भाग २ पासून पुढे-
......
रोहन, तिचं अफेर चाललय विक्रमशी... सागर.
विक्रम??.. रोहन.
तिच्या ऑफीसमध्ये असतो तो... सागर.
पण सागर, आर यू शोअर अबाउट इट?.. रोहन.
म्हणजे?.. कशाबद्दल... सागर.
म्हणजे, तुला हे कसं कळाल सागर?.. आणि मला वाटतय तू एकदा पक्की खात्री करून घ्यावीस.. रोहन.
रोहन मला पक्की खात्री आहे, त्या दोघांना मी कॉफी शॉप मध्ये बसून गप्पा मारताना पाहिलंय आणि प्राचीच्या मोबाईलवर त्याचे रोमँटीक मेसेजेसनी तिचा इनबॉक्स भरलाय.. सागर.
तरी सूध्दा मला डाउट वाटतोय सागर... रोहन.
हो मलाही वाटतं होता.. मग तपास सूरू केला, आणि शेवटी सत्य माझ्या हाती लागले... सागर.
ओ शायर!.. निट काय कळालं ते सांगा... रोहन.
अरे तिच्या ऑफीस मधला तो प्यून सदाशिव, त्यानं सगळ कळवलं मला, गेल्या तीन चार महिन्यापासून चाललय म्हणे त्यांच.. सागर
सदाशिव!.. वाह, मानलं यार तुला.. काय कमेक्शन्स आहेत तुझे.. सागर, तू डिटेक्टीव एजंसी का उघडत नाहीस.. म्हणजे मस्त चालेल हां... रोहन
रोहन, इट्स नॉट अ जोक... सागर
सॉरी सॉरी.. मग तिच्याशी बोललायसं का तू या विषयी?... रोहन
हो.. अरे पण तिला त्याबद्दल थोडापणं पश्चाताप नव्हता रोहन, साधं सॉरी सुद्धा ति म्हणू इच्छूक नव्हती... सागर
' सॉरी '... आणि कशासाठी म्हणावं तिनं... सागर, तुमचं एकत्र नाही जमू शकलं.. मग त्यात इतकं रिअॅक्ट होणासारखं काही नाहीये सागर.. रोहन
अरे पण तीन वर्षाचं रिलेशनशिप?... प्रेम?... सागर
प्रेम?... कोणत्या रिलेशनशिप बद्दल बोलतोयस तू सागर?... कॉलेज मधे एकामेकांवर अट्रॅक्ट होणं साजिक आहे सागर.. म्हणतात ना, अपोसिट अट्रॅक्ट्स पण त्या अट्रॅक्शन ला प्रेम मानून घेनं...
फक्त एकत्र कॉफी पिल्याने, हातात हात घालून प्रेम नाही होत सागर...
खर तरं तुमच्या दोघांचा स्वभाव अगदी उलट.. तू असा शांत मों. रफी, लता मंगेशकरची गाणी ऐकून आपलं मन रमवनारा ओल्ड फॅशन..
कदाचित ती तुला वैतागली असेल सागर..
आणि आज कालच्या मुलींना डॅशिंग, कुल, पार्टी करणारी मुलं आवडतात सागर... आणि नक्कीच तू तिला ते देऊ शकला नसतास... बहूतेक तिला जे हवयं ते तिला विक्रम मधे दिसलं असेल... आणि त्यासाठीचं ती गेली असेल.. आणि आता तू ही सगळं मागे टाकून एक नविन सूरुवात करायला हवीस... रोहन
पण रोहन, मी आत्ता काय करु?.. सागर
ते तर तुलाच ठरवावं लागेल सागर.. आफ्टर ऑल इट्स युवर लाईफ.. आणि मला वाटतं कि तुला त्याहूनही चांगली मुलगी मिळेलं सागर.. जि तुझ्या सारखीच असेल १७६० ची गाणी ऐक नारी, निसर्गात रमणारी... रोहन
( रोहनचं वाक्य तोडत) हो हो कळालं मला.. सागर
बरं चल मग मला आता निघायला हवं.. प्रियाला पिक करायचय... रोहन
बरं चल तू.. मी थोडा वेळ थांबतो इथे... सागर
ओके.. बाय देन.. रोहन
हो.. बाय.. सागर
( रोहन जातो...)
थोडा वेळ बसल्यानंतर सागर कॉफी शॉपच्या बाहेर येतो.. समोरून त्याला रोहन त्याच्याकडे धावत येताना दिसतो..
काय झाल?.. सगळं ठिक आहे ना?.. इतक्या गडबडीने परत?.. आणि तू कोणाला तरी पिक करायचंय म्हणत होतास ना?.. सागर
अरे तिकडेच चाललो होतो पण मधेच आठवण झाली..
ऐक, तू उद्या ऑफीसला येणार आहेस ना?.. रोहन
हो.. सागर
मग आल्यावर आधि दिक्षित सरांना भेट.. रोहन
का रे?.. काय झालं?.. सागर
तसं काही सिरीयस नाहीये.. बिसनेस बद्दलचं आहे काही तरी.. तू त्यांना भेट ना, ते सांगतील तुला... बरं मी थोडं घाईत आहे मी निघतो... रोहन
रोहन... हे तु मला कॉल करून सुद्धा सांगू शकला असतास... इतक्यासाठी परत येणं?... सागर
गडबड रे गडबड.. चल येतो.. रोहन
( जातो...)
- सागरने पार्किंग मधिल आपली गाडी बाहेर काढली.. व नेहमी प्रमाने गाडी हायवे वर येताचं त्याने रे डिओ ऑन केला.. रेडिओ वर सागरचा आवडता कार्यक्रम चालू होता.. पहिलं गाणं लागलं
" अभि ना जाओं छोड करं,
के दिल अभि भरा नहीं.."
सागर स्वतःला त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीशी जोडत जातो.. जणू त्याच्यासाठीच ते गाणं लिहिलं असावं...
सागर आपल्या फ्लॅट मध्ये पोहचतो... सकाळी ७ चा गजर लाऊन तो आपल्या बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करू लागतो...
सकाळी ७ वा. गजराच्या त्या कर्कश आवाजाने सागरला जाग येते.. सागर स्वतःला आवरुन ऑफीसला जाण्यासाठी १० वा. आपल्या फ्लॅटच्या बाहेर पडतो.. त्याने आपली गाडी बाहेर काढली व नेहमीप्रमाने गाडी हायवे वर येताचं त्याने रे डिओ ऑन केला.. गाण सूरू होतं
" जिंदगी इक सफर है सूहाना,
यहां कल क्या हो किसने जाना."
त्या गाण्यातील उत्साहासोबत सागर ऑफीस मधे येतो.. व सरळ दिक्षित सरांच्या केबिन मध्ये जातो...
मे आय कम इन सर?... सागर.
ओ.. येस सागर प्लीझ कम... दिक्षित.
( सागर येऊन त्यांचा समोरिल खूर्चीवर बसतो)
सो सागर, हाऊ आर यू फिलींग नाऊ?... दिक्षित.
मच् बेटर सर... थँक यू.. सागर.
सागर मी तुझ्यासाठी एक बिजनेस ट्रिप प्लान केलीय... दिक्षित.
म्हणजे सर?... सागर.
सागर तुला २० ते २५ दिवस पूण्याला जावं लागेल. एका प्रोटेक्ट साठी... तुला मि. राधा बरोबर हा प्रोटेक्ट कंप्लीट करायचा आहे.. आणि स्पेशली तुझ्यासाठी मी राधाशी बोललोय, ती तुझ्या राहण्या - खाण्याची व्यवस्था करेल... दिक्षित.
मि. राधा?... सागर.
ती विजन टेक्नोलॉजी प्रा. लि. ची सीनियर एक्सीक्यूटीव मॅनेजर आहे.. दिक्षित.
पण सर, आय थिंक मी या प्रोजेक्टसाठी तयार नाहिये.. सागर.
हे बघ सागर, गेल्या १ महिन्यापासून तू सुट्टीवर आहेस.. आणि मला वाटतय तू आता तुझ्या पर्सनल गोष्टींना बाजूला सारून आपली रिस्पॉन्सीब्लीटी सांभाळावीस..
तुझं टिकेट आणि राधाचा कॉटेक्ट मी तूला संध्याकाळ पर्यंत पोचवेन. उद्या तूझी फ्लाईट आहे.. इफ यू से येस... दिक्षित.
ओ के सर, आय विल गो... सागर.
ग्रेट... कम ऑन सागर, घरी जा आणि पॅकींग कर.. आय एम शोअर सागर, तुला खूप मजा येईल... दिक्षित.
थँक यू सर... सागर.
सागर आपल्या फ्लॅटवर येऊन पॅकिंग करण्यात व्यग्र होतो.. बेल च्या आवाजाने तो दचकतो.. दारावर एक प्यून त्याला एक पॅकेट देऊन जातो...
....
( क्रशम...)
हा भाग पण मस्तच. लिहीत रहा.
हा भाग पण मस्तच. लिहीत रहा.
धन्यवाद!..
धन्यवाद!..
भाग ४ लवकरच...
भाग ४ लवकरच...
छान आहे भाग.. थोडं लांबी
छान आहे भाग.. थोडं लांबी जास्त झालीय..
प्रेमाबद्धल माझं अस मत आहे की नाववद तक्के लोक habit ला प्रेम समजतात...