" मी तुला भाऊ मानते " ...... ह्या वाक्याने प्रेमाचा शेवट झालेल्या सर्व भावांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा
मित्रहो ! हां अनुभव बहुतांश तरुणांनी आपल्या कॉलेज तसेच शालेय जीवनात अनुभवलेला असतो (अस्मादिकांनी ह्यास अपवाद मानण्याचा प्रश्न उद्भवणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो )आणि त्या क्षणी मात्र आपल्या मनाचा प्रचंड हिरमोड झाल्याने आपला देवदास नाही तर किमान उदास नक्कीच झालेला असतो.
अश्या काही ठळक आठवणी पुढे काही काळानंतर / वर्षा नंतर स्वत:लांच खूप हसु आणतात. आणि आपण आपल्या (प्रेम)वेडेपणावर तसेच झालेल्या फजीतीवरसुद्धा जीवनात फार गंभीर नसतो; कारण हां त्या विविक्षित वयोमर्यादेचा अनाहूत आकर्षणाचा फ़ार्स असतो हे आता ह्या वयात कळू लागलेले असते...
असे कळून गेलेल्या आणि अनुभव शेअर करु इच्छिणाऱ्या मुलांनी (आता प्रौढ़ किंवा तारुण्याच्या उतरणीस लागलेले तेव्हा boys ह्या केटेगरीत असणार आणि आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा देताना तेव्हढेच young होणार ह्या अर्थाने मुलांनी संबोधले ) आपले अनाहूत पणे घडलेले रक्षाबंधनाचे किस्से ईथे सांगितले तर !!
तळ टिप एवं संवैधानिक ईशारा -
कृपया यह धागा जले पे नमक छिड़कने वाला साबित हो सके ऐसे व्यक्तियोंसे अनुरोध है की इस विषय एवं धागेसे दूर रहे ।
(थोडक्यात म्हणजे ताज्या अनुभव असणाऱ्यांसाठी लेखक दिलगीर आहे तरी बाकीच्यांनी शेअर करावे ह्याकरिता हां धागा )
माझा एक अतिशय महान किस्सा आहे
माझा एक अतिशय महान किस्सा आहे.
मला अकरावी बारावी मध्ये एक मुलगी भयानक आवडायची. पण ती तशी अभ्यासू, साधी सरळ प्रकारात मोडणारी होती. त्यामुळे तिला प्रपोज वगैरे करायचा प्रश्नच नव्हता. माझ्या मित्रांना अर्थातच माझ्या क्रश बद्दल माहीत होते पण हळू हळू क्लास मध्ये कुजबुज व्हायला लागली असं मला माझ्या मैत्रिणींकडून कानावर यायला लागले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तसे माझे माझ्या क्रश सोबत बोलणे, बघून स्माईल देणे वगैरे चालायचे. पण क्लास मध्ये चालणाऱ्या गोष्टींमुळे तिला त्रास होऊ नये या उदात्त भावनेने मी एके दिवशी तिच्या कडे राखी घेऊन गेलो आणि क्लास मध्ये आपल्या विषयी बोलतात म्हणून तू मला राखी बांध असा आग्रह केला
माझा हा मूर्खपणा विसरायचा मी कैक वेळा प्रयत्न केला पण अजून पण माझे मित्र दर गेट टूगेदर माझी या विषयावरून आवर्जून खेचतात. त्यामुळे जखम अजून ओलीच आहे.
ओह अतरंगी so sorry 4 जले में
ओह अतरंगी
so sorry 4 जले में नमक़
पण खरेतर असे मूर्खपणा केलेला कधीकधी फायद्याचाही ठरत असावा ! ह्या नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रेमसागरात येणाऱ्या पुढील नारळांवरुन / प्रतिसादांवरुन कळेलच म्हणा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिल्या वहिल्या नारळा बद्दल तुमचे अभिनंदन
पण क्लास मध्ये चालणाऱ्या
पण क्लास मध्ये चालणाऱ्या गोष्टींमुळे तिला त्रास होऊ नये या उदात्त भावनेने मी एके दिवशी तिच्या कडे राखी घेऊन गेलो आणि क्लास मध्ये आपल्या विषयी बोलतात म्हणून तू मला राखी बांध असा आग्रह केला >>>
सॉरी पण रहावले नाही
पण क्लास मध्ये चालणाऱ्या
पण क्लास मध्ये चालणाऱ्या गोष्टींमुळे तिला त्रास होऊ नये या उदात्त भावनेने मी एके दिवशी तिच्या कडे राखी घेऊन गेलो आणि क्लास मध्ये आपल्या विषयी बोलतात म्हणून तू मला राखी बांध असा आग्रह केला >>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
VB आणि सायुरी
VB आणि सायुरी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुम्ही सुद्धा अनुभव शेअर करु शकता
पीछा छुड़ाने के लिए क्या क्या कारनामे किये और कैसे इस रक्षाबंधन दिन का बेसब्रीसे इंतज़ार किया
तेव्हापासून अतरंगी पणा करत
तेव्हापासून अतरंगी पणा करत होता तर
सॉलीड किस्सा आहे पण, आवडला
भाऊ का खपल्या काढता?
भाऊ का खपल्या काढता?
उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या ऽऽऽऽ
आपण क्युट(साधा सरळ, निरागस,
आपण क्युट(साधा सरळ, निरागस, सालस, सात्विक या अर्थाने) आहात असे नमूद करावे वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा नाही पण माझ्या
माझा नाही पण माझ्या मैत्रीणिचा किस्सा आहे.
त्यानंतर दहावीपर्यंत प्रत्येक रक्षाबंधनला ती त्याला राखी बांधायची.
शाळेत असताना तिला आम्ही एका मुलाच्या नावाने चिडवायचो. कारण आम्हाला एका मित्राकडून खबर मिळाली होती कि त्या मुलाला हि आवडते म्हणून. जाम पिडायचो आम्ही तिला. शेवटी कंटाळून तिने वर्गात रिसेसमध्ये सर्वांसमोर त्याला राखी बांधली. बिचाऱ्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला
पीछा छुड़ाने के लिए क्या क्या
पीछा छुड़ाने के लिए क्या क्या कारनामे किये और कैसे इस रक्षाबंधन दिन का बेसब्रीसे इंतज़ार किया Lol >>>> मी दिलेये एकदा एकाच्या कानाखाली ते पाहुन नंतर कुणी आगाऊपणा करायची हिम्मतच नाही केली. रक्षाबंधनाची वाट पाहत का ऊगाच बसायचे आपला त्रास टाळण्यासाठी
gr8 VB
gr8 VB
आवडले
आज खरेतर मुलींनी असेच रोखठोक वागावे
उगीच फाजिल प्रकारास बढ़ावा मिळेल असे नरमाईचे धोरण स्वीकारले तर अधिकच मनस्ताप होतो हे खरेच
माझी बहिण कॉलेज मध्ये असताना
माझी बहिण कॉलेज मध्ये असताना तिलाहि एका मुलाने प्रपोझ केलेले तिने मोठ्या भावाचा फोटो मोबाईलवर ठेवलेला तो फोटो त्याला दाखवला हा माझा प्रियकर आहे आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे असे सांगितले. त्यानंतर तिला त्या मुलाकडुन त्रास झाला नाही.
मी कॉलेजमध्ये एका मुलीला
मी कॉलेजमध्ये एका मुलीला बोललेलो, मला तुझ्यात माझी बहीण दिसते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि एक्चुअली तसेच होते. तिचा चेहरा माझ्या एका चुलत बहीणीशी बरेच साम्य राखणारा होता. त्यामुळे त्या मुलीला पाहताच माझ्या चेहरयावर खूप प्रसन्न स्माईल यायचे. तिने आणि तिच्या ग्रूपमधील मैत्रीणींनी याचा वेगळा अर्थ काढला. माझ्या डोक्यातही असले काही आले नाही. कॅम्पस, कॅन्टीन, जिम, लायब्ररी.. एकमेकांसमोर येताच आम्ही एकमेकांना गोड स्माईल देऊन पुढे जायचो. एकदा मग रोज डे ला तिच्याकडून पिवळे गुलाब आले. म्हटले तर पिवळेच. पण मुलीकडून आलेले. मुलं चिडवायला लागली. मग मलाही शंका आली. मी तिला गाठले. स्वताही पिवळे गुलाब दिले. आणि त्याच संध्याकाळी कॅन्टीनमध्ये गप्पा मारताना तिला हे बहिणीचे सांगून टाकले. तिचा चेहरा बघून मला काय ते समजले. पुढे मग आमच्यात काहीच उरले नाही. ना भावाबहिणीचे नाते, ना मैत्री, ना तसले काही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मित्रांनी मला फार शिव्या घातल्या. पोरगी स्वताहून पटत होती तर मी चान्स घालवला असे त्यांचे म्हणने होते. अध्येमध्ये मी सुद्धा विचारात पडायचो, च्यायला आपण चुकलो तर नाही. कारण सौण्दर्य हा आमच्या घराण्याला शापच असल्याने मी, माझी बहिण आणि तिच्यासारखी दिसणारी ती देखील सुण्दरच होती. पण जेव्हा ती नजरेस पडायची तेव्हा मात्र मला बहिणच आठवायची. मग कसलं काय... माझा निर्णय योग्यच होता.
पण एक गोष्ट त्या दिवशी मला समजली. जर तुम्हाला एक बहिण असेल तर जगातल्या सहा मुली तुमच्या लिस्टमधून कट होतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑलमोस्ट प्रत्येक वेळी (मोबाईल
ऑलमोस्ट प्रत्येक वेळी (मोबाईल वापर सर्वत्र प्रचलित झाल्यानंतर) हिट आणि भरवशाची असणारी आइडिया
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंगेश
पण ते निडर पणे वापरणे हेसुद्धा तितकेच महत्वाचे
ह्याआधीचा काळ आठवतो मला (म्हणजे माझ्या कॉलेज वेळचा) तेव्हा सुद्धा मोस्ट ऑफ़ टाइम एक कॉमन " बंधु "कॉलेजमध्ये असायचा (अर्थात दांडगट शरीरयष्टी पण सुसंकृत स्वभाव आणि सिनिअर कॉलेजमध्ये असणारा) आणि अश्या प्रसंगी मुली ....दादाला सांगेन हम्म अशी गोड़ धमकी न चुकता द्यायच्या आणि मग समोरच्या नवशिक्या मुलाचा पोबारा ठरलेला असे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचा किस्सा शेअर केल्याबद्दल
तुमचा किस्सा शेअर केल्याबद्दल धन्यवाद ऋ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्या सिक्योर्ड कैटगरी साठी कधीकधी मनाविरुद्ध फार मोठे बलिदानही दिले जाते हेसुद्धा खरेच
अजून असला अनुभव आलेला नाहीये
अजून असला अनुभव आलेला नाहीये पण आता येण्याची दाट शक्यता आहे...कुणीतरी उपाय सुचवा बरं.....
मी १९९४ ला १० पास झालो. ८ वी
मी १९९४ ला १० पास झालो. ८ वी ते १० वी या तीन वर्षात मला दोन मुली आवडायच्या. त्यातली पहिली 'ए' मला भाऊ बनवून गेली व दुसरी 'बी' जस्ट अ फ्रेंड एवढच मानायची. 'ए' नी भाऊ बनविल्यामुळे तो विषय तसा १९९३/९४ मध्येच संपला. 'बी'वरचं प्रेम मात्र तसचं राहिलं. पण नंतर मीही गाव सोडलं व पुढच्या शिक्षणासाठी शहरात निघून गेलो.
बी ची मैत्रीण 'सी' मी गेलेल्या नवीन शहरात शिकायला आली. मग पदवीचे पाच वर्ष 'सी' सोबत गेले. सुरुवातीला जस्ट फ्रेंड म्हणत आलेली 'सी' प्रेयसी बणून माझे पुढील पाच वर्ष समृध्द केले. पण नंतर अजून तेच... पोरी पदवी नंतर लगेच लग्नाच्या होतात पण पोरांच्या करीअरचा पत्ता नाही. त्यामुळे सी चा एका चांगल्या पोराशी लग्न झालं. त्या लग्नात ए आणि बी दोघीही भेटल्या, नुसतं जुजबी बोलणं झालं तेवढच. म्हणजे १९९८-९९ मध्ये ए, बी, सी स्टोरी पुर्णपणे संपली. एका गोष्तीची मात्र कमाल वाटते... सी व बी सख्ख्या मैत्रीणी. पण सी नी बी शी माझं प्रकरण शेअर केलेलं दिसत नाहीये. मागेपुढे कधी ते केलच तर माझी वॉट लागेल म्हणून अधेमधे घाबरत असतो. असो.
त्या नंतर माझी नोकरी, लग्न, मुलबाळं सगळं झालं. मधे बराच गेप गेल्यावर २०१५ मध्ये ए एका लग्नात भेटली. म्हणजे जवळ्पास १५-१६ वर्षानी. तेंव्हा मात्र तिला बघून मनातून वाटलं की हिनी मला रिजेक्ट केलं ते बरच झालं. कारण २०१५ च्या माझ्या निकषावर ती माझी बाय्को म्हणून सर्वार्थाने अनफिट वाटली. त्याच बरोबर स्वतःवर हसूही आलं. मनातल्या मनात भाऊ बनविल्या बद्दल ए चे आभार मानले.
मग आजुन काही वर्षे गेली व ओगस्ट २०१६ मध्ये बी भेटली. लग्न झालेलं, एक मुलगा पण आहे तिला. बाकी सगळं मस्त चालू आहे तिचं. तिला एकाठिकाणी पाणिपुरी खायला खूप आवडायचं. तीला पाहण्यासाठी त्या पाणीपुरीच्या ठेल्याच्या आसपास मी तासनतास ताटकळत राहायचो. अर्थात हे तिला माहित नव्हतं. २२ वर्षाच्या गेप नंतरही ती जागा मला अजूनही आठवत होती. तिला सहज म्हटलं... गुप्ताच्या ठेल्यावर पाणिपुरी खायला जावू या का? तीचे डोळे अचानक चमकले व मोठ्या आनंदात तिकडे झेपावलो. पाणिपुरी खाऊन निघताना ती खूष दिसत होती. तसं बोलणं जवळ्पास नव्हतच... बस सोबतीने चालत होतो. अन मग तिनी हळूच माझा हात हात घेतला. मला कळेना काय करावं. आम्ही चालतच राहिलो. मला वाटलं हात दाबावा... पण नाराज होईल याची भिती आजही तितकीच होती जी २२ वर्षा आधी होती. काही दूर गेल्यावर मग तिनीच हात दाबला. मग मात्र खात्री झाली. त्या नंतर मी ही हात दाबला. अर्धाएक किलोमिटर नुसतं हातात हात धरुन फिरलो. छान वाटलं. पण पठ्ठीनी तोंडातून एक शब्द नाही काढला... मीही नाही काढला. काय बोलू यार...! पण हातात हात धरुन चालण्याच एक जादू असते. हा एक नवा अनुभव घेत होतो. व्यक्ती आवडीची असली की कृतीतिल विविध छटा ठळकपणे अनुभवता येतात. नाहितर नुसती कृतीच उरते... छटा दिसतच नाहीत. हातात हात घालण्याची जादू अनुभवण्यासाठी पुढची व्यक्ती खास असली पाहिजे.
आता मधेमधे फोनवर बोलते... पण खुपच जनरल बोलणं होतं. पण त्यातही आनंद असतो.
... सी का इंतजार जारी है!
@रानपाखरु, भारी आठवण...
@रानपाखरु, भारी आठवण...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
C लवकरच भेटो..शुभेच्छा
खरंच भारीय अनुभव रानपाखरु
खरंच भारीय अनुभव रानपाखरु
काही आठवणी अश्याच हळुवार जपण्यात मज्जा असते
काही आठवणी अश्याच हळुवार
काही आठवणी अश्याच हळुवार जपण्यात मज्जा असते>> आणि हो.. मला पाणिपुरी अजिबात आवडत नाही. पण तिच्या सोबत खाल्लं बुवा. साला माणूस बैमान असतो नै.
बायकोलाही पाणिपुरी आवडते. मी कधीच तिच्या सोबत खाल्ल नाही. पण आता बायको सोबतही पाणीपुरी खावं म्हणतो... बायकोला जपावं या टप्प्यावर येऊन उभा झालोय यार. याला वयाने येणारी परिपक्वता म्हणावं... की इमोशनल फूल म्हणावं. काहिही असो. पण अबतो बिबीके साथ पानीपुरी खानाही पडेगा.
फारच कमी प्रतिसाद आलेत पण जे
फारच कमी प्रतिसाद आलेत पण जे आलेत ते भारी आहेत![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
धन्यवाद एमी
धन्यवाद अॅमी
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बहुधा पाफा म्हणतात तेच कारण असावे मैक्सिमम मुलांकडून कमी प्रतिसाद येण्यास
ह्या धाग्याने-
उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या ऽऽऽऽ
म्हणून अनुभव शेअर करायला चालढकल असावी
मस्त धागा आहे हा.आतापर्यंतचे
मस्त धागा आहे हा.आतापर्यंतचे सगळे किस्से ही छान.
सर्वांचे किस्से भारी आहेत..
सर्वांचे किस्से भारी आहेत..
मस्त्त् धागा किस्से भारी
मस्त्त् धागा किस्से भारी
धन्यवाद अंकु, मेघा आणि
धन्यवाद अंकु, मेघा आणि पंडितजी
तरुणाईचा धागा दिसतोय.
तरुणाईचा धागा दिसतोय. रक्षाबंधन केल्याने पोरगी पटता पटता राहिली वगैरे किस्से = : हाहा : जवानीकीयादेताजाकरदीवगैरे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता माझे म्हातार्याचे २ शब्द.
पोराहो, राखी फक्त बहिणीने भावाला बांधायची नसते. तू माझे रक्षण कर, असे सांगणार्या कुणीही कुणालाही बांधली तरी चालते. अगदी बायकोने नवर्याला बांधली तरी हरकत नसते.
पण ते एक असो.
माझ्या डोक्यात जाणारे सक्तीचे रक्षाबंधन म्हणजे, राखीपासून थेट पोळ्यापर्यंत घरी-दारी-दुकानी उगवणारे "गुरुजी" लोक्स.
लाल दोर्यात थोडा पिवळा गोंडावाल्या 'त्या' राख्या घेऊन हे ब्रह्ममूहूर्तावर उगवतात. सायकलपासून यजमानापर्यंत घरादारातल्या सगळ्यांना राखी बांधतात. अगदी माझ्या कारच्या आरशालाही. ते हे सगळे कररतात, त्याचे नक्की कारण काय, ते तुमच्या ध्यानी आले असेलच. मीही त्यांची मजबूरी म्हणून सोडून देत, थोडी इच्छापूर्ती करून टाकतो. पण कित्येकांची इच्छा जरा जास्तच असते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर किस्सा. मागच्या मंगळवारी भर दवाखान्यात एक महोदय आले होते. आमच्या कंपावंडरसाहेबांनी येऊन सांगितले, एक गुरुजी आले आहेत, तुम्हाला भेटायचं म्हणताहेत, अन त्यांच्या हातात राख्या आहेत,
म्हटलं, "गजा, पोळा होउन गेलेला आहे. राखी बांधायचा मुहूर्त संपला आहे. जर ते गुरुजी पेपर न काढता (
) चुकून माझ्या केबिनमधे आले, तर दक्षिणेची रक्कम तुझ्या पगारातून कापून घेईन"
तर अशा रितीने माझे (अजून एक) सक्तीचे रक्षाबंधन टळले.
पोराहो, राखी फक्त बहिणीने
.
वनंटार्आम्ङॅअॅ खुपच सज्जन
वनंटार्आम्ङॅअॅ खुपच सज्जन आहात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Majesheer dhaga.
Majesheer dhaga.
Atarangi hyancha kissa bhannat ahe.
Mala eka mulavarun chidvayache
chidawanaryanna ततसल्काही नाही he paTave mhanun tyala ani to barobar gheun aala mhanun ajun teeghanna rakhee bandhanyacha gadhavpana kelela shalet asatana.
Aathavala tar malach hasu yet ani bawalat feeling dekhil yet.
Pages