साहित्य :-
एम सील, कि-चेन साखळी , फेविक्रील रंग, वोर्निश , ब्रश
कृती :-
एम -सील प्रथम एकत्र करून घ्यावे. चांगले मळून त्याचा गोल तयार करावा.
एकत्र झाल्यावर ते साधारण पंधरा मिनटानी हळू हळू घट्ट होत जाते.
ते घट्ट होण्या आधीच त्याचे एक मोठा गोळा व पाच लहान गोळे बनून घावेत.
मोठ्या गोळ्याला आकार देऊन त्याची पाठ तयार करून ती चांगली सुकू द्यावी .
बाकीचे खूप छोटे गोळे घेऊन त्याचे पाय , डोके व शेपटी बनून घावी .
हे अवयव झल्यावर लगेच पाठीला चिटकऊन घ्यावे. कोणत्याही गमचा वापर न करता एम-सील नेच ते चीटकतात.
कासव पूर्ण वाळण्या आधी त्याची शेपटी निट दुमडून घ्यावी कि जेणेकरून त्यात चेन अडकवता येईल .
पूर्ण वळायला एक दिवस लागतो. त्या नंतर फेविक्रील रंगाने रंगून घावे.
रंग सुकले कि मग शेवटी वर्निश चा एकाच हात मारावा. वर्निश सुकायला साधारण एक ते दोन दिवस जातात.
ते निट सुकले कीच चेन शेपटीत अडकून घ्यावी .
झाले कासव तयार.
सूचना :-
एम सील वापरताना काळजीपूर्वक वापरावे. एकदा का ते कडक झाले तर त्याला कोणताही आकार देत यॆत नाही.
आणि त्यापासून बनवलेली कोणतीही गोष्ट हि वजनाने थोडी जडच असते.
कासवाचे -किचेन - भाग १ (विडिओ सहित )
Submitted by salgaonkar.anup on 10 October, 2017 - 23:59
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच.. पुभाप्र
भारीच..
पुभाप्र
तुमचे कासव तर छान बनलय
तुमचे कासव तर छान बनलय
हे सुद्धा अफलातून सुंदर बनवले
हे सुद्धा अफलातून सुंदर बनवले आहे.
खूप आवडल.
छान!!
छान!!