अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा : भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर : भरत.

Submitted by भरत. on 26 August, 2017 - 09:43

काय सिनेमा किंवा नाटक पाहताना पुढल्या खुर्चीवर उंच माणूस आल्याने तुमचा रसभंग होतो?
काय ग्रुप फोटोत तुमचे डोके शेजारच्या दोन खांद्यांच्या मध्ये दबल्याने तुम्हाला चेहरा हसरा ठेवता येत नाही?
काय उंच फळीवर ठेवलेली वस्तू काढायला, तुम्हाला कोणालातरी सांगावं लागतं ?
काय वर्गात पहिल्या बाकावर बसावे लागल्याने तुम्ही अभ्यासेतर उपक्रमांत मागे पडता?

यातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल, तर आम्ही घेऊन आलो आहोत, तुमच्या या सर्व समस्यांवर खात्रीचा उपाय.

प्राचीन ग्रंथांचे संशोधन करून फक्त नैसर्गिक वस्तू वापरून आम्ही बनवली आहे "उंच भारत" पावडर. ही पावडर दुधात मिसळून तुम्ही मानेवर, हातांवर, पायांवर चोळल्यास त्या त्या भागाची उंची/लांबी तुम्हाला हवी तेवढी वाढवता येईल.

पावडरचा परिणाम पंधरा मिनिटांत दिसू लागतो आणि तीन तास बावीस मिनिटे टिकतो.

पावडर घरपोच मिळण्यासाठी पुढील पत्त्यावर मनीऑर्डरने रुपये ३२९ मात्र पाठवा.

पोस्ट बॉक्स नं २४६८, अफलापूर, महाराष्ट्र ४०० ४००.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>"उंच भारत" पावडर
मस्त.. एखाद दुसरे चित्र असते तर अजून मजा आली असती...
>>तीन तास बावीस मिनिटे टिकतो.
हे काय आहे? Happy

Lol भारीय.
रच्याकने ,मी ते ' उंच भरत पावडर ' वाचलं Proud