आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..
हया व्हलेटाईनला नसेल घ्यायचं तिला पण पुढच्या व्हलेटाईनपर्यंत मी करत राहीन स्वतःला सिद्ध ..कितीही तिने मला युज का करेना .. कितीही तिने मला आजमावू दे...मी हार नाही मारणार....असं मनं जरी माझं म्हणतं असलं तरी कुठेतरी मी खचलो होतो..
"ती" मला आजमावत होती आणि मी ही आजमावून घेत होतो पण स्वःतला प्रत्येकवेळी किती सिद्ध करणार ना? कदाचित माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असेलही आणि ह्याचा तिला त्रास झाला असेलही पण मलाही भावना आहेत, मर्यादा आहेत.. एखाद्याने आधीच ठरवलं असेल तर मग कितीही परीक्षा द्या कितीही आजमावून घ्या सारं व्यर्थच ..मी भलेही कितीही मनाशी हट्ट केला असेल किंवा कितीही मी जिद्दी असेल तिच्याबाबतीत पण शेवटी मी ही माणूस आहे भावनेच्या भरात कदाचित मी वेडेपणा केला असेलही पण
जबजस्तीच प्रेम नकोय मला तिने माझ्या भावना समजून घ्याव्या मला नीट ओळखावं इतकचं वाटतं होत मला पण आता अजुन ह्या अशाच दिव्यातून जाणं.. हे नाही जमणार मला आणि मी आजमावून घेण आता लगेच सोडलं तर परत ती स्वतःच बोलणार ..
"हेच का तुझं प्रेम?? माझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का तु"
काय करू नि काय नको असं झालं होत मला. इतरही बरेच कौटंबिक ताण तणाव परत त्यात पप्पांनी "आता परत नापास झालास ना तर सरळ सलूनमध्ये यायचं आणि वस्तरा हातात घ्यायचा तेव्हा तुझं मी ऐकणार नाही" अशी धमकी दिलेली.
खुप टेंशन आलेलं तेव्हा, विरलला भेटून सगळं सांगितलं मनातलं.. त्याने मला विपश्यना साधना करायचा सल्ला दिला आणि मी ही गुगल वर सगळे डीटेल्स चेक केल्या.. जर ही साधना केल्याने काहीतरी चांगल घडवून आणता येणार असेल, एकाग्रता,संयम, मनाची शक्ती वाढत असेल तर काय हरकत आहे..दहा दिवसाचा तर प्रश्न आहे आणि तसंही मला काही दिवस कसालाच विचार करायचा नव्हता लगेच चौकशी करून अॅडमिशन मिळवलं घरीही सांगितलं की,अभ्यासात मन लागावं,एकाग्रता वाढवावी म्हणून जातोय परवानगी मिळणार हे माहित होतचं. प्रेरणाला सांगू की,नको हाही प्रश्न होताच पण पंधरवड्यातच तिला काही न सांगता निघालो मी..
.......................................................................................
तब्बल दहा दिवस त्या आश्रमात राहीलो मी. मोबाईल अलाऊड नाही,कुणाशी बोलणं नाही,बाहेर जायचं नाही की, कुणाला भेटायचं नाही.. जगापासून वेगळाच होतो मी असं म्हटलं तरी काही हरकत नाही पण खुप काही शिकायला मिळालं तिकडे..
तिथून आल्यानंतर प्रेरणाला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याची एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली.. मी यायच्या आदल्या दिवशीच अॅडमिट केलंल.. लगेचचं पाहायला गेलो तिला.
गाडी चालवायला शिकताना गाडीवरून पडल्यामुळे गुडघ्याची का त्याखालची हाड मोडलेली आणि त्यामुळे संपूर्ण गुडघ्यापासून पायाला फॅक्चर केललं..
तिला ह्या अवस्थेत पाहिल्यानंतर गहीवरूनच आलं मला पण मी सावरलं स्वतःला जे काही मी आश्रमात शिकलो आतल्या मनाच्या पाॅसिटीव्ह पाॅवरबद्दल.. ते मी तिला शिकवायचं ठरवलं.. ह्याने तिलाच लवकर बरी व्हायला मदत होणार होती..
दिवसभर बेडवरच असल्यामुळे खुप बोअर व्हायचं तिला..सगळे येऊन भेटून जायचे फक्त.. त्यात बोलायला फारसं कुणी नसायचं
तिचे आईबाबा येऊन जाऊन असायचे रात्री बहीण यायची तिच्यासोबत झोपायला..ती ही कामावरून थकून यायची त्यामुळे लगेच झोपायची आणि संपूर्ण दुपार झोपून राहिल्यामुळे रात्री तिला झोप लागायचीच नाही अशावेळी मी फोन करून बोलायचो तिच्याशी.. ज्या काही चांगल्या गोष्टी मला आश्रमात सांगितलेल्या त्या मी सांगायचो तिला..सकाळी काॅलेजला जाताना भेटायचो, बोलायचो, क्लासला काय शिकवलं हे सांगायचो कधी कधी क्लासला थोडं जास्त थांबून सरांकडून न कळलेला अकाऊंट विषय शिकायचो,सराव करायचो आणि मला चांगलं जमू लागलं की तिलासुद्धा हाॅस्पिटलमध्ये जाऊन शिकवायचो तिला ह्याच आश्चर्य वाटायचं पण प्रेम सर्व काही शिकवतं माणसाला त्यात मी चांगला शिकतोय ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही..सारखं सारखं जाऊन येऊन येत असल्यामुळे तिच्या आईवडीलांशीही ओळख झालेली त्यामुळे कधी कधी तिच्या आईला जमत नसल्यास मीच डबा वैगेरे आणून द्यायचो तिला...
हल्ली "ती" माझ्याशी आपुलकीने बोलायची म्हणजे पुर्वीसारखी केवळ माझी मजा घ्यायचीय म्हणून न बोलता मनमोकळेपणाने बोलयची..आधी कधीच न सांगितलेल्या गोष्टी सांगायची कदाचित मला वाटणारी तिची काळजी आणि हाॅस्पिटलमध्ये केलेली मदत ह्यावरून तिला थोडसं जाणवलं असेल...हळूहळू तिच्या मनात कुठेतरी माझ्याविषयी आपलेपणा दिसत होता..
रोज रात्री आम्ही बोलयचो हाॅस्पिटलमधून डीस्चार्ज मिळाल्यानंतरही आमचं बोलणं चालूच राहीलं आणि एकेदिवशी तिने स्वतःच विषयाला हात घातला
" जयेश आय अॅम साॅरी"
मी - "कशाबद्दल?"
" मी तुझी मजा घेत होते, तुझ्या प्रेमाला समजून घेतलं नाही मी उलट तुला मी मुद्दाम काहीही करायला लावायचे..खरं सांगू मला तु मागच्या बॅचवर बसणारा, नापास होणारा "ढ", रस्त्यात मुलीना अडवून त्रास देणारा टपोरी वाटलेलास पण आता कळतयं तु कसाही असलास तरी तु मनाने चांगला आहेस आणि मलाही तु आवडू लागला आहेस पण हे प्रेम नाही तु खुप काही केलंसं माझ्यासाठी कदाचित मीच तुझ्यावर तु करतोस तितकं प्रेम नाही करू शकणार आणि जरी करता आलं तरी तु न्हावी मी मराठा घरचे नाही ऐकणार आणि पळून जाऊन लग्न करणं मला नाही जमणारं..सो त्याबद्दल आय अॅम साॅरी..."
इतकं बोलून ती शांत झाली पुढे काय बोलावं हे मला सुचेना पण कुठेतरी मनाच्या आठवणीत मला काहीतरी आठवत होतं..तेच तिला मी बोलून दाखवलं.
"जेव्हा मी आश्रमात होतो ना तेव्हा शेवटच्या दिवशी मी गुरूजीना सांगितलेलं सगळं..स्वतःला मी पुर्णपणे व्यक्त करून सोपवलं मी स्वःतला..ते काय म्हणाले माहीतेय??"
"प्रेम, क्षमाशिलता आणि इतरांच्या मतांबद्दल आदर ज्यांच्याजवळ आहे ना त्याला प्रेम हया ना त्या रूपात मिळतेच तु प्रेम केलेस तसे तिला तिच्या काही चुकांबद्दल क्षमाही कर आणि तिच्या मताचा आदर राख..तुझं खरं प्रेम असेलही तिच्यावर पण त्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्या मनाचं तुझ्यावर आहे आणि हे मन ज्याने तुला दिलयं ना त्याच तुझ्यावर तु जितकं करतोस ना त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रेम आहे आणि जो प्रेम करतो ना आपल्यावर तो आपल्याला कधीच त्रास देत नाही तो फक्त प्रेम करत राहतो कुठलीही अपेक्षा न करता..तु ही तसंचं करत राहा प्रेम तिच्यावर... तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता..
इतका सुंदर विचार आणि प्रेमाचा अर्थ मला कुणीच सांगितला नव्हता.. आता कळतय मला..मी तुझ्या शरीरावर कधीच प्रेम केलं नव्हतं...तुझ्या त्या आनंदी अवखळ हसण्यावर, निरागस खुश होण्यावर व तुझ्यातल्या त्या धार्मिक व सात्विक वृत्तीवर प्रेम केलं होतं आय मिन अजुनही करतोच फक्त तो आनंदी चेहरा आणि ते सात्विक भाव आयुष्याच्या रहाटगाडग्यात कुठेतरी हरवू नको देऊस..खुश रहा नेहमी.."
इतकं बोलून मी फोन कट केला...
यथावकाश आमची पदवी पुर्ण झाली..मला अगदीच चमत्कार व्हावा असे मार्क्स नाही मिळाले पण पास झालो मी..
"ती" पहील्यापासून टाॅपरच होती. सध्या सरकारी नोकरी करतेय गेल्याच महीन्यात तिची रत्नागिरीला बदली झाली..
आणि मी प्रायवेटमध्ये कामाला आहे सुट्टी असली की सलूनमध्ये पप्पांना मदत करतो ..लाज नाही वाटत आता त्याची. स्वतःच्या वडीलांना त्यांच्या कामात मदत करायला कसली आलीय लाज..
काही लोक "ऐ ग्रुज्यवेट हजाम, बगल का बाल निकाल" असं चिडवतात पण राग नाही येत त्यांचा...गुरूजींनी शिकवलयं क्षमाशिलता असावी अंगात ..इतरांना क्षमा करण्यासारखं दुसरं कठीण आणि महान काहीच नाही ह्या जगात..
कधी कधी रात्री फोन करते ती स्वतःहून..न सांगितलेल्या गोष्टि सांगते..मी ही शेअर करतो..आणखी काय हवं असतं ...प्रेम जरी एकतर्फी असलं तरी ते रिकामं नाही अधुर जरी असलं तरी सुंदर आहे अर्ध्या चंद्रासारखं......फक्त त्या चंद्राची दुसरी बाजू कधीच दिसत नाही आणि हीच बाजु सलते मनात आणि मनात काही ओळी सतत घोळत राहतात..
मन गुंततं..कुठेतरी आदळतं..
भावना फुलतात, संवेदना जागतात..
कधी आनंद तर कधी खुप वाईट वाटतं..
मग नकळत मनात एकचं कोडं उरतं..
"प्रेमात असचं का होतं?
समाप्त..
खरंतर ह्या कथेवरून झालेल्या
खरंतर ह्या कथेवरून झालेल्या गदारोळानंतर मी इथून जाणारचं होतो..
पण इथल्याच लोकांनी शिकवलयं मला...निंदक आणि टीकाकार कितीही असले तरी नाऊमेद व्हायचं नाही..
आणि मी तर किती सुदैवी आहे..माझ्याबरोबर असणारे खुप जण आहे आणि केवळ काही टीकांकारसाठी मी का हतबल व्हायचं?
मी लिहत राहणार आणि इथुन पुढे ही इथेच पोस्ट करणार कुणी काहीही म्हणू दे मग..
सर्वांना मनापासून धन्यवाद..... मला पाठबळ दिल्याबद्दल व समजुन घेतल्याबद्दल..
अभिनंदन ! आता कथा वाचतो
अभिनंदन !
आता कथा वाचतो
अजय...छान कथा..सुंदर!
अजय...छान कथा..सुंदर!
"प्रेम, क्षमाशिलता आणि इतरांच्या मतांबद्दल आदर ज्यांच्याजवळ आहे ना त्याला प्रेम हया ना त्या रूपात मिळतेच तु प्रेम केलेस तसे तिला तिच्या काही चुकांबद्दल क्षमाही कर आणि तिच्या मताचा आदर राख..तुझं खरं प्रेम असेलही तिच्यावर पण त्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्या मनाचं तुझ्यावर आहे आणि हे मन ज्याने तुला दिलयं ना त्याच तुझ्यावर तु जितकं करतोस ना त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रेम आहे आणि जो प्रेम करतो ना आपल्यावर तो आपल्याला कधीच त्रास देत नाही तो फक्त प्रेम करत राहतो कुठलीही अपेक्षा न करता..तु ही तसंचं करत राहा प्रेम तिच्यावर... तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता..
इतका सुंदर विचार आणि प्रेमाचा अर्थ मला कुणीच सांगितला नव्हता.. आता कळतय मला..मी तुझ्या शरीरावर कधीच प्रेम केलं नव्हतं...तुझ्या त्या आनंदी अवखळ हसण्यावर, निरागस खुश होण्यावर व तुझ्यातल्या त्या धार्मिक व सात्विक वृत्तीवर प्रेम केलं होतं आय मिन अजुनही करतोच फक्त तो आनंदी चेहरा आणि ते सात्विक भाव आयुष्याच्या रहाटगाडग्यात कुठेतरी हरवू नको देऊस..खुश रहा नेहमी.." >>>>>
धन्यवाद! ह्या सगळ्या भावना माझ्या आहेत ज्या आपण शब्दबद्ध केल्यायेत.
पुढील लेखनास शुभेच्छा...
पहिल्या आणि दुसर्या भागात
पहिल्या आणि दुसर्या भागात किती फरक आहे... दुसरा भाग आवडला. लिखाण, भाषा, कथा सगळच. कथा नायकाने हिन्दी शब्द वापरण बंद्/कमी केल
मी लिहत राहणार आणि इथुन पुढे ही इथेच पोस्ट करणार कुणी काहीही म्हणू दे मग.. << मायबोलीवर चांगल लिखाण नेहमीच चालत...
कसला टर्न आहे कथेला...
कसला टर्न आहे कथेला... सत्यकथा आहे का?
बाकी मी मवाल्यातल्या मवाल्यांना एखाद्या घटनेनंतर शक्यतो दुर्घटनेनंतर आमूलाग्र बदलताना पाहिले आहे. त्यामुळे माणसं बदलतात यावर विश्वास ठेवतो. आणि तसेही तुमच्या मित्राचे कॅरेक्टर मला तितकेही गॉन केस वाटले नव्हते, या वयात काही रस्ता चुकतात ईतपतच होते.
सत्यकथा असेल तर शुभेच्छा दोघांना ..
राहूल आणि ऋऽऽन्मेष तुमचे आभार
राहूल आणि ऋऽऽन्मेष तुमचे आभार मानायला शब्द सापडत नाहीयेत तरीही तुमच्या सहकार्याबद्ल परत एकदा मनापासून स्पेशल थॅन्क्स..
अत्यंत पोसिटीव कथा... खूप छान
अत्यंत पोसिटीव कथा... खूप छान अजय जी.
खूप चांगला संदेश दिलाय आपण.
अतिशय सुंदर, कथेला एक वेगळीच
अतिशय सुंदर, कथेला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
>>>>मी लिहत राहणार आणि इथुन पुढे ही इथेच पोस्ट करणार कुणी काहीही म्हणू दे मग<<<<< +११११११
कोणी काहीही, कसंही, बोललं तरी, त्या लोकांना आपल्या लेखणीतून उत्तर द्या.
तुमची पोस्ट बघून खरंच मनापासून आनंद झाला, तुम्ही असंच नियमित लिहीत राहा, माबोला तुमच्या सारख्या लेखकांची गरज आहेच.
तुमच्या पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत!
शेवट आवडला नाही. फारच टिपिकल
शेवट आवडला नाही. फारच टिपिकल झाला असं वाटलं.
पुलेशु.
वा:! छान!! मस्तं लिहिलंय!!
वा:! छान!! मस्तं लिहिलंय!! आवडली (सत्य!) कथा!!
एकतर्फी प्रेम प्रत्येकवेळी विध्वंसकच असते असं नाही. समजूतदारपणाचेही असते. मैत्रीचे, समर्पण आणि त्यागाचेही असू शकते. एकतर्फी प्रेमात त्यावेळी निर्माण झालेल्या अपयशाच्या दुःखदायी विचारांना कसे वळण मिळते हे महत्वाचे असते. तसंच अशावेळी आपल्याबरोबर असलेल्या लोकांची साथ आणि योग्य मार्गदर्शन मिळणे फार उपयोगी ठरते. नायकाच्या मनातल्या भावना किती सहज आणि सुंदरपणे रेखाटल्या आहेत आपण. आपण लिहीत रहा.
पहिला भाग आणि दुसऱ्या
पहिला भाग आणि दुसऱ्या भागाच्या लिखाणात प्रचंड फरक आहे, सीता और गीता टाईप. मला पहिला भाग जास्त आवडला आहे. ती साऊथ-इंडियन मुलीची गोष्ट ती पण पाहिल्या भागाच्या स्टाईलनीच लिहिली होती. प्लिज लिहायची स्टाईल बदलू नका. बाकी, अशीच गोष्ट असणार होती का तुम्ही लोकांच्या मतांनुसार गोष्ट बदललीत, ते तुम्हाला माहित. पहिल्या भागाच्या style नी लिहिली असतील तर जास्त आवडली असती. पूर्ण गोष्ट लिहून एकत्र पोस्ट केलीत तर पुढच्यावेळी.
राजसी ह्यांच्याशी सहमत
पहिला भाग आणि दुसऱ्या भागाच्या लिखाणात प्रचंड फरक आहे, ह्याबद्दल राजसी ह्यांच्याशी सहमत
आणि २रा भाग पोस्टल्या बद्दल लेखकाचे अभिनंदन
लेखकाचे लिखाण अभिजात असावे
कुठल्याही (+/-) प्रतिसादामुळे त्यात अनैसर्गिक बदल करु नये असे माझे मत राहील.
आपली स्टाईल ती आपली स्टाईल ह्यावर फक्त विश्वास ठेवून वैविध्य साधता आले तर उत्तमच
माबो वर तुमचे असेच सहजतेने नटलेले लिखाण ह्यापुढे येत राहील ह्यसाठी शुभेच्छा
अजियजी सर्वांत प्रथम तर
अजियजी सर्वांत प्रथम तर तुमचे अभिनंदन तसेच धन्यवाद कि तुम्ही निर्णय बदलला आणि स्टोरी इथे पोस्ट केली..
स्टोरी नंतर वाचेन....................
आवडली. पु.ले.शु.
आवडली. पु.ले.शु.
...प्रेम जरी एकतर्फी असलं तरी
...प्रेम जरी एकतर्फी असलं तरी ते रिकामं नाही अधुर जरी असलं तरी सुंदर आहे अर्ध्या चंद्रासारखं......फक्त त्या चंद्राची दुसरी बाजू कधीच दिसत नाही आणि हीच बाजु सलते मनात आणि मनात काही ओळी सतत घोळत राहतात.. व्वा मस्त.
ह भाग आवडला.
मी लिहत राहणार आणि इथुन पुढे ही इथेच पोस्ट करणार कुणी काहीही म्हणू दे मग.., तुम्ही लिहित रहा.
आवडली गोष्ट अजुन लिहा.
आवडली गोष्ट
अजुन लिहा.
जमलीये गोष्ट.
जमलीये गोष्ट.
पुढे लिहिल्याबद्दल अभिनंदन.
गोष्ट पुरी केल्याबद्दल
गोष्ट पुरी केल्याबद्दल अभिनंदन... आणी धन्यवाद सुद्धा!
पण.. खरं सांगू तर दोन वेगळे भाग वाटले. विपश्यनेचं वर्णन योग्यच आहे, असेच होते तिकडे गेले की.
ही सत्यकथा आहे त्यामुळे काय सत्यकथेत कायपण होतं.... असो
गोष्ट वाचली नाहीये . वाचते
गोष्ट वाचली नाहीये . वाचते सावकाश .. पण इथे दुसरा भाग आला हेच खूप आवडलंय. खूप खूप अभिनंदन त्याबद्दल तुमचे .
Submitted by राजसी on 1
Submitted by राजसी on 1 August, 2017 - 09:56 >> +1
लिहीत रहा.
समोरच्या व्यक्तीकडून आजिबात
समोरच्या व्यक्तीकडून आजिबात काही रिस्पॉन्स किंवा कमिटमेंट नसतांना आपल्या आकर्षणाला 'प्रेम' नाव देत अश्या स्वार्थी भावनेच्या समाधानासाठी आपले आणि ईतरांचे आयुष्यं गहाण ठेवण्याचा किंवा पणाला लावण्याचा फोलपणा कथानायकाला वेळीच लक्षात आला हे चांगले झाले. कथानायकाचे आयुष्य विपश्यनेमुळे बदलले त्यात प्रेमाबेमाचा काही संबंध नाही असे वाटले.
बाकी कथा आणि शैली यथा तथाच आहे आणि, ह्या आधीची कथा जरा बरी होती ईतकेच.
कथेचे शीर्षकही अगदीच चुकीचे आहे कथेत आधी बळजबरी आणि नंतर हतबलता दिसली, प्रेम कुठे दिसले नाही.
अवांतर- मागच्या भागातला टोन आणि भाषा ऊचित आणि जरूरी नव्हती हे तुम्हाला पटल्याचे दिसते आहे. ह्या भागात टोन आणि शब्दांच्या निवडीत तुम्ही जाणीवपूर्वक केलेले बदल स्वागतार्ह आहेत.
गदारोळाला वैतागून निघून न जाता कथा पूर्ण केली हेही चांगले.
*महत्वाचे हा प्रतिसाद फक्तं लेखकाप्रती आहे ईतरांनी त्यावर मतप्रदर्शन करण्याची अपेक्षा आणि गरज नाही.
कथा आवडली पहिला भाग जास्त
कथा आवडली पहिला भाग जास्त आवडला कथेतील पात्रे अतिशय उत्तमरित्या वाचकांपर्यंत पोहोचवता आणि लेखनशैली हि उत्तम
लिहित रहा.
पहिल्या भागानंतर ही कथा डर
पहिल्या भागानंतर ही कथा डर किंवा देवदास च्या मार्गाने पुढे जाणार वाटले होते,
इकडे ते कभी हा कभी ना झाला
कथा लेखनाचा पहिला प्रयत्न आवडला .
अजयदा मस्त! (सत्य)कथा आवडली.
अजयदा मस्त! (सत्य)कथा आवडली.
पहिल्या भागानंतर ही कथा डर
पहिल्या भागानंतर ही कथा डर किंवा देवदास च्या मार्गाने पुढे जाणार वाटले होते,
इकडे ते कभी हा कभी ना झाला Happy <<< आणि मधे मोठ रामायण/महाभारत झाल की
पहिल्या भागानंतर ही कथा डर
पहिल्या भागानंतर ही कथा डर किंवा देवदास च्या मार्गाने पुढे जाणार वाटले होते,
इकडे ते कभी हा कभी ना झाला Happy
>>>>>
मी त्या धाग्यावरच्या पहिल्याच पोस्टमध्ये या चित्रपटांची नावे लिहिली होती
अरेच्या कथानायकात बराच मोठा
अरेच्या कथानायकात बराच मोठा बदल झाला की. हे सगळं त्या विपश्यनेमुळेच का? तसं असेल तर जरा त्या केंद्राचा पत्ता द्या बरं इथे. मायबोलीवरच्या बर्याच मेंबरांना तिथे पाठवायची नितांत गरज आहे.
अजय,
अजय,
मी सुरूवातीला कथेवर प्रतिसाद लिहीलेला. आता थोडा सविस्तर लिहीतो.. पहिल्या भागाच्या वेळी मी शिर्षक वाचलं त्याचवेळी ध्यानात आलं कि हि व्यथा आहे. अतिशय समर्पक शिर्षक आपण निवडलं. मी हा प्रतिसाद त्या भागावर सुरूवातीलाच लिहीलेला आहे. त्याचवेळी डर वा अंजाम च्या मार्गाने कथा जाणार असं बिल्कुल वाटलेलं नाही..पहिल्या भागात वापरलेली भाषाशैली हि practicle life मधली कॉलेजमध्ये शिकत असताना प्रत्यक्ष वापरली जाणारी होती..त्या भागात बरेच संवाद होते. त्यापैकी बरेच मित्रांमधले होते आणि नेमकेपणाने as it is लिहीलेले होते. ह्या भागात मित्रांमधलं संभाषण नाहिये म्हणून भाषाशैलीत फरक जाणवतो. मला नाही वाटत कि कथेला या भागात असलेलं वळण मुद्दामहून दिलेलं आहे..आणि प्रामाणिकपणे कथा संपवलेली दिसतेच. बाकी प्रेम अनुभवायचं असतं..ते लोकांना दिसेलच याची खात्री नसते.
विपश्यनेमुळे आयुष्यात बदल होतो हे जरी मान्य झालं तरी सुरूवातीचा चांगुलपणाचा स्पार्क आपल्या स्वत:च्या अंतरंगात असतोच..
नविन कथेच्या प्रतिक्षेत..शुभेच्छा!
अजय, अभिनंदन.
अजय, अभिनंदन.
हा भागही आवडला. सकारात्मक शेवट पण छान.
दोन्ही भागातील भाषेचा बदल हा
दोन्ही भागातील भाषेचा बदल हा मलाही कथेची गरज वाटतो. वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर तो आधीसारखाच कसा वागेल बोलेन.
फक्त मागच्या धाग्यावर जो गदारोळ झाला त्यामुळे लोकांना असे वाटणे साहजिकच आहे की त्या गदारोळामुळे लेखकाने शैली बदलली.
जर तेव्हाच हे समजून घेतले असते की ती शैली कथानकाची गरज आहे तर गदारोळ झालाच नसता
Pages