एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत Proud
बर मग आज नाही दुखणार आज मी पळालो नाही. आज विश्रांतीचा दिवस होता.

अन्जू आणि मंजूताई मनापासून धन्यवाद. आतातर मी नक्की रोजच्या रोज अपडेट टाकत जाईन.

हर्पेन मी रोज न चुकता वाचतो अपडेट्स.

कमालीच डिटर्मिनेशन आहे तुझ्यात

मी आज भाजी आणली ईतक्या सहजतेने तु "आज १५ किमीच धावलो" लिहितोस!! दडपण येतं वाचुनच Happy

हर्पेन, आज माझे पाय खर्रेखुर्र दुखताहेत. काल रोजच्यापेक्षा अडीच पट चालणं झालं. आणि बाहेर जाताना पाणी कॅरी न करण्याची शिक्षा.

आदित्य सिंग - मग होऊन जाऊ दे फुल या वर्षी त्या दडपणात

भरत. - काळजी घ्या. ह्या दिवसात (पावसाळ्यात / थंडीत) आवर्जून पाणी प्यावे लागते. मी पण पावसात पळालो तेव्हा असेच पाणी प्यायचे विसरलो म्हणजे वाटलेच नाही पाणी प्यावे असे आणि मग पायात गोळे येणे वगैरे प्रकार घडू शकतात.
भरपूर पाणी पिऊन घ्या उद्या परवा परत माझ्यामुळे पाय दुखणारेत तुमचे Wink

मी पण वाचते अपडेट्स.
गेला आठवडाभर लदाख मध्ये होतो. लेह मध्ये २-३ ठिकाणी या मॅरेथॉन चे फ्लेक्स लागलेले दिसले. ते बघून मी सगळ्यांना ( तिथल्या ऑफिसर मित्राला, त्याच्या फॅमिलीला) या मॅरेथॉनमध्ये माझा एक मायबोलीकर मित्र धावणार आहे हे सांगून कॉलर टाइट करून घेतली.

तिथे इतक्या उंचीवर थोडे चालल्यावर पण धाप लागते, श्वास चढतो... तू इतके अंतर धावणार म्हणजे हॅटस ऑफ...
बेस्ट ऑफ लक. किती दिवस आधी जाणार आहेस ?
काळजी घे.

धन्यवाद अल्पना,

संपुर्ण अंतर धावता येईल असे नाही काही अंतर चालतच पार पाडावे लागेल.

हे जरा धाडस आहे याची कल्पना आहे. मला अजीबात आवडले नाही तरी ऐन वेळी परिस्थिती उद्भवेल त्याप्रमाणे सर्वात वाईट निर्णय (स्पर्धा अर्धवट सोडणे हा) ही घ्यावा लागेल याची तयारी करून ठेवली आहे. पण कैलास मानसरोवर यात्रेच्या वेळच्या माझ्या विरळ हवेत वावरण्याच्या अनुभवावर आधारित हे धाडस करत आहे.

मी ३० तारखेला सकाळीच लेह मधे असेन. अ‍ॅक्लेम्टायझेशन इस द की .
सध्यातरी फार पुढचा विचार न करता पुर्ण लक्ष सरावावर केंद्रीत आहे.
आधी माझे प्रयत्न आणि मग देवाक काळजी जे होईल ते बघू

शिवाय मायबोलीकरांकडून मिळणार्‍या इथल्या सदिच्छा मधे ही खूप ताकद आहे Happy

आज चार तास धावायचे होते धावलो. एकूण पार पाडलेलं अंतर ३७ किमी.
ऑफीस असल्याकारणाने सकाळी ४:१० ला चालू केले ८:१० ला संपवले.
अंदाजे तासभर एकटाच पळालो मग वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे मित्र होते.
पाऊस नव्ह्ताच हवा बर्‍यापैकी गार पण दमट होती.
एकूणात रन चांगली झाली. समाधानी आहे.

धन्यवाद पिंगू

मी लिहायला आलो होतो की आज मी घाई गडबडीत फोन घरीच विसरलो आहे. जर कोणी मला संपर्क साधू पहात असेल तर मी संध्याकाळीच पोच /उत्तर देऊ शकेन .

हर्पेन, मी पण रोजच वाचते अपडेट्स आणि भारी वाटतं वाचून मला Happy
>>> धन्यवाद रीया Happy बहुतेक मी माझा प्रतिसाद टाईप करत असतानाच तुझा प्रतिसाद आला त्यामुळे मी वाचला नव्हता. आत्ता वाचला Happy

कमालीच डिटर्मिनेशन आहे तुझ्यात
मी आज भाजी आणली ईतक्या सहजतेने तु "आज १५ किमीच धावलो" लिहितोस!! दडपण येतं वाचुनच>>> + १००००००

नाहीतर मला वाटायला लागले होते की कोणी वाचतंय की नाही किंवा मी बोअर करतोय की काय >>> आम्ही वाचतो हर्पेन , खुप सार्‍या शुभेच्छा !

धन्यवाद श्री,
टवणे सर आता घेतलंच आहे खारदुंग ला चॅलेंज तर इतकं तर करावंच लागणार ना
जाई. - मागच्याच वर्षीपर्यंत १५-१६ किमी अंतर हे केवळ रवीवारी, लाँगरन म्हणूनच धावलं जायचं पण आता सगळं परिप्रेक्ष्यच बदलून गेलंय. मी स्वतःही विस्मयचकीत आहे.

आज तीन तास पळायचं होतं पण २ तास ४० मिनिटे पळालो. सिंहगडावर घाटरस्त्याने धावत वर जाऊन परत खाली आलो. आजही सिंहगडावरतीही पाऊस नव्हता. आजचा सगळ्यात अवघड भाग वर पोचल्यावरही तिकडे खायला न थांबता लगेच परत वळणं हा होता. Proud

जिज्ञासा, प्राची. धन्यवाद
हुरुप वाढवलात तुम्ही माझा.

आज धावलो नाही.
आज (ट्रेनिंग सारखे न थांबता वगैरे नाही पण) थोडेसे पोहलो. ४००-५०० मी. असेल. शरीर मोकळे झाले. छान रिलॅक्स वाटलं.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की
मागच्या आठवड्यात सहा जणांनी मिळून ( चार जणांनी १०००, एक जणांनी १००१ व एकजणांनी ५००० अशा रितीने ) एकूण १०००१ रुपये मैत्रीला देणगी म्हणून दिले.

अधिक आनंदाची गोष्ट ह्यामधे आपल्या मायबोलीकर बब्बन, मंजूताई, रीया यांचा मोलाचा वाटा आहे.
मी सर्वच देणगीदारांचा मनापासून आभारी आहे.

आजही भाजी आणली Proud
पण आणताना बराच त्रास झाला. हात पाय आखडलेले होते, कधीकधी होतं असं पण झालेच तर गेलाबाजार ३-४ किमी नंतर तरी शरीर मोकळं होतं पण आज तसे काही झाले नाही. लय अशी सापडलीच नाही. पण नेटाने आणि मित्रांच्या साथीने पुर्ण अंतर पार केले.

तर अशा प्रकारे कसेबसे १६ किमी धावलो एकदाचे Happy

मामी, जोरदार प्रतिसाद आहे.
चार आठवड्या अखेरीस एकूण जमा रक्कम रुपये ५८,६१४
माझ्या निर्धारित ७२००० करता १३३८६ रुपये कमी
म्हणजे झालेच / होतीलच आता.

माणसे मात्र ७२ पैकी २३ झाली आहेत.

मी हेडर मधे आठवड्यानुसार लिहिलंय त्यात महिना संपला की अपडेट करतो एकूण आकडा

आदित्य सिंग - Happy धन्यवाद.
भाजीचं ओझं झालं आज जरा. येणारे दोन तीन आठवडे महत्वाचे आहेत. दुखापत न होऊ देणे याकडे लक्ष द्यायला हवे असे स्वतःलाच बजावले आहे.

नाहीतर मला वाटायला लागले होते की कोणी वाचतंय की नाही किंवा मी बोअर करतोय की काय >>>
वाचतो रे,
पण टायपाचा कंटाळा! Happy

सूनटून्या - धन्यवाद मित्रा. मी समजू शकतो.

आज १५ किमी धावलो. त्यातले ८ किमी टेम्पो रन (म्हणजे जलद गतीने सलग सतत)

आज अंदाजे १ किमी पोहलो. अंदाजे म्हणण्याचे कारण फेर्‍या मोजताना चूक झालेली असू शकते.
अगदी थोडा वेळ थोडासा पाऊस भूरभूरला. पावसात पोहायची मजा काही औरच असते पण आज काही ती मजा आली नाही.

Pages