लागणारा वेळ : ४० ते ४५ मिनिटे
वापरलेली उपकरणे :
अ) यादी १ मधील ढोकळा स्टॅन्ड किंवा इडली स्टँड
आ) यादी २ मधील सोर्या
साहित्य :
उकडीसाठी :
१) तांदूळ पिठी - १ भांडं भरून (मी अग्रजची वापरली)
२) पिठीइतकेच पाणी
३) साजूक तूप - १ ते १.५ चमचा
४) मीठ - चिमूटभर
रसासाठी :
५) नारळाचं दाट दूध - १ मोठ्ठं भांडं भरून
६) गूळ - १.५ वाटी (गोडाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावा. पण रस थोडा गोडंच करावा. म्हणजे शेवया घातल्यावर योग्य गोड होते.
वाढणी : एका व्यक्तीस भरपूर
कृती :
१) नारळाच्या दूधात गूळ मिसळून ठेवा.
२) एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात साजूक तूप व चवीपुरते मीठ घालावे. पाणी खळखळ उकळले की त्यात पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी व त्याचे उंडे करून घ्यावे.
३) हे उंडे इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यात ठेवावे व १५ मिनिटे उकडून घ्यावे.
४) सोर्याला शेवेची चकती लावून उकडलेले उंडे भरा.
५) ज्या वाटीतून खायला देणार (सर्व्ह करणार) त्यात शेव पाडा. त्यावर नारळाचा गोड रस शेवया बुडतील इतका घाला.
गोडाच्या शेवया तयार !
कोकणातल्या लोकांना हा पदार्थ नक्कीच माहित असेल. किती दिवस इथे द्यायचा होता. रविवारी संध्याकाळी डोकं काम करु लागलं आणि लक्षात आलं की हा पदार्थ नियमांत बसतोय. आज शेवटच्या दिवशी मुहुर्त मिळाला इथे देण्यासाठी!
चुकून फोटो मधे तेल घेतलंय. दुर्लक्ष करा.☺
मस्स्त!! अगदी आत्ता खावंसं
मस्स्त!! अगदी आत्ता खावंसं वाटतंय ...
मी पण करते अधून मधून खूपच छान लागतात
इडिअप्पम च्या जवळपास जाणारा
अरे वा.. मस्त.. आली कि पहिली
अरे वा.. मस्त.. आली कि पहिली एन्ट्री
धन्यवाद! अगदी लगेच प्रतिसाद
धन्यवाद! अगदी लगेच प्रतिसाद बघून मस्त वाटलं!
~साक्षी
पण मी उलट करते आधी
पण मी उलट करते आधी इडलीपात्रात शेवया पडून घेते
(इडली पात्रात केळीचं पण चौकोनी कापून ठेवायचं अन त्यावर शेवया पाडायच्या म्हणजे चिकटत नाहीत)
आणि मग वाफावते आणि मग बाकी दूध वगैरे
आता याप्रमाणे करून पाहायला हवं
मस्त !!!!
मस्त !!!!
मस्त!
मस्त!
कोकणात शेवरोळ्या म्हणतात.ना.दू + गूळ , हे तापवून घेतात,त्यात वेलची पावडर घालायची.
मस्त मस्त !
मस्त मस्त !
वा मस्त!
वा मस्त!
खरंच की! वेलची पावडर विसरले!
खरंच की! वेलची पावडर विसरले!
मस्त रेसिपी साक्षी .
मस्त रेसिपी साक्षी .
हुश्श!!
हुश्श!!
या कॅटेगरीत एक एन्ट्री आली.
मी गेले कित्येक दिवस या नियमात बसणारे आणि मला आवडणारे जमणारे काय करता येईल हा विचार करतेय
मी हा पदार्थ खाल्ला नाही पण याबद्दल ऐकले आहे.
मध्ये एका ठिकाणी उकडलेले उंडे ऐवजी नजरचुकीने उकडलेले अंडे वाचून उडाले होते
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
कोकणातल्या लोकांना हा पदार्थ नक्कीच माहित असेल.<< हो. गणपतीत गावी केली होती. भारी लागते.
मस्तच सा मी खायलाच येते
मस्तच साक्षी
हा पारंपारीक पदार्थ आहे तर
हा पारंपारीक पदार्थ आहे तर नविन म्हणून धरला जावु शकतो का?
हे भारी आहे. आणि मस्त डोके
हे भारी आहे. आणि मस्त डोके लावले आहे !!
धन्यवाद सगळ्याना~ ~साक्षी
धन्यवाद सगळ्याना~
~साक्षी
Aaj mi kelya hotya,,tuzya
Aaj mi kelya hotya,,tuzya lekhavaroon sfurtee gheun.Tyat tuup ghalayala visarale.pan ekadam mauu zalya hotya.
इथे आहे की हिच रेसीपी,
इथे आहे की हिच रेसीपी,
>>>>https://www.maayboli.com/node/56138<<<<<
(No subject)