माणसे वाचताना

Submitted by सिम्बा on 22 May, 2017 - 23:53

माणसे वाचताना.

काही दिवसांपूर्वी फेसबुक वर फिरता एक पोस्ट दिसली
“Meet people who aren’t your age. Hang out with people whose first language isn’t the same as yours, get to know someone who doesn’t come from your social class, This is the only way to see the world. This is how you grow."

आणि पुढे कुठल्यातरी travel डेस्टीनेशन चे फोटो. पण त्या मिनिटाला ती वाक्ये मला फार अपील झाली.

आपल्या “केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार”च्या खूपच जवळ जाणारा तो विचार होता. फक्त इकडे तुमचा संवाद “पंडितां” पुरता सीमित ठेऊ नका, तुमच्या पेक्षा “वेगळे” जगणारे जे कोणी आहे त्यांच्याशी संवाद साधा असे म्हणणे होते

“वेगळ्या” लोकांशी संवाद साधताना, पहिला आणि मोठा अडथळा ठरतो तो पूर्वग्रह (Prejudice). काही शब्द ऐकले कि आपले अनुभव, आपले सोशिअल कंडीशनिंग आणी आपली वैयक्तिक मुल्ये यांच्या एकत्रित प्रभावाने त्या शब्दाची एक प्रतिमा आपल्या मनात नकळत उमटते, आणी प्रत्यक्ष भेटलेली व्यक्ती,घटना आपण त्या प्रतिमेशी मनातल्या मनात ताडून पाहू लागतो, साम्य शोधू लागतो आणी आपले पूर्वग्रह अजून अजून पक्के करत जातो.

पूर्वग्रह टाळण्याचा सगळ्यात सोपा आणी हमखास उपाय म्हणजे आपले अनुभवसंचीत वाढवणे, प्रथमपुरुषी अनुभव घेता आले तर फारच छान, पण तसे घेता नाही आले तर किमान दुसर्यांचे अनुभव वाचून आपले संचित वाढू शकतो.
देशाटन न करता, आपले अनुभव विश्व समृध्द करायचा सोपा उपाय म्हणजे पुस्तके,
आपला वैचारिक परीघ वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षितिजे विस्तारण्यासाठी आपण कायम पुस्तकांची मदत घेत आलो आहोत, पुढे technology च्या प्रगतीमुळे फक्त छापील पुस्तकांच्या ऐवजी दृकश्राव्य अनुभव देणारी इतर माध्यमे सुद्धा आपण वापरू लागलो,
मात्र या सगळ्यात आपल्याला जी गोष्ट “सांगण्यात “ येते तीच आपण पाहतो/ वाचतो. लेखक, दिग्दर्शक यांच्या सामाजिक/ राजकीय जाणीव/मते या प्रमाणे त्या गोष्टीची छटा बदलते. पर्यायाने आपले त्या घटने बद्दलचे दृष्टीकोन/ पूर्वग्रह जास्त घट्ट होत जातात

जसे, समलैगिक म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर भडक कपडे घातलेला स्त्रैण हालचाली करणारा पुरुष येतो, कामवाली गंगुबाई म्हंटली कि नऊवारी नेसेलेली पण नथीसकट सगळे दागिने घातलेली, मोडके तोडके हिंदी बोलणारी स्त्री हवी; मिसेस डीकॉस्टा नाव असणारी म्हातारी प्रेमळच असणार ;मोनिका किंवा शनाया नाव दिलेले कॅरक्टर आधुनिक विचारांचे आणी विधिनिषेधाची चाड नसलेलेच असणार अशी आपली पक्की धारणा असते. माध्यमांनी घट्ट केलेले हे काही पूर्वग्रह.

लोकांचे मनात वर्गीकरण करताना आपण वेगवेगळ्या शब्द्खुणा वापरतो. दुर्दैवाने त्यातली सगळ्यात taboo असलेली शब्दखुण पुढे त्या व्यक्तीची ओळख बनते. लोकांना आपण एकदा एका विशेषणाने tag केले कि बाकीचे सारे गुणदोष त्या tagच्या सावलीतच राहतात. मग मध्यम वर्गातून येऊन बनलेला प्रतिथयश डॉक्टर, गे activist, उच्च अभिरुची असणारा प्रेक्षक, वेल रेड मनुष्य या tags मधला गे activist हा tag आपल्या सगळ्या भावनिक व्यापाराचा मध्य बिंदू होतो किंवा प्लस साईझ मॉंडेल. मुस्लिम, स्त्री अशा tags मधून जाडी किंवा मुसलमान म्हणून स्टीरीओटाईप केले जाते.
याच्या पुढचा भाग म्हणजे हा टॅग पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या प्रमाणे आपण त्या व्यक्तीशी extra चांगले व वाईट वागू लागतो/शकतो, हे त्या व्यक्तीसाठी प्रचंड इरिटेटिंग ठरू शकते ,कारण आपण व्यक्ती ला रीऍक्ट न होता त्या टॅग ला रिऍक्ट होत असतो. यात तिचा व्यक्ती म्हणून स्वीकार दिसत नाही.

दुसरा अडथळा म्हणजे या “वेगळे अनुभव असणाऱ्या” लोकांबरोबर संवादाची संधी न मिळणे.
बहुतेक वेळा “वेगळे अनुभव” हे नकारार्थी असल्याने लोकांचा हे अनुभव लपवण्याकडे कल असतो, अगदी आपल्या नेहमीच्या वर्तुळातील कोणाला असा अनुभव आलाय हे माहित असले तरी शक्यतोवर त्या विषयावर बोलणे टाळले जाते. मग uncomfortable प्रश्न विचारून त्या व्यक्तीला बोलते करणे तिचा प्रवास उलगडणे हि गोष्ट दूरच राहिली.
या बाबतीत पाश्चात्य लोक नशीबवान म्हंटले पाहिजेत,त्यांच्या सामाजिक रचनेमुळे त्यांना जास्त वेगवेगळ्या लोकांचे एक्सपोजर मिळते. बरोबर शिकणारा मुलगा संध्याकाळी बार टेंडर म्हणून काम करणारा असू शकतो, किंवा घरगुती मदत करणारी बाई, पुर्वायुष्यातील सरकारी ऑफिसर असू शकते, भारतातून बाहेर जाणाऱ्या लोकांना जो पहिला सांस्कृतिक धक्का बसतो तो या ओपन कल्चर मुळे. आणि परदेशात खूप काळ राहणाऱ्या लोकांचे दृष्टिकोन विस्तारलेले दिसतात ते ही याच वाढलेल्या अनुभाव संचितांमुळे (परदेशात देश उभा करणाऱ्या अपवादांची मला जाणीव आहे, आणि त्याबद्दल मी बोलत नाहीये)
एखादि ओळखीतली व्यक्ती तिच्या आपबिती बद्दल मोकळेपणे बोलत असेल तरी आपण साधारण ते प्रॉब्लेम आपल्या पर्यंत येऊ नयेत म्हणून बेतानेच त्या संभाषणात सहभागी होतो.

हि सगळी विचार साखळी मनात येण्याचे कारण म्हणजे फेसबुक वर पाहिलेली दुसरी जाहिरात
“ the Human library”
पहिल्या वाचनातच हा प्रकार फार इंटरेस्टिंग वाटला.
हा उपक्रम २००० साली डेन्मार्क मध्य एसुरू झाला, आणी आतापर्यंत ७० देशात हा उपक्रम राबवला गेला आहे, भारतात इंदूर आणी हैद्राबाद नंतर मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे.

सोशिअल प्रीजुडीस च्या शिकार झालेल्या माणसांपैकी ज्यांना आपले अनुभव सांगण्यासारखे वाटतात, ते “मानवी पुस्तक” म्हणून आधी स्वत:ची नोंदणी करतात. (मुंबईत ल्या कार्यक्रमासाठी आत्ता पर्यंत ४७ पुस्तके नोंदवली आहेत). त्यांचे अनुभव/स्ट्रगल अधोरेखित करेल असे त्या पुस्तकाला नाव दिले जाते कार्यक्रमाच्या दिवशी पुस्तक वाचायला येणारे लोक, आपल्याला इंटरेस्टिंग वाटणारे “पुस्तक” घेऊन hall च्या कोपर्यात बसतात आणी पुढची ३० मिनिटे त्या “पुस्तकांशी” संवाद साधायचा प्रयत्न करतात. इथे नोंद घ्यायची गोष्ट म्हणजे uncomfortable प्रश्न विचारायला ना नसते आणी पुस्तक होताहोईतो मनमोकळे उत्तर देण्याचा प्रयत्न करते.
अनुभवांच्या प्रवाहात कोणी फक्त पाय सोडून बसेल, कोणी गुडघ्यापर्यंत उतरेल तर कोणी डुबकी मारेल ज्याचा त्याचा प्रश्न. आपल्या स्ट्रगल ची प्रस्तावना सांगितल्यानंतर पुस्तक वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देईल (पुस्तक स्वत: सेट भाषण देणार नाही) त्यामुळे एकाच पुस्तक वेग वेगळ्या वाचकांना वेगवेगळ्या प्रकारे उलगडेल.
३० मिनिटाची वेळ संपल्यावर हे पुस्तक परत देऊन इच्छा असेल तर दुसरे घेऊ शकता.

अर्थात हा प्रकार वर लिहिलंय तितका सोपा नसणार आहे, आणी एक्चुअल कार्यक्रमात अजून बरेच चालेन्जेस असतील याची कल्पना आहे,
कोणाला हे पुस्तक झालेल्यांनी आपले दुख: मिरवणे वाटेल, कोणाला हे आपल्या वेगळेपणाचे भांडवल करणे वाटेल, तर कोणाला वाचकांचा दुसर्याच्या आयुश्यात ला फालतू इंटरेस्ट वाटेल.कोणा वाचकाला आपल्या सारख्याच स्ट्रगल मधून गेल्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून प्रेरणा मिळेल, तर कोणी वाचकासाठी ही इन्ट्रॅक्शन त्याच्या मनात असलेले prejudice चॅलेंज करायची सुरवात ठरू शकेल.
पण एक मात्र नक्की, नेहमीच्या आयुष्यात मी ज्यांना भेटणार नाही अशा माणसांशी बोलायची संधी मला मिळेल
मनात खूप उत्कंठा घेऊन मी रविवारची वाट पाहतोय.

पुस्तकांबरोबर झालेल्या गप्पा इकडे शेअर करीनच पण कोणा मायबोलीकराला अशी पुस्तके वाचायची असतील तर हा कार्यक्रम २८ मे रोजी “Title wave” बुक स्टोर बांद्रा इकडे ३ ते ७ या वेळात होणार आहे. आणि कोणाला पुस्तक होण्याची इच्छा असेल तर फेसबुक वर र्यांचे डीटेल्स मिळतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख ! भन्नाट उपक्रम !!
अता थोडे स्वताचे अनुभव . तुमच्या मूळ वाक्यानुसार :

Meet people who aren’t your age. >>>> सध्या ट्रेनच्या प्रवासात असे जाणवते की माझ्याशेजारी जर माझ्याहून १०-१५ व र्षांनी मोठी व्यक्ती असेल तरच चांगला संवाद होतो ! संवादासाठी तरुणांचा उपयोग नाही कारण त्यांच्या कानात इअरफोनच्या नळ्या खुपसलेल्या व हातात स्मार्ट फोन. अगदी संपूर्ण प्रवासभर. मध्यंतरी माझा ८२ वर्षांच्या आजोबांशी मस्त ४ तास संवाद झाला.

Hang out with people whose first language isn’t the same as yours >> याचा मस्त अनुभव महाराष्ट्राबहेर व परदेशात घेतला आहे. यात मुख्य आपण दुसर्‍या भाषेतील वेगळ्या म्हणी, वाक्प्रचार, विनोद , किंबहुना एक वेगळी संस्क्रुतीच शिकत असतो. खूप छान वाटते.

इन्टरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्ही वरती लिहीलेली माहितीही आवडली. >> +१
Meet people who aren’t your age >> मला कोणाला भेटलं की बोलयला जमतच नाही. म्हणजे ओळखीचे असतील तर बोलते पण प्रवासात भेटलेल्या माणसांशी स्वतःहून बोलणे किंवा त्यांनी सुरुवात केल्यावर बोलणे सुरू ठेवणे नाही जमत! मित्रपरिवारात मात्र मी खूप बोलकी आहे.
अवघड विषयावर कसं बोलायचं ते तर अज्जिबात कळत नाही. त्यामुळे अशी पुस्तके वाचणे जमणारच नाही. पुस्तक होणे अगदी पॅसिव्ह होऊन, अगदी रुक्षपणे वगैरेच जमेल बहुदा.

जे लोक बोलू शकतात कुणाशीही त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

चांगला उपक्रम.
वेगळ्या” लोकांशी संवाद साधताना, पहिला आणि मोठा अडथळा ठरतो तो पूर्वग्रह >>>> +१

याचाच दुसरा भाग 2 जुलै रोजी title wave बांद्रा इकडे होणार आहे.

दुर्दैवाने मला हा इव्हेंट अटेंड करता आला नाही,
पण परिचितांकडून याचा अभिप्राय कळाला, त्याच्या या त्रोटक नोंदी

त्यांनी 10 पुस्तके ठेवली होती, पुस्तकांचे नाव गाव प्रसिद्ध करण्यात आले नव्हते.
मोठ्या प्रमाणावर वाचकांनी नोंदणी केली होती, ते पाहून आधीच या इव्हेंट ची वेळ 2 तासांनी वाढवली,
शेवटी वाढत्या गर्दीमुळे 1-1 होणारे सेशन 1-मेनी करावे लागले,
ज्या पुस्तकांशी मी बोलत होतो (हा एक गे डॉक्टर आहे) त्यांनी पहिली 2 सेशन्स प्रत्येकी 5 माणसांशी, मग 8,9 आणि शेवटचे सेशन तब्बल 15 लोकांबरोबर केले.

आलेल्या लोकात स्वत: समलैगिक, समलैगिक मित्र, नातेवैक असणारे लोक होते, ज्या गोष्टी ते आपल्या जवळच्या लोकांना ते विचारू शकत नव्हते ते प्रश्न त्यांनी इकडे उघडपणे विचारले,
वाचकांपैकी एका मुलीने " i think this will help me understand my gay cousine better" असे सांगितले,
तर दुसऱ्या एक बाई ज्यांच्या गे मुलाने 25 वर्षपूर्वी आत्महत्या केली होती, त्याची मानसिकता काय होती ते आत्ता कळले असे सांगितले.

हे 1-1 सेशन असते तर अजून इंटिमेंट संवाद झाला असता असे त्याला वाटले.

बहुदा हा पुस्तकांबरोबरच वाचकांसाठीही लिबरेटिंग अनुभव असावा.

Pages