नमस्कार,
येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.
मुंबईतला कार्यक्रम दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर जमून तेथून विल्सन कॉलेजपर्यंत जायचं, असा आहे; तर पुण्यात दुपारी ५ वाजता रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गांधी पुत़ळ्यापाशी जमून तेथून कलेक्टर कचेरीजवळील आंबेडकर पुत़ळ्यापर्यंत चालत जायचं, असा कार्यक्रम आहे. याविषयी अधिक माहिती - http://breakthrough-india.org/imfs2017/index.html - या दुव्यावर मिळू शकेल.
या संचलनाला आणि चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
हे संचलन आम्ही ज्या मागण्यांसाठी करणार आहोत, त्या आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -
(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.
(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.
(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.
(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.
या मागण्यांमागची आमची भूमिका अशी -
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. पण ते तितकंसं खरं नाही. आज आपल्याला जी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतली प्रगती दिसते आहे, ती झाली आहे कुतूहलामुळे. का, कसं आणि कशामुळे हे प्रश्न अत्यंत मूलभूत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे मूलभूत संशोधन! ज्ञानप्राप्ती हा मूलभूत संशोधनामागचा मूळ हेतू असतो. आपल्या अवतीभवती जे घडतं, त्याचा अर्थ लावण्याचं काम मूलभूत विज्ञान करतं. नव्यानं समोर येणार्या घटना आणि त्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचं कुतूहल यांतून विज्ञानाची प्रगती होते. ही प्रगती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
सफरचंद झाडावरून खाली का पडलं, असा विचार करताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; एका पेट्रिडिशमध्ये सूक्ष्मजंतू वाढत असताना त्या डिशवर चुकून आलेल्या बुरशीनं त्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली आणि या निरीक्षणामागचं कारण शोधताना अलेक्झांडर फ्लेमिंगना प्रतिजैविकांचा शोध लागला; या आणि अशा अनेक सुरस कथा आपण ऐकतो. मात्र नीट विचार करता हे शोध असे एका ओळीत मावतील इतके सोपे नसतात, हे आपल्याला जाणवतं. कारण विज्ञानाच्या मूलभूत शाखांमधलं संशोधन हे पूर्वसुरींच्या संशोधनाचा आधार घेत पुढे जाणारं असतं. आज मूर्त स्वरूपात दिसणारा एखादा शोध हा कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आपल्यासमोर आलेला असतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे काही गोळीच्या रूपात हाती लागलं नाही. फ्लेमिंग यांना पेनिसिलीन नैसर्गिकरीत्या तयार करणारी बुरशी सापडली. त्या शोधानंतर त्या बुरशीपासून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात वेगळं करणं, पेनिसिलीनची रासायनिक रचना शोधून काढणं आणि प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग, हे सारं एका माणसाचं काम नव्हतं. १९२८ साली फ्लेमिंग यांनी पेनिसिलीयम या बुरशीचा शोध लावला आणि १९४१ साली पेनिसिलीन हे द्रवरूपात रुग्णाला इंजेक्शन म्हणून उपलब्ध झालं. त्यावर आजही भरपूर संशोधन सुरू आहे.
म्हणजे मूलभूत संशोधनाची मुख्य वैशिष्ट्यं अशी सांगता येतील -
१. ज्ञानप्राप्ती / कुतूहल हा मूळ हेतू. त्यामुळे एखाद्या शोधाचा तत्काळ उपयोग असेलच, असं नाही.
२. अज्ञाताचा शोध घेताना अनेक प्रयोग अयशस्वी होणं – यशाचं अत्यल्प प्रमाण.
३. अनेको वर्षं, किंबहुना निरंतर चालणारं काम.
४. अनेकांच्या सहकार्यानं चालणारं काम.
मूलभूत संशोधनाला भरपूर पैसा लागतो. ही त्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक असते. मूलभूत संशोधनाचे फायदे लगेच दिसत नसले, तरी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखकर, संपन्न जगण्यासाठी संशोधन व त्यावर होणारा खर्च टाळणं शहाणपणाचं नसतं. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २.७४२% वाटा विज्ञान-संशोधनासाठी राखून ठेवते. चीन आपल्या उत्पन्नाचा २.०४६% भाग संशोधनावर खर्च करतो. जगात संशोधनासाठी सर्वाधिक खर्च करणारा देश दक्षिण कोरिया असून तिथे या खर्चाचं प्रमाण ४.२९२% इतकं आहे. विकसनशील देशांमध्ये ब्राझील त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१५% वाटा संशोधनासाठी राखून ठेवतो. भारतात हे प्रमाण ०.८% इतकं आहे.
भारतानं संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३% भाग राखून ठेवावा, अशी मागणी गेली अनेक दशकं शास्त्रज्ञ करत आहेत. आजवरच्या एकाही सरकारनं ही मागणी पूर्ण केलेली नाही. गेल्या दोन दशकांत हा खर्च वाढवण्याची आश्वासनं तीनदा दिली गेली, मात्र मूलभूत संशोधनाचं महत्त्व आणि त्यासाठी उपलब्ध असणारा निधी यांचं आपल्या देशातलं व्यस्त प्रमाण वारंवार सत्ताधार्यांच्या लक्षात आणून देऊनही हा खर्च वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही झाली नाही. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं पूर्ण होत असताना विज्ञानासाठी भरीव आर्थिक तरतूद नसणं, हे खेदकारक आहे.
त्यातच भारतातल्या प्रमुख संशोधनसंस्थांना मिळणारा निधी कमी होत जातो आहे. संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या निधीत वाढ करण्याऐवजी देशभरातल्या संशोधनसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि संशोधनासाठी लागणारा काही निधी स्वत: उभारावा, असं सरकारचं मत आहे. त्या दिशेनं निधिकपातही लगेच सुरू झाली आहे. सीएसआयआर, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडे संशोधनप्रकल्पांसाठी पुरेसा पैसा नाही. हीच कथा अणुऊर्जा आयोग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयआयटी, आयसर, टीआयएफआर यांचीही आहे. या संस्थांमधले अनेक संशोधनप्रकल्प सध्या आर्थिक चणचणीमुळे खोळंबले आहेत. निधिकपातीमुळे आयआयटी, आयसर अशा संस्थांमधली विविध शुल्कही वाढली आहेत.
शास्त्रज्ञांनी दरवर्षी अमूक इतकी उत्पादनं / तंत्रज्ञानं बाजारात आणावी, त्यांनी सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असं संशोधन करावं, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे. मुळात उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या खांद्यावर उभं असतं. क्वांटम भौतिकीच्या सखोल अभ्यासाअभावी आपण लहानांत लहान सेमिकंडक्टर तयार करू शकलो नसतो. पुण्यात डॉ. मुरली शास्त्री यांनी चांदीचे नॅनोकण तयार करून त्यांचा अभ्यास केला नसता, तर ’टाटा स्वच्छ’सारखं कमी खर्चातलं पाणी शुद्ध करणारं यंत्र तयार होऊ शकलं नसतं. पण बाजारपेठेसाठी केवळ काही उत्पादनं निर्माण करणं, हे प्रत्येक शास्त्रज्ञाचं काम नाही. केवळ तंत्रज्ञान-विकास हा मूलभूत संशोधनाचा उद्देश नसतो. शास्त्रज्ञांनी सरकारी धोरणं आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या आवडीचे राजकीय-सामाजिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठीच काम करणं, हे अन्यायकारक आहे. त्याच्या आवडीच्या विषयात मूलभूत संशोधन करणार्या शास्त्रज्ञाला अमूकच विषयात संशोधन करायला सांगणं, किंवा त्याला तसं संशोधन करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण करणं, हे घातक आहे.
सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीवर चालणार्या संशोधनसंस्थांमधल्या संशोधनामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, ही अपेक्षा योग्य आहे आणि देशातल्या अनेक संस्था त्या दिशेनं काम करतही आहेत. मात्र नवी ’स्टार्टअप्स’ सुरू होणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. शिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा टीआयएफआर अशा मूलभूत संशोधनासाठी नावाजल्या गेलेल्या संस्थांकडूनही असंच आणि इतकंच संशोधन व्हावं, ही अपेक्षा गैर आहे. या संस्थांमधल्या संशोधनावर किती पैसा खर्च झाला आणि त्यातून ’परतावा’ किती मिळाला, असा हिशेबही चुकीचा आहे. मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही. या देशासमोर असलेले अन्नधान्याचे, आरोग्याचे प्रश्न किंवा नद्यांची आणि रस्त्यांची स्वच्छता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करताना मूलभूत विज्ञानाचा बळी जाणं हितावह नाही.
देश स्वयंपूर्ण व्हावा, नवी तंत्रज्ञानं विकसित व्हावी या अपेक्षापूर्तीसाठी संशोधनाला पाठिंबा देऊन शास्त्रज्ञांना मोकळीक मिळायला हवी. विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही. या बाबतीत रामानुजनचं उदाहरण बोलकं आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणित करणार्या रामानुजनला प्रचलित पद्धत शिकवायचा प्रयत्न हार्डीनं केला. परंतु ते मानवत नाही, हे ध्यानात येताच त्यानं पूर्ववत पद्धतीवर भर दिला. अशा परिपक्वतेची व लवचिकतेची आज गरज आहे.
विज्ञाननिष्ठ समाज हा नेहमी प्रगतिशील समाज असतो. ज्या देशांनी मूलभूत संशोधनात गुंतवणूक केली ते देश नेहमीच प्रगत झाले आहेत. अर्थात आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर मूलभूत विज्ञानांतील गुंतवणुकीला पर्याय नाही.
मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमागे निधीचा अभाव हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या अभावामागे असलेलं वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे कारण अधिक गंभीर आहे. मूलभूत संशोधन महत्त्वाचं का, याचं उत्तर जर सामान्य जनतेला माहीत असेल, तर शास्त्रज्ञांना समाजातून आपोआप प्रोत्साहन मिळेल, शिवाय सरकारदेखील त्याकडे अधिक गांभीर्यानं बघेल. यासाठी मूलभूत संशोधनाला लोकाश्रय मिळायला हवा. विज्ञानाविषयी भारतीयांचा अत्यंत उदासीन असा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. अर्थात याचं काही अपश्रेय शासनाच्या आणि खुद्द संशोधकांच्या माथी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आपलं संशोधन लोकांपर्यंत नेलं पाहिजे.
एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना छद्मविज्ञानाला राजाश्रय मिळणं ही गंभीर बाब आहे. या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची धोरणं आखणार्या, निर्णय घेणार्या आणि निधिवाटप करणार्या संस्था आणि संस्थाचालक छद्मविज्ञानाचा पुरस्कार करताना दिसून येतात. विज्ञानाशी संबंध नसलेल्या बिगरसरकारी संस्थाही सरकारी संशोधनसंस्थांच्या कामकाजात ढवळाढवळ करून छद्मविज्ञानाचा प्रचार करताना, त्यासाठी निधी मिळवताना दिसतात. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणं हे जागृत आणि सक्षम समाजाच्या जडणघडणीसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. हे घडण्यासाठी सामान्य नागरिकांना विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे समजणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्यांना कुठले दावे केवळ शास्त्राचा देखावा करीत आहेत, हे ओळखता येणंही गरजेचं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य, अतार्किक आणि प्रसंगी क्रूर अशा प्रथांना वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न सतत होतो आहे. त्याचबरोबर वेद-पुराण आणि महाकाव्यं यांतला प्रत्येक संदर्भ हा शास्त्रीय आधारावरच उभा आहे, हे ठसवण्याचा जोरकस प्रयासही चालू आहे.
छद्मविज्ञानी संस्था आणि त्यांचे दावे यांचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या राजकीय, धार्मिक अथवा सांस्कृतिक मतांचा त्यांच्या निष्कर्षांवर असलेला जबरदस्त पगडा. या मतांप्रमाणे संशोधनाचे निष्कर्ष आले नाहीत, तर त्यांच्यात अक्षम्य फेरफार केले जातात किंवा अस्तित्वात असलेल्या सिद्धांतालाच नाकारलं जातं. संशोधन करताना त्याचा निकाल आधीच ठरवून मग सुरुवात करण्याचा हा उरफाटा उद्योग आहे. आधीच ठरलेल्या निष्कर्षांना पूरक असलेली निरीक्षणं घेऊन केलेल्या वैज्ञानिक तपासणीमुळे झालेल्या नुकसानाची कितीतरी उदाहरणं आहेत.
छद्मविज्ञान हे ज्ञान आणि सत्य यांच्या मूलभूत संकल्पनेवरच हल्ला चढवत असतं. त्याचप्रमाणे खऱ्या शास्त्रीय संशोधनांवर जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होणं अपेक्षित आहे, त्याचा अपव्यय अशा निरर्थक ’शोधां’मुळे केला जातो. 'आपल्या महान, पुरातन परंपरेला सगळंच ठाऊक होतं, आपल्या पूर्वजांनी सगळेच शोध लावले होते', अशी भ्रामक अहंगंड जपणारी आणि स्वकष्टानं नवी ज्ञाननिर्मिती करण्यापासून परावृत्त करणारी घातक वृत्ती समाजात बोकाळणं, हा छद्मविज्ञानाचा सगळ्यांत मोठा धोका आहे.
भारतीय वैज्ञानिक परंपरेत अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी आहेत हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु त्या गोष्टींबद्दल न बोलता भलत्याच गोष्टींचा अभिमान बाळगावा, असा अभिनिवेश समाजात बोकाळला आहे. उदाहरणार्थ, डायोफंटाईन इक्वेशन्स सोडवण्यामध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारखे भारतीय गणिती पाश्चात्य गणितज्ञांपेक्षा काही शतकं आघाडीवर होते. परंतु ब्रह्मगुप्ताची 'कुट्टक' किंवा भास्कराचार्यांची 'चक्रवाल' पद्धत यांविषयी भारतीयांना किंवा आपल्या नवीन पिढीला काहीच माहिती नाही. याउलट 'वैदिक'ही नसलेल्या व 'गणित'ही नसलेल्या काही क्लृप्त्या 'वैदिक गणित' मानून त्यालाच आपला वारसा मानण्याचं खूळ समाजात वेगानं पसरतं आहे. चरकसंहितेचा आधार घेऊन सूक्ष्मकणांवर आणि भस्मांवर संशोधन करणार्या नॅनोशास्त्रज्ञांचं, किंवा आवळ्याच्या रसामुळे गॅमा किरणांपासून होणारी हानी कमी होऊ शकते, असं संशोधन करणार्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचं काम बघण्या-वाचण्यापेक्षा आपण ’गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यांबद्दल बोलतो. याची परिणती आपल्या खर्याखुर्या ठेव्यावर प्रेम करणारी संयत राष्ट्रभक्ती सोडून एक भलताच आक्रमक व अनिष्ट राष्ट्रवाद वेगानं मूळ धरू लागण्यात होत आहे.
छद्मविज्ञानाला नाकारणं म्हणजे धर्माला नाकारणं आणि तसं करणं म्हणजे देशद्रोह अशीही विचारधारा मूळ धरू पाहत आहे. विज्ञानाची सांगड सातत्यानं धर्म आणि अध्यात्म यांच्याशी घातली जात आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन समांतर धारा आहेत, आणि त्या तशाच असाव्यात. धार्मिक ग्रंथांमधल्या साहित्यांत विज्ञान शोधण्याच्या प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये केला जातो. पण विज्ञान आणि धर्म यांच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाचा परीघ मोठा आणि सर्वसमावेशक आहे. त्याची तुलना कोणत्याही धर्माशी करून आपण विज्ञानाचं कार्य आणि व्याप्ती या दोहोंवर अन्याय करतो. पण विज्ञान आणि धर्म या दोहोंसाठी हानिकारक असा एक मानवी दुर्गुण आहे - असहिष्णुता.
अॅरिस्टोटल म्हणाला होता - एखादी गोष्ट पटत नसली तरी तिचा सगळ्या बाजूंनी विचार करणं, हे सुविद्य मनाचं लक्षण आहे. असहिष्णुता ही जशी सगळ्या धर्मांच्या मूलभूत शिकवणींवरच घाला घालते, तशीच ती वैज्ञानिक तपासाच्या पायावरही आघात करते. धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंसाचार होतो, शांतता भंग होते. बौद्धिक असहिष्णुतेमुळे विज्ञानाचं नुकसान होतं. विज्ञानाची व्याप्ती मोठी असली तरी वैज्ञानिक होण्याआधी बरेचदा माणसाच्या मनावर धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यातूनच विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायचा मोह निर्माण होतो. पण धार्मिक शिकवणीनं मन खुलं झालं असेल, तरच ते विज्ञानाला पोषक बनू शकतं. धार्मिक शिकवणीनं बंद झालेलं असहिष्णू मन हे विज्ञानासाठी धोकादायक आहेच, शिवाय धार्मिक संस्कारांच्या अंतिम ध्येयाला, म्हणजे वैयक्तिक मनःशांती आणि समाधान यांनासुद्धा असं मन पोषक नाही.
सहिष्णुतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:च्या श्रद्धेला असलेली संशयाची किनार. ही संशयाची किनार आपण स्वत:च द्यायची असते. स्वत:च्याच श्रद्धेकडे किंचित संशयानं, कणभर अविश्वासानं पाहणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ही कसरत कशी करायची, हे विद्न्यानाकडून शिकता येतं. अशी धार्मिक श्रद्धा आपोआप सहिष्णुतेचा कित्ता गिरवते.
सारासार आणि तारतम्यानं विचार करणं या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होत. आपल्या आसपास होणार्या घटनांचे अर्थ लावताना त्यात हा सारासार विचार करता आला पाहिजे. हा अर्थ लावताना आपले पूर्वग्रह व आपल्या श्रद्धा खुलेपणानं मान्य करणं आवश्यक आहे. एखादं अनुमान काढताना आपली गृहितकं कोणती, ही बाबतर सतत तपासून पाहावी लागेल. त्या गृहितकांवर कोणी आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपांना उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देणं व प्रतिक्रिया देणं यांत महदंतर आहे. प्रतिक्रिया देण्यात केवळ स्वतःच्या मतांच्या कातडीचा बचाव आहे. उत्तर देण्यात इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनन अपेक्षित आहे. या मननात ’आपण ज्या गोष्टींना पुरावा समजतोय त्यांना पुरावा का मानले जावे?’, ’आपली गृहितकं कोणती?’, ’आपण जो निष्कर्ष काढला आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या?’ या प्रश्नांची उत्तरं शोधणं अंतर्भूत आहे... हे खरं संशोधन होय. या गोष्टी विज्ञानजगतात कराव्या लागतात, त्यामुळे आपण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आणि या खंडनमंडनातून निघतं त्याला (आणि त्यालाच) संशोधनाचा दर्जा प्राप्त होतो.
जोपर्यंत समाजमानसिकतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात नाही, तोपर्यंत समाजशास्त्र, मानव्यशास्त्रे इत्यादी विद्वत्शाखांमध्येही मूलगामी, समाजोपयोगी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन व त्याचे उपयोजित फायदे निर्माण होणं अशक्य आहे. विज्ञानसंशोधनाला पाठिंबा देताना त्यात सामाजिक व मानव्यशास्त्रेही अंतर्भूत आहेत, हे विसरता कामा नये. कारण वर्ण्य-विषय वेगळे असले, तरी संशोधन व ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया यांचे निकष व घटक समानच असतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच जमू शकतं. किंबहुना, असा दृष्टिकोन बाळगून सारासार विश्लेषण करता येणं, ही आपल्या हितासाठी आवश्यक गोष्ट ठरते. शास्त्रीय दृष्टिकोनाअभावी तरतमभाव येत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वच शास्त्रांचं ज्ञान नसतं, ते आवश्यकही नाही. आवश्यक आहे ती शास्त्रीय विचार करण्याची क्षमता आणि त्याहीपुढे जाऊन तसा विचार सातत्यानं करण्याची सवय. ज्या समाजाच्या नागरिकांना अशा पद्धतीच्या सारासारबुद्धीचं महत्त्व पटत नाही, त्या समाजाला अज्ञानामध्ये जखडून ठेवणं सोपं असतं, कारण अशा समाजाला वि-ज्ञान व छद्मज्ञान यांत फरक करता येत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगणारं राष्ट्र भावनिकतेच्या आहारी जाण्यात सुख मानतं. अशा राष्ट्राच्या अस्मितांची जपणूक न होता त्या अस्मितांचं रूपांतर दुराग्रहांमध्ये होतं. विज्ञान वापरणं म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धतीतून येणारी सारासारबुद्धी वापरणं नव्हे. केवळ विज्ञान वापरणारा समाज ज्ञानाधिष्ठित राहतो, पण ज्ञानोपासक बनत नाही. आपल्या संशोधनाचं, आपल्या मतांचं साक्षेपी खंडन होणं, हा आपल्या बुद्धीवर घेतला गेलेला संशय नसून सत्यान्वेषणाची ती अतिशय सशक्त पद्धत आहे. हे कळलं नाही तर ज्ञान / सत्य ’असं असतं’ आणि ’असं असायला पाहिजे’ यांतला फरकसुद्धा कळत नाही. हा भेद जेव्हा एखाद्या नागरिकसमूहाला कळेनासा होतो, त्या नागरिकसमूहात, पर्यायानं त्या राष्ट्रात 'सत्य काय' हे उचित व यथायोग्य अन्वेषणाआधीच ठरवलं जातं. अशा सत्यासाठी 'सत्यमेव जयते'चा घोष करणं ही त्या राष्ट्रानं स्वतःचीच केलेली घोर फसवणूक ठरते.
आपल्या राज्यघटनेतलं ५१अ हे कलम आपल्याला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांचा आदर्श बाळगायला, आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं जतन करायला, पर्यावरणाचं संवर्धन करायला, धर्म-जात-भाषा-प्रांत यांत भेद न करता बंधुभाव वृद्धिंगत करायला सांगतं. घटनेचं हेच कलम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक वृत्ती विकसित करणं, हे आपलं मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला सांगतं.
भारतीय राज्यघटनेत सांगितल्याप्रमाणे या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जावे, प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची प्रत्येकाला मुभा असावी, धर्म-जात-वंश-भाषा-लिंग यां भेदांपलीकडे जाऊन आचार-विचारस्वातंत्र्य असावं, अशी आमची इच्छा आहे.
आमच्या या मागण्यांसाठी आम्ही व आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ - शिक्षक - विद्यार्थी - वैज्ञानिक मूल्यांचा आदर राखणारे नागरिक येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी देशभरात संचलनात सहभागी होणार आहेत.
आमचा हा लढा कोणत्याही एका सरकारविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आमची बांधिलकी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी, लोकशाहीशी आणि सहिष्णुतेशी आहे. आम्हांला ज्यांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम आहे, अशा वैज्ञानिक मूल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
आपला पाठिंबा आम्हांला मिळाल्यास व आपणही या संचलनात सहभागी झाल्यास आमच्या लढ्यास बळकटी येईल.
धन्यवाद.
डॉ. आदित्य कर्नाटकी (भास्कराचार्य)
डॉ. आरती रानडे (रार)
केतन दंडारे (अरभाट)
डॉ. चिन्मय दामले (चिनूक्स)
डॉ. जिज्ञासा मुळेकर (जिज्ञासा)
वरदा खळदकर (वरदा)
डॉ. सई केसकर (सई केसकर)
सत्यजित सलगरकर (आगाऊ)
या मसुद्यातल्या डॉ. चिन्मय दामले यांच्या मतांशी मायबोली.कॉमचा संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत.
विज्ञानवादा बद्द्ल बेफिकीर
विज्ञानवादा बद्द्ल बेफिकीर सांगतील. वैज्ञानिकाने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे याबद्दल विज्ञान काहीही मत मांडत नाही.
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे हवीत चा मला समजलेला अर्थः धोरणे आखताना डेटा काय सांगतो तो बघुन धोरणे आ़खणे ना की आपल्या वैचारिक बांधिलकी नुसार. जर प्रुथ्वीचे तापमान वाढते आहे आणि पारंपारिक इंधनाचा त्यात मुख्यत्वे हातभार आहे तर रिन्युएबल एनर्जी कडे वाटचाल करणे. समलैगिता का होते हे विज्ञाने सिद्ध झाले आहे तर एलजीबीटीक्यु साठी कायदे बदलणे, इ.
परत, गुणसूत्रात बदल करता येउ लागला हे विज्ञानाने झाले. पण म्हणून लगेच विज्ञानाधारीत शासन ते करायची मान्यता देणार नाही तर एथिक्स, स्रुश्तीचा गुरुत्वमध्य बदलत नाहीये ना इ. कसोट्या लावून मग त्याचा चुकीचा वापर कुठला योग्य कुठला? तो कसा शोधायचा? झाला तर त्याला काय आणि कशी शिक्षा करायची ? इत्यादी नुसार धोरण ठरवेल. जे कदाचित जेनेटिक बदलांना बंदी हे सुद्धा असू शकेल.
<<<~माफ करा पण विज्ञान म्हणजे
<<<~माफ करा पण विज्ञान म्हणजे काय हे तुम्हाला समजलेले नाही. विज्ञान म्हणजे प्रयोग आणि निरिक्षणे करुन विश्वातील भौतिक आणि जैविक वस्तू आणि घटनांचा पध्तशीरपणे केलेला अभ्यास. विज्ञानवादी किंवा इतर कोणीही 'विज्ञान यच्चयावत प्रश्न सोडवेल' असा दावा कधीही केलेला मी वाचलेला नाही.~>>>>>
अमितव , Personal व्हायची काय गरज आहे ??
मुद्दा क्र. ४ सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत. अशी ती मागणी आहे.
कोणती धोरणं ते स्पष्ट केलेलं नाही. पुराव्यांनी शाबित न होणार्या / न होऊ शकणार्या करोडो गोष्टी आज देशात सर्रास सुरू आहेत व त्यावर मोठाल्ली अर्थचक्रेही फिरत आहेत. भावनाही निगडीत आहेत. लार्जली, तरीही शांतता नांदत आहे.
सरकारची सरसकट सर्व धोरणा विषयी हाच पवित्रा असेल तर ?? ह्या मुद्द्यावर माझा सरळ प्रश्न आहे ! जर जमत नसेल तर हा मुद्दा मागे घ्या !!
मिजा
मिजा तुम्ही
बेफिंनी कट्यावर टाकलेला प्रतिसाद इथे स्वत: च्या नावावर इथे खपवत आहात.
दोन्ही एकच आहे का?
जर प्रुथ्वीचे तापमान वाढते
जर प्रुथ्वीचे तापमान वाढते आहे आणि पारंपारिक इंधनाचा त्यात मुख्यत्वे हातभार आहे तर रिन्युएबल एनर्जी कडे वाटचाल करणे.>>> कालच दिल्ली व देशभरात मिळून ५० ठिकाणी bio-fuels बद्दल सरकारचे प्रतिनिधी व इंधन क्षेत्रातले अधिकारी ह्यांच्या उपस्थितीत events झाले. Fossil fuels च्या जोडीने bio-fuels ना ही अधीक संशोधन व अधीक प्रचार/प्रसाराने वापरात आणणे हे aim होते. हळूहळू fossil fuels वर अवलंबून राहाणे कमी करून पर्यावरण, economy ला पूरक पावलं उचलली जाण्याबद्दल होतं. त्या दृष्टीने भारतात Jatropha ची लागवड वाढवली जात आहे. Bio ethanol आणि bio-diesel वापरले जाणे ही काळाची गरज आहे.
याचे उत्तर नक्की देईन. पण इथे
याचे उत्तर नक्की देईन. पण इथे नाही. वेगळा धागा काढतो जरा सवडीने...>>> धन्यवाद
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे हवीत चा मला समजलेला अर्थः धोरणे आखताना डेटा काय सांगतो तो बघुन धोरणे आ़खणे ना की आपल्या वैचारिक बांधिलकी नुसार.
>>>
हे सरसकट शक्य नाही कारण सरकारच्या अख्यतारीत येणारी सर्व क्षेत्रे अशी डेटावर आधारीत निर्णय घेउन करण्यासारखी नसतात. डेटा वापरला जातो मात्र निश्कर्ष काढण्यासाठी त्या त्या सरकारच्या वैचारीक बांधिलकीचा परिणाम होणारच. उदा. सरासरी वार्षिक उत्पादनाचा डेटा उप्लबध झाल्यावर ते वाढवण्यासाठी पूर्ण डावे ते पूर्ण उजवे आणि त्याच्या मधल्या असंख्य विचारसरणींनुसार वेगवेगळे उपाय योजले जातील. अगदी शालेय शिक्षणाची फी ते रस्ते बांधायचे की रेशनवर अन्न उपलब्ध करायचे असे असंख्य निर्णय विचारसरणींनुसार बदलतील.
सरकारने मेडिकलचा अभ्यासक्रम ठरवताना आयुर्वेदच शिकवणे कम्पल्सरी करून आधुनिक वैद्यक बॅन करणे हे अवैज्ञानिक ठरेल.
मात्र सबसिडाइझ्ड पेट्रोल द्यायचे की मार्केटला भाव ठरवू द्यायचे हे विचारसरणीवर अवलंबून असेल.
तेव्हा इथे विषयांची सरमिसळ होते आहे. मूळ लेख पुरेसा सुस्पष्ट आहे असे माझे मत आहे.
सरासरी वार्षिक उत्पादनाचा
सरासरी वार्षिक उत्पादनाचा डेटा उप्लबध झाल्यावर ते वाढवण्यासाठी पूर्ण डावे ते पूर्ण उजवे आणि त्याच्या मधल्या असंख्य विचारसरणींनुसार वेगवेगळे उपाय योजले जातील. अगदी शालेय शिक्षणाची फी ते रस्ते बांधायचे की रेशनवर अन्न उपलब्ध करायचे असे असंख्य निर्णय विचारसरणींनुसार बदलतील. >> हे संपूर्ण चुकीचे उदाहरण आहे. कारण उजवे किंवा डावे उत्पन्नाच्या माहितीवर निर्णय घेत आहेत. मग तो रेशन का काय याला महत्त्व नाही. लक्षात घ्या की डेटा हा डेटा आहे. तो डेटा सुधारायला विचारसरणीने निर्णय घेणे हे डेटा नुसारच निर्णय घेणे झाले.
पण, डेटा सांगतो की लसीकरण केले की रोग प्रतिबंध होतो पण माझी विचारसरणी सांगते की लसीकरण हे भगवंताच्या योजनेनुसार अडथळा आहे तर लसीकरण बॅन करणे हा डेटा धुडकावून विचारसरणीने घेतलेला निर्णय झाला.
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे हवीत चा मला समजलेला अर्थः धोरणे आखताना डेटा काय सांगतो तो बघुन धोरणे आ़खणे ना की आपल्या वैचारिक बांधिलकी नुसार>>>
पुन्हा एकदा प्रयत्न करतो. डेटा समोर असताना विविध विचारसरणीचे लोक वेगवेगळे निर्णय घेणार. ग्लोबल वार्मिंगचा डेटा समोर असताना एका विचारसरणीचे लोक रिनयूएबल एनर्जी सोर्सेस वापरतील पुढल्या पिढ्यानचा विचार करून. दुसऱ्या विचारसरणीचे लोक आजची लोकसंख्या व तिचे पोट भरायला आहेत ते रिसोर्सेस वापरून आजची समस्या सोडवायला प्राधान्य देतील. तेव्हा डेटा वापरणे हीच फक्त विज्ञानवादी असण्याची व्याख्या आहे का?
दुसरे टोकाचे उदाहरण: आज जगात मेजोरीटी दहशतवादी मुस्लिम धर्माचे आहेत. दहशतवादी हल्ला झाला तर जास्त प्रोबॅबिलिटी तो मुस्लिम धर्माच्या माणसाकडून होईल ही आहे. तेव्हा एखाद्या रिस्क अवर्स नेत्याने मुस्लिम धर्मियांना देशात यायला बंदी केली तर दुसऱ्या नेत्याने सर्व धर्म समान आहेत व धर्म दहशतवादी नसून स्पेसिफिक लोक दहशतवादी असतात या तत्त्वाने देश मुस्लिम धर्मियांना आत येण्यासाठी खुला ठेवला. पहिला नेता रॉ डेटा बघतो आहे तर दुसरा तोच डेटा व तीच रिस्क समोर असताना त्याच्या विचारसरणीनुसार निर्णय घेत आहे जो समोर असलेल्या डेटाच्या विरोधात आहे. किंवा पहिल्या पर्यायात जी रिस्क आहे त्या लेव्हलला येण्यासाठी दुसऱ्या पर्यायात अधिक खर्च होणार आहे तरीही दुसऱ्या नेत्याने तो पर्याय निवडला आहे. तर यातला कोण विज्ञानवादी?
<<<<विज्ञान "धार्मिक"तेची
<<<<विज्ञान "धार्मिक"तेची शकले उडवतोय असे अजिबात वाटत नाही.>>>>
जगात आयसिस चे लोक किती, इतर मुसलमान किती? एकट्या आयसिस वरून सर्व धर्मांबाबत नि सर्व लोकांबाबत विधान करणे हे पटत नाही.
मान्य आहे, आयसिस हा एक अपवाद आहे, सध्या.
पण निदान हिंदी व ख्रिश्चन धर्मांमधे तरी सुधारणा झाल्या आहेत, होत आहेत हे मान्य कराल की नाही? ते जास्त प्रमाणावर की आयसिस मोठ्या प्रमाणावर? निदान भारतात तरी तुम्हाला शिकलेले मुसलमान सापडतील. आहेत की नाही सुधारलेले? करतात का आयसिस सारखे धंदे सतत? उगाच कुठलेतरी अशिक्षितांनी केलेले स्थानिक प्रकार सांगू नका - बहुसंख्य मुस्लिम तर नीट वागतात ना?
कुणि काही लिहीले की त्यातले अपवाद शोधून बारीक चुका शोधून एकदम सगळेच वाईट ठरवणे हे बरे नव्हे.
त्यासाठी स्वतःच्या अंगी धमक, कर्तबगारी आहे का की इतक्या मोठ्या प्रमाणावरचे कार्य अपवादरहित संपूर्णपणे यशस्वी करता येईल? नसेल तर बोलू द्या, लिहू द्या, करू द्या दुसर्यांना, जमले तर चुका काय, का नि त्या कश्या सुधारायच्या हे सांगा!
कित्येकांना सगळे काही एका सेकंदात व्हावे, कालच का झाले नाही, एव्हढेच वाटत असते. ते फक्त टीकाच करतात. तसले लोक मायबोलीवर उदंड!
(विज्ञानवाद व धर्म ) <<
(विज्ञानवाद व धर्म ) <<<दोन्हींचे 'एकट्याने अस्तित्वात असणे' घातक आहे.>>>
बरोबर आहे. पण त्यांचा एकमेकांशी संबंध येतोच.
तर धर्मा च्या नावाखाली असे काय केले जाते की जे विज्ञानाच्या दृष्टीने योग्य नाही हे विज्ञानाच्या अभ्यासातून कळते. पुरातन भारतीय संस्कृतीत जीवनाचे ध्येय काय? ते साध्य करणे हे या साठी काय करावे? त्यातले शास्त्रीय दृष्ट्या आर्थिक, सामाजिक व्यवस्थेला घातक काय हे कळले पाहिजे. ते सर्व टाळून सुद्धा खर्या धर्माचे पालन होऊ शकते - कारण देव हा फक्त अंतर्मनाने जाणता येतो - बाकीचे सगळे त्या अंतर्मनावर योग्य संस्कार व्हावे, योग्य दिशा मिळावी या साठी असते - त्यात नि विज्ञानात विरोध असू नये.
जर आर्थिक, सामाजिक व्यवस्थेला घातक नसेल, स्वास्थ्याच्या दृष्टीनेहि घातक नसेल तर देव, धर्म यावर मनाचा विश्वास ठेवावा. त्यासाठी काय मनन, चिंतन, प्रार्थना करायची ती करावी - त्याचा दुसर्याला त्रास होऊ नये. उदा. हॉस्पिटल च्या आय सी यू जवळ सार्वजनिक गणपती आणून, ढोलकी बडवून आरडाओरडा करून आरत्या म्हणू नयेत.
डेटा वापरणे हीच फक्त
डेटा वापरणे हीच फक्त विज्ञानवादी असण्याची व्याख्या आहे का? >> असं कोण कधी म्हणालं? मी म्हटलेलं नाही. फक्त आणि फक्त डेटा वापरुन निर्णय घेता येणार नाही. कोणी घेतही नाही हे वरच्या किमान तीन पोस्ट मध्ये लिहिलेले आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना प्रसंगी आपला मुद्दा डायल्युट करावा लागला तरी करावा हेच पहिल्या पोस्ट पासून म्हणत आलोय.
डेटा twist करून आपल्याला हवे ते निष्कर्ष कसे काढायचे ह्याची ही व्यवस्थित कल्पना आहे. ओबामा सकट सगळे राजकारणी कधी ना कधी याचा आसरा घेतात हे ही जाणतो. निर्णय घेताना सगळ्या बाजूने विचार करताना रॉ डेटाकडे दुर्लक्ष करू नका इतकंच म्हणणं आहे. असो.
हेच अनेक कारणापैकी एक कारण आहे मला 'विज्ञानवादी असणे' आणि 'सायन्स मार्च' हे मुद्दे एकत्र आणू नये असं प्रकर्षाने वाटत होतं.
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे
विज्ञानाधारीत शासकीय धोरणे हवीत चा मला समजलेला अर्थः धोरणे आखताना डेटा काय सांगतो तो बघुन धोरणे आ़खणे ना की आपल्या वैचारिक बांधिलकी नुसार
>>>
हे तुमचे वरचे वाक्य सुस्पष्ट आहे की तुम्हाला काय म्हणयाचे आहे त्याबद्दल. मी दिलेल्या उदाहरणातील दुसऱ्या नेत्याने ज्याने मुस्लिम लोकांना प्रवेश बंद केला त्याचा निर्णय विज्ञानाधारीत शासकीय धोरणाचे उदाहरण नाही का? पहिला नेता ज्याने मुस्लिम प्रवेश चालू ठेवला त्याचे निर्णय हे वैज्ञानिक शासकीय धिरणाच्या विरोधात नाही का?
माझ्या वाक्यात 'फक्त' वर्ड
माझ्या वाक्यात 'फक्त' वर्ड घातला की त्याचा अर्थ सुधारणार असेल तर तो घालतो.
मी दिलेल्या उदाहरणातील दुसऱ्या नेत्याने ज्याने मुस्लिम लोकांना प्रवेश बंद केला त्याचा निर्णय विज्ञानाधारीत शासकीय धोरणाचे उदाहरण नाही का? पहिला नेता ज्याने मुस्लिम प्रवेश चालू ठेवला त्याचे निर्णय हे वैज्ञानिक शासकीय धिरणाच्या विरोधात नाही का? >> तुमच्या कडून अशा शब्दछलाची अपेक्षा न्हवती.
मी १० वेळा पांढरा शर्ट घातला आणि जॉब मध्ये सिलेक्ट झालो आणि २० वेळा निळा शर्ट घालून सिलेक्ट झालो नाही. या डेटावरून पांढरा शर्ट घातल्याने सिलेक्शनचे चान्सेस दुपट्टीने वाढतात असा निष्कर्ष ही तुमच्या लॉजिकने डेटा ड्रिव्हनच.
तुमचे शर्टाचे उदाहरण चुकीच्या
तुमचे शर्टाचे उदाहरण चुकीच्या कार्यकारण भावाचे उदाहरण आहे. मी दिलेले उदाहरण प्लाजीबाल आहे किंवा ते तसे आहे असे समजून वाचा. आणि मग उत्तर द्या.
समाजकारण, अर्थशास्त्र आणि राजकारण हे निव्वळ भौतिक/पदार्थ विज्ञानाप्रमाणे चालू शकत नाही वा चालणार नाही इतकेच म्हणायचे आहे मला. निखळ विज्ञानाशाखात सिद्ध झाल्यावर एकच सत्य असते. राजकारण समाजकारणात तुमची विचारधारा तुम्हाला गाईड करत राहणार. आणि त्या विचारधारेवरील विश्वास/श्रद्धा ही संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेली असेलच असे नाही.
उदा. जगात साम्यवाद फेल झाला असला तरी मदुरो अजून साम्यवादावर आधारीत घटना लिहायचा प्रयत्न करतो आहे कारण त्यांची श्रद्धा विश्वास हा साम्यवादाच्या अंतिम युटोपीएन औटकमवर असेल. किम जोंग ऊन संपूर्ण नास्तिक अन विज्ञानवादी असला तरी त्याच्या जनतेसाठी तो कल्याणकारी राज्यकर्ता नाही. याउलट कॅथॉलिक आयर्लंडची कवालिटी ऑफ लाईफ (फक्त भौतिक नव्हे तर तर तिथल्या रिसर्च इन्स्टिट्यूट वगैरे) इतर अनेक अधार्मिक वा रॅशनल सारकारांपेक्षा अधिक चांगली असू शकते.
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
आपले कॅलेंडर हे आपल्या संस्कृतीचा व इतिहासाचा भाग आहे. अमुक तिथिमुळे काही वाईट घडत नसुन लोक त्या तिथिला २१ व्या शतकात रिलेवंट नसलेल्या गोष्टी करतात त्यामुळे घडत आहे. यात दोष लोकांचा आहे कॅलेंडरचा नाही.
असे असताना आपले कॅलेंडर का सोडावे.
खरेतर देशांतर्गत व्यवहारांसाठी आपलेच कॅलेंडर वापराय्ला हवे होते सुरुवातिपासुन. तसेही ते अधिकॄत आहेच इंग्लीश कॅलेंडरसोबत. जागतीक व्यवहारांसाठी इंग्लीश कॅलेंडर वापरावे. अर्थात हे सुरुवातीपासुन करायला हवे होते.
हेच अनेक कारणापैकी एक कारण
हेच अनेक कारणापैकी एक कारण आहे मला 'विज्ञानवादी असणे' आणि 'सायन्स मार्च' हे मुद्दे एकत्र आणू नये असं प्रकर्षाने वाटत होतं.
+१
भार्तातल्या साइन्टिस्ट्नी
भार्तातल्या साइन्टिस्ट्नी आजवर कोणकोणते शोध लावले आहेत कस्ले सनशोधन केले आहे हे कुठे कळेल?
टिपापाकरांना मी इंटेलेक्च्युल
ठराविक पानावरच्या लोकांना मी इंटेलेक्च्युल समजत होतो,पण ते तर पक्के अंधश्रद्धाळु व धार्मिक भावनांना चिकटून बसणारे निघाले.फक्त शब्दांची हेराफेरी करण्यात माहीर आहेत ,बाकी थाट "टनाटन प्रभात" सारखाच आहे.
सिंजी कृपया इकडे अमुक पान
सिंजी कृपया इकडे अमुक पान विरुद्ध तमुक पान असे आरर्ग्युमेंट सुरू करू नका,
लिहिलेली मते त्या त्या id ची वैयक्तिक मते असतात, ते पटले नाही तर त्या बद्दल बोला,
त्यावरून बाकीच्यांना जज करू नका.
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?
>>>>
आजच्या युगातल्या विज्ञानाची एक पद्धती आहे. त्यात हायपोथॅसिस कसा मांडावा, प्रयोग कसे करावेत, निरीक्षण कसे नोंदवावे, त्यातून निष्कर्ष कसा काढावा, त्या निष्कर्षाचा रिव्ह्यू कसा व का करावा याचे स्पष्ट नियम आहेत. हे नियम कुणी एक दिवशी मनात आले म्हणून मांडलेले नाहीत. पुरातन काळापासून हे नियम कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अस्तित्वात होते. आधुनिक काळात ते सुस्पष्ट मांडले गेलेत. उदा गोल आकाराचे चाकच एफिशिअंत असते चौकोनी नाही हे समूहांच्या प्रयोगांती लक्षात आले. कुणी बाबाने सांगितले तरी चौकोनी चाक प्रचलित झाले नाही.
जे जे समजत नव्हते त्या गोष्टी अमानवीय शक्तींवर सोपवल्या गेल्या. उदा पर्जन्य राजा, सूर्य देव वगैरे.
उत्तरोत्तर मनुष्ययाची प्रगती झाली तशी अधिकाधिक गोष्टीचे स्पष्टीकरण उमजू लागले व देवाने कंट्रोल केलेल्या गोष्टींची संख्या कमी झाली. आता मनुष्य समाज ज्या पायरीवर आहे तिथे वैज्ञानिक विचारपद्धतीने विचार करणाऱ्या समूहात (ज्यात वैज्ञानिक अधिक संख्येने आहेत) ज्ञात नसलेल्या गोष्टींना स्पष्ट करण्यासाठी देव या संकल्पनेची आवश्यकता नष्ट झाली आहे. जर आयझॅक न्यूटन आज जन्माला आला तर तो बायबलामधल्या घटनांचे पुरावे शोधण्याच्या वा सिद्ध करण्याच्या मागे वेळ घालवणार नाही. कारण त्याला दिसेल का 17व्या शतकात जन्मलेल्या आयझॅक न्यूटनने अभ्यासलेल्या व काम केलेल्या सर्व गोष्टींमध्ये गणित, भूतीकशास्त्रामधील त्याचे काम काळाच्या कसोटीवर टिकले तर होली त्रिनिती आणि बायबलमधळया घटनाच्या सिद्धतेवर घालवलेला वेळ वाया गेला.
कंडिशनिंग न झालेले वा स्वतंत्र विचाराने कंडिशनिंग झुगारून दिलेल्या वैज्ञानिकात देवाचे अस्तित्व मान्य करणारे कमी आहेत. हे जगभरातील सर्वेतून (अमेरिकन वैज्ञानिक जगतात अशे सर्व्हे बरेच आहेत) दिसून येते.
तेव्हा जो जी वैज्ञानिक देवाचे अस्तित्व एक सत्य म्हणून मान्य करते तो/ती वैज्ञानिक विचारसरणीशी प्रतारणा करतो. याचा अर्थ त्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात त्याला अभ्यासाचे हक्कच नाहीत असे नाही. तू माझा देव मानत नाहीत म्हणून तू जगण्याच्या लायकीचा नाहीस ही विचारधारा वैज्ञानिकांमध्ये दिसणार नाही.
तेव्हा एखाद्या वैज्ञानिकांने देवाचे अस्तित्व 'मला वाटते म्हणून, मला जाणवले म्हणून' मान्य करणे हा त्याचा तिचा वैयक्तिक मत आहे. त्या व्यक्तीने जर तिच्या अभ्यासाच्या क्षेत्रात मला वाटते वा माझा केवळ वैयक्तिक अनुभव आहे म्हणून अमूक तमूक सिद्धांत सत्य आहे असे प्रतिपादन केले तर त्यास इतर वैज्ञानिक समूह मान्यता देणार नाही व ते विधान शोध दुर्लक्षला जाईल.
तेव्हा इन अ नटशेल एखादा वैदनानिक देवावर विश्वास ठेवत असेल तर तो चिंतेचा विषय आहे मात्र त्याच्या विषयात जोवर तो वैज्ञानिक शास्त्रीय विचारपद्धतीशी फारकत ना घेता काम कारातो आहे तोवर त्या कामाचे व त्या कामाच्या रिझल्ट प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य व हक्क त्या व्यक्तीला आहेत.
नील दिग्रास टायसन, डॉकिन्स यांचे अनेक व्हिडीओ वैज्ञानिकांने देवावर सत्य म्हणून विश्वास ठेवणे यांच्या परिणामांवर आहेत ते तुम्ही पाहू शकता
https://youtu.be/8MqTOEospfo
त.टी. मी वैज्ञानिक वा त्या क्षेत्रात काम करत नाही. वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी उपजीविका करतो. तेव्हा प्रत्यक्ष विज्ञान क्षेत्रात काम करणारे अधिक चांगल्या पद्धतीने हे समजावून सांगू शकतील
>>तेव्हा इन अ नटशेल एखादा
>>तेव्हा इन अ नटशेल एखादा वैदनानिक देवावर विश्वास ठेवत असेल तर तो चिंतेचा विषय आहे मात्र त्याच्या विषयात जोवर तो वैज्ञानिक शास्त्रीय विचारपद्धतीशी फारकत ना घेता काम कारातो आहे तोवर त्या कामाचे व त्या कामाच्या रिझल्ट प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य व हक्क त्या व्यक्तीला आहेत.<<
याच प्रकारात उद्घाटनाला नारळ फोडणे, सत्यनारायणाची पूजा घालणे, विघ्न टळण्यासाठी गणेशस्तवन, अथर्वशिर्ष म्हणणे (
किंवा गणपतीचं अस्तित्वच मानणे) वगैरे येतं का? कि असं करणार्यांना दांभिक, हिपक्रिट्स म्हणायला हरकत नाहि? इस्रोचे शास्त्रज्ञ हि करतात अशी बातमी आहे...तेव्हा एखाद्या वैज्ञानिकांने
तेव्हा एखाद्या वैज्ञानिकांने देवाचे अस्तित्व 'मला वाटते म्हणून, मला जाणवले म्हणून' मान्य करणे हा त्याचा तिचा वैयक्तिक मत आहे. त्या व्यक्तीने जर तिच्या अभ्यासाच्या क्षेत्रात मला वाटते वा माझा केवळ वैयक्तिक अनुभव आहे म्हणून अमूक तमूक सिद्धांत सत्य आहे असे प्रतिपादन केले तर त्यास इतर वैज्ञानिक समूह मान्यता देणार नाही व ते विधान शोध दुर्लक्षला जाईल.>>> टण्या, हे अगदीच मान्य. असेच करायला हवे.
अज्ञाताचा शोध घेणे किंवा जे आधीच आहे ते आहे हे माहित होणे व त्याचा अजून सखोल अभ्यास करणे हाच तर मानवाचा विकास आहे. स्थूल पातळीवर जे अभ्यासता येते त्याचा अभ्यास करावाच लागेल. त्यापलिकडे सूक्ष्म किंवा तरल पातळीवर घडते त्याचाही विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास केला जावा. काही सापडते का बघावे. सापडल्यास उत्तमच. न सापडल्यास ते अस्तित्वातच नाही असे न मानता असूही शकते हा दृष्टीकोन असू द्यावा. आपले प्रयास किंवा बुद्धी कमी पडू शकते ते शोधायला कारण मर्यादा असू शकतात.
-- -- --
तेव्हा इन अ नटशेल एखादा वैदनानिक देवावर विश्वास ठेवत असेल तर तो चिंतेचा विषय आहे मात्र त्याच्या विषयात जोवर तो वैज्ञानिक शास्त्रीय विचारपद्धतीशी फारकत ना घेता काम कारातो आहे तोवर त्या कामाचे व त्या कामाच्या रिझल्ट प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य व हक्क त्या व्यक्तीला आहेत.>>>> एखादा वैज्ञानिक अगदी शास्त्रीय विचारपद्धतीशी प्रामाणिक राहून काम करत असेल आणि जीव ओतून त्याच्या मिशनमध्ये पुढे जात असेल तरी एकीकडे तो देवाच्या अस्तित्वावर विश्वास असलेला असू शकतोच की. त्यात चिंताजनक काय आहे?
मी परत सांगतेय.... स्तोत्र म्हणणे, पूजा करणे किंवा कुठल्याही धर्माप्रमाणे इतर अजून काही करण्याबद्दल मी म्हणत नाही. अगदी हातही न जोडता त्या अज्ञात शक्तीपुढे मनाने प्रामाणिकपणे नतमस्तक एखादा प्रामाणिक वैज्ञानिक असू शकत नाही का? त्याला ती शक्ती जाणवली असेल आणि आपल्या वैज्ञानिक असण्याची अडकाठी ते मान्य करण्याच्या आड तो येवू देत नसेल तर?
हे चर्चेच्या ओघात आलं आहे पण विषयापासून भरकटत असेल तर admin ही पोस्ट उडवू शकता. I don't mind
टवणे सर यांचा प्रतिसाद पटला.
टवणे सर यांचा प्रतिसाद पटला.
अश्विनी के, तुम्ही खलील ओळी समजून घ्या.
>>(पूर्वी) जे जे समजत नव्हते त्या गोष्टी अमानवीय शक्तींवर सोपवल्या गेल्या.
>>(सध्या) ज्ञात नसलेल्या गोष्टींना स्पष्ट करण्यासाठी देव या संकल्पनेची आवश्यकता नष्ट झाली आहे
म्हणून अज्ञात शक्तीपुढे मनाने प्रामाणिकपणे नतमस्तक होणार एखादा प्रामाणिक वैज्ञानिक असू शकत नाही! प्रामाणिक वैज्ञानिक अज्ञातासमोर नतमस्तक होण्याऐवजी अज्ञातामागाची कारणमीमांसा शोधून काढण्यासाठी धडपडेल. या विश्वातले आपले सूक्ष्म स्थान ओळखून नम्र(हंबल) असेल पण नतमस्तक नाही. जे असे वागत नाहीत तर नक्कीच त्यांना दांभिक/हिपोक्रीट्स म्हणावे.
>>न सापडल्यास ते अस्तित्वातच
>>न सापडल्यास ते अस्तित्वातच नाही असे न मानता असूही शकते हा दृष्टीकोन असू द्यावा. आपले प्रयास किंवा बुद्धी कमी पडू शकते ते शोधायला कारण मर्यादा असू शकतात.
तुम्हाला इन्व्हिजिबल पिंक युनिकोर्न किंवा फ्लाइंग स्पाघेती मॉन्स्टर बद्दल माहिती आहे का? हे शोधायला प्रयास किंवा बुद्धी कमी पडतेय असं वाटतंय का तुम्हाला?
रसेल च्या चहापात्राविषयी देखील वाचा.
तुम्हाला इन्व्हिजिबल पिंक
तुम्हाला इन्व्हिजिबल पिंक युनिकोर्न किंवा फ्लाइंग स्पाघेती मॉन्स्टर बद्दल माहिती आहे का?>> नाही.
एखाद्या वैज्ञानिकाने स्वत:चे डोळे, कान, त्वचा ... त्याही पुढे जाऊन MRI, sonography वगैरे सर्वमान्य मेडिकल टेस्ट्स इत्यादी भौतिक गोष्टींच्या सहय्याने एखादा अतर्क्य (सर्व तर्क, सर्व फिजिक्स / केमिस्ट्री / बायॉलॉजीचे नियम पडताळूनही उत्तर मिळू न शकलेला) अनुभव आल्यास त्याने तो नाकारावा का? की हे असं असं आहे किंवा असं असं झालं हे त्याने प्रामाणिक विज्ञानवादी राहूनही प्रामाणिकपणे स्वत:शी तरी मान्य करावं? इतकाच माझा प्रश्न आहे.
<<<<याच प्रकारात उद्घाटनाला
<<<<याच प्रकारात उद्घाटनाला नारळ फोडणे, सत्यनारायणाची पूजा घालणे, विघ्न टळण्यासाठी गणेशस्तवन, अथर्वशिर्ष म्हणणे (किंवा गणपतीचं अस्तित्वच मानणे) वगैरे येतं का? कि असं करणार्यांना दांभिक, हिपक्रिट्स म्हणायला हरकत नाहि? इस्रोचे शास्त्रज्ञ हि करतात अशी बातमी आहे... >>>
करतहि असतील.
तसे केल्याने कुणाला काही त्रास होतो, का खर्च एकदम हाताबाहेर जातो का वेळेचा अपव्यय होऊन कार्यास बाधा येते? का तुम्हाला ते अगदी बघवत नाही, जसे पूर्वी ब्राह्मणांना इतर लोक मांस खाताना बघून अगदी असह्य व्हायचे तसे? आता ब्राह्मण जिभल्या चाटत असतील?
कसले धर्माचे सोंग आणतात लोक?
कसले धर्माचे सोंग आणतात लोक?
निवडून येण्यासाठी पूर्वी काँग्रेसने मुळीच हिन्दू लोकांचे लांङ्गुल चालन केले नाही तरी निवडून आले कित्येक वर्षे. आजकाल एकदम लोकांना धर्माची आठवण झाली म्हणून धर्म धर्म करताहेत, निवडून येण्यासाठी. उद्या जनतेचे मत बदलले की लगेच विज्ञान विज्ञान करतील.
काहो, ९० च्या सुमारास भारताने अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलली म्हणे तेंव्हा काही कुणि जनतेतल्या लोकांनी मोर्चे काढले होते का, की बदला म्हणून? की मनमोहनसिंग सारख्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र तज्ञ माणसांनी ठरवले?
विज्ञान व धर्म या दोन विषयांतील तज्ञ लोकांनी आपआपसात चर्चा करून धोरण ठरवावे की भावनेला किती महत्व द्यायचे किंवा शास्त्राला.
करण सर्वजनिक जनमत मूर्ख असते. त्यांना ना धर्म कळत ना विज्ञान, ते काय सांगणार?
आता इथे मायबोलीवर अनेक सुशिक्षित लोक आहेत, पण त्यांना सुद्धा सुनावणारे आहेत की अहो तुम्हाला कळतच नाही. कुणाचे तरी खरे असेलच. पण कुणाचे? कोण असे तज्ञ आहेत का, की जे जगात सर्वत्र मान्यता पावलेले आहेत?
जगात प्रत्येक क्षेत्रात जागतिक मान्यता पावलेले अनेक भारतीय आहेत. त्यांनी करावा विचार.
मानवाला किती टक्के विज्ञान
मानवाला किती टक्के विज्ञान समजलंय? ५ टक्के ? मग त्याच्या कक्षेतच आलेले अनुभव खरे व बाकी सर्व खरे नाहीत हा अट्टाहास विज्ञानवादी लोक का करतात हे समजत नाही. उलट त्यांना सर्वात आधी कळायला हवे की हे जे आहे त्याचे कारण आजच्या विज्ञानाला सापडलेले नाही (नाकारण्यापेक्षा).
अनुभव येणे, त्यावरून एक
अनुभव येणे, त्यावरून एक हायपोथॅसिस मांडणे, प्रयोग करणे, निरीक्षण नोंदवणे, पिअर रिव्ह्यू या प्रोसेसबद्दल वर लिहिले आहे. ते सर्व करून जर देवाचे अस्तित्व सिद्ध झाले तर तोच वैज्ञानिक काय बाकी जग सुद्धा मान्य करेल, त्या संशोधनाचे तंत्रज्ञानात रूपांतर होईल.
मात्र तोवर मला अनुभव आला म्हणून अमूक एक मान्यता/समजूत ही सत्य आहे असे समजणे हा त्या वैज्ञानिकाच्या शिक्षणाचा पराभव आहे इतकेच म्हणता येईल.
सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवणारा, रस्त्यावरून चालताना डाव्या बाजूनेच चालले म्हणजे यश मिळते यावर विश्वास ठेवणारा, घोड्याचे मूत हे सर्व रोगांवर अक्सीर इलाज आहेत व त्यामुळे बुद्धी तल्लख होते असे मानून ते रोज प्राशन करणारा आणि नुकत्याच वयात आलेल्या कुमारींशी संभोग केल्याने बुद्धी तल्लख राहते हा वैयक्तिक अनुभव (mri वगैरे झाल्यावर त्यापेक्षा भारी) आहे म्हणून कुमारी मुलींना अबुज करणे असे चार श्रद्धा असलेले वैज्ञानिक आहेत असे समजा. चौघांचेही वैयक्तिक अनुभव जेन्यूईन आहेत असे समजू. पण तुमच्या सामाजिक कंडिशनिंगमुळे पहिल्याला तुम्ही ज्येष्ठ, देवध्यानी म्हणून नमस्कार कराल.
दुसऱ्याला जरा सटकलेला आहे, हे संशोधक असेच म्हणून दुर्लक्ष कराल. तिसऱ्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्याल. चौथ्याला पोलिसांच्या हवाली कराल व कडक शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न कराल. एक वैज्ञानिक म्हणून त्यांचा दाम्भीक पणा एकाच पातळीवरचा आहे.
मानवाला किती टक्के विज्ञान
मानवाला किती टक्के विज्ञान समजलंय? ५ टक्के ? मग त्याच्या कक्षेतच आलेले अनुभव खरे व बाकी सर्व खरे नाहीत हा अट्टाहास विज्ञानवादी लोक का करतात हे समजत नाही. उलट त्यांना सर्वात आधी कळायला हवे की हे जे आहे त्याचे कारण आजच्या विज्ञानाला सापडलेले नाही (नाकारण्यापेक्षा).
>>>
हे सर्वच वैज्ञानिक मान्य करतात. फक्त आज समजलेले नाही म्हणून कोणीतरी एक सर्वशक्तिमान इंटिटी आहे इतका सोपा निष्कर्ष काढून गप्प बसत नाहीत. न समजलेल्या गोष्टींचा शोध लावण्याचे प्रयत्न चालू ठेवतात. हे तुमचे जे 5% म्हणत आहात ते नसते तर तुम्ही अजून चूल मूल करत होतील तितकी मुलं होऊन देत बाळंतपणात दगावण्याची मोठी शक्यता धरून वयाच्या पन्नाशीत मेला असता (इथे तुम्ही म्हणजे एकूण मनुष्य जातीतील महिला. याच प्रमाणे पुरुशांबद्दल लिहिता येईल)
Pages