“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल ?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात टेकवंत विचारलं.
“अम्…टेडी बीअर?”
“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”
”Management Ethics चं textbook?”
“असं abstract गिफ्ट देतं का कुणी, बावळट. Think something romatic .”
“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली.
“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”
“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलंस.”
त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.
“ए ए थांब थांब इअररिंग्स आणल्या का?” ती उताविळपणे बोलली.
काहीच न बोलता त्याने मूठ उघडली, त्याच्या तळहातावरचा तो जीन्नस पाहताच तीचे डोळे आनंदाने आणि आश्चर्याने विस्फारले गेले.
“ सुरा???!!”
“यपSSS बेब”
“आय कांट बिलिव्ह धिस. तुला कसं मिळालं पण? पंचवीस वर्षाच्या खालच्यांना मिळत नाही ना.”
“माझा एक मित्र आहे निशांत फार्मामध्ये, त्याच्याकडून मिळवली एक बॉटल…फक्त तुझ्यासाठी.”
“ओह…थँक यू व्हेरी मच…आय लव्ह यू शोन्या…”असं म्हणून ती सरळ त्याच्या गळ्यात पडली.
“वेट वेट…आधी हे औषध पी, मग सुरू करू. कारण आपण एकदा बॅटिंग सुरू केली की सेंचुरी मारल्याशिवाय थांबत नाही.”
“ हो का, आज बघतेच…दे ती बॉटल इकडे.” असं बोलून तिने त्याच्या हातातली बॉटल हिसकावुन घेतली. अत्तराच्या कूपीसारख्या दिसणाऱ्या त्या बॉटलमध्ये तपकिरी रंगाचं द्रावण होतं. जणूकाही स्वयंप्रकाशित असावं अशी आभा होती त्याची. क्षणाचाही विलंब न करता तिने झाकण उघडलं अन एका घोटात द्रावण घशाखाली रिचवलं. घसा जाळंत ते पोटात शिरलं. पण याची तिला तमा नव्हती. तिने बॉटल फेकून दिली अन मधाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तिची ती आव्हान देणारी नजर अन शरीराचे सगळे चढउतार स्पष्टपणे अधीरेखीत करणारे फिट्ट कपडे…
त्याला पेटायला अजून काय हवं होतं. तिच्या नजरेत रुतवलेली नजर अजिबात न हटवता त्याने तिला जवळ खेचली. ओठांमध्ये ओठ मिसळले, अंतराच्या मर्यादा संपल्या. तो एखाद्या झंझावाताप्रमाणे तिला भिडला.
“तू रेनकोट आणलायस ना सोबत?” कसेबसे ओठ विलग करंत तिने विचारलं.
“घरूनच घालून आलोय.”
“कुत्र्याSSS “ असं म्हणून ती दुप्पट जोमाने त्याला बिलगली. तिने डोळे मिटले अन त्याच्या अधीन झाली. त्याने अलगद तिला उचललं आणि बेडरुम मध्ये घेऊन गेला.
त्यांच्याजवळ फक्त अर्धा तास होता
* * *
दोन वर्षांपूर्वी :
एव्हरेस्ट सर करायचं त्याचं स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात आलं होतं. पन्नाशी गाठलेल्या बिरजूला अजूनही विश्वास बसत नव्हता. पंधरा वर्ष, तब्बल पंधरा वर्ष प्रयत्न केल्यानंतर तो इथे पोहोचला होता. दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले असूनही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं होतं.
पण आजचा दिवस ऐतिहासिक ठरण्याचं अजून एक कारण म्हणजे………
आज सुराच्या मानवी टेस्टिंगचा दिवस होता !!
बिरजूने ट्रेकिंग बॅगमध्ये हात घालून सुराची बॉटल बाहेर काढली. अन ते अदभुत रसायन तो प्यायला. घसा जाळत गेलेली ती चव यशाच्या मस्तीत त्याला जाणवली नाही.
तिसाव्या मिनिटाला तो एव्हरेस्टवर होता. निशांत फर्माचं हेलिकॉप्टर, एका शास्त्रज्ञाला अन दोन टी.व्ही. रिपोर्टसना घेऊन आकाशात घिरट्या घालत होतं. गेली पंधरा वर्ष एका क्षणात त्याच्या नजरेसमोरुन सरकली. असंख्य प्रयत्न, हालअपेष्टा, समाजाचा उपहास, उपमर्द सोसत त्याने आज हा टप्पा गाठला होता. भारताच्या दिशेने तोंड करून त्याने एक कडक सॅल्यूट ठोकला. त्याचं ह्रृदय अतीव आनंद अन अभिमानाने भरून आलं अन… त्याक्षणी तो त्याच्या भावनांनी कमाल पातळी ओलांडली. तो पाषाणवत स्थिर झाला…एखाद्या जादूगाराने जणू काही त्याला मूर्ती बनवलंय.
पुढचे दहा मिनीटं तो ही परमसुखाची अनुभूती घेणार होता.
थोडक्यात सुरा रसायनाचा प्रयोग यशस्वी झाला होता.
“ मानवी आयुष्य हे खूप धकाधकीचं, अन अतीव दुःख, कष्ट अन त्राग्याने भरलेलं आहे. वाळवंटात पाणी सापडावं तसे सुखाचे मोजके क्षण आपल्या आयुष्यात येतात. पण तेसूद्धा क्षणभंगुर असतं. तुमच्या आयुष्यातले हे सुखाचे क्षण दीर्घकाळ टिकावे अन आयुष्य अधिक अर्थमय बनावं म्हणून आम्ही एक अदभुत औषध तयार केलंय- ज्याचं नाव आहे सुरा.” निशांत फार्माचा CEO, Product launching च्या वेळी बोलला होता.
“आपल्या आयुष्यात आनंदाची घटना घडणार आहे असं लक्षात येताच हे औषध प्यायचं, पुढच्या तीस ते चाळीस मिनिटांत भावनांच्या पातळीने उच्चतम पातळी गाठली की तुम्ही निश्चल व्हाल आणि तो अत्युच्च भावनांचा आवेग पुढची तब्बल सहाशे सेकंद अनुभवू शकाल !!”
अर्थातच या product ने अख्खं जग दणाणून सोडलं.
प्रचंड किंमत अन भरपूर Permissions घ्याव्या लागत असूनही सुराची डिमांड कमी झाली नाही. त्यातच ‘या औषधाचा पंचविशीच्या आतल्या तरूणांकडून गैरवापर होऊ शकतो’ असा जावईशोध सरकारने लावला अन या वयोगटातील तरुणांना सुरा मिळणं बंद झालं.
* * *
तो आणि ती, तिच्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये होते. दोघांचीही अनावृत्त उष्ण शरीरं ऐहिक बंधनं विसरून एकमेकांत मिसळण्याचा यत्न करत होती. शरीरं घुसळून निघत होती, चुंबनांचा पाऊस पडत होता. भावनांचा आवेग एवढा जबरदस्त होता की पहिल्या दहा मिनिटांतच ती शिखरावर पोहोचली असती, पण दोनदा महत्प्रयासाणे ती परत आली… तीस मिनिटांच्या आधी तिला तसं होऊ द्यायच नव्हतं. क्षणभर टिकणारा तो परमोच्च आनंद तिला तब्बल दहा मिनीट अनुभवायचा होता…स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का ?
वेळ वेगात पुढे सरकू लागला… हा हा म्हणता वीस मिनीट झाली, वीसची पंचवीस झाली…शिखर नजरेच्या टप्प्यात आलं; आता तो धावू लागला, धावण्याचा वेग त्याने वाढवला आणि पुढच्या दोनच मिनिटांत तो अत्त्युच्च बिंदुवर जाउन पोहोचला. तिला गच्च मिठी मारून तो तिच्या अंगावर कोसळला. दोन क्षण विश्रांती घेऊन तो चक्क उठला. त्याने फरशीवर फेकलेले कपड़े गोळा करून चढवायला सुरुवात केली.
“ हे काय करतोयस तू?” तिच्या चेहऱ्यावर मह्दाश्चर्य होतं.
“कपड़े घालतोय.”
“का?”
“कारण माझं झालंय. “
“What the fuck…मी इथे उपाशी आहे आणि तू उठून चाललास. Selfish moron.”
पण तो काहीच बोलला नाही.
ती उठून त्याच्या जवळ आली; त्याचा हात तिने हातात पकडला अन त्याला जोरात बेडवर खेचलं
“तुझी भूक मिटवायला मी तुझा बांधील नाही.” तिचा हात झिडकारत तो म्हणाला.
“अचानक काय झालंय तुला?”
“अचानक नाही. ज्या दिवशी तू मला त्या हरामी नरेशबरोबर झोपलेली दिसली तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझा बदला घ्यायचा. मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं अन बदल्यात तू मला काय दिलंस?? विश्वासघात??? आज तुला गरज आहे अन माझ्याकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणून तुला मी आठवलो..पण माझी खोटी बदनामी करून तू जेलमध्ये जाण्याची वेळ माझ्यावर आणली होतीस हे मी कसं विसरू ?”
एरवी या विषयावर ती खूप भांडली असती, आकांडतांडव करून त्याला फ्लॅटमधून हाकलून लावलं असतं; पण आज ती संयमानं घेणार होती. कारण तिला कसंही करून तो परमोच्च क्षण गाठायचा होता... तब्बल दहा मिनीटे टिकणारा तो स्वर्गानुभुतीचा क्षण. तिला पंचविशी ओलांडायला जवळपास तीन वर्ष बाकी होते अन हा अनुभव घ्यायला ती एक हजार बावण्ण दिवस थांबू शकत नव्हती.
“मी शॉरी म्हटलंय ना तुला पिलू. “ तिने आवाजात जास्तीत जास्त मृदूता आणली, “ आता शहाण्या बाळासारखं ये बरं माझ्याजवळ.” असं म्हणून तिने आपल्या नाजूक हातांचा पाश त्याच्या कमरेभोवती गुंडाळला.
पुरूषी भावना चेतवणारे विविध पाश तिने फेकायला सुरुवात केली. पुरूषच तो. काही क्षणांपूर्वीचा त्याचा आभिनिवेश हळूहळू गळून पडू लागला.तो परत एकदा तिच्यात मिसळायला तयार झाला. तीस मिनीटं उलटून गेल्यामुळे तिला आता वाहून जाण्याची भीती नव्हती; किंबहुना तिला तेच हवं होतं. हळूहळू वादळ जोर धरू लागलं,त्याच्या आवेगाच्या लाटा तिच्या किनाऱ्यावर आदळू लागल्या. ती आवेगामधे खूप दूरवर वाहत गेली. आत्मग्लानीच्या त्या उन्मयी अवस्थेत पोहोचायला फक्त काही क्षण उरले अन अचानक एखाद्या झुरळाला झटकावं तसा तिचा देह त्याने स्वतःपासून दूर ढकलला.
“ Go and fuck yourself bitch” असं बोलून तो तडक बेडरुमबाहेर पडला.
ती भयंकर चवताळली. अंगावर चादरही न ओढून घेता ती त्याच्या मागे धावत सुटली. तो एव्हाना फ्लॅटच्या दरवाजापर्यंत पोहोचला होता. तिची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही जास्त अवघड होती. अतृप्त कामेच्छा, भयंकर अपमान, अपेक्षाभंग, क्रोध अशा संमिश्र भावनांचा प्रचंड आगडोंब उसळला होता. तिने टेबलावर ठेवलेली काचेची फुलदाणी उचलून पुर्ण ताकदीने त्याच्या दिशेने भिरकावली.
पण…त्याच, अगदी त्याच क्षणी तिच्या भावनांनी कमाल मर्यादा ओलांडली अन ती एखाद्या नग्न रोमन शिल्पाप्रमाणे आहे त्या स्थितीत थिजून गेली.
“Happy Valentine day जानू.” एवढंच तो बोलला अन दरवाजाबाहेर निघून गेला
-------------------------------------------------------
कडक लिहिलीय..
कडक लिहिलीय..
स्पॉयरल एलर्ट..
चुकत नसेल तर त्या संतापलेल्या भावनेत ती पुढची दहा मिनिटे थिजून गेली ना..
Yupp
Yupp
भारी लिहलय
भारी लिहलय
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी आधी एका कथेत वाचलंय, कुठल्या ते नीट आठवत नाहीये.
सुरापान ब्रम्हहत्या
सुरापान ब्रम्हहत्या
भारी लिहीलंय...
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी आधी एका कथेत वाचलंय, कुठल्या ते नीट आठवत नाहीये.
>> दिवाळी अंकात वाचली होती का ? याच concept वर एक कथा मागे मी एका दिवाळी अंकात दिली होती. त्याचा शेवट माझा मलाच फारसा न आवडल्याने बदललाय
सुरापान ब्रम्हहत्या >>
सुरापान ब्रम्हहत्या
>>
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी
शेवटचा भाग सोडून बाकीचं मी आधी एका कथेत वाचलंय, कुठल्या ते नीट आठवत नाहीये.
>> दिवाळी अंकात वाचली होती का ? याच concept वर एक कथा मागे मी एका दिवाळी अंकात दिली होती. त्याचा शेवट माझा मलाच फारसा न आवडल्याने बदललाय
नवीन Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 July, 2017 - 23:50
+ 999999999
मी पण वाचली होती. हा छान शेवट झालाय. "सुरापान सुडांत"
छान आहे. शेवट मस्त आहे.
छान आहे. शेवट मस्त आहे. दिवाळी अंकातला शेवट काय होता?
जबरी !!!!! मस्त लिहिली आहे.
जबरी !!!!! मस्त लिहिली आहे. कॉन्सेप्ट आवडली.
शेवट तर एक नंबर जमला आहे.
एक नंबर, जबराट, .........
एक नंबर, जबराट, .........
अजुन विशेषणे आठवत नाहीत, भावना व्यक्त करण्यासाठी
अप्रतिम...........
मस्त लिहिलंय शेवट पण भारि
मस्त लिहिलंय शेवट पण भारि
प्रतिसादांबद्दल खूप खूप आभार
प्रतिसादांबद्दल खूप खूप आभार
दिवाळी अंकातला शेवट काय होता?
दिवाळी अंकातला शेवट काय होता?
>> सुराचा एक side effect असतो की त्यामुळे Emotional Quotient (EQ) कमी होतो, लोक भावनाशून्य होऊ लागतात.
हे एका हुशार व्यक्तीच्या लक्षात येतं आणि तो कंपनी बंद पाडण्यासाठी संघर्ष करतो. अर्थातच त्याला यश मिळतं.
शेवट predictable होता.
मस्त आहे कथा!! कल्पना छान आहे
मस्त आहे कथा!! कल्पना छान आहे.
लय भारी ! काय काय टकुऱ्यातनं
लय भारी ! काय काय टकुऱ्यातनं निपाज्ताय तुमच्या ! येकापत्तुर येक भन्नाट लिवता राव !
_/\_
_/\_
जबरी आहे!
जबरी आहे!
>> सुराचा एक side effect असतो
>> सुराचा एक side effect असतो की त्यामुळे Emotional Quotient (EQ) कमी होतो, लोक भावनाशून्य होऊ लागतात.
हे एका हुशार व्यक्तीच्या लक्षात येतं आणि तो कंपनी बंद पाडण्यासाठी संघर्ष करतो. अर्थातच त्याला यश मिळतं.
शेवट predictable होता.>>>>>>> ओके. हा शेवट आवडला.
जबरी कथा, मस्त लिहिली आहे.
जबरी कथा, मस्त लिहिली आहे. कल्पना अगदी अप्रतिम. शेवट तर एक नंबर !!!
मस्त कथा!
मस्त कथा!
बापरे, काय भन्नाट लिहिता
बापरे, काय भन्नाट लिहिता विनयजी!
सही!!!!
सही!!!!
खूपच छान लिहिलंय तुम्ही विनय.
खूपच छान लिहिलंय तुम्ही विनय....
आधी वाचली होती इतर साईटवर.
आधी वाचली होती इतर साईटवर.
मस्तच आहे!
बाप रे!!
बाप रे!!