नावं सुचवा

Submitted by VB on 29 May, 2017 - 03:58

मला माझ्या भाचीसाठी नाव सुचवा प्लिज...
शक्यतो नाव लहान असावे, उच्चारायला एकदम सोपे आणी अर्थ सुंदर असावा.

अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय

राशी ( मीन ) अक्षरं - द ध च

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव सुचवा
असे सर्च करा . या विषयावर २-३ धागे आहे. त्यात मुबलक प्रमाणात विविध अक्षरांवरून नावे मायबोलीकरांनी उपलब्ध्/सुचवली आहे

नेहा
पिहू
तरला
वीणा
रश्मी
रम्या

दुर्वा, दिया, दिशा, दित्या (अर्थ माहित नाही. पण एका मुलीचं ऐकलंय हल्लीच)
धृवी, धनश्री, धरा
चैत्रा, चैत्राली

सर्वांचे आभार.

गजोधर , आम्हाला नविन नाव हवे आहे अन ते सगळे धागे तसे बर्यापैकी जुने आहेत. तसेही स सोडुन ईतर कुठल्याही अक्षरापासुन चालु होणारे नाव चालेल

ठिक आहे.

देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.<<< ओ बोंधू.. त्यांना "स" वरुन हवे आहे मग देवसेनाचे शिवसेना करणार का? Wink

स्नितीषा,
समिषा
सोफिया (आजकाल ख्रिश्चन नावे सुध्दा ठेवायचा फॅड आहे .. सोफीया जोशी, सोफीया पवार हटके टाईप कॉम्बिनेशन)
स्निती
स्निग्धा
समिता

अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय
>>>
हिंद्दीमध्ये सलमान शाहरूख
मराठीमध्ये सई स्वप्निल
गायकांमध्ये सोनू शान
क्रिकेटमध्ये सचिन सौरव
महिलांमध्ये सानिया सायना...
...
अशी जगप्रसिद्ध कर्तबगार नावे स (ईंग्रजी एस) वरून असताना स का नको बरे Happy

द - दिया
ध - धनिष्का
च - चानी

जरा कठीण अक्षरे आहेत, मुलीच्या आईच्या नावाला सूट होईल असे कुठल्याही अक्षरावरून साजेसे नाव ठेवा Happy

ईतके प्रतिसाद पाहुन वाटले कि कदाचीत नावे सुचवलीत पण ईकडे तर धन्य आहे अगदी.

मुलीच्या आईच्या नावाला सूट होईल असे कुठल्याही अक्षरावरून साजेसे नाव ठेवा >> आपल्याकडे अजुनतरी सहसा बाबाचे नाव लावतात मह्णून त्याच्या.नावाशी जुळत (रायमींग) ठेवतात.

तसेही फक्त स नकोय बाकी ईतर कुठलेही चालेल असे लिहीलेय की मी

हा जर राशी अक्षराचे नाव आवडले तर जास्त छान

वर गजोधर यांनी सुचवलेले 'धानी' हे नाव मलाही अतिशय आवडते.
धात्री, धारणा, धीरा, धीमती.
चांदनी, चंदना, चित्कला
दिव्या, दीपल, द्विजा,

आपल्याकडे अजुनतरी सहसा बाबाचे नाव लावतात
>>>>
यही सोच तो बदलनी है.. म्हणून मुद्दाम तसे लिहिलेले.. मुलीचे नाव पुढे आईचे नाव पुढे बाबांचे नाव .. नो आडनाव प्लीज.. मेरा देश बदल रहा है तेव्हाच म्हणून शकतो Happy

सर्वांचे आभार☺

आमच्या घरी हे पहिले बाळ आहे सो आम्ही सर्व सुपर एक्सायटेड आहोत.

प्रत्येकाने ऐखादे सुंदर नाव सुचवायचे त्याच्या छोट्या
चिठठ्या करायच्या अन बाळाकडुन एक ऊचलायची असे सर्वानुमते ठरलेय म्हणुन मला माझ्याकडुन एक सुंदर सोपे अन लेटेस्ट नाव हवे आहे
खुपसार्या साईट चाळल्या पण एकही आवडेना

सो प्लिज अजुन नविन नावे सजेस्ट कराना

द्राष्टी , दिमिका, द्वारी, दिर्घिका (आकाशगंगेत फिरणार्‍या),
चिन्वा, चैत्यन्या, चिन्मिका, चिन्मया, चेतना, चारू, चेरी चारूमती, चेल्सी, चीना, चार्मी

Pages