मी ....अब्जशीर्ष

Submitted by अनन्त्_यात्री on 15 September, 2017 - 01:31

मी ....अब्जशीर्ष आशावाद

मीच फुलवितो विझू पाहणारी नवविचारांची पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात

मीच गुणगुणतो आमूलाग्र बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात प्र‌ग‌तीचा महामंत्र होऊन आसमंतात

तो मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात

मीच मळतो विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा

कैकदा झाकोळून
पण प्रतिकूलांना पुरून
मीच उरतो पुनःपुन्हा
अब्जशीर्ष.
अजिंक्य.

रंग,वंश,लिंग,ध‌र्म‌ या चौक‌टीत‌ मला चिणू नका
दिव्यत्वाच्या शोधात व्य‌र्थ शिणू नका.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रंग,वंश,लिंग,ध‌र्म‌ या चौक‌टीत‌ मला चिणू नका
दिव्यत्वाच्या शोधात व्य‌र्थ शिणू नका.

अप्रतिम !