कोण आहे हा पाखंडी बाबा राम रहीम?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2017 - 11:25

कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"

सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...

तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार चुकिचे आहे
साक्षी महाराज म्हणतात की न्यायपालिका फक्त एका व्यक्तीचे ऐकून शिक्षा केली आहे. बाबाच्या करोडो भक्तांचे का ऐकले नाही?

हे सगळं भयाण आहे. समाज भरकटलेला आहे. धर्मसुधारक, संत यांचा प्रवास संत तुकाराम ते स्वयंघोषित आसाराम, रामरहीम असा का झाला याचा विचार होणं गरजेचं आहे. येणाऱ्या चर्चेत हे मुद्दे मांडले जावेत.

मागे सत्य साईबाबांचेही काही चमत्कार नमस्कार पकडले गेलेले. त्यानंतरही करोडो लोकांचा आयकॉन सचिन सारख्यालाही त्या बाबांच्या भक्तीत बघून वाईट वाटलेले. मध्यंतरी सचिन प्रेमापोटी त्याचा चित्रपट पहिल्याच विकेंडला पीवीआरमध्ये सहपरीवार पाहिला. त्यातही त्या बाबांचे दर्शन झाले. त्रास झाला. जर ढोंग बाहेर निघूनही जर एखादा सचिनसारखा आपला विश्वास तोडू शकत नसेल तर सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवायची. पण हे दंगे, जाळपोळ, हिंसक होणे, नव्हे प्रत्यक्षात कित्येकांचा जीव घेणे हे अति आहे. या वृत्तीला तितक्याच कठोरपणे बळाचा वापर करत दडपायला हवे.

या वृत्तीला तितक्याच कठोरपणे बळाचा वापर करत दडपायला हवे. >>>>
दडपणं हा पर्यायच नव्हे! नेस्तनाबूत मुळापासून. त्यासाठी रूट कॉजेस शोधायला हवीत.

मूळापासून म्हणजे प्रबोधन करून. ते गरजेचे आहेच. किंबहुना कायमस्वरूपी उपाय तोच आहे. पण सध्या जडीबूटीची नाही तर ईंजेक्शनची गरज आहे. अश्या वृत्तीला थारा नाही हे तात्काळ दाखवून द्यायला हवे. अन्यथा वर साक्षी महाराजसारखे काड्या करणारयांना बळ चढेल.

कल्ट आहे त्याचा.धर्मरुपी गांजा झोकुन तर्र झालेले हरामखोर आहेत हे लोक.
या सगळ्या बुवा बापू कापू जापू ब्रह्मचैतन्यवाल्यांचा कल्ट असतो.या लोकांना कायदा हातात घेतल्याक्षणिक गोळ्या घातल्या पाहीजेत.

अश्या वृत्तीला थारा नाही हे तात्काळ दाखवून द्यायला हवे. >>>>
हो.
साक्षीचं वक्तव्य उन्मत्तपणे केलेलं आहे! दुर्दैवाने ह्या व्यक्तिला राजाश्रय आहे अन् सत्ताधारी पक्षाकडून साक्षीवर कारवाईची शक्यता धूसरच नव्हे तर शून्य आहे.

जे लोकं नास्तिक असतात ते कधीच अश्या बुवाबाजीला बळी पडत नाहीत.
जे आस्तिक असतात त्यांची श्रद्धा-अंधश्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष असते. आपली ती श्रद्धा आणि दुसरयाची अंधश्रद्धा या तत्बावर ती चालते.
कोणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग देवावर ठेवा किंवा बुवावर ठेवा. पण तुम्ही संविधानाने बनवलेले कायदे पाळायलाच हवेत, तसेच तुमच्या श्रद्धेपोटी ईतर कोणाचे नुकसान होता कामा नये. आणि ईथे तर कायद्याची ऐशीतैशी करत जीवहत्या होतेय

ह्या सो कॉल्ड बाबाने केलेले कृत्य निंदनीय तर आहेच पण त्याही पेक्षा त्याला मिळणार लोकांचं समर्थन निंदनीय आहे.एका गुन्हेगाराच्या समर्थनासाठी बस ,गाड्या , लोकांचे बळी जात असतील तर ते जास्त चिंताजनक आहे.
दाभोळकारांसारख्या माणसाची किती गरज हे लक्षात येतेय .

कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
>>
ही अशी एक अध्यात्मिक ताकत आहे , जिला रेपची केस असूनही शासनाने झेड प्लस सिक्युरिटी (जी पण्तप्रधानाना असते) असते आणि ही ताकत लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून फिरते. ही अशी अध्यात्मिक ताकत आहे जिला रेप केसमध्ये न्यायालयाने दोषी ठरवल्यानन्तर्ही लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून नेले जाते. ही ताकत तीन सिनेमान्ची हिरो, गीतकार, संगीतकार आहे आणि अब्जावधी रुपयांची मालमत्ता बाळगून आहे. या ताकतीच्या सेवेसाठी २०८ तरुण शिष्या असून त्या स्वतः बाबानी निवडलेल्या आहेत. या अध्यात्मिक शक्तीने मागच्या निवडणूकीत भाजपला पाठिंबा दिला होता, आणि भक्तांनी भाजपचा प्रचार केला होता. हरी ओम तत्सत. पुन्हा असले मूढ प्रश्न विचारू नका की कोण आहे हा संत बाबा राम रहीम?

Maharashtra Times...
राम रहीमचा बचाव करताना भाजप खासदार साक्षी महाराज पुढे म्हणाले की, कोर्ट करोडो भक्त काय म्हणतात ते ऐकत नाही, केवळ एका तक्रारदाराचे म्हणणे मात्र एकते. मग एक तक्रारदार बरोबर आहे की, करोडो भक्त?. कोर्टाने साधा माणूस असलेल्या राम रहीमला बोलावले, याचा अर्थ झालेल्या नुकसानीला कोर्टही जबाबदार आहे.
भाजपचे आणखी एक नेता आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही नाव न घेता बाबा राम रहीमचा बचाव केला आहे. स्वामींनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'साधूंसाठी नवी धमकी: राजनेता आणि आश्रमांमध्ये राहणारे साधू स्वामीजींना तुरूंगात पाठवून आश्रमातील संपतीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. साधूंनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे.'

आत्ताच इथल्या लोकल रेडीओ स्टेशन वर ही बातमी ऐकली.
त्यांनी खुबीने कोण बाबा याचा जराही उल्लेख टाळून सुप्रीम कोर्टाने रेप केस मध्ये शिक्षा ठोठावलेला स्पिरिचुअल रॉकस्टार गुरु, ज्याला बाईक वरून फिरायला आवडतं.. इत्यादी सांगून चांगली बातमी दिली.
रेपीस्ट ऐकल्यावर आधी आसाराम वाटलं.. पण तो काही कूल रॉकस्टार नाही.. आता इकडे धागा उघडल्यावर भलताच बाबा आहे कळलं. कुठली शिक्षा सुनावली आहे बायदवे ?

भक्त म्हणून काही समाजकंटकही घुसलेले असतील.
>>>>
कोण भक्त आहे आणि कोण वेगळ्या हेतूने दंग्यात उतरलेला समाजकंटक आहे हे एकदा पकडल्यावर पास्ट रेकॉर्डवरून शोधणे कठीण नाही.

हरियाणा के शिक्षा मंत्री के बोल- डेरा प्रमुख के समर्थक हजारों लोग जमा हुए तो क्या? उन्होंने एक पेड़ तक नहीं तोड़ा
http://dhunt.in/2K9x4
via NewsHunt.com

^^^^^

हि कालची बातमी सापडली.

संत???

बहुधा संत असे नसतात. अशा नालायक माणसाला संत म्हणायचं म्हणजे खर्‍या संतांचा अपमान.
साक्षी राजकारणी बाबा (मी महाराज म्हणणार नाही) या भोंदूबाबा सारखाच नीच असेल म्हणून समर्थन करत असणार. करोडो लोक चुकीची अ
सतील तर का ऐकावं कोर्टानं? शेवटी गुन्हा तो गुन्हाच.
आणि एक गोष्ट भाजपाला कशाला हवेत असले साधू बाबा राजकारणात?

हा बाबा तो यु आर माय लव चार्जर वाला ना?
भयाण सिनेमे बनवुन स्वतःच हिरो असतो त्यात. खरंतर त्यामुळेच सिनेमे भयाण होतात.
हे पण धंदे केले होते का ह्याने. आंधळ्या भक्तांची पर्वा न करता शिक्षा होते ही चांगली गोष्ट आहे.
भक्त काय त्यांच्या देवाला नैसर्गिक मृत्यु आला तरी दंगे करतील

भक्त काय त्यांच्या देवाला नैसर्गिक मृत्यु आला तरी दंगे करतील>>>>> +१
हा आरामात सुटणार आनि परत एक चित्रपट काढणार.

सुटणार हा. किंवा अपेक्षेईतका लटकणार नाही. याला राजाश्रय आहे. भाजपाची विकासाची धोरण काय चूक काय नाही हे समजत नाही. समर्थक वा विरोधक जे चांगला मुद्दा मांडतील ते त्यावेळी खरे वाटते. मात्र भाजपा बुवाबाजीला फार थारा देते. काँग्रेसही लांगुलचालन करायला यांचा वापर करायची, पण भाजप यांना सोबत मांडीवर बसवते. मोदी स्वत: प्रत्यक्षपणे कधी अश्या गोष्टीँचे समर्थन करताना दिसत नाहीत, मात्र कडक भुमिका न घेता एखादे फुसकुली स्टेटमेंट सोडून अश्या प्रकरणांना इग्नोर करतात हे दुर्दैव्य. ते साक्षी महाराज की कोण आहेत ते अश्या प्रकरणात अचानक हिरो बनून कुठून प्रकट होतात समजत नाही. हा एकच माणूस वेडा आहे, बाकी आम्ही सारे शहाणे असे चित्र उभे करायला त्यांना वापरले जात असावे. काँग्रेसही बहुधा दिग्विजयसिंह की कोण यांमा असेच वापरायची बहुतेक..

बाकी हा गुरमीत राम रहीम नक्की आहे कोणत्या धर्माचा? साईबाबांसारखा सबका मालिक एक है आहे का?

हा आरामात सुटणार आनि परत एक चित्रपट काढणार.
नवीन Submitted by अंकु on 26 August, 2017 - 11:20

<<

मला तरी असे वाटत नाही. ह्या ढोंगी बाबाला, जामीना घेण्याकरिता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. मात्र काल ह्याच्या भक्तांनी माजवलेल्या हिंसेची भरपाई करायला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ह्या ढोंगी बाबाची संपत्ती जप्त करायचा आदेश दिलाय. तेंव्हा उच्च न्यायालय इतक्या सहजासहजी ह्या गुरमीत रामरहीमला जामीन मंजूर करेल असे वाटत नाही उलट कालच्या हिंसाचारात बळी गेलेल्या २८ लोकांच्या हत्येची केस ह्या ढोंगी बाबावर चालवली जाण्याची शक्यता आहे.

Pages