भारनियमन. आता का बरं?

Submitted by भरत. on 6 October, 2017 - 00:45

गेले काही दिवसापासून समाजमाध्यमांतून "आमच्याकडे इतके इतके तास भारनियमन आहे," अशी वाक्ये वारंवार दिसत आहेत. आज तर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरच भारनियमनाची ठळक बातमी झळकली.

"वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचे भारनियमन सुरु झाले असून शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. राज्यात २२०० ते २३०० मेगावॉटचे भारनियमन होत असल्याने कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आली आहे. त्यांना आता १० ऐवजी आठ तास रात्रीच्या वेळी वीज दिली जाईल."
तापमानातल्या वाढीमुळे शहरी भागात आणि चांगला पाऊस झाल्याने शेतीसाठी ग्रामीण भागात विजेची मागणी वाढली आणि तुटवडा झाला, असे बातमीत म्हटले आहे.

मोदी सरकारचे आताआतापर्यंतचे ऊर्जामंत्री पीयुष गोयल हे या सरकारमध्ये फार चांगली कामगिरी करणारे मंत्री मानले जातात. युपीए सरकारच्या काळातील तथाकथित कोळसा भ्रष्टाचारामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोळशांच्या खाणी बंदच पाडल्या होत्या. त्या मोदीसरकारने सुरू केल्या. त्यामुळे विजेचे उत्पादन वाढले. भारतात सध्या मागणीपेक्षा विजेचे उत्पादन जास्त आहे. ६६.७२ करोड एलईडी दिव्यांचे स्वस्तात वितरण , २०,००० करोड (वर्षाला १३७०० करोड) रुपयांच्या विजेची बचत अशी वक्तव्ये ऐकू येत/येतात. शिवाय अपारंपरिक आणि नूतनीक्षम (उदा : सौर)ऊर्जास्रोतांतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे दिसते.

भारतात सगळीकडे रोषणाई केल्यासारखे दिवे लागले आहेत, असा उपग्रहाद्वारे घेतलेला एक फोटोही ऊर्जा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर झळकला होता.

मग आताच हे भारनियमनाचे दुखणे का उपटावे?

बातमीत म्हटलंय, की दिवाळीतही भारनियमनाचे सावट असेल. (त्यावरून ईद आणि ख्रिसमसलाही भारनियमन हवेच, असे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या तर्काप्रमाणे म्हणावे लागेल, पण तो मुद्दा वेगळा).

आणखी एक नवलाची गोष्ट म्हणजे कालपासून पिंक पेपरची पहिली दोन पाने भरून "फुक्कट वीज आली रे" अशी एक जाहिरात येते आहे. मनोज भार्गव नामक कुणा अब्जाधीश परोपकारी मनुष्याचा फोटो , त्यांची कोणतीशी फिल्म पाहण्याचा आग्रह, दहा टीव्ही वाहिन्यांवर पुढचा महिनाभर ही फिल्म दाखवली जाणार आहे त्याचे वेळापत्रक, मागच्या पानावर सोलर पॉवर, जलशुद्धिकरण आणि खतनिर्मिती संबंधित यंत्रांची थोडक्यात ओळख आहे.

नोटाबंदीच्या दुसर्‍या की तिसर्‍याच दिवसापासून पेटीएमच्या पानभर जाहिराती आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या छबीसह, वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्या होत्या ते आठवले.

एकंदरित चलनव्यवस्था, करव्यवस्थेनंतर पुढची क्रांती ऊर्जाव्यवस्थेत येऊ घातली आहे . एका वर्षात तीन तीन क्रांती (की क्रांत्या) इतकी गरुडझेप क्वचितच एखाद्या देशाने घेतली असेल.

पुढील घटनाक्रम नक्कीच रंजक, मनोज्ञ, अभिमानास्पद इ.इ. असेल.

पण तूर्तास आपण भारनियमनाकडे पुन्हा वळू?
आताच भारनियमानचे दुखणे, तेही इतक्या मोठ्या प्रमाणात का उपटावे ?
ऊर्जा उत्पादनात आपण भरारी घेतली (सरकारच्या म्हणण्यानुसार) असली, तरी ऊर्जा वितरणात अजूनही सुधारणेला भरपूर वाव आहे का? राज्यांच्या वीजवितरण मंडळांची प्रकृती (आर्थिक) कशी आहे? त्यासाठी मोदीसरकारने आणलेल्या 'उदय' योजनेचे फलित काय? शिवाय येऊ घातलेल्या सौभाग्य (म्हणजे सहज बिजली हर घर योजना - चे लघुरूप) मुळे नक्की काय फरक पडेल, हेही प्रश्न आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी स्वतःच्या बूडाला चिमटा बसल्याशिवाय भारतात पब्लिक अवेअरनेस येत नाही हे पुन्हा एकदा जाणवलं. मोठ्या शहरांतून लोडशेडिंग सुरू होताच सोशल मेडियाचा नूर पालटला.
खेड्यापाड्यांतून रात्रीच्या ८ तासात जेव्हा केव्हा लाईट येईल तेव्हा उठून विहिरीवरची मोटर चालवण्यासाठी रानात धावणार्‍या शेतकर्‍याचं जगणं, अन त्याच्या अडचणींची खिल्ली उडवणं मात्र थांबणार नाही. >>> +१

साहिल,
सुरवातीचे विवेचन हे सगळ्या प्रकारावर पांघरून घालणारी सारवासारव वाटते.
>>>>>>>
कोळस्याची गरज कमी कल्याने कोळस्याची आयात आणि उत्त्खनन कमी केले गेले आणि transport infrastructure दुसरीकडे वापरले गेले>>>>>>>
एक्साक्ट विजेची मागणी आणि किती वीज औष्णिक केंद्रातून पुरवली जाते , गेले 2 वर्ष हे प्रमाण वाढले की कमी झाले हे आकडे आत्ता माझ्या कडे नाहीत.
मात्र http://www.financialexpress.com/economy/railways-freight-set-to-be-hit-a...
इकडे म्हंटल्या प्रमाणे
17-18 आर्थिक वर्षाच्या सुरवातीस दररोज 244 रेक्स भरून कोळसा काढायचे CIL ने कबूल केले होते .
प्रत्यक्षात एप्रिल मे जून मध्ये ते दररोज 220 रेक्स कोळसा काढू शकले
जून महिन्याच्या शेवटी रेल्वे आणि CIL ची मीटिंग होऊन दररोज 239 रेक्स कोळसा ने आण होण्याचे कबूल झाले
प्रत्यक्षात जुलै मध्ये 213 आणि ऑगस्ट मध्ये 208 रेक्स इतकाच कोळसा निघाला,

या माहिती वरून (जर रेल्वे दिशाभूल करत नसेल तर) असे दिसतेय की रेल्वे त्यांना आवश्यक तितके रेक्स उपलब्ध करून देत आहे, मात्र जुलै पासून वीजेचा प्रॉब्लेम चालू आहे तरीही कोळसा उत्पादन उत्तरोत्तर कमीच होतंय.

>>>>>सोलर, हायड्रो, विंड ची विज जरी प्रदुषण मुक्त असली तरी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाही तसेच ही विज साठवता येत नाही. >>>>
मला वाटते हवामानावर अवलंबून असणाऱ्या गोष्टींचा सरकार कडे डेटा असतो, असायला हवा, कोणत्या ऋतू मध्ये किती वीज मिळेल याची ठोकताळे सरकार कडे असायलाच हवेत.
दुसरी गोष्ट आता महाराष्ट्राचे काही फार टोकाचे हवामान बदल झाले नाहीयेत कीया गायडिंग फिगर पेक्षा अचानक वीज निर्मिती कमी व्हावी.
जर सरकार "हवामाना मुळे वीज निर्मिती कमी झाली, हे आम्हाला सरप्राईज आहे " म्हणत असेल तर त्यांचा नालायक पणा आहे.
पर्यायी व्यवस्था न करता ,रुळलेली व्यवस्था रद्द करणे हा या सरकार चे salient feature होउ घातले आहे.

या विषयावर जितके जास्त वाचावे तितकी इंटरेस्टिंग बातम्या मिळत आहेत. नवीन काही मिळाल्यास इकडे लिहिनच.

गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच कोळसा खाण असलेल्या ठिकाणी पाऊस यंदा पडला का?
Submitted by पावसकरा on 7 October, 2017 - 17:34
>>>खांग्रेजच्या काळात पाऊसच पडत न्हवता! २०१४ नंतर पाऊस सुरु झाला ,ते ही मोदी काकांनी वरुणयज्ञ केल्यावर.यापुढे पाऊस २०१९ पर्यंत पडेल ,पुन्हा पाऊस हवा असल्यास भाजपला मत द्यावे लागेल.

(ओपन मार्केट मधील विज ही खाजगी कंपन्याची स्पेअर कॅपॅसिटी, किंवा गरज असेल तेव्हा विकण्यासाठी ची investment असते. सहसा डिझेल किंवा गॅस वापरुन जनरेट करतात. )
<<
आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादावरून आपणापाशी बरीच शास्कीय अंदरकी बात माहीती/विदा इ. आहे असे दिसते.

तेव्हा तुमच्याकडून खालील प्रश्णांना उत्तरे मिळू शकतील असे वाटते :

एकंदर किती वीज खासगी कंपन्या बनवतात/बनवू शकतात? (गिगावॉट्स इ. मधे कपॅसिटी)
अशा कोणत्या खासगी कंपन्या आहेत ज्या वीज बनवून सरकारला विकत आहेत?
किती वीज विकत घेत आहेत, किती भावाने, अन किती विजेचा तुटवडा आहे?

काही विदा? आकडे?

सरकार/सरकारी अधिकार्‍यांच्या मिसप्लॅनिंगमुळे (अर्थात कोळशाचा साठा नसणे) महाग वीज विकत घ्यावी लागेल, त्याचा फटका जनतेच्या खिशाला का? सरकार किंवा त्या अधिकार्‍यांना काही शिक्षा करायचे प्रावधान वगैरे?

>>
यानुसार मागच्या तीन वर्षात सोलर आणि विंड मधुन मिळणार्या विजेत दर वर्षी २५ ते २८% वाढ होत आहे.
<<
२५ ते २८% हे एकूण वीज उत्पादनाच्या आहेत, अन म्हणून कोळसा कमी पडतोय अशी मखलाशी केलेली दिसते. प्रत्यक्षात एकंदरात होणारी वाढ अन त्या अनुषंगाने करावी लागणारी कपात नगण्य आहे. (खाली दिल्या प्रमाणे ८-१०% च्या २५%)

India's overall installed capacity has reached 329.4 GW, with renewables accounting for 57.472 GW as of 14 June 2017. 61% of the renewable power came from wind, while solar contributed nearly 19%.[1] Large hydro installed capacity was 44.41 GW[3] as of 28 February 2017 and is administered separately by the Ministry of Power and not included in MNRE targets.

एकूण ३३० गिगावॉट्स पैकी ५७.५ गिगावॉट्स रिन्युएबल सोर्सेसकडून आलेत, त्यात हायड्रो पॉवरही येते. अर्थात, एकूणाच्या फक्त ~२०% वीज रिन्युअबल सोर्सेस पासून मिळते; (त्यातही जवळपास ८०% धरणांतून.) तेव्हा, जर उरलेली ६०-८०% जर आपण नेहेमीच्या उर्फ औष्णिक केंद्रातून मिळवत असू तर कोळसा साठा करणे व विज पुरवठा नीट ठेवणे याची जबाबदारी कुणाची??

पर्यायी व्यवस्था न करता ,रुळलेली व्यवस्था रद्द करणे हा या सरकार चे salient feature होउ घातले आहे.
<<
होऊ काय घालायचंय? घिसाडघाईत घेतलेले तुघलकी निर्णय हा हॉलमार्क आहे त्यांचा.

<<<टॅक्सचे पैसे जाताहेत कुठे?>>>

जगातील टॅक्स वसूल करणार्‍या सर्व देशातील सर्व लोकांना कायम हाच प्रश्न पडलेला आहे. त्याचे खरे उत्तर कुणालाच माहित नाही. ज्यांना माहित असावे ते खरे सांगत नाहीत. कारण A few good men या सिनेमात जॅक निकोल्सनने टॉम क्रुझला सांगितले तसे "You want the Truth? You can't handle the truth" !

आमच्याकडे सरकार वीज निर्मिती करत नाही. सगळ्या खाजगी कंपन्या करतात. जास्त वेळ वीज गेली, रेफ्रिजेरेटरमधील सामान खराब झाले, इ. खर्च झाले तर वीज कंपनीवर फिर्याद करून पैसे वसूल करता येतात.

ज्या ज्या गोष्टी सरकार (जगातील कुठल्याहि देशात ) करू पहाते त्या त्या सर्व तोट्यात जातात. मग टॅक्स वाढवतात - की पुनः प्रश्न - टॅक्सचे पैसे जाताहेत कुठे?

<<<पब्लिक स्वतःच्या खर्चाने वीज तयार करणार. रस्ते वापरायला टोल देणार. कचरा फेकायला पैसे देणार. शिक्षणाला अव्वाच्या सव्वा फी भरणार. एकंदर "पायाभूत सुविधा" म्हणजे नक्की कोणत्या देतंय सरकार?>>>

Survival of the fittest!

म्हणजे आजूबाजूच्या परिस्थिती ने उत्पन्न झालेल्या धोक्यांपासून जो स्वतःचे रक्षण करतो तो बचावतो. त्यासाठी जे करावे लागते ते तो करतो.
तसे जगातील सर्व देशात सरकार नावाचे एक भयानक विषारी वातावरण तयार झाले आहे.

मनुष्य प्राणी वाघ, सिंह, नाग इ. प्राण्यांपासून जगला. वारा, वादळे यांना तोंड दिले. अति उष्ण हवा, अति थंड हवा यापासून बचावला.
या परिस्थितीला आधी शिव्या दिल्या असल्या, अजूनहि अधून मधून देत असला तरी स्वतःचे संरक्षण करायला शिकला. नि त्याच परिस्थितीचा काही अंशी फायदा घ्यायलाहि शिकला - जसे वाघ सिंहांना सर्कशीत नाचवून स्वतःची करमणूक करून घेणे.

त्या मानाने सरकार हे विषारी वातावरण तसे फारसे कठीण नाही जगायला.

या वातावरणात मिळेल त्याचा फायदा घेऊन जे मिळत नसेल त्याची स्वतःपुरती सोय करून घेऊन जिवंत रहायचे. पुष्कळांना त्या विषारी वातावरणात नुसतेच जगणे नाही तर त्यातून भरपूर फायदा करून घेणे जमते. मग त्यातले काही त्या विषारी वातावरणात लुडबूड करतात. बाकीचे तिकडे दुर्लक्ष करतात.

विषारी वातावरण कृत्रीमरित्या निर्माण करणार्‍यां काही विकृतांना ठेचून मारणे हे आजकालच्या उत्क्रांत मानवाच्या हातात आहे.

उत्क्रांतीच्या शीर्षावर पोहोचून स्वतःच्या डीएनएत इंजिनियरिंग करून स्वतःची प्रजाती प्रगत करण्या-करवण्याच्या, रोबॉटिक्स अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्याच्या गॉडलाईक पिनॅकलवर मानवजात उभी आहे, तिला अ‍ॅज अ स्पिसिज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ची डार्विनियन कॉण्टेक्स्ट फिट बस्ते, कारण अ‍ॅज ह्युमन्स, वी आर द फिटेस्ट स्पिसीज.

पण, ती कन्सेप्ट इथल्या या चर्चेत असंबद्ध आहे, कारण, इथे आपण अराजकीय ("अराजक" अन त्यातून उत्पन्न झालेल्या) मूर्खपणाबद्दल चर्चा करीत आहोत.

इथली चर्चा भारतातील लोकांनी दिलेला मेजॉरिटी मँडेट, अन त्याचा केला जाणारा दुरुपयोग, याबद्दल सुरू आहे, असे मला तरी वाटते.

म्हणूनच.... कोणी कितीही गर्दीचे म्हणा, मुंबईत राहण्याचा हाच फायदा आहे. नळ उघडले की पाणी आणि बटण दाबले की वीज. चोवीस तास. या दोन्ही सुविधांचा वापर करत मनात येईल तेव्हा गरम पाण्याचा शॉवर घेता येतो. म्हणून म्हणतो या आमच्या मुंबईत. आपली शेती वाडी, कोंबड्या कुत्री, गाय बैल अगदी खुराड्या गोठ्यासह विकून या. अजून बरीच जागा शिल्लक आहे ईथे. आणि गर्दीचेही काय एवढे, ती फक्त लोकलपुरतीच. एकदा का लोकलच्या जागी बुलेट ट्रेन सुरू केल्या, की मग दहा मिनिटात ठाणे ते बोरीबंदर आणि पाचच मिनिटात विरार ते अंधेरी ..

ऋन्मेष,
>>>>णा, मुंबईत राहण्याचा हाच फायदा आहे. नळ उघडले>>>>
या ऐवजी हे वाक्य,
णा, दक्षिण मुंबईत राहण्याचा हाच फायदा आहे. नळ उघडले.....
असे हवे.
XX वली ( डोंबिवली, कांदिवली,बोरिवली etc) मध्ये वीज नसण्याचा काही काळ असतो :p

कांदिवली, बोरिवलीत नाही हो. मुलुंड, भांडुप .MSEB च्या राज्यात असतं भारनियमन. टाटा, बेस्ट, रिलायन्सच्या राज्यात किमान शेड्युल्ड भारनियमन नाही.
डोंबिवली मुंबईत येत नाही.

ही १२ सप्टेंबरची बातमी. जवळजवळ सगळ्या वृत्तपत्रांत या आशयाची बातमी आहे.

वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन विजेची जादा हानी असलेल्या ई, एफ, जी या गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार केले जात आहे.

विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत असून, लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून 395 मे.वॅ. वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसात जाळ्यात उपलब्ध होईल. तसेच पॉवर एक्स्चेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सांगण्यात आली.

१६ सप्टेंबर : कोळसा मिळत नसल्याने महानिर्मिती कंपनीचा कोल इंडियावर ठपका

पीयूष गोयल यांच्या आधिपत्याखालील केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून सहकार्य मिळत नसल्याने वीजनिर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसून महाराष्ट्रात वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. देशात विक्रमी कोळसा उत्पादनाचे दावे करणाऱ्या कोळसा मंत्रालयाकडे वारंवार मागणी करूनही महानिर्मिती कंपनीला कोळसा मिळत नसल्याने वीज उत्पादन घटले आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असून वीज भारनियमन पुढील दोन-तीन आठवडे सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्राला पुरेसा कोळसा मिळावा, यासाठी मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे विनंती केली असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
महानिर्मिती कंपनीने या परिस्थितीला आमचे गैरव्यवस्थापन कारणीभूत नसून कोळसा उपलब्ध करण्यासाठी गेले वर्षभर करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली आहे आणि केंद्र सरकार, कोल इंडिया व कोळसा कंपन्यांवर खापर फोडले आहे. महानिर्मिती कंपनीने म्हटले आहे की, ‘महानिर्मितीच्या औष्णिक वीजकेंद्रांमध्ये पावसाळ्याआधीच पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असावा, यासाठी सप्टेंबर २०१६ पासून सातत्याने केंद्र शासन, कोल इंडिया लि. व कोळसा कंपन्यांकडे वारंवार प्रयत्न केले आहेत. गेल्या सहा महिन्यांत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी कोल इंडियाच्या अध्यक्षांची वेळोवेळी भेट घेऊन कोळशाच्या तुटवडय़ाबाबत त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती.
मुख्य सचिवांनी १९ जुलै २०१७ रोजी कोल इंडियाला पत्र लिहून कोळशाचा पुरवठा वाढविण्याबाबत विनंती केली होती. केंद्रीय ऊर्जा सचिवांनी वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची ३० जुलै रोजी बैठक घेऊन त्यांना किमान २२ दिवसांचा कोळशाचा साठा करून ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दररोज रेल्वेच्या ३० मालगाडय़ा (रेक्स) कोळसा उपलब्ध झाल्यास हा साठा करता येईल, असे महानिर्मिती कंपनीने कोल इंडिया व सर्व कोळसा कंपन्यांना १५ जुलै २०१७ रोजी कळविले होते. दररोज सुमारे सहा हजार ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी रेल्वेच्या ३२ मालगाडय़ा कोळसा आवश्यक आहे. तरीही गेले चार महिने सरासरी केवळ २० मालगाडय़ा कोळसा उपलब्ध होत
असल्याचे महानिर्मिती कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले."

पावसाळ्यामुळे कोळसा उत्पादन घटले असे कारण पुढे केले जात असले, तरी हा घोळ त्याही पावसाळ्याच्या आआधीपासून चालत असल्याचे दिसते.

कृतिशील, पारदर्शी, उत्तरदायी, इ.इ. कारभार यालाच म्हणत असावेत.

जीडीपी, धान्य उत्पादन , इ.इ. प्रमाणे वीज आणि कोळसा उत्पादनाच्या आकड्यांनाही विंडो ड्रेसिंग केले असे म्हणायचे का?

यू ट्यूबवरपण मनोज भार्गव यांच्या BiC च्या जाहिराती दिसू लागल्यात. हेही गृहस्थ त्या बोकील बाबांसारखे बरीच वर्ष आपल्या कल्पनांचा प्रचार करताहेत.

म्हणजे या वर्षी नोटबंदीप्रमाणे कोळसाबंदी करून भार्गवच्या नादाला लागण्याचे चांसेस जास्त आहे. मस्त सुरेख
घरोघरी सौरउर्जेच्या चुली.
आता कोळसाबंदी कशी देशहिताची आहे, पर्यावरण वाचवणारी आहे, शतकानुशतके चालत येणारी पध्दत कशी ऐतिहासिक मोडून काढली छाप लेख येऊ लागणार.

पंतजलीचा कोळसा येणार का?

आता कोळसाबंदी कशी देशहिताची आहे, पर्यावरण वाचवणारी आहे, शतकानुशतके चालत येणारी पध्दत कशी ऐतिहासिक मोडून काढली छाप लेख येऊ लागणार.
>>>

मी भारनियमन कसे 'समाज'हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे ही पोस्ट पाहिली आहे. पहिले मला वाटले 'सटायर' आहे. पण मग नीट लक्ष दिले तर कळले की खरच लिहिलेली आहे.

टण्या,
असे खरेच लिहिलेले भरपूर लिटरेचर 'आपल्या' आयटीसेल ने प्रचारित केलेले आहे, गेल्या ४-५ वर्षांत.

अरे हो, ते पियुष गोयलांच्या जुन्या "नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स" मिनिस्ट्रीने दिलेल्या कर्जांचं प्रकरण नुकतंच वाचण्यात आलं. अड्ड्यावर डकवलं आहे. जिज्ञासूंनी पहावे.
इथे जसं भारनियमनाचं समर्थन करताहेत, तसंच तिथे पियुष गोयल रेल्वे मंत्री असताना एका साध्या भारतीय नागरीकाची अब्रू नुकसानीत जाऊ नये म्हणून टीव्हीवर मुलाखत देत होते. Wink

दोन वर्षापूर्वी कोळसा खाणीच्या रिव्हर्स ऑक्शनचे बरेच कौतुक ऐकायला येत होते. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना माफक दरात कोळशाचा अखंडित पुरवठा केला जाईल , ज्यामुळे विजेचे दर वाढणार नाहीत व वीजनिर्मितीत सातत्य राहिल असं सांगितले गेले. परंतू गेल्या वर्षभरात वीजदर वाढतच आहेत, कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीत घट होऊन भारनियमन केले जात आहे. मग ह्या रिव्हर्स ऑक्शनने सरकारला नेमका काय फायदा झाला आहे?

ण्या,
असे खरेच लिहिलेले भरपूर लिटरेचर 'आपल्या' आयटीसेल ने प्रचारित केलेले आहे, गेल्या ४-५ वर्षांत.
>>>

आपल्या वरचा रोख आवडला Happy

आपल्या वरचा रोख आवडला
<<
अवतरण चिन्हांचा वापर करणे 'आपल्या' ट्रंप साहेबांकडून शिकतोय. Wink

स्वतःचे संच बंद ठेवून सध्याची वीज अडाणींकडून विकत घेतली जाते आहे असे ऐकले.

काय भावाने घेतली हे कुणी सांगायला तयार नाही. भक्तीभावानेच घेतलेली असावी, असे वरच्या शहा साहेबांच्या एका प्रतिसादातून वाटले. पण ते साहेब पुन्हा इकडे फिरकलेले दिसत नाहीत.

हो. हीच.
महानिर्मितीचे स्वतःचे अनेक विद्युत निर्मिती संच गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी बंद आहेत. Uhoh

एकंदर मोदी फक्त नावाला आहे.देश अडाणी अंबाणीच्याकडून वैयक्तीक फायद्यासाठी चालवला जात आहे.
यालाच म्हणायचे अच्छे दिन.

Pages