द्रौपदी

Submitted by _तृप्ती_ on 14 August, 2017 - 00:03

द्रौपदी भाग्यवानच होती, नाथांनी अनाथ केली तरी
कृष्ण सखा धावला होता
आणि काळाचा ठोका चुकता चुकता थांबला होता

आज नाथ नाही सखा नाही, विश्वासाला जागाच नाही
कालचक्रच उलटले जिथे,न्यायाची मागणी करू नका तिथे

पांचालीच्या दुःखाला राजमान्यता होती
इथे मात्र उघडपणे सांगण्याचीही चोरी आहे
मौनाचे व्रत काही जमेना आणि
महाभारत लढण्यासाठी कृष्ण काही मिळेना

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पांचालीच्या दुःखाला राजमान्यता होती
इथे मात्र उघडपणे सांगण्याचीही चोरी आहे
मौनाचे व्रत काही जमेना आणि
महाभारत लढण्यासाठी कृष्ण काही मिळेना >> व्वा अप्रतिम!!

छान! आशय आवडला.
मला रचनेत बदल करूशी वाटतोय... Lol करावा काय? Wink