वरदहस्त

Submitted by प्रशांत तिवारी on 24 October, 2017 - 04:10

IMG_20171023_175547.JPG
वरदहस्त
(खालील प्रसंग माझ्या मित्राच्या बाबतीत खरोखर घडलाय त्यात थोडा बदल करून माझ्या तोकड्या कल्पना शक्ती प्रमाणे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय).
मी त्या वेळेस 15-16 वर्षाचा असेल तेव्हाची ही घटना
आम्हा मुलांच्या उन्हाळी परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या होत्या आता वेध लागले होते ते फिरायचे...दरवर्षी आम्ही सर्व कुटुंब सुट्ट्या लागल्या की अष्टविनायकाला जात असतो याही वर्षी हा प्लॅन ठरला असल्याने सर्व जण 2 दिवस आधीच आमच्या आजोळी पोहोचलो होती काका काकू आत्या बहिण अगदी सर्व गोतावळा...गप्पांना उधाण आल होत तर बायकांना फिरायला जायचं म्हणून अजिबात उसंत मिळत नव्हती. सर्व माणसे राजकारण, गावातील चर्चा यावर गप्पा मारत होते ....तर आम्ही पोर घराच्या कोपऱ्यावर किराणा दुकान होत व त्यालगतच लिंबाचं झाड व पार होता तेथे सकाळपासून गोट्यांचा डाव मांडून होतो. सर्व जण एकत्र असल्याने जाम मजा येत होती. छान त्या झाडाच्या सावलीखाली उनही लागत नव्हतं. आमची लहान भावंडे आमची गोट्याची डब्बे सांभाळायला बसली होती. व खुळूम खुळूम आवाज करून हवा करत होती...पण हे काम करताना त्यांना काय कौतुक वाटले कोण जाणे ! दुपारची उन्ह वर येऊनही आम्हाला जेवायची शुद्ध नव्हती त्यामुळे आजी, आई आम्हाला ओरडून जेवायला बोलवत असल्याने तसाच आमचा शेवटचा डाव नंतर पूर्ण करू या बोलीवर तिथून सटकलो.
आत जाऊन आम्हाला मोठ्यांचा ओरडा खावा लागणार ही गोष्ट गृहीतच होती. ठरल्याप्रमाणे झालंही तसच पण काहींचा तो ओरडा वरकरणीही असायचा त्यांना ठाऊक होतं ही सुट्टी सोडली तर आम्हा भावंडांच एकमेकांकडे येन जाण खूप कमी असायचं तरी घरातल्या आजी, आईंना अस वाटाव आम्हीही मुलांना रागावतो यासाठी त्यांच्या सुरात सूर मिसळून थोडं रागवायचे.
संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आम्हा सर्व भावंडांना आजी हाथ पाय धुवून देवापुढे बसायला सांगून गणपती अथर्वशीर्ष म्हणायला लावत तसा तो आमच्या घरचा रिवाजच होता .गणपती हे आमच्या घराच आराध्य दैवत. आता सारखे गणेशउत्सवा मध्ये बाजारात गणपती मिळत नसत पण आमच्या शेता मध्ये विहिरी च्या काठावर एक झाडाखाली गणपतीची मूर्ती होती पण कशी आली आणि कुठून आली याची आजही कुणाला माहिती नाहीये, नवीन लग्न झालेल्यांना सर्वप्रथम दर्शनासाठीयाच ठिकाणी आणलं जात ..आजही आठवतंय शेंदुरामध्ये मढवलेली सुंदर मूर्ती होती ती even गावातली इतर घरेही त्या मूर्तीची पूजा करायची तर थोडक्यात बाप्पा आमच्या घरात श्रद्धास्थान होते.
उद्या अष्टविनायक यात्रेला निघायचं असल्याने आम्हा सगळ्यांना रात्री लवकर निजायला सांगण्यात आलं होतं. आणि आम्हीही दिवसभर खेळल्यामुळे दमून भागून लवकर झोपी गेलो. सकाळी लवकर जाग आली होती सार्यांनी पटापट आंघोळया करून सार सामान टेम्पोत ठेवायला सुरू केली होती कारण या प्रवासात स्वयंपाकाचं साहित्य ही घरातुनचं घेऊन जाणार होतो. कूठेही जायचं असेल तर खाण्याचं साहित्य आपलं असावं हा दंडकच होता जणू .ठरल्याप्रमाणे १५-२०जण होती अगोदर खाण्याचं साहित्य गाडीत चढवलं नंतर जेवण तयार करायची भांडी मग आम्ही सारी लहान मंडळी. कुणीतरी पुढे प्रवास छान व्हावा म्हणून चाकाखाली नारळ ठेऊन दिला होता.
गाडीत बसायला जागा कमी असून पण तो त्रास काहीच नव्हता कुठेतरी जायला मिळतंय हाच आनंद सगळ्यात मोठा होता.
अधूनमधून गाडी थांबवून आसपासची देवस्थाने करून घेत होतो. एकत्र कुटुंबाची मजा काय आहे ते आता आठवूनही मन भरून येतो. तर दिवसभर प्रवास करून सर्व जण दमले होते व संध्याकाळही झाली होती. जवळच एक खेड होत व त्याच्या आसपास रिकामं मैदान होत तर आजची रात्र तिथेच काढायची अस ठरवून उद्या पुढच्या प्रवासाला जायचं अस सर्वानुमते ठरवण्यात आल होत. सगळ्यांना सपाटून भूक लागली होती. मोठी माणसे तंबू लावत होती तर सर्व बायका स्वयंपाकाच्या तयारीच पाहत होत्या. ते खुलं वातावरण आणि ही काळी आई, चांदण्यांनी भरलं आभाळ रात्रीचा झोम्बणारा पण कमी त्रासाचा छान वारा जणू निसर्ग आपल्या सॊबत वर्षानुवर्षे सोबत आहे हे भासवत होता. रात्रीची सर्वांची जेवणे पार पडली होती. उद्याच्या प्रवासच नियोजन करत सर्व झोपेच्या आधीन झाली.
सकाळी पहाटेच तिथे कोपऱ्यात चार कपडे लावून आंघोळया करून घेतल्या होत्या आज कोणत्याही परिस्थिती मध्ये दोन गणपती करायचे होते. आम्हाला ते ठिकाण सोडेपर्यंत जवळपास सकाळचे ८ वाजले होते कारण दुपारचा स्वयंपाक करून घेतला होता रात्रीच जेवण त्याच वेळेस बनवून खायचं अस ठरवण्यात आल. पण काल आकाश निरभ्र होत तेवढं आज नक्कीच वाटत नव्हतं उन्हाळा असूनही पावसाळा ऋतू असल्याचं भासत होतो आम्हाला याच काही वाटत नव्हतं पण मोठ्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसत होती. पाऊस येणार नाही येणार या संभ्रमावस्थेत कसातरी दिवस पार पडला होता ठरल्याप्रमाणे आजचा मुक्काम महाड ला करायचा निश्चित झालं होतं. तरी त्या ठिकाणी जायला तीन ते चार तासांचा अवधी लागणार असल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला होता. जवळपास रात्रीचे १२.३० वाजून गेले होते व आम्ही गावात पोहोचलो. तोवर ढ गांनी वर चांगलीच गर्दी केली होती जो आज दिवसभर स्वतःला रोखुन ठेवत होता आता मात्र तो पाऊस मनसोक्त बरसन्याच्या इराद्या मध्ये होता व झालं ही तसच एव्हाना पाऊस सुरू होऊन १० मिनिटे झाली होती. एकतर रात्रीचा १ वाजत असल्याने सार गाव बंद होत साधं चिटपाखरूही नजरेला दिसत नव्हतं गाडी थांबवून कुठे स्वयंपाक करावा हा प्रश्न आ वासून उभा होता व आता तर पाऊस थांबायच नाव घेत नव्हता वरचेवर पाऊस वाढतच होता .तेवढ्या वेळेमध्ये अंधारात आजीचं गणरायाला साकडं घालण चालू होतं , "काय रं देवा का आमची परीकशा पातूस? आलू ना तुका भेटाया लांबून?" "का माझ्या लेकरा बाळाची हाल करतुया रं?"
काका आणि वडील पुढच्या केबीन मध्ये बसले होते त्यांनी एक शाळा पाहून गाडी कडेला थांबवली पावसानं आता रौद्र रूप घेतलं होतं आम्हा मुलांचेही भूक आणि झोपेवाचून हाल चालले होते.
आम्हाला गाडीतच बसवून स्वयंपाक करायचं सामान खाली घेत असताना आत्याने पाहिलं की ज्या मध्ये तेलाच्या पिशव्या होत्या त्या साऱ्या कुणाच्यातरी बसण्याने फुटून गेल्या होत्या. आता काय करायचं तेला शिवाय स्वयंपाक कसा? हा विचार करत असताना काका आणि बाबा डोक्यावर टॉवेल घेऊन कुठे दुकान उघड आहे का नाही ते पाहण्यास गेले तसा एवढ्या रात्री काही भेटण्याचा अंदाज नव्हताच पण तरीही ते जात होते जवळपास १५ मिनिटां नंतर ते परत आले होते पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं होती ती छोटी बॅटरी. खरतर मी बाहेरच डोकावत होतो बाबा व काकां सोबत एक धिप्पाड जवळपास ६ फूट उंची व रुबाबदार असा मिलिटरी चे कपडे घातलेला व डोक्यावर छत्री घेतलेला जवान होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत. काकांनी सांगायला सुरुवात केली गाडीकडे परत येत असताना हे आम्हाला रस्त्यात भेटले त्यांना मदत विचारली असता इथे आसपास काहीच उपलब्ध होण्यासारख नव्हतं पण आमचं सार कुटुंब एवढ्या अडचणीत आहे हे पाहिल्यावर दुसरा पर्याय त्यांनी आम्हाला सांगितला. एक आठवड्यापासून या जवानांचा कॅम्प इथेच जवळ पास लागला होता व प्रत्येकाला रूम्स ही होत्या व आज मात्र त्या जवानाची ड्युटी बाहेर असल्याने त्याची रूम ही रिकामी होती व त्याने आजची रात्र त्याच्या रूम वर राहायची परवानगी आम्हाला दिली होती व तिथेच आम्ही स्वयंपाक ही करु शकणार होतो. हे ऐकून आम्हा साऱ्या लोकांना आनंद झाला होत्या या अनोळखी ठिकाणी कुणा सैनिकाने आम्हाला मदत करणं खरंच मोठी गोष्ट होती.
काका व तो जवान पुढे केबिन मध्ये बसले व बाबा पाठीमागे आले. तो जसा रोड सांगत होता तसा आमचा टेम्पो जात होता १०मिनिट मध्ये आमचा टेम्पो एका मोठ्या इमारतीजवळ थांबल्याच आम्हाला जाणवलं. पण आमची गाडी त्या बिल्डिंग पासून बऱ्याच लांब उभी केली होती त्या जवानांच्या सांगण्याप्रमाणे. खरतर आम्हाला वाटलं त्या एन्ट्री गेट मध्ये आम्ही जाऊ पण बिल्डिंगच्या मागच्या साईडला जून छोट गेट होत..आताशी जरा पावसाणेही उघडीप घेतली होती. तर त्या छोट्या गेटने आम्ही सगळ्यांनी एन्ट्री केली व कडेला एक रूम होती बाहेरून तर वाटत होतं खूप जुनी असावी जस काय अडगळीचीच. एक-एक करत सार स्वयंपाकाचं सामान दाराजवळ आलेलं होत .त्या जवानांच्या म्हणण्यानुसार दरवाज्याजवळ आम्ही उभे राहिलो त्याने किल्ली लावून दरवाजा उघडून आम्हा सर्वांना आत घेतलं आमची सामान ठेवण्यासही मदत केली. खरतर अडचणीत असताना एखादी अनोळखी मदतही खूप जवळची वाटते. तर रूम तशी छोटी होती पण टापटीप गॅसच्या ओट्यावर थोडी खरकटी भांडी होती व एका पातेल्यात थोडा भात उरलेला होता व आसपास थोडा किराणा ही. त्या जवानाने त्या किराणा सामनातील काही साहित्य घेऊन तुम्ही स्वयंपाक करु शकता अस सांगितलं व नंतर सकाळपर्यंत इथेच झोपा अस सांगून निघून गेला. त्या गडबडीत आम्ही त्या जवानाचे आभार मानायचेही विसरून गेलो. उद्या सकाळी त्याचे आभार मानू अस ठरवलं. या साऱ्या प्रकारात रात्रीचे दिड वाजले होते आता जास्त स्वयंपाक न करता सरळ सगळ्यांसाठी खिचडी करण्यात आली व २.३० वाजता सर्व झोपून गेली रात्रीच्या प्रकारामुळे कुणाला लवकर जाग आलीच नाही तर सवयीप्रमाणे ८ वाजता आज्जीने सगळ्यांना उठवलं. जवळपास ९ वाजले होते व सर्वांचं आवरून झालं होतं मोठी मंडळी त्या कालच्या जवानाची वाट पाहत होते की तो आल्यावर पटकन या रूमची किल्ली देऊन त्याने केलेल्या मोठ्या मदतीमुळे आम्ही मोठ्या संकटातून वाचलो हे सांगून त्याचे आभार मानून पुढील प्रवासास निघणार होतो. पण ९.२५ झाले तरी काहीच हालचाल नव्हती म्हणून बाबा आणि काकाने त्या बिल्डिंग च्या ऑफिसात जाऊन चौकशी करायचे ठरवले.
बऱ्याच वेळा झाला तरी काका आणि बाबा यांचा पत्ता नव्हता आता सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली. जवळपासन अर्ध्या तासात दोघेही घरी आले बाबांनीतर आल्याआल्या खुर्चीवर बसून घेतल व काकाने निर्विकार चेहऱ्याने खाली बसला आज्जीने दोघांना विचारलं काय झालं. बाबा काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते काकांने सांगायला सुरुवात केली, आम्ही कालच्या जवानाचा खूप शोध घेतला पण ते कुठेच नव्हते शेवटचं पर्याय म्हणून आम्ही या बिल्डिंगच्या मिलिटरी ऑफिस ला गेलो तेथील साहेबांना काळ घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि कालच्या जवानाच वर्णन करून सांगितलं असता त्या नावाचा व वर्णनाचा कोणीही मनुष्य तिथे नव्हता अस समजलं. हे सर्व एक असताना आमच्या पायाखालची वाळू सरकली.अस कस होऊ शकत? भास एकाला किंवा दोघांना होऊ शकतात पण सगळ्या कुटुंबाला? काका पुढे सांगू लागले इथे जवान ८ दिवसापासून आहेत पण ट्रेनिंग असल्याने रात्रीची ड्युटी लावण्याचा प्रश्नच नव्हता आणि ती जी रूम आहे तिथे सगळं मिलीटरीच नादुरुस्त सामान ठेवलं जायचं...आज्जीने विचार केला याचा अर्थ काल अर्ध्या रात्री मदत करणारा मनुष्य दुसरा तिसरा कुणी नसून.......
हे सारं ऐकत असताना आज्जीच्या डोळ्यात पाणी आलं होतं आम्हाला काय चाललंय हेच समजत नव्हतं. आज्जीने फक्त एकच प्रश्न काकांना केला "नाव काय हुतं रं त्याच"? बाबांनी व काकांनी टेम्पो पर्यन्त आणताना त्याची प्राथमिक माहिती काढलीच होती नाव, गाव वगरे... काका जड अंतकरणाने म्हणाला "आज्जे, त्यांचं नाव होतं"
" विनायक शंकर महादेव"
आमची अष्टविनायक यात्रा इथेच सफल झाली होती.

https://www.facebook.com/prashant.s.tiwari

https://www.youtube.com/channel/UCsvB3X7OV2p7PMjpTEtch3g

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशांतजी, छान प्रसंग! सत्यकथा आहे का? असल्यास आपण आणि आपले कुटुंबिय भाग्यशाली आहात.
पुढील लेखनास शुभेच्छा !

शेवट अपेक्षित होता. कारण देवाची मदत करायची ही टिपिकल स्टाईल आहे Happy
जोक्स द अपार्ट, आवडले लिखाण. छान खुलवलेत.
अजून लिहा.. पुलेशु Happy

मस्त ... Happy
आपण आणि आपले कुटुंबिय भाग्यशाली आहात.
पुढील लेखनास शुभेच्छा !>+१

धन्यवाद रश्मिजी , अंबज्ञ, व्ही.बी. राहुल, ऋन्मेश , पियू, अंकू, मेघा, जागू , रिया, आबासाहेबजी....
तुमच्या नावावरून कोण लहान मोठ खरच माहित नाहीये पण आदरपूर्वक सर्वाना धन्यवाद ... या काही प्रतिक्रियांमुळे थोडा थोडका नाही तर मोठा हुरूप येतोय .... !