्टीलेशन ह्यांना मराठीत काय म्हणतात कुणाला माहीत आहे का?
है कोई माई का लाल?
fire extinguisher म्हणजे
कथा अजूनच उत्कंठावर्धक होत चालली आहे !! पु भा प्र (घायकुतीला आलेला उतावळा बाहुला )
fire extinguisher म्हणजे अग्निशामक
Moisture : ओलावा / आर्द्रता
compresor दाबणारा /संकुचित करणारा
distillation : ऊर्धपातन
कथेमधील इंग्रजी शब्द खटकत
पहिल्या भागापासून सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद. कथेचे अजून दोन भाग राहिले आहेत.
कथेमधील इंग्रजी शब्द खटकत आहेत का ?
काही काही वाक्यात मराठी पेक्षा इंग्रजी शब्द जास्त आहेत हे मलापण जाणवते आहे. पण कोणताही इंजिनिअर विचार करताना असाच करतो म्हणून ते शब्द तसेच ठेवले आहेत. नेहमीच्या वापरात नसलेल्या मराठी शब्दांनी कथेचा फ्लो जाईल. त्यामुळे इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत.
इग्नोर करा ओ... मराठीचा पुळका
इग्नोर करा ओ... मराठीचा पुळका या लोकांना माबो वरच येतो... बाहेर इंग्रजी हिंदी शब्द वापरत असले तरी..
मला नाही खटकले. रोजच्या
मला नाही खटकले. रोजच्या व्यवहारात सहजपणे जे इंग्रजी शब्द वापरले जातात ते तसेच वापरले तर काही बिघडत नाही
मला पण अज्जिबात खटकले नाहीत
मला पण अज्जिबात खटकले नाहीत.उलट flow मध्ये वाचलं जातंय!ते तसच ठेवा plz
बघा कित्ती इंग्रजी शब्द वापरले आता मी
अतरंगी, म्प्लीज ओढून ताणून
अतरंगी, म्प्लीज ओढून ताणून वापरात नसलेले पर्यायी मराठी शब्द मुळीच वापरु नका. कथेचा रसभंग होतो त्याने.
anjali_kool
anjali_kool
घायकुतीला आलेला उतावळा बाहुला...
ह्याचा अर्थ काय ? आणि कुणाला उद्देशून आहे हे..
आणि इंग्रजी मराठी शब्दभेद मी केलाच नाही ..थोडंसं कुतुहूल होतं म्हणून शब्दांचे मराठी पर्यायी शब्द विचारले कारण मलाही माहीत नव्हतं..
लेखकाला मी मराठी शब्द वापरा अशी गळही घातली नाही..
त्यांनी कथेतल्या पात्राप्रमाणे व कथेप्रमाणे बरोबर लिहलयं आणि मलाही कुठेच खटकलं नाही ते ..
ऊगाच चुकीचा अर्थ काढून नसलेल्या गोष्टीचा बाऊ करू नये कुणी ..
मस्त चाललीये कथा. पुढचा भाग
मस्त चाललीये कथा. पुढचा भाग टाका पटकन
मला नाही खटकले. रोजच्या व्यवहारात सहजपणे जे इंग्रजी शब्द वापरले जातात ते तसेच वापरले तर काही बिघडत नाही Happy >> + १
मराठी शब्द वापरले अस्ते तर उगाचच किचकट वाटली असती.
इंग्रजी शब्द मराठीत ट्रन्स्लेट करायला सोप जात पण मराठी शब्द अस्ते तर त्याचे योग्य प्रतिश्ब्द डोक्यात आला असता की नाही शंका आहे.
अजय,
अजय,
त्यांनी ते पुढे काय होईल ते जाणून घ्यायच्या उत्सुकतेने घायकुतीला आलेला बाहुला असे लिहिले आहे. त्यांचा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला नाही. तो फक्त तुमच्या प्रतिसदानंतर आल्याने तुम्हाला तसे वाटत असावे.
माझ्या प्रतिसदाबद्दल, मला पण मराठीत लिहिताना जास्त इंग्रजी शब्द वापरावे असे वाटत नाही. पण आपला इंजिनिअर (अभियंता :डोमा:) त्याच भाषेत बोलेल आणि विचार करेल म्हणून ते शब्द तसेच लिहिले आहेत.
@अजय
@अजय
मी 3रया भागाला reply द्यायला आले तेव्हा तुमचा प्रश्न पहिला सो अगदी सहज उत्तर दिले.
उतावळा बाहुला म्हणजे पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत असलेला उतावळा असा आहे ते.
आणि तुम्हाला ते शब्द खटकले म्हणून तुम्ही विचारले असे मला आज्जीबतच वाटत नाही तुम्ही कुतूहल म्हणून विचारले हे मला लगेच कळले .
कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
ओके अंजलीजी....
ओके अंजलीजी....
काही गैरसमज नाहीये..
चुकुन उलटसुलट बोलून गेलो असेल तर साॅरी हा...