पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाम (शमसुद्दीन खरे नाव) आणि दिगूनाना (नानूजान) दोघेही आएसआय चे सुसाईड बाँबर होते, ट्रेनला बोगद्यात ऊडवणे हे त्यांचे मिशन होते. पण स्फोट फार शक्तिशाली नव्हता त्यामुळे फक्तं श्याम बसलेला डबा ऊडाला आणि तो मेला. मरण्यापूर्वी पकोडे खाण्याची तीव्र ईच्छा झाल्य्यने दिगूनाना खाली ऊतरले आणि त्यांचा डबा चुकला पण शाम ने मिशन पूर्णत्वास नेले .

दिगुनानाचा ऑक्सिजन सिलेंडर शामजवळ होता. गाडी सुरू झाली तेव्हा दिगुनाना खालीच राहिले असं शामला वाटलं.....
>> असं नाही घडलं

शाम (शमसुद्दीन खरे नाव) आणि दिगूनाना (नानूजान) दोघेही आएसआय चे सुसाईड बाँबर होते, ट्रेनला बोगद्यात ऊडवणे हे त्यांचे मिशन होते. पण स्फोट फार शक्तिशाली नव्हता त्यामुळे फक्तं श्याम बसलेला डबा ऊडाला आणि तो मेला. मरण्यापूर्वी पकोडे खाण्याची तीव्र ईच्छा झाल्य्यने दिगूनाना खाली ऊतरले आणि त्यांचा डबा चुकला पण शाम ने मिशन पूर्णत्वास नेले .
>>चांगली शक्यता आहे पण असं नाही

श्यामने त्याच्या हातून घडलेल्या चुकीचा पाश्चाताप म्हणून आत्महत्या केलोय का ?
>> नाही..चूक आहे पण पश्चाताप म्हणून नाही

दिगुनानांना अशी कोणती गोष्ट माहीत आहे का जी ते कोणाला सांगतील ह्या भीतीने शाम ने आत्महत्या केलीय?
>> नाही

शामने ट्रेनमधून बोगद्यात उडी मारली का?
>> हो

बोगद्यात ट्रेन गेल्यामुळे मोबाइल फोन / डॉंगल ची कनेक्टिव्हिटी गेली?
>> असंबद्ध

शाम चे कोणावर प्रेम होते का ?
शामने आत्महत्या केली तेव्हा दिगुनाना हयात होते का?
>> दोन्ही प्रश्न असंबद्ध

दिगुनानांना शोधण्यासाठी शामने गाडीतून उडी मारली. त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरली आ णि शामचा बोगद्याच्या भिंतीवर आपटून शेवट झाला. त्याच्या हातून चुकून आत्महत्या घडली.

क्या बात ! योग्य दृष्टीकोनातून प्रश्न विचारले

डब्यामधे दिवे होते का ?
>> नाही.

बोगद्यात शिरल्यावर डब्यात पूर्ण अंधार होता?
>> हो

शाम ने चुकून एखादे चुकीचे औषध प्राशन केले आहे का ?
>> नाही

बोगद्यातून गाडी जात आहे हे शामला माहित असते का?
>> नाही

शाम आणि दिगू हे पळालेले आरोपी असतील.पोलिसांपासून वाचायला गाडीत शिरले . मधेच दिगू उतरून गेला आणि परत आलाच नाही. शाम ला वाटले त्याला पोलिसांनी पकडले . बोगद्यात गाडी आली आणि दिगूनाना त्याच वेळी त्याला शोधत आले असतील, त्यांनी खांद्यावर हात ठेवला तर शाम ला वाटले असेल की पोलिस आले. म्हणून त्याने गाडीतून उडी मारली.

बोगदा नसता तर शामने आत्महत्या केली असती का?
>> अजिबात नाय

बोगद्यातून गाडी जात आहे हे शामला माहित असते का?
>> नाही

बोगदा नसता तर शाम ने आत्महत्या केली नसती , बोगद्यात गाडी आहे त्याला माहित नाही आणि तरी त्याने आत्महत्या केली

ओ काय ऊलट सुलट ऊत्तरं देवून राहिले बाप्पा तुम्ही Proud

शामचा गैरसमज :

दिगुनानांबद्दल आहे का?

किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे का?

किंवै स्वत:बद्दल आहे का?

दिगुनानांना शोधण्यासाठी शामने गाडीतून उडी मारली. त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरली आ णि शामचा बोगद्याच्या भिंतीवर आपटून शेवट झाला. त्याच्या हातून चुकून आत्महत्या घडली.
>> चुकून आत्महत्या केली नाही

शाम विद्यार्थी आहे का ?
शाम ला कसले व्यसन आहे का ?
>>दोन्ही प्रश्न असंबद्ध

शामला झोपेत चालण्याची सवय असते का?
>>असंबद्ध

शामचा गैरसमज स्वतःबद्दल आहे का ?
>> हो

बोगदा नसता तर शाम ने आत्महत्या केली नसती , बोगद्यात गाडी आहे त्याला माहित नाही आणि तरी त्याने आत्महत्या केली
ओ काय ऊलट सुलट ऊत्तरं देवून राहिले बाप्पा तुम्ही
>> उत्तरं बराबर दिऊन राह्यलो न बाप्पा Lol
तीच तर मजा व्हय

शाम अंध आहे का?
>> नाही

शाम आंधळा नाही पण..
म्हणजे पूर्वी होता का?
>> हो

@ हायझेनबर्ग

शाम (शमसुद्दीन खरे नाव) आणि दिगूनाना (नानूजान) दोघेही आएसआय चे सुसाईड बाँबर होते, ट्रेनला बोगद्यात ऊडवणे हे त्यांचे मिशन होते. पण स्फोट फार शक्तिशाली नव्हता त्यामुळे फक्तं श्याम बसलेला डबा ऊडाला आणि तो मेला. मरण्यापूर्वी पकोडे खाण्याची तीव्र ईच्छा झाल्य्यने दिगूनाना खाली ऊतरले आणि त्यांचा डबा चुकला पण शाम ने मिशन पूर्णत्वास नेले .
>> Lol भन्नाट तर्क. नावाला जागलात

शाम आधी आंधळा होता. त्याचे डोळ्याचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. त्याने जवळची सगळी रक्कम दिगुनानांना यासाठी दिली आहे. त्याच्या डोळ्यावर प ट्टी आहे. दिगुनाना उतरून जातात आणि परत येत नाही तेव्ह्या त्याचा गैरसमज होतो की ते आपले पैसे घेऊन पळाले. आपले ऑपरेशन यशस्वी झाले का नाही ते बघण्यासाठी तो पट्टी काढतो. नेमकी त्याच वेळी गाडी बोगद्यात शिरते आणि अंधारच दिसतो. निराश होउन शाम गाडीच्या दारात जातो आणि उडी मारतो.

Pages