लाल दिवा बघुनी
थांबलो सिग्नलला
काचेवरती नाजूक
काळा हात फिरला ॥१॥
बघुनी मी अस्वस्थ
थोडा मनांत झालो
हलकेच काच गाडीची
खाली करता झालो ॥२॥
उघडणारी काच बघुनी
डोळे तिचे चमकले
उदास मलूल चेहर्यावरी
हास्य खिन्न विलसले ॥३॥
हातांत मिळताच काही
मनोमन ती हरखली
बघुनी माझ्याकडे ती
खळखळून किती हसली ॥४॥
कृतज्ञतेने हात तिने
माझ्यासमोर जोडले
बघुनी मला मनांत
खजील अपार वाटले ॥५॥
हळूहळू ती पाठीमागे
मागे सरकत राहीली
मनपटलावर माझ्या
माझीच ईशू झळकली ॥६॥
नकळत मी तुलना
मनांत दोघींची केली
दोघींतही मला केवळ
आदिमायाच फक्त दिसली ॥७॥
एवढ्यात खांबावरची
सिग्नल लाल बदलली
मीही हलकेच काच
वरती गाडीची घेतली ॥८॥
प्रतिमा तिची समोर
अंधुक धुसर बनली
मनांत आहेच अजूनही
ती माझ्या रेंगाळली ॥९॥
घरी जातांच सायंकाळी
ईशू माझ्याकडे झेपावली
कडेवरती ती माझ्या
अलगद बाहूंत विसावली ॥१०॥
ृ
उचलून ईशूला घेताना
परी सिग्नलची आठवली
नकळत माझ्या डोळ्यांची
कडा अबोल ओलावली ॥११॥
निरागस एक सवाल
ईशूने मजला केला
काय रे बाबा तू
आज कसकाय रडला? ॥१२॥
ऐकूनी तिला खोटं
मी लटकंच हसलो
काही नाही गं पिल्लू
असंच काही बोललो ॥१३॥
ढोंगी किती आपण
जाणिव मला झाली
सुरक्षित समाजाने शाल
एक विषमतेची पांघरली ॥१४॥
―₹!हुल/१.९.१७
सुंदर....
सुंदर....
सुंदर __/\__
सुंदर __/\__
छानच...
छानच...
छान आहे कविता!!
छान आहे कविता!!
दोघींतही मला केवळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आदिमायाच फक्त दिसली >>> हे खूप आवडले
मस्त
मस्त
अपरिहार्य घुसमटीचं नेमकं
अपरिहार्य घुसमटीचं नेमकं वर्णन!
छान। नेमकं मांडलय अगदी
छान। नेमकं मांडलय अगदी
छान।
छान।
छान उमटलय मनातुन..
छान उमटलय मनातुन..
मस्तच सुन्दर लिहिलय
मस्तच सुन्दर लिहिलय
निःशब्द.... ___/\__
निःशब्द....
___/\__
छान!!!!!!!!!!!!
छान!!!!!!!!!!!!
सायु, अक्षय, निरूजी,
सायु, अक्षय, निरूजी, सुमुक्ताजी,वेडोबा, अनंतजी, तनिष्का, भावनाजी, पंडितजी, शशांकजी, मेघा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. आपल्या प्रतिसादांमुळे लिहीण्यासाठी नवी उमेद मिळते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!
__/\__
मस्त.......
मस्त.......
फार बोलकी आहे ही कविता ! आणि
फार बोलकी आहे ही कविता ! आणि विचार करायला लावणारी. सुंदर.
धन्यवाद dabbu, तृप्तिजी
धन्यवाद dabbu, तृप्तिजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त !
जबरदस्त मांडलाय आम आदमीच्या भावनांचा कल्लोळ आणि काहीतरी करायची धडपड पण परिस्थितीपुढे हतप्रभ !
धन्यवाद अंबज्ञजी.
धन्यवाद अंबज्ञजी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता मी वाचत नाही फारश्या...
कविता मी वाचत नाही फारश्या... पण छान आहे.. होते असे !
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
धन्यवाद ऋ आणि मनीमोहरजी
धन्यवाद ऋ आणि मनीमोहोरजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर लिहिलंय...
खूप सुंदर लिहिलंय...
छान लिवल..
छान लिवल..
खुपच अप्रतीम उमटलयं!
खुपच अप्रतीम उमटलयं!
९६क, अनघाजी, कृष्णाजी आपल्या
९६क, अनघाजी, कृष्णाजी आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जमलीए.
मस्त जमलीए.
आवडली कविता!
आवडली कविता!
छान!आवडली कविता!!
छान!आवडली कविता!!
अरे ही कशी मिस झाली... खूप
अरे ही कशी मिस झाली... खूप छान
खुप छान..आवडली कविता..
खुप छान..आवडली कविता..
Pages