जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १८ (अंतीम)

Submitted by Mayur Mahendra ... on 1 July, 2017 - 12:34

नमस्कार वाचकहो........
शेवटचा भाग संपादीत करण्यासाठी काही कारणास्तव मला फारच ऊशीर झाला आहे. तरीही तूम्ही पूढील भाग आवर्जून वाचाल याची मला खाञी आहे.
धन्यवाद

जँकला आपल्या वडीलांच अधूरं स्वप्न पूर्ण करण्याची आस लागली होती.

" एलीजाबेथ तू नार्गोला विचारशील का ?
की या बेटावर खजाण्याचा मार्ग कूठे आहे ते "
जँकने एलीजाबेथला सांगीतले.

" बरं ठीक आहे "
एलीजाबेथने नार्गोकडे पाहीलं व त्याच्याशी बोलू लागली.

" आरमरू कोल्वा बारफरबोसा "
तीने नार्गोला समजेल अशा भाषेत खजाण्याचा मार्ग विचारला.

" कोईतो वामे अालर "
त्याबरोबर नार्गोने लगेचच प्रतीऊत्तर दिले.

" नार्गो म्हणतोय की ईथून पूढे एका गूहेत कूठेतरी तो खजाणा लपवून ठेवण्यात आला होता "
एलीजाबेथने नार्गोच्या ऊत्तराचं सर्वाना स्पष्टीकरण दिलं.

" मग त्यांना विचार ते आपल्याला आता त्या खजाण्यापर्यतं घेऊन जाऊ शकतील का ?"

" आरफयू निघोता बारफरबोसा "
एलीजाबेथने नार्गोला पून्हा प्रतीप्रश्न केला.

" निघोता वाया शांपरीक्त मंगो " नार्गो

" जँक हे म्हणतायेत की ते आपल्याला तीथे घेऊन जायला तयार आहेत.
जर तो खजाणा आपल्याला मिळाला तर त्यांच्या आदीवासी जमातीची शापातून मूक्तता होईल.
पण खजाण्याचा मार्ग खूपच खडतर आहे. त्यामध्ये जिव गमावण्याचा धोका देखील असू शकतो "
एलीजाबेथने पून्हा नार्गोच्या म्हणन्याचं सर्वाना स्पष्टीकरण दिलं.

" आपण ईथपर्यतं आलोच आहोत तर आता माघार घेण्यातही काही अर्थ नाही. मी नार्गोसोबत तो खजाणा शोधण्यासाठी जाणार आहे "

" आम्ही सर्वजणही तूझ्यासोबत येऊ जँक "कँप्टन स्मीथनी जँकच्या पाठीवर हात ठेवत त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले.

" असं असेल तर खूपच बरं होईल "

थोड्याच वेळात खजाण्याविषयी एक महत्वाची चर्चा करून नार्गो व त्याचे सहकारी जँक आणी त्याच्या मिञांना घेऊन खजाण्याच्या दिशेने जाण्यास तयार झाले. त्यांनी प्रत्येकाच्या हातात एक-एक लाकडी मशाल थोपवली होती. नार्गोच्या पत्नीने सर्वाच्या कपाळावर कसलीतरी पिवळी भूटकी लावली. व सर्वानी एकच जल्लोश केला.
आणी खजाण्यापर्यतं जाण्याच्या खडतर प्रवासाला सूरवात केली. चंद्राच्या अंधूक प्रकाशामूळे वातावरणात बऱ्यापैकी ऊजेड होता. नार्गो पाठोपाठ सर्वजण हळूहळू खजाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले.
काहीवेळ बर्फ तूडवल्यानंतर ती सर्व मंडळी बेटाच्या माथ्यापर्यतं पोहोचली. थंडगार वाऱ्याचा थंडावा सहन होण्यापलीकडे होता.नार्गोने पूढे होऊन माथ्यावरच्या एका खडकावर पसरलेले थडंगार बर्फ हाताने बाजूला सारले व त्या ठिकाणी निरखून पाहू लागला

" काय आहे त्या दगडावर ?"
वेबने एलीजाबेथला विचारले.
त्या खडकावर एका विचीञ भाषेत लिहीलेला कसलातरी सांकेतीक लिपीतील संदेश होता. नार्गोने एलीजाबेथचे त्या संदेशाकडे लक्ष वेधून घेतले.

" हा संदेश म्हणजे बार्बोसाने खजाणा लपवलेल्या गूहेत प्रवेश करण्यासाठी असलेला एक गूप्त मार्ग आहे "
एलीजाबेथने सर्वाना त्या संदेशाविषयी थोडक्यात कल्पना दिली.

" काय आहे तो संदेश ताई ?"
लहानग्या कॉर्नरने एलीजाबेथला विचारले.

" एक प्यासा श्वापद घे भरारी
रवीकीरण तेजस्वी लक्षवेधी "
एलीजाबेथने त्या संदेशाचं सर्वाना समजेल अशा भाषेत रूपातरं केलं.

" म्हणजे हे एक कोडं आहे " रॉन

" हो, ही एक पहेली आहे " विल्यम

" जर आपण हे कोडं सोडवू शकलो तरच आपल्याला बार्बोसाच्या गूप्त गूहेचा मार्ग सापडू शकेल "
एलीजाबेथच्या या वाक्याबरोबरच सर्वजण विचारात पडले.

" नक्की काय असेल याचा अर्थ " ज्युली

" ' एक प्यासा श्वापद घे भरारी ' म्हणजे एक तहानलेला पक्षी बरोबर "
खूप वेळ विचार केल्यानंतर रॉनने अखेर तोडं ऊघडले.

" हो अगदी बरोबर रॉन " जँक

" आणी ' रवीकीरण लक्षवेधी ' म्हणजे ऊगवत्या सूर्याची तेजस्वी किरणं "

" हो ग्रेट यार तू कोडं सोडवण्यात अगदी माहीर आहेस "
ज्युलीने रॉनची थोडक्यात प्रशंसा केली.

" पण या कोड्यात सूर्याच्या किरणांचा आणी तहानलेल्या पक्षाचा संबध काय असू शकतो ?"
ज्यूलीने अगदी योग्य प्रश्न माडंला होता.

" तेच तर आपल्याला शोधायचं आहे " जँक

" पण कसं काय ?" ज्युली

" त्या पहेलीत सूर्याची तेजस्वी किरणं असा ऊल्लेख केला आहे याचा अर्थ आपल्याला सूर्य ऊगवण्याची वाट पहावी लागेल "
कँप्टन स्मीथनी अगदी योग्य अंदाज माडंला होता.

" हो बरोबर " जँक

" पण मग तहाणलेल्या पक्षाचा याच्याशी सबंध काय ?" रॉकी

" तेच तर समजत नाही ना " वेब

" विल्यम तूला सापडलेल्या पूराव्यात बार्बोसाच्या खजाण्याविषयी काय लिहीलं होतं "
जँकने विल्यमकडे बघत त्याला विचारलं.

" त्या पूराव्यानूसार तो खजाणा एका गूप्त ठिकाणी ठेवण्यात आला होता " विल्यंम

" गूप्त ठिकाणी म्हणजे नक्की कूठे आणी कसा ? काहीतरी महत्वाचं असेल ना त्या पूराव्यात "
कँप्टन स्मीथ

" बार्बोसाने तो खजाणा कोणालाही सहजासहजी सापडू नये म्हणून खजाण्याचा प्रत्येक मार्ग विशीष्ट प्रकारच्या विवीध रचना व काही गूप्त संदेश देऊन लपवून ठेवला होता " विल्यम

" मग बरोबरच तो खजाणा आपल्याला सहजासहजी कसा काय सापडणार " रॉकी

ते सर्वजण एकमेकांसोबत बोलत असतानाच अचानक वाऱ्याची एक थंडगार लहर सर्वाना गारठवून गेली.
आणी एका ऊंच बेटामागून हळूहळू सूर्याच आगमन होऊ लागलं. त्याची तेजस्वी किरणं क्षणभरासाठी सर्वाचे डोळे दिपवून गेली. तेवढ्यात कूठूनतरी गरूडासारखा एक मोठा विचीञ पक्षी पंख फडफडत त्या बेटावर आला व कर्कश आवाज करून सतत एकाच ठिकाणी तो घिरट्या घालू लागला.

" हा काय प्रकार आहे विल्यम "

" मलापण याविषयी काहीच कल्पना नाही जँक "

" तू निट निरीक्षण केलंस तो पक्षी सतत एकाच ठिकाणी गोल घिरट्या घालतोय "
जँक

" हो, पण याचा अर्थ काय ?" विल्यम

" कदाचीत तो पक्षी आपलं लक्ष वेधून आपल्याला काहीतरी सूचवण्याचा प्रयत्न करत आहे " कँप्टन स्मीथ

" नक्की आपल्याला काय सूचवायचं असेल त्याला " लूसी

" यस व्ही गॉट ईट
मला त्या दगडावर लिहीलेल्या पहेलीचा अर्थ कळलाय "
जँकने एक मोठा पॉस घेतला व पूढे बोलू लागला
" तो पक्षी जीथे घिरट्या घालतोय त्याच ठिकाणी बार्बोसाच्या गूहेत प्रवेश करण्याचा गूप्त मार्ग असावा "

" हो जँक अगदी बरोबर
त्या पक्षाने आपलं काम खूपच सोपं करून ठेवलं आहे.
त्या दगडावरील पहेलीमध्ये सांगीतल्यानूसार तो तहानलेला पक्षी सूर्य ऊगवताना या बेटावर पाणी पिण्यासाठी येतो. व गूहेत प्रवेश करण्याचा गूप्त मार्ग सांगून जातो.
सर्वानी त्या ठिकाणी चला "
लूसी सर्वाना तो पक्षी ज्या ठिकाणी घिरट्या घालत होता त्या ठिकाणी घेऊन गेली.

" हा साचलेला बर्फ बाजूला केल्यावर आपल्याला गूहेत जाता येईल "
रॉकीने सांगीतल्याबरोबर सर्वानी एकञ येऊन त्या दगडावर साचलेला बर्फ बाजूला करण्यास सूरवात केली.
आणी थोड्याच वेळात त्यांना गूहेच्या भूयाराचं तोडं दिसू लागलं. त्या गूहेतील बर्फाचा थंडावा सहन होण्यापलीकडे होता.

" यस आपण गूहेत प्रवेश करण्याचा गूप्त मार्ग शोधून काढला आहे जँक "
ज्यूली ऊत्साहाने ओरडली.
मग हळूहळू अगदी सावधतेने एकामागोमाग प्रत्येकाने गूहेत प्रवेश केला.
त्या बर्फाळ गूहेमध्ये दाट अंधाराचं अस्तीत्व असलं तरी या वेळी माञ नार्गोने स्वतःहून सर्वाच्या हाती एक-एक लाकडी मशाल स्वाधीन केली होती. त्यामूळे अधांराचं वर्चस्व आता बरऱ्यापैकी कमी झालं होतं.
आतमध्ये अगदी बऱ्याच वर्षापासून मरून पडलेल्या माणसांचे सांगाडे लक्ष वेधून घेत होते. त्यामूळे एक ऊग्र दर्प गूहेतील निमूळत्या हवेत पसरला होता.
त्या भूयारातील एका कोपऱ्यात कसलेतरी अनेक लहान-लहान बँरल एकावर एक रचून ठेवण्यात आले होते त्यावर बर्फ साचला होता.
" ईतके लहान बँरल बार्बोसाच्या सैन्याने या गूहेमध्ये का आणून ठेवले असतील " वेब

" हो, हा काय प्रकार आहे विल्यम " जँक

" कदाचीत माझ्या मते बार्बोसाच्या जहाजातील सैन्य व कारागीर हा खजाणा लपवण्यासाठी या गूहेपर्यतं पोहोचले असतील आणी मग काही कारणास्तव त्यांना गूहेतून बाहेर पडता न आल्यामूळे त्या सर्वाचा ईथेच गूदमरून मृत्यू झाला असेल "

" हो असं होऊ शकतं " रॉकी

" पण या बँरलमध्ये नक्की आहे तरी काय ?"
कँप्टन स्मीथनी खीशातील चाकूने त्या बँरलपैकी एकावरंच आवरण फाडलं आणी त्या भरलेल्या बँरलमधून हळहळू दारू ( यूद्धात वापरली जाणारी दारू ) बाहेर पडू लागली.

" अरे या बँरलमध्ये तर दारू भरून ठेवण्यात आली आहे "
कँप्टन स्मीथनी सर्वाना थोडक्यात कल्पना दिली.

" पण या गूहेत त्यांना हे दारूने भरलेले बँरल ठेवण्याची गरजच का भासली असावी ?" वेब

" त्यामागे देखील नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असेल " जँक

" अरे हा जहाजाचा कँप्टन आहे वाटतं "
समोर पडलेल्या एका सांगाड्याकडे पाहून जँक म्हणाला.

" कशावरून " लूसी

" त्याने घातलेली कँप अजूनही त्याच्या डोक्यावरच आहे.
पण हा या गूहेमध्ये दारूने भरलेल्या बँरलची राखण का करतोय ?
खरंतर याला बार्बोसाच्या जहाजात असायला हवं " जँक
जँकने हातातील दगडाने तो गंजत आलेला बँरल फोडल्याबरोबर त्यामधून दारू बाहेर पडू लागली त्या दारूबरोबरच कापडात व्यवस्थीत गूंडाळून ठेवलेली एक वस्तू बाहेर आली.

" हे गाईज मला काहीतरी सापडलंय. "
जँकने सर्वाचं लक्ष त्या वस्तूकडे वेधून घेतलं.
कापडात व्यवस्थीत गूंडाळून ठेवलेली ती वस्तू म्हणजे एक लांबलचक पेटी होती.

" पेटी ?
यामध्ये काय असेल जँक ?"
त्या पेटीचं निट निरीक्षण केल्यावर जँकने सर्वासमोर हलक्या हाताने अगदी काळजीपूर्वक ती पेटी ऊघडली.

" तलवार "
त्या पेटीमध्ये एक नक्षीदार तलवार लपवून ठेवण्यात आली होती.

" हा जहाजाचा कँप्टन या तलवारीची राखण करत होता ? " रॉन

" पण ही तलवार या पेटीमध्येच का लपलवून ठेवली असेल ?" रॉकी

" यामागे देखील नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार " जँक

" गाईज ही बार्बोसाची रत्नजडीत तलवार आहे मला सापडलेल्या पूराव्यामध्ये या तलवारीचा ऊल्लेख करण्यात आला होता "
विल्यम

" लाखोची अमानत असेल " रॉकी

" रॉन निट बघ त्या तलवीरीच्या नळीवर काहीतरी लिहीलं आहे " जँक

" असंच काहीतरी असेल ते " ज्युली

" नाही वेडे हा एक सूराग आहे " जँक

" कसला सूराग जँक " ज्युली

" ईथे आण मला बघू दे "
जँकने कँप्टन स्मीथच्या हातातून चाकू घेतला. आणी त्या चाकूचा टोक हाताच्या अगंठ्यावरून खेचला त्यामूळे अगठ्यांतून भळाभळा रक्ताची धार वाहू लागली.

" जँक तू काय करतोयेस ?
वेडा आहेस का तू ?"
ज्युली जँकच्या हाताकडे पाहत मोठ्याने ओरडली.

जँकने अगठ्यांतून आलेलं रक्त त्या तलवारीच्या गोळाकार नळीवर लावलं आणी मग एका कापडावर ती नळी फिरवली त्यामूळे नळीवर लिहीलेली अक्षरं त्या कापडावर ऊमटली गेली.

" यू आर जिनीयस जँक " ज्युली

" मला वाटतं हा खजाणा कदाचीत काल्पनीक आहे " लूसी

" का ?
असं का वाटतय तूला ?
माझा यावर विश्वास नाही " जँक

" आता आपण खजाण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचलो आहोत मिञानो "
विल्यमने डोळे मिचकावत सर्वाना कल्पना दिली.

" पण विल्यम तू म्हणाला होतास हा खजाणा तर ईथेच असेल " रॉन

" ते जाऊदे कापडावर काय ऊमटलंय ते सांग अगोदर "
विल्यमने मूद्दामूनच विषयाला दूजोरा देण्याचा प्रयत्न केला.

" अंखड काळापासून लिहीलेलं
लिहीलेलं खोल लपलेलं
एक गूप्त चावी टाळा शोधी
बाकी आहे कोणाची मजाल "
एलीजाबेथने कापडावर लिहीलेल्या मजकूराचा सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत अनूवाद करून सांगीतला.

" बस एवढंच लिहीलं आहे " रॉकी

" हो " एलीजाबेथ

" म्हणजे पून्हा एक कोडं, पून्हा एक पहेली " रॉन

" या कोड्याला निट समजावं लागेल " लूसी

" ' अंखड काळापासून लिहीलेलं ' म्हणजे काय असेल "
रॉनच्या या वाक्याबरोबरच सर्वजण विचारात पडले.

" म्हणजे बार्बोसाच्या काळात लिहीलेली एखादी गोष्ट कीवां.."
अखेर बऱ्याच विचाराअंती रॉनने तोडं ऊघडले.

" हो अगदी बरोबर " जँक

" पण बार्बोसाच्या काळात नक्की काय लिहीलं गेलं असेल " ज्युली

" ' लिहिलेलं खोल लपलेलं ' याचा अर्थ काय ?" लूसी

" म्हणजे या गूहेतून पूढे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी बार्बोसाच्या काळात लिहीलेली एखादी गोष्ट या गूहेत खोलवर कूठेतरी लपवून ठेवण्यात आली असेल "

" ग्रेट यार तू तर कोडं सोडवण्यात अगदी माहीर आहेस रॉन " ज्युली

" आता पूढची ओळ "

" ' एक गूप्त चावी टाळा शोधी बाकी आहे कोणाची मजाल ' "
ज्युलीने रॉनला कोड्यातील पूढची ओळ वाचून दाखवली.

" म्हणजे या गूहेतच कूठेतरी खोलवर लपवून ठेवलेली बार्बोसाच्या काळातील एखादी गोष्ट किवां आणखीन काही आपल्याला या गूहेतून पूढे जाण्यास मदत करेल " जँक

" हो अगदी बरोबर जँक " एलीजाबेथ

" म्हणजे या सर्वाचा एकंदरीत अर्थ काय ?"
सर्वच गोष्टी विल्यंच्या डोक्यावरून गेल्या होत्या.

" याचा अर्थ या गूहेतून खजाण्यापर्यतं पोहोचण्याचा मार्ग पूढे नाही खाली आहे "
जँक

" खाली ?" लूसी

" हो,
आपल्याला खजाण्यापर्यतं पोहोचण्यासाठी या गूहेच्या खालच्या बाजूनेच एखादा मार्ग सापडेल " जँक

" सापडेल नाही सापडला जँक ईथे माझ्या पायाखाली एक चैकोनी आकाराचा लाकडी दरवाजा आहे "
लूसीने मोठ्याने ओरडून सर्वाना कल्पना दिली.

" ग्रेट लूसी " वेब

" यस....आपण खजाण्याच्या एक पाऊल आणखीन जवळ पोहोचले आहोत " ज्युली

" सर्वानी माझ्यामागोमाग खाली या "
विल्यमने सर्वाना ओरडून योग्य त्या सूचना दिल्या. मग त्याच्या पाठोपाठ प्रत्येकजण तो लाकडी दरवाजा खोलून खालच्या भूयारात पोहोचले.
ते बर्फाळ भूयार वरच्या गूहेपेक्षा अगदी वेगळे भासत होते. जणू काही कित्येक वर्ष मणूष्याचं त्या ठिकाणी येणं-जाणं होत असावं.

" जँक हे बघ ईथे काय लिहीलं आहे या भींतीवर ?"
वेबने बर्फाळ भींतीवर लिहीलेल्या भूयारातील एका मजकूराकडे सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

" पहेलीत ऊल्लेख केल्याप्रमाणे ' लिहीलेलं खोल लपलेलं ' म्हणजे हेच असेल कदाचीत " रॉन

" काय लिहीलं आहे त्या भींतीवर ?" जँक

" फरगॉटन पॉल " वेब

" फरगॉटन पॉल ?" जँक

" हो " वेब

" म्हणजे ?" जँक

" म्हणजे हरवलेला पॉल " विल्यम

" ते माहीत आहे रे पण हा पॉल कोण होता " ज्युली

" पॉल हा बार्बोसाच्या दरबारातील एक राज मैस्तरी होता. त्यानेच बार्बोसाचा खजाणा लपवण्यासाठी या गूहेची रचना केली होती " विल्यम

" पण मग ईथे या भींतीवर 'फरगॉटन पॉल ' असं का लिहीलंय ?" रॉकी

" कारण एकच असू शकतं.
पॉल या गूहेची रचना करताना काही कारणास्तव या गूहेतील भूयारातच अडकून राहीला असेल कीवां हरवला असेल "
विल्यमने एक पूसटसा तर्क लावला.

" मग आता आपण या भूयारातून पूढे जाण्यासाठी काय करायचं ?" ज्युली

" त्यासाठी आपल्याला पॉलचा मृतदेह शोधावा लागेल "

" काय ?"

" हो,
जर पॉलचा सांगाडा आपल्याला सापडला तरच तीथन पूढे खजाण्यापर्यतं पोहोचण्याचा मार्ग देखील मिळण्याची शक्यता आहे "

" हो, कँप्टन बरोबर बोलत आहेत " जँक

" पॉलचा मृतदेह त्यांनी कूठे लपवून ठेवला असेल ?" रॉन

" अर्थातच समोरच्या बर्फाळ भीतींवर जीथे ' फरगॉटन पॉल ' असं लिहीलं आहे त्या ठिकाणीच त्याचा मृतदेह असायला हवा "

" हो अगदी बरोबर जँक
आपल्याला पॉलचा मृतदेह शोधण्यासाठी ही बर्फाळ भीतं सर्वात प्रथम फोडावी लागेल "
विल्यमने प्रथमच जँकच्या म्हणन्याला सहमती दर्शवली होती.

" पण एवढी जाड भींत कशी काय फोडणार आपण ?" ज्युली

" एक मिनिट, एक मार्ग आहे
जर आपण ही भींत फोडण्यासाठी वरच्या गूहेत असलेल्या बँरलमधील दारूचा वापर केला तर "

" ग्रेट यार
चांगली कल्पना आहे " रॉन

जँकच्या सांगण्याची वाट न पाहताच रॉकी व वेब वरच्या गूहेतून दारूने भरलेला बँरल खाली घेऊन आले.

" ही दारू या बर्फावर पेट घेईल का ?" ज्युली

" का नाही ?
दारू जेवढी जूनी असते तेवढ्याच लवकर ती पेट घेते " रॉकी

" सर्वानी दूर व्हा "
रॉकीने त्या बँरलमधील दारू काढून हाताच्या ओजंळीने समोरच्या बर्फाळ भींतीवर ऊधळली आणी मग मागे होऊन हातातील पेटती मशाल त्या भींतीवर पसरलेल्या दारूवरून फिरवून तो लगेचच त्या भींतीपासून दूर गेला.
आणी बघता बघता त्या ठिकाणी अचानकच एक मोठा स्फोट झाला व क्षणार्धात बर्फाचे लहान-मोठे तूकडे सगळीकडे विखूरले गेले.

" ग्रेट रॉकी एक्सलटं जॉब " जँक

" मी म्हटलं होतं ना ' दारू जेवढी जूनी तेवढी लवकर पेट घेते " रॉकी

" हे गाईज ते बघा त्या भींतीपलीकडे एक चैकोनी आकाराचं लहानसं भूयार आहे "
लूसी ने भींत फूटल्यावर समोर दिसणाऱ्या लहानशा भूयाराकडे ईशारा करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

" आणी ती पेटी कसली त्यात ?" ज्युली

" अरे ही तर दफन पेटी आहे " जँक

" दफन पेटी ?" रॉन

" हो " जँक

" नक्कीच या पेटीमध्ये पॉलचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला असावा " कँप्टन स्मीथ

मग फार वेळ न घालवता जँकने व विल्यमने ती दफन पेटी सावकाशपणे त्या लहानशा चैकोनी भूयारातून बाहेर काढली. व हलक्या हाताने ऊघडली.
त्यात फक्त एक मानवी सांगाडां व्यवस्थीत रचना करून ठेवण्यात आला होता.

" हा नक्कीच पॉलचा सांगाडा असायला हवा "

" कशावरून " रॉन

विल्यमने त्या सांगाड्याच्या मानेतील हाडांभोवती गूडांळलेल्या नाण्याकडे ईशारा करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं

" हे नाणं बार्बोसाने त्याच्या राजमैस्तरीला म्हणजेच पॉलला दिलेलं विश्वासाचं प्रतीक आहे "

" म्हणजे "

" याचा अर्थ आपण खजाण्याच्या खूपच जवळ पोहोचलो आहोत "
विल्यमने डोळे मिचकावत सर्वाना कल्पना दिली.

" या पेटीमध्ये तर पॉलच्या सांगाड्याशीवाय दूसरा कोणताच पूरावा नाही जँक
मग आपण पूढे खजाण्यापर्यतं कसे काय पोहोचणार आहोत " ज्युली

" आता आपल्याला कोणत्याच पूराव्याची गरज नाही ज्युली ज्या चैकोनी आकाराच्या भूयारामध्ये ही दफन पेटी ठेवली होती त्या भूयारातूनच पूढे जाण्याचा मार्ग आहे " जँक

" असं असेल तर खूपच बंर होईल " ज्युली

" कोणीही या पेटीवर पाय न देता माझ्या मागे या "
थोड्याच वेळात सर्वजण जँकपाठोपाठ हळूहळू त्या लहानशा भूयारातून पूढे निघाले.
जँकने पेटती मशाल एका निमूळत्या वातीला टेकवली आणी एकाएकी सगळीकडेच ऊजेड पसरला.
अचानक समोरचं दृश्य पाहून सर्वजणच अवाक झाले होते.
त्याच्यां पूढ्यात एक जीवघेणी घळी आ वासून पसरली होती. त्या घळीत खालच्या दिशेने जाण्यासाठी बर्फाच्या एका गोळाकार सीडीची रचना त्या ठिकाणी बार्बोसाच्या राजमैस्तरीनी केली होती.

" बापरे ईथून एखाद्याचा पाय घसरला की तो सरळ खालच्या घळीत खोलवर जाऊन पडेल
मग त्याचा मृत्यू निच्छीत " लूसी

" जँक ही सीडी बघ
ही एवढी मोठी गोठलेल्या बर्फाची सीडी यांनी कशी काय बनवली असेल आणी जवळजवळ हजारो वर्षापेक्षा जास्त ही सीडी टिकून तरी कशी राहीली असेल ?" ज्युली

" जशी माणसांने पीरँमीडं बनवली. जशी चीनची भीतं बनवली. अगदी तशीच ईतक्या वर्ष ही सीडी टीकून राहण्यामागे नक्कीच काहीतरी गूपीत असावं. "

" नाही कदाचीत एलयन्स नी मदत केली असेल " रॉन

" हो एलयन्स ईथे आले होते ही सीडी बनवायला " रॉकी

" थापा मारणं पूरे
चला पूढे आता " जँक

" मी नाही जाणार या सीड्या जवळजवळ हजारो वर्षाहून जून्या आहेत त्यामूळे या बर्फावरून कधीही पाय घसरून एखाद्याचा तोल जाऊ शकतो " ज्युली

" पण त्याला आता काहीच पर्याय नाही ज्यूली जर खजाण्यापर्यतं पोहोचायचं असेल तर आपल्याला पूढे जावंच लागेल "
जँकने ज्युलीला समजाऊन सांगीतले.

अखेर सर्वाणीच मोठी हिम्मत करून
त्या बर्फाळ सीड्यांवरून ऊतरत खालच्या दिशेने वाटचाल सूरू केली.

" सांभाळून या सर्वानी " रॉन

" आपण कीगं बार्बोसाच्या गूप्त गूहेत आहोत "
जँक बोलत असतानाच अचानक एकाएकी बर्फाचे चमकदार गोळे वरतून खाली पडू लागले. क्षणार्धात ती संपूर्ण गूहा दणदणू लागली. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला एका ठिकाणी सीडी तूटून खाली बर्फाच्या घळीत जाऊन पडली होती.

" मी आणखीन पूढे नाही येणार जँक मला खूप भीती वाटतेय "
लूसी दचकून जागच्या जागी खीळून ऊभी राहीली.

" लूसी पटकन पूढे ये नाहीतर तू पण त्या बर्फाच्या तूटलेल्या सीड्यांसोबत खाली जाशील "
जँक लूसीला समजावत असतानाच अचानक त्याच्या पायाखालची सीडी तूटून सर्वजणच एकञ खाली पडले.
पण केवळ सूदैवाने सीडीला चीकटून असलेला बर्फाचा तूकडा खाली जाऊन घळीतील दोन टोकांमध्ये अडकला गेला. त्यामूळे सर्वजण एकञ मरण्यापासून वाचले
होते तो लहानसा सीडीचा तूकडा ज्यावर सर्वजण ऊभे होते तोही काही क्षणातच खाली जाणार होता.

" सर्वानी जागेवरच ऊभे राहा
हालचाल केलीत तर सर्व एकञच मराल "
कँप्टन स्मीथनी मोठ्याने ओरडून सर्वाना शांत केलं. व थोड्याच वेळात त्यांनी वरतून सीडीला बांधलेली एक रस्सी जँकजवळ फेकली.
मग हळूहळू त्या रस्सीमार्फत प्रत्येकजण वरच्या न तूटलेल्या सीडीवर जाऊन पोहोचले

" बापरे खूपच भयानक आहे ही गूहा "घडलेला प्रसंग आठवून ज्युली थरथर कापत होती. लहानगा कॉर्नर लूसीच्या कूशीत जाऊन घाबरल्यामूळे शांत बसला होता. सर्वजणच घळीत पडण्यापासून अगदी थोडक्यात वाचले होते.

" पण जँक आपण आता खाली कसे काय जाणार " रॉन

" हो खालच्या सर्वच सीड्या तूटून घळीत पडल्या आहेत " रॉकी

" जँक ते बघ विल्यम आणी वेब "
एका लाकडी बॉक्समध्ये बसून त्यांच्याजवळ येणाऱ्या विल्यमकडे लूसीने ईशारा केला.
विल्यमला खजाण्यातील सर्वच पूराव्यांची परीकल्पना होती. तो बॉक्स जरी ईलेव्हेटर नसला तरी रस्सी अडकल्यामूळे एखाद्या लिफ्टसारखंच काम करत होता.
थोड्याच वेळात खालच्या दिशेने जाण्यासाठ सर्वजण विल्यमने आणलेल्या लाकडी बॉक्समध्ये जमा झाले.
रॉनने त्या बॉक्सला बांधलेली रस्सी थोडी ढीली केल्याबरोबर तो बॉक्स सर्वाना घळीमध्ये खालच्या दिशेने घेऊन गेला.
समोरच न तूटलेल्या सीडीजवळ एक चैकोनी आकाराची बर्फाळ रूम होती.

" यस जँक व्ही गॉट ईट
आपण चेम्बर ऑफ ईस्केपजवळ पोहोचलो आहोत "
विल्यम डोळे मिचकावत मोठ्याने ओरडला.

" चेबंर ऑफ ईस्केप ?
हा मार्ग आहे " जँक

" हो हाच आहे
मला सापडलेल्या पूराव्यामध्ये राजमैस्तरीनी चेम्बर ऑफ ईस्केपचा ऊल्लेख केला होता त्यांच्यामते याच खोलीमध्ये बार्बोसाने आपला दिव्य खजाणा लपवून ठेवला होता.
सर्व पूरावे हाच मार्ग दाखवत आहेत "
विल्यमच्या या एका वाक्याबरोबर सर्वाची ऊत्सूकता शीगेला पोहोचली.

" सर्वानी पूढे या आपण आता खजाण्यापर्यतं पोहोचलो आहोत "
विल्यमने दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अडकवून ठेवलेल्या लाकडी मशाली आगीने प्रज्वलीत केल्या. आणी आत प्रवेश केला. त्याने रूममधील सर्व भींतीवर एकवार नजर फिरवली.

" हे काय ?
तो खजाणा कूठे आहे.
मला मीळालेल्या पूराव्यानूसार तरी तो खजाणा याच चेबंरमध्ये असायला हवा होता "
विल्यमने जँकच्या तोडांकडे पाहत विचारले.

" पण ईथे तर काहीच नाही " जँक

" कदाचीत या खोलीच्या पलीकडे काही असेल " ज्युली

" याच्या पूढेही काहीच नाही आहे " जँक

" पूढे जाण्यासाठी एखादा पूरावा ?" विल्यम

" ईथे कोणताच पूरावा नाही विल्यम "
जँकने त्या खोलीचं निट निरीक्षण केले.

" एक मिनीट
तो बघ लाल कंदील असलेला दिवा "
विल्यमने त्या खोलीमध्ये लटकणारऱ्या एका बंद दिव्याकडे सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

" पण त्याचा आता ईथे काय ऊपयोग ?" जँक

" हाच पूरावा आहे "

" म्हणजे "

" म्हणजे हा त्या वेळेच्या स्वतंञ राज मेस्तरीनी निर्माण केलेला पूरावा होता " विल्यमने खूलासा केला

" कंदीलाचा पूरावा ?"

" हो,
बार्बोसाच्या राज्यातील कीगं सोलोमन मंदीरामध्ये एक लिफ्ट सारखी सीडी होती जीची निर्मीती फक्त लढाईच्या वेळी शञू पक्षाच्या सैन्याचा अंदाज घेण्यासाठी करण्यात आली होती "

" म्हणजे जरा निट समजेल असं सांगशील का विल्यम " जँक

" बार्बोसाला लढाईच्या वेळी ब्रीटिशर्स कूठून येत आहेत याचा ईशारा करण्यासाठी बार्बोसाचा राजमैस्तरी पॉल लाल कंदीलाचा दिवा बॉस्टन चर्चच्या टोकावर लटकवत असे.
एक दिवा लटकवण्याचा अर्थ जमीनीवरून येणारे सैन्य आणी दोन दिवे लटकवण्याचा अर्थ समूद्रातून येणारे सैन्य.
ईथे एकच दिवा लटकवला आहे
याचा अर्थ एक लाल दिव्याचा कंदील आणी लीफ्ट वाल्या सीड्या हा खजाण्यापर्यतं पोहोचण्याचा पूरावा आहे " विल्यम

" म्हणजे आपल्याला त्या लीफ्टसारख्या बॉक्समधून खालच्या दिशेने जावं लागेल "
जँक

" हो, खजाणा नक्कीच खाली असेल "
विल्यमने जँकच्या बोलण्याला सहमती दर्शवली

सर्वानी पून्हा या बॉक्समध्ये येऊन ऊभे रहा आपण सर्वजण खालच्या दिशेने जात आहोत "
सर्वजण पून्हा दाटीवाटीने त्या बॉक्समध्ये शीरले.
रॉनने त्या बॉक्सच्या एका कोपऱ्याला बांधून ठेवलेली रस्सी थोडी ढीली केली त्याबरोबर तो बॉक्स त्यांना घेऊन खालच्या दिशेने गेला "

" आपल्याला समोरच्या बर्फाळ खोलीमध्ये जायचं आहे "
कँप्टन स्मीथनी सर्वाना कल्पना दिली.

" विल्यम माझ्या मते आपल्याला त्या वरच्या बर्फाळ खोलीमध्ये लाल कंदीलाचा दिवा भेटला होता ती खोली ' चेम्बर ऑफ ईस्केप ' नसून ही समोरची खोली आहे "

" म्हणजे बार्बोसाचा खजाणा या रूममध्ये आहे " रॉन

" हो रॉन "
जँकच्या या वाक्याबरोबरच सर्वाची ऊत्सूकता पून्हा शीगेला पोहोचली.

जँकने त्या बर्फाळ रूमच्या दरवाजाबाहेर असलेल्या दोन्ही मशाली पून्हा प्रज्वलीत केल्या. मग प्रत्येकजण खजाणा पाहण्यासाठी लगबगीने एकामागोमाग त्या रूममध्ये शीरले.
तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. आणी एकाएकी सर्वानाच आच्छर्याचा धक्का बसला.
अचानकच त्यांच्या रूमचा एकमेव दरवाजा बाहेरची भीतं सरकून बंद झाला होता.

" ओ माय गॉड
आता आपण काय करायचं जँक या रूमचा दरवाजा बाहेरून बंद झालाय "
ज्युली मोठ्याने ओरडली

" आपण ईथून बाहेर कसे काय पडणार ?"
ज्युलीने जँकला पून्हां प्रतीप्रश्न केला पण जँक माञ अजूनही त्या संपूर्ण रूमभोवती चैफेर नजर फिरवून शांतपणे ऊभा होता

" अरे खजाणा कूठे आहे ?"
विल्यमने जँकच्या चेहऱ्याकडे पाहत त्याला विचारले.

" खजाणा याच रूममध्ये असायला हवा होता. पण ईथे तर काहीच नाही "
रॉनने कसलातरी अंदाज लावण्याच्या अनूशंगाने जँकला विचारले.

" विल्यम तूला सापडलेले पूरावे तूझ्या व्यवस्थीत लक्षात आहेत ना "
जँकने विल्यमकडे एक बारीक कटाक्ष टाकत त्याला विचारले.

" हो, जँक ते पूरावे माझ्या अगदी व्यवस्थीत लक्षात आहेत. मी त्यांचा खूप अभ्यास केला होता.
पूराव्यानूसार बार्बोसाचा खजाणा चेबंर ऑफ ईस्केपमध्ये म्हणजे याच रूममध्ये असायला हवा होता "
विल्यमने जँकला स्पष्टीकरण दिले.

" नक्कीच आपलं काहीतरी चूकतयं " कँप्टन स्मीथनी जँकसमोर अगदी विचारपूर्वक वक्तव्य केलं.

" नाही आपण मीळालेल्या पूराव्यानूसार अगदी योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत पण ईथे खजाणा वैगरे काहीच नाही "
विल्यमने नाराजी व्यक्त करत स्मीथचं म्हणनं झीडकारून लावलं.

" जँक तूझ्या वडीळांनी हॉस्पीटलमध्ये मरणाच्या अगदी शेवटच्या क्षणी तूला खजाण्याबद्धल काहीतरी महत्वाचा पूरावा सांगीतला होता ना "
विल्यमने जँकच्या ऊदास चेहऱ्याकडे बघत त्याला विचारले.

" नाही , खोटं होतं ते "
जँकच्या या वाक्याबरोबरच सर्वाच्या नजरा पून्हा जँककडे वळल्या.

" काय ?"

" हो, त्यांनी मला कोणताच पूरावा वैगरे कीवां खजाण्याबद्धल कधी काहीच सांगीतलं नाही "
जँकने लगबगीने विल्यमच्या प्रश्नाचं ऊत्तर दिलं.

" मग तू आमच्याजवळ खोटं का बोललास "
रॉनने जँकला पून्हां प्रतीप्रश्न केला.

" त्या वेळी रॉकीला शोधून काढणंच सर्वात महत्वाचं होतं. शीवाय विल्यमच्या कचाट्यातून सूखरूप बाहेर पडण्यासाठीही याचा ऊपयोग होणार होता म्हणूनच मला तूम्हा सर्वाजवळ खोटं बोलावं लागलं "
जँक हताश झाला होता.

" म्हणजे माझ्या वडीळांनी जो खजाणा मिळवण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयूष्य खर्ची केलं तो खजाणा खोटा होता तर "
जँकचा चेहरा पडला. एवढं निराश झाल्याचं रॉनने त्याला कधीच पाहीलं नव्हतं.

" नाही जँक तूझे वडीळ खरे होते हा खजाणा व त्यांनी मेहनतीने मिळवलेले सर्व पूरावे खरोखरच अस्तीत्वात आहेत "
कँप्टन स्मीथनी जँकला समजावण्याचा प्रयत्न केला.

" मी हरलो कँप्टन
मी माझ्या वडीळाचं स्वप्न केव्हांच पूर्ण करू शकणार नाही
मला वाटलं होतं मी हा खजाण शोधून काढेन पण...... "

" नाही जँक परीस्थीतीसमोर लाचार होऊन तू खचून जाऊ नकोस. जर तूझे वडीळ आता ईथे असते तर त्यांनी केव्हांच हार मानली नसती.
आपण सर्वानी या रूममधून बाहेर पडण्यासाठी पून्हा प्रयत्न करायला हवेत
आपण नव्या ऊम्मीदीने आता पून्हा खजाण्याचा शोध घ्यायला हवा "
कँप्टन स्मीथनी जँकच्या निरागस भावना प्रज्वलीत करण्याचे पून्हा प्रयत्न केले

" हो कँप्टन तूमचं म्हणनं अगदी बरोबर आहे.
कदाचीत ही वेळ पून्हा कधीच येणार नाही अशा महत्वाच्या निर्णायक क्षणी माघार घेण्यात काय अर्थ......नाही मी आता खजाण्याच्या शोधात पून्हां प्रयत्न करणार
माझ्या वडीळांच स्वप्न, त्यानी खजाण्याच्या शोधात घेतलेली मेहनत मी सहजासहजी वाया जाऊ देणार नाही.
आपल्याला आता पून्हां नव्या ऊमीदीनं खजाण्याचा शोध घ्यायचा आहे "
जँकच्या अद्भूत जीद्धीने सर्वामध्ये पून्हा ऊत्साहाची एक बेभान लहर पसरली
सर्वजण ताठ माना करून खजाण्याच्या शोधासाठी पून्हा नव्याने ऊभे राहीले.

" आपण या रूममध्ये अडकून राहीलो आहोत ईथून बाहेर पडल्याशीवाय आपल्याला काहीच करता येणार नाही "
ज्युलीने सर्वासमोर अगदी महत्वाचा मूद्धा माडंला
खरोखरच त्या रूममधून बाहेर पडल्याशीवाय त्यांना काहीच करता येणार नव्हतं.

" असं काही होणार नाही ज्युली सर्व ठीक होईल
आपण नक्कीच या चेबंर ऑफ ईस्केपमधून सूखरूप बाहेर पडू "
यावेळी माञ जँकच्या बोलण्यात विश्वासक भाव होता.

" कसं काय जँक ?
थोड्या वेळातच या रूमच्या भींतीमधील बर्फ वितळण्यास सूरवात होईल आणी त्यात आपण सर्वजण जीव गमावून बसू "
लूसीने सर्वाना सत्याची जाणीव करून दिली.

" नाही लूसी हि रूम वितळायच्या अगोदरच आपल्याला या रूममधून बाहेर पडायला हवं "
जँकने त्याची भेदक नजर संपूर्ण रूमवर फिरवली.

" सर्वानी लवकरात लवकर या रूममधून बाहेर पडायचा मार्ग शोधा "
कँप्टन स्मीथनी पूढाकार घेत सर्वाना ओरडून योग्य त्या सूचना दिल्या.

" पण कँप्टन ईथून बाहेर पडता येईल असं ईथे काहीच नाही या रूमच्या चारही बाजूना बर्फाच्या भींती आहेत "
रॉकी रूममधील रचनेचा अदांज घेऊन बोलत होता.

" वाळवंटात कधी पूर आल्याचं मी ऐकलं नाही
जोपपर्यतं माझा अंदाज आहे आपण अजूनही ईथे अडकलो आहोत "
रॉनने सर्वाना पून्हां भानावर आणले.

" ईथून बाहेर पडण्याचा नक्कीच एखादा मार्ग असेल "
कँप्टन स्मीथनी सर्वाना धीर देण्यासाठी पून्हां पून्हां समजावण्याचा प्रयत्न करत होते.

" एक मार्ग आहे "
जँकच्या या वाक्याबरोबरच सर्वाच्या नजरा त्याच्या शोधक नजरेकडे वळल्या.

" काय जँक ?
कोणता मार्ग ?"
रॉनने जँककडे प्रश्नार्थक मूद्रेने पाहत विचारले.

" हा चेबंर ऑफ ईस्केप बनवणाऱ्या राजमैस्तरीनी सर्वात प्रथम श्वास कोडंण्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी व हवा खेळती ठेवण्यासाठी दूसरा एखादा मार्ग नक्कीच बनवला असेल "
बऱ्याच निरीक्षणाअंती जँकच्या डोक्यात हा विचार आला होता.

" अगदी बरोबर जँक
आपण सर्वानी पून्हा एकदा ईथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत "
रॉनने लगबगीने आजूबाजूला पाहीलं.

" एक मिनीटं रॉन तू या रूमच्या भीतीचं निट निरीक्षण केलंस
निट बघ ती समोरची बर्फाळ भीतं ईतर तीन्ही भींतीपेक्षा थोडी वेगळी आहे "

" हो रे जँक हे तर माझ्या लक्षातच आलं नाही "
जँकने कल्पना दिल्यावर रॉनने समोरच्या भींतीकडे लक्षपूर्वक पाहीलं.

" बार्बोसाचे राज्य आफ्रीकेच्या पच्छीम दिशेला होतं बरोबर "
जँकने विल्यमच्या चेहऱ्याकडे बघत त्याला विचारलं.

" म्हणजे पच्छीमेकडील भीतं "
विल्यमने पूसटसा तर्क लावला.

" हो अगदी बरोबर विल्यम "
जँक एकाएकी ऊठून पून्हां त्या बर्फाळ भींतीजवळ गेला व त्याने पून्हा एकदा त्या भीतीचं निट लक्षपूर्वक बारकाईने निरीक्षण केलं.

" हे खरोखरच एवढं सोपं असेल "
जँकला नक्कीच काहीतरी गवसलं होतं तो ऊत्साहाने ओरडला.

" काय ?"
रॉनने जँकच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहत त्याला विचारलं.

" हे बघ "
जँकने त्या भींतीला हाताने हलकासा धक्का दिला आणी बघता बघता ती बर्फाळ भींत काही अंशी थोडी मागे सरकून खचली गेली.

" यस व्ही गॉट ईट रॉन
आपल्याला या चेबंर ऑफ ईस्केपमधून अखेर ईस्केप मिळवण्याचा मार्ग मिळालाच
सर्वानी लवकरात लवकर ईथे या आणी एकञच या भींतीला बाहेरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करा "
जँकचा ऊत्साह पाहून सर्वजण तप्तरतेने त्या बर्फाळ भींतीला ढकलण्यासाठी पूढे सरसावले. सर्वानी एकञ जोर लावताच एक मोठा आवाज झाला व त्या भीतींची आतीली बाजू गोल फिरून सर्वाना बाहेरच्या दिशेने घेऊन गेली. आणी मग पून्हा क्षणार्धात ती भीतं पूर्ववतही झाली.

" जँक लवकर बघ "
जँकला हाक मारताना ज्युलीच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी ऊत्साह फूलून आला होता.

एलीजाबेथने पेटती मशाल सर्वापूढे धरली आणी मग एकाच वेळी प्रत्येकाच्या नजरा द ग्रेट एम्पायर कीगं ऑफ बार्बोसाच्या अदृश्य खजाण्यावर पडल्या.

" ईट ईज अनबिलीवेबल यार "
खजाण्यातील ऐवजे पाहून रॉन स्तंभीत झाला होता.

" व्ही गॉट ईट गाईज,
मी एखादं स्वप्न तर पाहत नाही ना
आपण सर्वजण कीगं बार्बोसाच्या दिव्य खजाण्यापूढे ऊभे आहोत "
जँकला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. त्याचे डोळे आतीव आनंदाने भरून आले होते. त्यांने हात ऊंचावून एक अवीरत झेप घेतली.

" तू यशस्वी झालास जँक
आपल्या वडीळांच्या नजरेत तू त्यांच नाव रोशन केलंस.
तू ते शोधलसं ज्यासाठी तूझ्या वडीलांनी त्यांच आख्ख आयूष्य खर्ची केलं.
जर ते या क्षणी ईथे असते तर त्यांनी नक्कीच तूझ्या पाठीवर अभीमानाची थाप दिली असती "
कँप्टन स्मीथनी जँकच्या यशाची मनोभावे प्रशंसा केली.

त्या अदृश्य खजाण्याच्या दर्शनाने सर्वाच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी समाधान पसरले होते.
हजारो-लक्ष सोन्याच्या मूद्रा, ताब्यां , चांदीची नक्षीदार भांडी, हिऱ्या-मोत्यानी सजवलेले रत्नजडीत हार कारागीरानी घडवलेल्या लक्षवेधक मूर्त्या आणी ईतर अनेक मैल्यवान वस्तूचां समावेश त्या खजाण्यात करण्यात आला होता. एका भरभराटीस आलेल्या संतूष्ट राज्याची संस्कृती त्या दिव्य खजाण्याची साक्षीदार होती. हजारो वर्षापासून लूप्त खजाण्याचा शोध लावून त्याला जगापूढे आणन्याचं मैल्यवान काम त्या मंडळीनी पूर्णत्वास आणले होते.

" जँक या खजाण्याचा सैदा करण्यास आता काही हरकत नाही "
विल्यमने संधी मिळताच डोळे मिचकावत जँकच्या चेहऱ्याकडे पाहून म्हटले.

" म्हणजे "

" म्हणजे आपलं काय ठरलं होतं ?
या खजाण्यातील नव्वद टक्के हिस्सा माझा असेल आणी बाकीचा तूम्ही घ्या "

" काय ?
विल्यम तू या मैल्यवान खजाण्याचा सैदा करायला निघाला आहेस.
आम्ही असं होऊ देणार नाही.
हा खजाणा राष्ट्राच्या मालकीचा आहे.
यातील ऐवज राष्ट्रातील गोरगरीबांच्या कल्याण्यासाठी वापरण्यात येईल. कीगं बार्बोसानेदेखील प्रजेच्या विकासासाठी फ्रान्सीस्कोच्या लूटारूपासून हा खजाणा सूरक्षीत ठेवला होता "
कँप्टन स्मीथनी विल्यमला समजावण्याचा निरर्थक प्रयत्न केला.

" तूम्ही सर्वजण मूर्ख आहात
समोर आलेल्या खजाण्याला तूम्ही नाकारत आहात "
विल्यम जँककडे पाहत हसून म्हणाला

" विल्यम तू काहीही केलसं तरी मी हा दिव्य खजाणा तूझ्या पापी हाती लागू देणार नाही "
जँक विल्यमवर रागाने ओरडला.

" तूम्ही सर्वानी मला फसवलत जर हा खजाणा माझा होऊ शकत नाही तर मी कोणाचाच होऊ देणार नाही "
विल्यमने रागाने गूहेत मीळालेली बार्बोसाची रत्नजडीत तलवार बाहेर काढली आणी एकाएकी जँकवर धावून गेला.

" विल्यम मूर्खपणा करू नकोस. हे करून तूला काहीच साध्य होणार नाही "
कँप्टन स्मीथनी विल्यमला अडवण्याचा निरर्थक प्रयत्न केला.
ते एकमेकांसोबत भांडत असताना अचानकच एक मोठा आवाज झाला जणू काही हजारो-लाखो वर्षापासून एखाद्या धीरगंभीर तत्ववेत्याप्रमाणे शांत, अचल भासणाऱ्या भूमीचा एकाएकी कंप पाऊन अतं जवळ आला असावा. ती संपूर्ण गूहा क्षणार्धात दणदणू लागली.
त्या गूहेच्या चारही कोपऱ्यातील जूनाड खडक फूटून त्यातून पाण्याचे झरे मूक्त झाले. बघता बघता पाण्याच्या पातळीत वाढ होऊन एक महाकाय बर्फाचा तूकडा त्यात कोसळला आणी सर्वाची एकच धावपळ ऊडाली.
वरून बर्फाचे मोठमोठे गोळे खाली पडून त्या पाण्यावर तरंगत होते.

" सर्वानी लवकरात लवकर या गूहेतून बाहेर पडा "
जँकने सर्वाना ओरडून सांगीतले व त्याने चेबंर ऑफ ईस्कोपच्या दिशेने धाव घेतली.

" हा ईथून बाहेर पडायचा मार्ग आहे "
रॉनसोबत जँकच्या ईशाऱ्याने सर्वजण त्याच्या मागे धावले.

तेवढ्यात लहानग्या कॉर्नरला घेऊन लूसी जँकपर्यतं पोहोचली. मग सर्वानी एकञ जोर लावून त्या चेबंरमधील बर्फाळ भीतींला आतल्या बाजूने ढकळलं त्याबरोबर ती भीतं गोल फिरून सर्वाना आत घेऊन गेली.

" शू.... वाचलो एकदाचे "
ज्युलीने धापा टाकत एक दिर्घ श्वास घेतला.

" नाही ज्युली थोड्याच वेळात वरील भेगा पडलेले बर्फ विरघळून या रूममध्ये पाणी भरेल आपल्याला लवकरात लवकर ईथून बाहेर पडायला हवं "
जँक बोलत असतानाच त्यांच्या रूममधील बंद दरवाजावर अडून राहीलेली बर्फाळ भीतं एकाएकी तूटून ऊध्वस्त झाली. त्यामूळे त्यांना बाहेर पडण्यासाठी आता आयताच मार्ग मीळाला होता.

" सर्वानी या चेबंरमधून बाहेर पडा काही क्षणातच ही खोली तूटून ऊध्वस्त होईल. व पलीकडील भूयारात साचलेलं पाणी ईथे येईल. आपल्याला बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर वरील फरगॉटन पॉलच्या गूप्त गूहेत प्रवेश करायला हवा "
कँप्टन स्मीथनी घाईघाईने सर्वाना ओरडून योग्य त्या सूचना दिल्या.

" पण कँप्टन आपण आता वरती कसे काय जाणार ?
सर्व सीड्या तर तूटून नष्ट झाल्या आहेत "

" आपल्याला विल्यमने आणलेल्या या लाकडी बॉक्समध्ये बसून वरच्या दिशेने जायचं आहे. सर्वानी ताबडतोब या बॉक्समध्ये येऊन ऊभे रहा
स्मीथ त्या बॉक्सकडे ईशारा करून बोलत असताना अचानकच बर्फाचा एक विशाल गोळा त्या बॉक्सवर येऊन पडला. त्यामूळे वरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग आता त्यांच्यासाठी बंद झाला होता

अखेर एवढ्या अडचणीचा सामना करून ते कसेबसे तीथपर्यतं पोहोचले होते. पण आता बाहेर पडण्यासाठी काहीच अंतर बाकी असताना त्यांना माघार घ्यावी लागत होती.

" आपल्याला प्रयत्न करण्यात काय हरकत आहे आपण या तूटलेल्या सीड्याचा आधार घेत वरती चढलो तर "
जँकने रॉनच्या प्रश्नार्थक मूद्रेकडे पाहत म्हटले

" नाही हे शक्य नाही जँक घळीचं तोडं खूपच दूर आहे. आपण पाण्यातून पोहत वरती जातानाच स्वतःचा जीव गमावून बसू आता घळीतून बाहेर पडायचा कोणताच मार्ग नाही "
कँप्टन स्मीथच्या या वक्तव्यावर माञ सर्वजण शांत झाले. प्रत्येकाला स्वतःचं मरण बघवणार नव्हतं. पण त्यापूढे आता काही ईलाजही नव्हता. फक्त काही क्षणाचाचं अवधी मग ते सर्वच त्या अथांग घळीमध्ये भरणाऱ्या पाण्यात जलमग्न होऊन घळीच्या तळाशी जाणार होते.

" हे बघ जँक जीवन आणी मृत्यूवर कोणाचाच अधीकार नसतो.
तू लूसीला वाचवण्याचे प्रयत्न केलेस.
तू आम्हा सर्वाणानाच वाचवण्याचे प्रयत्न केलेस.
आता थोड्याच वेळात ही भीतं तूटुन पाणी या घळीमध्ये येईल आणी आपण पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून जाऊ "
कँप्टन स्मीथनी जँकच्या उदास चेहऱ्याकडे पाहत म्हटले.

" जँक आता आपण काय करायचं ?"

" एक मार्ग आहे "
जँकच्या मनात नक्कीच काहीतरी भन्नाट कल्पना येत होती.

" काय ?"
रॉनने जँकच्या शोधक नजरेकडे पाहत त्याला विचारले

" जर समोरून येणाऱ्या पाण्याला आपण गती दिली तर ?"

" म्हणजे "

" म्हणजे समोरून वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा प्रेशर प्रती मीटर दीडशे दोनशेच्या आसपास असायला हवा तरच पाण्याची घनता काही अंशी वाढेल. एकदा का पाण्याचा दाब वाढला की ही घळी भरत जाऊन पाण्याचा फोर्स आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जाईल.

" यू आर जीनीअस जँक
तूला हे नक्की सूचतं तरी कसं "

" पण पाण्याचा प्रेशर ईतक्या मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकतो का ?"

" नक्कीच आपल्याला प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे
त्यासाठी आपल्याला चेबंर ऑफ ईस्केपचा ऊघडा दरवाजा गोठलेल्या बर्फाच्या साहाय्याने बंद करावा लागेल. मग ती खोली पाण्याने पूर्णपणे भरल्यावर पाणी बाहेर पडण्यास जागाच ऊरणार नाही. तसे झाल्यास दरवाजावर लावलेल्या बर्फाची भीतं फोडून पाणी वेगाने बाहेर येईल व आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जाईल

" आणी जर असे नाही झाले तर "

" तर माञ आपला मृत्यू निच्छीत आहे आपण पाण्यात गूदमरून स्वतःचा जीव गमावून बसू "

" हे खूपच भयंकर आहे जँक "

" आता दूसरा कोणताच पर्याय नाही "

अखेर सर्वानी विचारपूर्वक निर्णय घेतला व त्या खोलीचा ऊघडा दरवाजा बर्फाच्या सहाय्याने बदं करण्यासाठी कँप्टन स्मीथ, विल्यम, रॉन व जँक पूढे सरसावले
एक मोठा बर्फाचा गोठलेला तूकडा त्या चैघांनीही एकञ ऊचलून चेबंर ऑफ ईस्केपच्या ऊघड्या दरवाजावर ठेवला. त्यामूळे तीथे जमा होणाऱ्या पाण्यावर अतीऊच्च प्रेशर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

" आपला प्लान खरंच यशस्वी होईल का जँक ?"

" सध्यातरी काहीच सांगता येणार नाही "

ते एकमेकांसोबत बोलत असताना अचानकच एक मोठा आवाज झाला आणी त्या चेबंरमधील गोल फिरणारी भीतं एकाएकी तूटून ऊद्धस्त झाली.

" सर्वानी सावध व्हा व एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवा "
कँप्टन स्मीथ मोठ्याने ओरडले. आणी बघता बघता पाण्याचा वेगवान प्रवाह दरवाज्यावरील गोठलेले बर्फ तोडून बाहेरच्या घळीमध्ये पोहोचला.
पाण्याच्या थंडगार फवाऱ्याने सगळेच गारठले होते.

" या घळीमध्ये पाणी भरायच्या आगोदरच आपल्याला ईकडून निघायला हवं "

" त्या रूममधून येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरपासून दूर व्हा आणी प्रत्येकाने वरच्या दिशेने पोहायला सूरवात करा जर चूकून खाली राहीलत तर पाण्याच्या कचाट्यात अडकून वाहत जाल "
कँप्टन स्मीथ पून्हा मोठ्याने ओरडले.

" सर्वानी एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवा
थोड्याच वेळात ही संपूर्ण घळी पाण्याने भरून जाईल "
जँकने प्रत्येकाला मोठ्याने ओरडून सांगीतले.
पाण्यातील प्रवाहात वाहून जाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वानी एकमेकांनाचे हात घट्ट पकडून ठेवले होते. आणी काही क्षणातच घळीमधील पाणी कंबरेर्यतं भरंल व सर्वाच्या तोडांत पाणी शीरू लागलं.
खालून वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरमूळे सर्वजण वरच्या दिशेने फेकले जात होते. आणी बघता बघता ती संपूर्ण घळी पाण्याने व्यापून गेली. तळाकडे जाण्यापासून स्वतःला सावरण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना कसंबस पकडून ठेवलं होतं.
" या घळीमध्ये पाणी भरायच्या आगोदरच आपल्याला ईकडून निघायला हवं "
जँक सर्वाना ओरडून समजावत असतानाच चेबंर ऑफ ईस्केपची दरवाजाकडील मोठी भीतं संपूर्णपणे तूटली गेली व पाण्याचा एक मोठा लोढां ऊसळत वरती आला आणी सर्वाना घळीबाहेर घेऊन गेला.
जँकच्या तोडांत पाणी शीरलं होतं. त्याच्या बाजूलाच कँप्टन स्मीथ, विल्यम, एलीजाबेथ व नार्गो शूद्धीवर येऊन एकमेकांना सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
जँकने रॉनची नाडी तपासून पाहीली. सूदैवाने त्याची श्वसनक्रीया अद्ययावत सूरू होती.
लूसीनी व लहानग्या कॉर्नरनी सात-आठ जोराचे हूदंके देताच ज्युलीच्या शरीरात शीरलेले पाणी तोडांमार्फत बाहेर पडले. प्राणवायूच्या कमतरतेमूळे तीची शूद्ध हरपली होती. रॉकीही खोकतच कसाबसा जीवंत होता. त्याची स्पदंने वाढू लागली व एकाएकी तो भानावर आला.

" प्रत्येकाने माझ्यामागून लवकरात लवकर फरगॉटन पॉलच्या चैकोनी भूयारात या "
रॉन शूद्धीवर येताच मोठ्याने ओरडला
लगेचच सर्वजण रॉनपाठोपाठ फरगॉटन पॉलमधील गूप्त भूयारात शीरले.
अखेर पाण्याच्या जबरदस्त प्रेशरमूळे ऐव्हाना पाणी घळीबाहेर पडून त्या गूप्त भूयारात शीरू लागले होते.

" वरती,...या गूहेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वरच्या दिशेने जावं लागेल "
कँप्टन स्मीथ पून्हा मोठ्याने ओरडले.

" जँक ईथे पाणी भरायच्या अगोदरच लवकरात लवकर या भूयारामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेला वरचा बंद दरवाजा ऊघड व स्वतः बाहेर पडून सर्वाना वरती घे "
रॉन मोठ्याने ओरडला.

फरगॉटन पॉलचा संपूर्ण भूयार आता पाण्याने भरत आला होता. फक्त श्वास घेण्यासाठी कींचीतशी जागाच काय ती वरच्या भागात शील्लक होती.
अखेर रॉनने फार वेळ न घालवता वरच्या दिशेने असलेला त्या भूयाराचा बंद दरवाजा ऊघडण्यासाठी वरती वेगाने झेप घेतली. त्याला काहीच स्पस्ट दिसत नव्हतं. तो हतबल झाला होता. त्याच्या तोडांत वेगाने पाणी शीरू लागलं होतं. ते सर्वजण काही क्षणातच बूडून मरणार होते.
एव्हांना ते संपूर्ण भूयार पाण्याने व्यापलं गेलं. आणी त्या दरवाजाच्या वरच्या फटीतून पाणी बाहेर जाण्यास सूरूवात झाली. जँकही आतून मोठमोठे हूंदके देत वरील बदं दरवाजा तोडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला विल्यमजवळ असलेल्या बार्बोसाच्या रत्नजडीत तलवारीची आठवण झाली. त्याच तलवारीचा वापर करून त्याने फरगॉटन पॉलमधील भूयाराचा बंद दरवाजा ऊघडला होता. जँकने लगेचच विल्यमकडून ती रत्नजडीत तलवार घेतली व त्या बंद दरवाजामधील छोट्याशा फटीत अडकवली. पण त्या भूयारात झपाट्याने शीरणाऱ्या पण्याच्या तूलनेत त्या छोट्याशा फटीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.
खूप वेळ पाण्यात बूडून राहील्यामूळे त्यांच्या शरीरातील स्नांयूचा आकार वाढत जात होता. त्यांची शूद्ध हरपत होती.
अखेर रॉकीने शेवटचा प्रयत्न म्हणून पून्हा एकदा वरील बदं दरवाज्याच्या दिशेने झेप घेतली आणी केवळ दैवाने साथ द्यावी तशी त्या भूयारामधील एका कोपऱ्यात जँकच्या हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारी तलवार त्याच्या नजरेत आली. ती तलवार पाण्याबरोबर पूढे वाहत जात असतानाच रॉकीने तलवारीच्या दिशेने हात केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती तलवार वाहत आणखीनच पूढे गेली.
पण कदाचीत त्याच्या अांतरीक ईच्छाशक्तीने अजूनही हार मानली नसावी. नकळतच त्याचे दोन्ही हात तलवारीच्या दिशेने झेपावत होते. काही क्षणातच त्याने ती तलवार ऊजव्या हाताच्या मूठीत घट्ट पकडली. पण त्या तलवारीवर दाब देऊन तो बंद दरवाजा ऊघडण्याचे प्राणही त्याच्या कमजोर बाहूत आता ऊरले नव्हते.
तेवढ्यात भूयारातील पाण्यामध्ये गूदमरून बेशूद्ध झालेल्या लहानग्या कॉर्नरच्या हाताचा हलकासा स्पर्श रॉकीच्या हाताला झाला आणी त्याची कीचीतंशी हालचाल झाली. ती एक हालचालच त्या सर्वाचा जीव वाचवण्यासाठी निमीत्त ठरली होती. कारण त्या छोट्याशा स्पर्शामूळेच रॉकीचा हात नकळतच ऊजवीकडे फिरला गेला व त्याबरोबरच त्याच्या हातातील तलवारीवर जोर पडून भूयारातील बंद दरवाजा अचानक ऊघडला गेला आणी एकाएकी पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहत ते सर्वजण एकञच त्या भूयाराच्या ऊघड्या दरवाजातून वरती आली.
रॉकीच्या तोडांत पाणी शीरलं होतं. त्याच्या बाजूलाच कँप्टन स्मीथ, विल्यम, एलीजाबेथ व नार्गो शूद्धीवर येऊन एकमेकांना सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
रॉकीनेने जँकची नाडी तपासून पाहीली. सूदैवाने त्याची श्वसनक्रीया अद्ययावत सूरू होती.
लूसीनी व लहानग्या कॉर्नरनी सात-आठ जोराचे हूदंके देताच ज्युलीच्या शरीरात शीरलेले पाणी तोडांमार्फत बाहेर पडले. प्राणवायूच्या कमतरतेमूळे तीची शूद्ध हरपली होती. रॉनही खोकतच कसाबसा जीवंत होता. त्याची स्पदंने वाढू लागली व एकाएकी तो भानावर आला.

" अरे वेब कूठे आहे तो तर तूझ्या सोबतच होता ना "
ज्युलीने विल्यमकडे पाहत त्याला विचारले.

" त्याचा पाय खाली भूयारातील एका बर्फाच्या तूकड्याखाली अडकला होता........जँक चल लवकर वेब अजूनही तीथेच आहे. त्याला लवकरात लवकर पाण्यामधून बाहेर काढायला हवं "
रॉन कसाबसा धापा टाकत बोलत होता.
त्याने पून्हा एक दीर्घ श्वास घेतला व जँकसोबत पाण्यात मूसंडी मारली. आणी काही मिनीटातच त्या दोघांनीही वेबला पाण्याबाहेर आणलं.
त्याचं शरीर निस्तेज झालं होतं. स्पदंने थांबली होती. रॉन त्याच्या छातीवर जोरजोरात हूंदके देत त्याला शूद्धीवर आणण्याचा अतोनात प्रयत्न करत होता.
परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही एव्हांना त्याने प्राण सोडला होता. त्याचा निस्तेज देह पाण्यावर अधांतरी तरंगत होता. खरंतर विल्यमसोबतच्या वाईट संगतीचचं त्याला प्रायचीत मिळालं होतं.
पूढ्यात दिसणारा वेबचा निस्तेज देह पाहून सर्वच हादरून गेले होते. काहीच वेळापूर्वी त्यांच्या सोबत असलेल्या वेबचा पाण्यात बूडून मृत्यू झाला होता.
गूहेतील एका कोपऱ्यात एलीजाबेथ स्मीथच्या खांद्याला पकडून सहानभूती मीळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.
अखेर वेबचा मृतदेह तीथेच पाण्यात सोडून ते सर्वजण पूढे नीघून गेले.
त्या सर्वानाच आता विश्रांतीची अतोनात गरज होती.
केवल नशीबानेच त्यांची पाण्याने भरलेल्या प्रचंढ घळीतून सूटका झाली होती. खरंतर रॉकीने त्यांचा जीव वाचवला होता.
अखेर फार वेळ न घालवता त्या सर्वानी ऊध्वस्त झालेल्या गूप्त गूहेमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला.
मग हळूहळू पायाखाली साचलेले बर्फ तूडवत थोड्याच वेळात ती मडंळी बेटाच्या पायथ्याशी पोहोचली.
एव्हाना आलेलं मोठं वादळ पूर्णपणे क्षमलं होतं. आणी नैदलाची जहाजं त्या बेटावरील कीनाऱ्यापर्यतं येऊन धडकली होती.
ईनेस्पँक्टर रसेल व काही नैदल अधीकारी बर्फात अडकून राहीलेल्या आदीवास्याना बाहेर काढण्यासाठी धडपडत होते.
एका ईसमाने पायावरील मोठा बर्फाचा गोळा सरकवून त्याचा जखमी पाय कसाबसा मोकळा केला. त्याच्या समोरच एक जण बर्फातील लहानश्या घळीमधून बाहेर पडण्यासाठी आतीव वेदनेने कींचाळत होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांने जीव सोडला.
त्याच्या बाजूलाच एक स्ञी मरून पडली होती.
जँक व त्याच्या मिञाना पाहताच अर्जेन्टीना नैदलाचे चीफ कमांडर स्टीफन क्लार्क व ईनेस्पेक्टर रसेल पूढे सरसावले.

" वेलकम मीस्टर जँक फ्लेचर
वेलकम कँप्टन स्मीथ
आय एँम प्राऊड ऑफ यू "
कमाडंर ऑफ नेव्हीने त्या दोघांशी हस्तादोंलन केले.

" आम्हाला तूमच्या डीस्कवरी जहाजाचे जी.पी.एस. सीग्नल मीळाले होते. त्यामूळेच आम्ही ताबडतोब सी. एम. ए. च्या मूख्य ब्रान्चशी संपर्क साधू शकलो. आम्हांला मिळालेल्या माहीतीनूसार तूमचे जहाज दक्षिण अमेरीकेच्या आसपासच कूठेकरी असायला हवं होतं. त्याच तर्काच्या आधारे आम्ही नैदलाच्या मदतीने ईथपर्यतं येऊन पोहोचलो "
स्टीफन क्लार्कनी कँप्टन स्मीथना घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण दिले.

" विल्यमच्या स्मग्लीग बीजनेसबद्धल आम्हालाही अगोदरच खबर लागली होती. तोही याच जहाजातून प्रवास करत आहे म्हटल्यावर माञ आम्हालाही ईथे येणं भाग होतं.
विल्यम हिलरी तूमच्या विरूद्ध आम्हाला अटक वॉरटं मिळालं आहे. अमली पदार्थाची स्मग्लीग करण्याबाबत व ट्रेजर हंटीग एजंसीचे गूप्त पूरावे मिळवण्याच्या आरोपाखाली आम्ही तूम्हांला अटक करत आहोत "
ईनेस्पँक्टर रसेलनी नजर चोरत ऊभ्या असलेल्या विल्यमकडे पाहून म्हटले.

" नाही तूम्ही मला कधीच अटक करू शकणार नाही.
रसेल तू हेड कमीशनर रेगन लीलीला फोन लाव "
शक्य तेवढा आवाज स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करत विल्यम ईनेस्पँक्टर रसेलवर खेकसला.

" त्याचा काहीच फायदा होणार नाही. विल्यम तूझी वरपर्यतं असलेली ओळख आता काहीच कामी येणार नाही
मँडमनी स्वतःच तूमच्याविरूद्ध अटक वॉरटं काढले आहे "

" साली पैसे खाऊन पण माझ्यावरच ऊलटा आरोप करते काय तीला नंतर बघतो "
विल्यम स्वतःशीच पूटपूटला

" पण रसेल हा खजाणा शोधण्यामध्ये माझाही तेवढाच महत्वाचा सहभाग आहे. त्यामूळे ह्या खजाण्यातील अर्धा हिस्सा माझ्याच वाट्याला यायला हवा "
विल्यमने पोलीसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अखेर खजाण्याचा विषय पूढे केला.

" नाही विल्यम तूम्हांला यातील कोणताच हीस्सा मीळणार नाही.
ईट ईज नँशनल ट्रेजर
हा बार्बोसाच्या राज्यातील लोकांचा खजाणा होता. त्यामूळे हा राष्ट्राच्या मालकीचा आहे
काहीच दिवसात पूरातन वस्तू संशोधन खात्या अंतर्गत हा खजाणा बार्बोसाच्या गूप्त गूहेतून बाहेर काढण्यात येईल व राष्ट्रीय खजाण्यात याचा समावेश करण्यात येईल "
ईनेस्पँक्टर रसेलनी विल्यमला स्पष्टीकरण दिले व त्याला आणखीन काही बोलण्याची संधी न देताच त्याच्या हाताला बेड्या ठोकल्या.

" जँक तूम्हांला कोणतचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आम्हाला विल्यम व त्याच्या स्मग्लीगच्या बिजनेसबद्धल सर्वकाही समजलं आहे शीवाय डीटेक्टीव्ह रॉन वॉल्टनही तूमच्यासोबत होताच "
ईनेस्पँक्टर रसेलनी रॉनकडे विश्वासक नजर टाकली. आणी सर्वाना शूभेच्या देऊन ते बर्फाच्या घळीत अडकलेल्या आदीवास्याची मदत करण्यासाठी पूढे सरसावले.
चार-पाच दिवसांच्या शोधकार्यानंतर सर्वजण खूपच थकले होते. अखेर परतीच्या प्रवासासाठी सर्वानी तयारी केली व थोड्याच वेळात नार्गोला निरोप देऊन नैदलाच्या जहाजांनी त्या बेटाचा किनारा सोडला व सूदूर ऊत्तरेच्या दिशेने अर्जेन्टीनाच्या किनाऱ्याकडे वाटचाल सूरू केली. नार्गो व त्या बेटारील आदीवासी जहाजाच्या ताफ्याकडे खूप वेळ एकटक नजर लाऊन ऊभे होते. अखेर त्यांच्या डोळ्यादेखत समूद्राच्या क्षीतीज समांतर रेषेत ती जहाजे नाहीसी झाली.
त्या अदृश्य खजाण्याच्या शोधकार्यात सहभागी झाल्यामूळे सर्वाच्याच चेहऱ्यावर एक तेजस्वी समाधान पसरले होते.
ते सर्वजण एकमेकांसोबत बोलत असतानाच अचानक वाऱ्याची एक थंडगार लहर सर्वाना गारठवून गेली.
आणी एका ऊंच बेटामागे हळूहळू सूर्याचा अस्त होऊ लागला. त्याची अवीरत किरणं क्षणभरासाठी सर्वाचे डोळे दिपवून गेली.
आज खूप दिवसांनी जँकला त्याचं शरीर थोडं हलकं वाटत होतं. त्याचा थकवा तर कूठच्याकूठे दूर पळून गेला होता. ऊघड्या खिडकीतून येणाऱ्या धूक्यानी त्याचे डोळे पाणावले होते.
शीवाय त्याची झोपही व्यवस्थीत पूर्ण झाली होती. जणू काही मागील दोन तीन दिवसात त्याच्यासोबत काहीच महत्वाचं घडलं नाही अशा अवीर्भावात तो डेकवर ऊठून गेला.
ज्युलीतर त्याच्या अगोदरच जागी होऊन डेकवर हवा खात बसली होती. रूणझूणत येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श होताच तीचे लाबंलचक काळेभोर केस गोऱ्यापान चेहऱ्यावर विखूरले जात होते. आणी मग त्यावर कानातील गोलाकार रीगंणाची झगमगत हालचाल होत होती.
तो अथांग, अमर्याद पसरलेला, शांत, धीरगंभीर एखाद्या तत्ववेत्याप्रमाणे भासणारा विशाल जलसमूदाय आणी त्यात अवघ्या सागर भूमीवर कर्तूत्व गाजवून आपली बिरादारी मीरवणारं ते भव्य जहाज.
नैदलातील त्या विशाल जहाजाच्या भव्यतेकडे पाहता पाहता नकळतच जँकची नजर खाली पाण्याकडे गेली.
त्याने पाहीले
त्याच्या आयूष्यातील सर्वात मोठा पराक्रम करून तो यशाच्या शीखराकडे मार्गक्रमण करत होता.

समाप्त..................

भाग १६ साठी
http//www.maayboli.com//node//62352

कथेतील सर्व भाग वाचण्यासाठी शब्दखुणांचा वापर करावा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व भाग वाचले, कथा छान आहे पण बरेचसे प्रसंग "किंग काँग", "नँशनल ट्रेजर", "पायरेट्स ऑफ कँरिबिअन" मधून जसेच्या तसे घेतले आहेत हे समजतय.