नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

झी मराठी वरची एक ही सिरीयल पाहण्या सारखी नाहीये .
माझ्यामते झी मराठी ने चॅनेल ला काही दिवस टाळ ठोकाव .>>>+१

राधिका विद्यासागर बरीच लहान दिसते उदय टिकेकरांपेक्षा. सौमित्रचे बाबा आणि भाऊ आहेत हे बघून छान वाटलं. रोहिणीबाईंचा नवा लूक आवडला. प्रोमोचा अतिरेक होतोय. प्रोमोच ईतका बोअरिंग आहे की मालिका बघायची नाही हे आत्ताच ठरवंलय पण ईथे येणार प्रतिसाद उर्फ पिसं काढलेली वाचायला Happy

. प्रोमोच ईतका बोअरिंग आहे की मालिका बघायची नाही हे आत्ताच ठरवंलय पण ईथे येणार प्रतिसाद उर्फ पिसं काढलेली वाचायला>>>
पिसं काढायला मालिका बघण्याच रिस्क कोण घेणार आहे???

मी सुरुवातीला पाहनार आहे येता जाता..पहिल लग्न दाखवुन ,ते मोडुन परत दुसर्या लग्नाची तयारी दाखविणार की डायरेक्ट मोडलेले लग्न दाखवुन दुसर्या लग्नाची तयारी दाखविनार काय माहित ???

खुकखु आणि मानबा पेक्षा बरी असेल तर झी मराठी सुधारतय असं म्हणायला हरकत नाही. फार अपेक्षा आहेत का माझ्या? Uhoh

खुकखु आणि मानबा पेक्षा बरी असेल >> काय माहित पण माझ्या पाहण्यात अशी खरी खुरी घटना घडलेली आहे .
आता ते कस दाखवताहेत ते बघायचं Happy

झी च्या मालिका आणि प्रोमो यांचा बऱ्याचदा एकमेकांशी संबध नसतो >> हो ना खुकखु चा एक प्रोमो जो नेहमी दाखवत ज्यात मान्शी विक्र्याच्या गाडीत मागे बसते.. आणि नातेसंबंधांबद्दल काहीतरी बोलते. तो प्रसंग आयुष्यात (सिरियलच्या) दाखवला नाही झी वाल्यांनी.

हो ना...आणि अंगठीचा ही......
किंबहुना ते एव्हढे काही एकमेकांच्या प्रेमात वगैरे नव्हतेच असे मला वाटू लागले आहे . विक्र्या ने कायम अवघडलेला, बंदिस्त, संकुचित अभिनय केला.....व तिने सदा गोंधळलेली, सदोष उच्चारांनी परिपूर्ण, केसांच्या जटा वागविणारी कंफ्यूज्ड मानसी साकारली. बाकी काही प्रेम बिम जाणवलं नाही...संवाद ही त्रोटक व अपूर्णच होते ज्यातून काही प्रतीत होईल!

चला , जाऊद्या........!! सुटलो हे महत्वाचं!!
Happy

झी च्या मालिका आणि प्रोमो यांचा बऱ्याचदा एकमेकांशी संबध नसतो >> अगदी प्रोमो वेगळाच तयार करतात . कादीप मध्ये सुद्धा ती गौरी धावत धावत खाली येते . आई बाबांच्या पाया पडते. त्या लौकी वरून बडबडते . मधेच अम्मा काहीतरी बोलत असते . असं कुठे होत ?

हो ना सुजा
आता कादिप पण संपणारे ना?

हो ना खुकखु चा एक प्रोमो जो नेहमी दाखवत ज्यात मान्शी विक्र्याच्या गाडीत मागे बसते.. आणि नातेसंबंधांबद्दल काहीतरी बोलते. तो प्रसंग आयुष्यात (सिरियलच्या) दाखवला नाही झी वाल्यांनी. >>>> मेबी तो सिरियलच्या दुसर्या भागाचा प्रोमो असावा. Biggrin नाहीतरी ती मानसी म्हणतेच ना, ईशा मोठी झाल्यावर जोपर्यन्त आपल्याला तुम्ही लग्न करा अस म्हणत नाही तोपर्यन्त आपण लग्न करायचे नाही.

केतकी चितळे कलर्स मराठीवरच्या 'तुझ्यावाचून करमेना' मालिकेतसुध्दा होती ना? >>> हो बरोबर, व्हिलन होती. मी संपायला आली तेव्हा शेवटचे दोन भाग बघितले होते, आत्ता आठवलं. ही मालिका लवकर उडाली channel वरून.

तो हिरो किती पकाऊ आणि इरिटेटिंग वाटतो.
हार्दिक (राणा) आणि शिव या दोन चांगल्या हिरोजच्या तुलनेत तर अगदीच फ्लॉप वाटला.

मी आत्ताच बघितली. मला दोघांनी इरीटेट केलं. त्याचं भांडण, प्रेम सगळं कृत्रिम वाटलं मला. ओढूनताणून केल्यासारखं . कोणाचीच natural acting वाटली नाही. तो गाडी घेतो नवीन, तिला काहीच वाटत नाही त्या सरप्राईजबद्दल. ती जास्त आगाऊ वाटली दोघांत. मला गुजराथी actor वाटला एक, तो मराठीच आहे बहुतेक कुठेतरी इन्स्पेक्टरचा रोल केलेला. मी नाही बघू शकत ही सिरीयल. राधिका हर्षे आणि उदय टिकेकर मात्र आवडले. नायिकेचं माहेर डोंबिवलीत दाखवलंय.

पुन्हा एकदा दाढीवाला हिरो. दाढीवाल्या श्रीची मालिका चांगली चालल्यापासुन काही मोजके अपवाद वगळता झी मराठीचे सगळे हिरो दाढीवाले का असतात? फक्त मिशीमधला किंवा क्लिनशेव्ह हिरो दाखवला तर मालिका चालणार नाही असे झी मराठीला वाटते का? दाढीवाल्या हिरोमुळे नाही तर सशक्त कथानकामुळे मालिका चांगली चालते हे यांच्या कधी लक्षात येणार?

सशक्त कथानकामुळे मालिका चांगली चालते हे यांच्या कधी लक्षात येणार? >>> असं आपल्याला वाटतं. झीच्या मालिका कशाही चालतात असं चित्र दिसतं. मा न बा दोन नं वर होती लास्ट वीक मध्ये. पहिल्या पाचात नेहेमीच झी असतं त्यामुळे मनमानी करते अर्थात सगळ्या channel वर तसंच.

त्याने गाडी खरेदी नव्हती केली बहुतेक..
फिरायला रेंट् वर घेउन आला असं काहितरी होतं
हे भांडण आधीचं रोखुन धरलेलं आणि त्या क्षणाला सहन न होउन भडकल्यासारखंवाटलं..
मालिका कशी ते हळु हळु कळेल्च..
पण असल्या विचित्र कॉन्सेप्ट का घेउन येतात अलिकडे.. खुकखु.. ही मालिका..

इयत्ता दुसरीतली मुलं बरी acting करतात हिरो-हिरविणीपेक्षा.. राधिका विद्यासागर overacting करत्येय. btw,पार्ले आणि डोंबिवली एवढं का emphasize करतायत?

पार्ले आणि डोंबिवली एवढं का emphasize करतायत? >>

तो पार्ल्यात राहणारा आणि आणि ती डोंबिवलीत राहणारी आहे म्हणून
पार्ल्यात आणि डोंबिवलीत शूटिंग घेतल असेल म्हणून
दिग्दर्शक परत खुलता कळी खुलेना चेच आहेत म्हणून
आणि त्यांना पार्ल आणि डोंबिवली दोन्ही आवडतात म्हणून Wink Lol

पार्ल आणि डोंबिवली >>> असं पण बरेच जण पार्ले आणि डोंबिवली एका नाण्याच्या दोन बाजू समजतात. दोन्ही सांस्कृतिक शहरं आहेत म्हणून. पण इथे काय उद्धार करणार आहेत काय माहीती. करोत बापडे. आमच्यासाठी आमची डोंबिवली ग्रेट. सिरीयल बोअर वाटली काल म्हणून आज नाही बघणार.

Pages