"Thank You"

Submitted by मी@प्रज्ञा on 28 October, 2017 - 11:49

म्हणजे तसा नेहमीचाच दिवस , तीच नेहमीची बस आणि तोच रोजचा प्रवास कोल्हापूरचा. मी बसमधे चढले आणि सवयीनुसार खिड़की जवळची जागा पकडली. बस सुरु झाली , तिने वेग पकडला , काही अंतर गेल्यावर बस चालकाने कचकन ब्रेक दाबला बसने थोडे वळण घेतले आणि ती थांबली .
आम्ही सगळे दचकलो, घाबरलो, काय झाले हे कळण्यासाठी बाहेर पाहू लागलो, तेव्हा कळले एक मिनी बस इंडिकेटर न लावताच एका ठिकाणी वळत होती आणि म्हणून आमच्या बस चालकाने , प्रसंगावधान राखून त्वरीत बस बाजूला घेतली आणि मोठा अनर्थ टळला!! आमच्या बसमधील प्रवासी आणि मिनी बसचे प्रवासी , चालक यांच्यात थोडी बाचाबाची झाली , शेवटी जीवाशी खेळ!! हे सगळं इतर सुज्ञ प्रवाशांमुळे तिथंच आटोपलं!!
बस पुन्हा सुरू झाली, प्रवास पुन्हा चालू झाला, बस कोल्हापूरमध्ये पोहचली, प्रवासी उतरू लागले, उतरता ,उतरता आजच्या टळलेल्या अपघाताची चर्चा करू लागले, देवाचे आभार मानू लागले, मी पण जागेवरुन उठले , बसच्या दाराजवळ आले, पण परत मागं फिरले, बस चालकांकडे गेले आणि म्हणाले,
"Thank You, तूम्ही आज आमचे प्राण वाचवले!!!!" , हे ऐकल्यावर ते दोन क्षण स्तब्ध झाले, कदाचित त्यांना कोणाकडून "Thank You" अपेक्षित नसावं, ते फक्त हसले, पण त्या हसण्यात एक प्रकारचं समाधान होतं, आपण रोज जे काम करतो त्याची पावती त्यांना एका "Thank You " नं दिली होती .
आज सगळयांनी देवाचे आभार मानले, पण आज खरा देव तर ते बस चालक होते,ज्यांनी आज आमचे प्राण वाचवले आणि कदाचित यापूर्वी अनेकांचे वाचवले असतील. कोणी त्यांना धन्यवाद म्हटलं असेल कि नाही ??
पण मला मात्र आज त्यांना धन्यवाद दयावेसे वाटले,त्यामुळे मलाच बरं वाटलं, निदान आज दोन क्षण तरी कोणीतरी समाधानाने हसलं!!
असा एक "Thank You" अनेकांना समाधान देऊन जातो.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Thank You!
हा अनुभव येथे लिहिल्याबद्दल. Happy
मायबोलीवर स्वागत!
पुढील लेखनास शुभेच्छा!

व्वा!!
स्वीट अँड सिंपल
मला खूप रीलेट झाली..
तसा माझाही बस मधला एक अनुभव आहे म्हणून बहुतेक!.

पुढील लेखनास ट्रकभरून शुभेच्छा!!!!!!