भाग १ -
http://www.maayboli.com/node/62798
भाग १ पासून पुढे -
..................................................................
बसा मि. सागर..
डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना?
काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे...
आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल..
हो डॉक्टर..
दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी..
.............................................................
संध्याकाळी ६ वा..
(सागर व कविता गार्डनमधे...)
सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना?
होय.. अहो तुम्हाला आठवतय? तुम्ही मला बघायला आला होतात, ती सायंकाळपण अशीच होती ना?
हो, आणि हे ही आठवतय की त्या संध्याकाळी सासूबाईनी आम्हाला मिठाचा चहा पाजवला होता..
प्रत्येक गोष्ट गमतीत कशी ओ घेता तुम्ही!..
सॉरी सॉरी, तुझं चालुदेत पुढे..
गप्प बसा..आता मला नाही त्यात इंट्रेस्ट..
बरं बाई, राहुदे...
अहो, ऐका ना.. तुम्हाला मुलगा हवाय की मुलगी?
माझं सोड, तुला काय हवयं?
मला तर एक सुंदर मुलगा हवाय तुमच्यासारखा. सतत माझ्या खोडी काढणारा, आणि तुम्हाला पण एक जोडीदार मिळेल ना माझा जीव खायायला..
हो ते तर आहेच... पण मला आधी मुलगीच हवी..
अहो असं काय बोलताय? तुम्हाला मुलं नाहीत का अवडतं?..
अगं तसं नाही.. बहुतेक तुला माझं बोलण काळाल नाही..
मग सांगा ना, काय भानगड आहे..
'भानगड'.... अगं भानगडं वगैरे काही नाही.. मला फक्त माझं वचन पाळायचं आहे..
कसलं ओ वचन?.. आणि कोणाला वचन दिलत तुम्ही?..
स्वतःला..
अहो तुमच हे बोलणं माझ्या डोक्यावरून चाललंय.. जरा नीट काय ते सांगा ना..
कविता, तुला आठवतंय? लग्नाआधी आपल्या घरच्यांनी आपल्याला बागेत पाठवलं होतं.. ओळख वाढवण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी..
अहो, मी कसं विसरु शकते तो क्षण.. आपली अशी एकांतात ती पहिलीच भेट होती..
तुला आठवतंय का गं? मी तुला त्या भेटीत काय म्हणालो होतो ते..
हो आठवतंय ना.. तुम्ही म्हटला होतात की -
"शांती आता आपली दोन वेगवेगळी मनं एकत्र येणार आहेत.. मला वाटतं की आपण एकमेकांना आपल्या आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या गोष्टी
सांगून या नात्याची सुरुवात करावी.."
अरे व्वा..!!
तुला अजून सगळं आठवण आहे?
हो, म्हणजे तुम्ही विसरलात ना?
नाही गं.. कसं विसरेन, अगदी निरागसपणे सगळं सांगून टाकलसं तु.. आणि तुझे ते बोल ऐकून, मला माझं आयुष्य पूर्णपणे सांगताच आलं नाही अगं..
मग त्यात काय एवढं? अत्ता सांगा ना..
.................
एक मुलगी होती माझ्या आयुष्यात..
कॉलेजमधे ओळख झाली आमची, हळूहळू मैत्री वाढली.. आणि ती इतकी वाढली, की कॉलेजमधे सगळे आमचं नाव जोडत होते.. मला हे सगळं फक्त एक गम्मत वाटत होती..
एक दिवशी ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली-
"सगळे आपलं नाव जोडू लागले आहेत, आता पुढे काय करायचं?"
अगं काय करायचं म्हणजे काय? आज बोलताहेत उद्या विसरून जातील...
"म्हणजे आपल्यात खरचं काही नाहीये का?"
त्यावेळी मी फक्त मान हलवून नाही म्हटलं...
ती निघून गेली..
अगदी कायमची...
मी रात्रभर तिचं बोलणं बरडत होतो, स्वतःला प्रश्न विचारत होतो.. आणि शेवटी उत्तर मिळालं..
बास्स यार, आपल्याला हीच आवडते..
मी ठरवलं आत्ता तिला भेटायचं, आणि आपल्या मनातील तिच्यासाठी असणारी भावना तिला सांगायची...
मी तीची वाट पाहिली.. १ दिवस, १ महीना, वर्ष..
फोन ट्राय केला..
रोज वाटायचं ती आज येइल, आज येइल.. नाही आली तर फोनतरी करेलच..
पण म्हणतात ना.. कि गेलेली वेळ आणि हरलेलं प्रेम कधी परत येत नाही..
.....................................................................
अहो, त्या मुळीच नावं काय होतं?
कोमल..
गेलेली वेळ जरी परत येत नसली, तरी कोमल येइल परत... तुमच्यासाठी... ह्यावेळी तुमची मुलगी होवून..
म्हणजे?
आपणाला जर मुलगी झाली ना, तर आपण तीचं नाव कोमल ठेवु..
म्हणजे?.... मी इतकी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली, तरी तु माझ्यासाठी
तुमच्यासाठी? नाही ओ, हे सगळं मी माझ्यासाठीच तर करत आहे.. तुम्हाला काय वाटतं, मला याबद्दल काहीच भनक नव्हती?..
आपली पहीली भेट आठवते?.. तुम्ही मला काही सांगितलं नाही,
कारण मी तुम्हाला काही सांगुच दिलं नाही... वेड्यासारखी बडबडत होते.. कारण मला माहीत होतं, की आज जर हा प्रेमाचा बांध तुटला आणि सगळ्या भावना माझ्या समोर मांडल्या, तर आपला बांध कधीच जुळू शकणार नाही...
(सागर गुडघ्यावर बसतो.. आणि कविताला घट्ट मिठी मारतो...)
मला माफ कर कवीता.. मला माफ कर...
उठा सागर... माझ्यासाठी नाही तर आपल्या बाळासाठी, कोमलसाठी उठा...
कविता मी तुझ्यावर खुप
अहो माहितीये ओ मला... आणि मीही तुमच्यावर खूप खूप प्रेम करते...
तु खुश आहेस ना गं?
(अरे वेड्या, याच क्षणासाठी तर मी जगत आहे....)
.....................................................................
(समाप्त...)
पहिल्या भागातच अंदाज आला होता
पहिल्या भागातच अंदाज आला होता...सुंदर विषय घेऊन लिहीलेली सुंदर कथा, एवढंच बोलेन..
ज्यांनी कोणी शाळा, कॉलेजमध्ये असताना प्रेम केलंय अशा जवळपास सगळ्यांमध्ये काही गोष्टी इतक्या common असतात की दुसर्यांची story आपलीच वाटते..
<<<सुंदर विषय घेऊन लिहीलेली
<<<सुंदर विषय घेऊन लिहीलेली सुंदर कथा, एवढंच बोलेन... ज्यांनी कोणी शाळा, कॉलेजमध्ये असताना प्रेम केलंय अशा जवळपास सगळ्यांमध्ये काही गोष्टी इतक्या common असतात की दुसर्यांची story आपलीच वाटते>>>>
सुंदर प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद राहुल....
छान ...
छान ...
मस्त झाला शेवट..
दिपक तुम्ही कथेचा दुसरा पार्ट लिहिताना,पहिल्या भागाची लिंक पण देत जा...
गोड शेवट.. पु ले शु
गोड शेवट.. पु ले शु
आज पर्यंत कधी , नवर्याने ,
आज पर्यंत कधी , नवर्याने , आपल्या मुलाचे नाव ,बायको च्या पहिल्या खास "मित्रा"च्या नावावरुन ठेवल्याची कथा वाचली नाही.
असो.
दिपक तुम्ही कथेचा दुसरा पार्ट
दिपक तुम्ही कथेचा दुसरा पार्ट लिहिताना,पहिल्या भागाची लिंक पण देत जा...
हो मेघाजी, पुढील कथा लिहीताना लक्षात ठेवेन...
प्रतिसाद देण्यासाठी मनापासून धन्यवाद...
आज पर्यंत कधी , नवर्याने ,
आज पर्यंत कधी , नवर्याने , आपल्या मुलाचे नाव ,बायको च्या पहिल्या खास "मित्रा"च्या नावावरुन ठेवल्याची कथा वाचली नाही.
असो.
नवीन प्रयोग होता स्वस्ति जी...
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद..!
मुलीचं नाव 'खास' मैत्रिणीवरून
मुलीचं नाव 'खास' मैत्रिणीवरून...
मी तर तस्सं प्रॉमिसच केलंय
खूप छान लिहिलंय।
खूप छान लिहिलंय।
मांडणीही सुंदर।
अतिरंजितपणे न लिहिता माझं प्रेम होतं, पण आता तूच माझं प्रेम आहेस हे सांगणारी।
खऱ्या प्रेमाला आदर देऊन दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवणारी।
खूप छान लिहिलंय।
खूप छान लिहिलंय।
मांडणीही सुंदर।
अतिरंजितपणे न लिहिता माझं प्रेम होतं, पण आता तूच माझं प्रेम आहेस हे सांगणारी।
खऱ्या प्रेमाला आदर देऊन दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवणारी।
सुंदर प्रतिसाद देण्यासाठी मनापासून धन्यवाद IRONMAN...
छान
छान
छान वाचलतं ? धन्यवाद! कऊ..
छान
वाचलतं ?
धन्यवाद! कऊ..
खुपच मस्त...!!! आवडली...!!!
खुपच मस्त...!!! आवडली...!!!
धन्यवाद!
धन्यवाद!
आज पर्यंत कधी , नवर्याने ,
आज पर्यंत कधी , नवर्याने , आपल्या मुलाचे नाव ,बायको च्या पहिल्या खास "मित्रा"च्या नावावरुन ठेवल्याची कथा वाचली नाही.
असो. >दुनियादारी मध्ये दाखवलाय . श्रेयस राणीमाच्या प्रियकराचा नाव असता. हा म्हणा ते काही तिच्या नवऱ्याने ठेवलेला नसतं. पण ती तरी ठेवते हट्टाने.
मुलगी जाली तर नवऱ्या च्या
मुलगी जाली तर नवऱ्या च्या glrfrd चे नाव, मुलगा जाला तर बायकोच्या boyfrd चे नाव
सर्वांचे मनापासुन धन्यवाद..!!
सर्वांचे मनापासुन धन्यवाद..!!
गोड वाटली गोष्ट
गोड वाटली गोष्ट
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद दक्षिणा जी...