|| विठू दादा ||

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 July, 2017 - 12:55

|| विठू दादा ||

भीमेचीया तटा
उभा विठू दादा
रोवूनिया पदा
युगे युगे ||

काळाला करडा
असे त्याचा धाक
पाप वाहे भाक
दूर पळे ||

दु:खात सावूली
धरे डोईवरी
कर्तव्य कसुरी
नावडे त्या ||

हसतो खेळतो
संगतीने येतो
जीवनाला देतो
अर्थ गोड ||

हाती नसे चक्र
अथवा की गदा
प्रेमाने सर्वदा
मार्ग दावी ||

कृपाळू दयाळू
सदा लोकपाळू
होई कनवाळू
प्रियजना ||

विक्रांते जाणला
हृदयी धरिला
म्हणुनी कळला
काही पथ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Use group defaults

काय म्हणू आता - इतक्या सहज सुंदर शब्दात दादाला पकडलेत . हा दादा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळेच शक्य झाले .