मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का

Submitted by आशुचँप on 15 May, 2017 - 03:26

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

फार पूर्वी एकत्र मायबोली पद्धती होती. नवीन आयडीला आपल्या लेखनकौशल्याची संधी दाखवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून त्यांच्यासाठी नवे धागे काढले जायचे.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच नवे नवे धागे काढलेच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच गप्पांच्या बाफवर मुक्ताफळे उधळणारे तेवढ्यातच आणखी वेळ खर्च करून नवे धागे काढून येतात. त्यात टवाळ लोकांना जेव्हा समजते की तुम्ही नवा धागा काढायला निघाला आहात तर ते आणखी (थरथर) कापू लागतात. मला मात्र हा एकूणच वेळेचा खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर गप्पांच्या धाग्यावर विषय समजून जात असेल किंवा पुरेशी चर्चा होत असेल, अश्यावेळी त्या नव्या धाग्याच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

मुळात मी ईथे नवे धागे काढण्याच्या विरोधात नाहीते. मानसिक क्षमता असेल तर दिवसा-दोन दिवसातून एकदा धागा काढलाच पाहिजे. पण प्रत्येक नवा विषय आल्यावर लगेचच नवा धागा काढण्याच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

असो, तर ही प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, आशिष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू इतका अल्प संतुष्ट असशील असे वाटले नव्हते. तुझ्या सारख्या लोकांची आज समाजाला गरज आहे.

असेच धागे प्रसवत रहा

{{{ इथे धागा काढुन हनीमुन ईतका आनंद मिळत असेल तर अजुन २ धागे काढ आणि संपव .. }}}

काही लोकांचा हनीमून कधीच संपत नाही. ऋन्मेषचाही हा धागीमून समस्त मायबोलीकरांच्या हयातीत संपेल असे वाटत नाही.

रुंमेश च लिखान मला तरी प्रंचड आवडायचे... काही ललित भारी लिहिलेयत.. रुंमेश आणि तुमचा अभिषेक यांचे ललित लिखाण वाचताना माजा यायची...
बाकी सध्या जे तिमेपास धागे उघडतो ते पण ओक आहेत..

इथे धागे काढून माहिती गोळा करून मग ती माहिती इतर ठिकाणी सांगून कॉलर टाइट करणे मला पॅथेटिक वाट्ते(ती मानसिकता . व्यक्तिनव्हे. 

एक उदाहरण रॅन्समवेअर अ‍ॅटॅक वर सी एन एन व रूटर्स वर इतकी माहिती उपलब्ध आहे व अपडेट्स पण. पण इथे धागा काढू काय मिळते. 
>>>

अमा ती माहीती ईंग्रजी भाषेत असते आणि ती देखील बरीचशी टेकनिकल भाषेत. माझ्या त्या धाग्याच्या निमित्ताने ईथले त्या क्षेत्रातील जाणकार मराठीत आणि सोप्या भाषेत माहिती देत आहेत, चर्चेतून विविध पैलू समोर येत आहेत, व्हॉटसपवर ऊत आलेले मेसेज खरेखोटे होत आहेत तर त्यात वाईट काय आहे. मला तरी त्या धाग्यात काही गैर वाटत नाही. बाकी आपल्या मताचा आदर आहे. आपल्या रोखठोक बोलण्याचे नेहमीच कौतुक वाटते Happy

आणि हो, मी ईथली माहिती गोळा करून आणखी कुठे शायनिंग मारत नाही. तसेच करायचे असते तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे गूगल करूनही मारता आली असती. ईथे धागा का काढला असता. याचाच अर्थ ईथे त्यापलीक्डे जाऊन काही माहीती मिळते हे आपणच एकप्रकारे कबूल करत आहात Happy

सोनाली - तुम्ही बरोबर बोलत आहात, पण या धाग्यावर मुद्देसूद बोलण्यास मनाई आहे असा बोर्ड टाकायला विसरलो>>> Lol

>>>>अरे, मध्ये ते कवितांचे पेव फुटले होते त्याच्यापेक्षा बरेच म्हणायचे
काही वर्षांनी डेंजर कवी परत आले आहेत ... जागते रहो... Wink

Ransomware च्या धाग्याबद्दल ऋ ला धन्यवाद, मी इंग्रजीत बरीच माहिती गोळा केली, पण इथे जे मराठीत सांगितले गेले त्याला तोड नाही.

>>> मानसिक क्षमता असेल तर दिवसा-दोन दिवसातून एकदा धागा काढलाच पाहिजे. <<< अरे बाबोऽऽ....
वर्षातुन एखाददुसरा धागा काढण्याइतपतच माझी मानसिक/बौद्धिक क्षमता आहे. Proud आपल्याला नाय बोवा जमणार दिवसा-दोन दिवसातुन धागा काढणे..... !
त्यातुन मला स्वतःचेच लिखाण धड जमत नाही, अन मग भरीस भर म्हणून "इतरांच्या लिखाणाचे स्क्रिनशॉट्स" वगैरे घेऊन त्यांचे बयाजवार रेकॉर्ड ठेवणे हे तर अशक्यच.... आधीच हापिसात काय कारकुनी कमी करावी लागते की काय? अन मग ही स्क्रिनशॉट्सची कारकुनी कोण करणार? Wink
थोडक्यात काय? मला स्वतःलाही फारसे लिहिता येत नाही, अन इतरांचे लिखाण वाचुन, अभ्यासुन(?) त्याची बयाजवार संगतवार नोंद ठेवणे वगैरे काहि काहिच जमत नाहि.

असे धागे पाहता माबोची गुणवत्ता घसरल्यासारखि वाटते.
नवीन Submitted by mr.pandit on 15 May, 2017 - 19:33 >>>>>>>>
+१११११ सहमत, त्या बाहुबली चित्रपटावर भारंभार धागे निघत आहेत. कुणाला आवडला म्हणून, कुणाला नाही आवडला म्हणून, तर कोणाला तरी परीक्षण लिहायचे असते म्हणून. पण बाहुबली रिलीस होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि आता हे सर्व वाचून कोणी आपले मत काही बदलू शकत नाही. या वर्षीचे सारे अवॊर्डस त्या चित्रपटालाच मिळतील कदाचित नॅशनल अवॊर्ड पण मिळेल. केवळ आपल्याला त्रास कसा झाला हे लिहिण्यासाठी धागे काढण्यापेक्षा आधीच्या धाग्यावरच पोस्ट स्वरूपात अनुभव टाकले कि चालत नाही किंवा त्यावर अभिप्राय मिळत नाहीत अशी भीती धागाकर्त्याने किंवा मायबोली सदस्यांना वाटते बहुदा. बाकी जैसे जिसकी सोच.

धागे काढणारे काढणारच.. आपण विरोध करण्यात काय अर्थ आहे? उलट जमल्यास अतिरिक्त विषय सुचवावेत. जसे की,

  1. मार्च अखेरीस अनेकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने घेतलेल्या युरो३ दुचाक्या आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम
  2. शिफू सन कृती
  3. आगामी राष्ट्रपती कोण व्हावेत / होणार?
  4. धनंजय मुंडेंना पाठबळ देऊन पंकजाला संपवायचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत का?
  5. तिहेरी तलाक रद्द होईल / व्हावा का?

धागे काढणारे काढणारच.. आपण विरोध करण्यात काय अर्थ आहे? उलट जमल्यास अतिरिक्त विषय सुचवावेत. जसे की,

  1. मार्च अखेरीस अनेकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने घेतलेल्या युरो३ दुचाक्या आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम
  2. शिफू सन कृती
  3. आगामी राष्ट्रपती कोण व्हावेत / होणार?
  4. धनंजय मुंडेंना पाठबळ देऊन पंकजाला संपवायचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत का?
  5. तिहेरी तलाक रद्द होईल / व्हावा का?

त्यातुन मला स्वतःचेच लिखाण धड जमत नाही, अन मग भरीस भर म्हणून "इतरांच्या लिखाणाचे स्क्रिनशॉट्स" वगैरे घेऊन त्यांचे बयाजवार रेकॉर्ड ठेवणे हे तर अशक्यच.... आधीच हापिसात काय कारकुनी कमी करावी लागते की काय? अन मग ही स्क्रिनशॉट्सची कारकुनी कोण करणार? 

>>>>

धागे काढणे आणि वर आपण जे उल्लेखलेले आहे ते करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत Happy

धागा काढणे, ते वर जे उल्लेखलेले आहे ते करणे आणि ज्यांनी उल्लेखलेले आहे त्यांच्यासारखे करणे ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत Wink

>>> धागे काढणे आणि वर आपण जे उल्लेखलेले आहे ते करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत <<<<
असे भासते, प्रत्यक्षात माझ्यामते तरी ते वेगळे नाहि...
कारण...
धागा निघालाय, त्याचे परिक्षण / मूल्यमापन करणे, अन ते केल्यावर तो धागा योग्य की अयोग्य हे सिद्ध करण्यार्‍या अशा कौतुकाच्या वा निषेधाच्या वा सहमतिच्या पोस्टी एकतर धाग्यावर खरडणे किंवा त्या मजकुराचे स्क्रिनशॉट्स घेऊन ठेवणे नंतरच्या वापराकरता..... एकुणात एकच बाब आहेत की... मूल्य निश्चिती/परिक्षण कॉमन आहे, प्रतिक्रियेची पद्धत फक्त वेगवेगळी भासते.... ! कुणी लगेच सहमति/कौतुक/निषे४धाचा प्रतिसाद देऊन प्रतिक्रिया देतिल, कुणी वर्षादोनवर्षाने "योग्य वेळ येताच" करु की निषेध, इतकी काय घाई आहे, असे म्हणून स्क्रिनशॉट घेऊन प्रतिक्रिया "पेन्डीन्गला" टाकतील... Proud
असो.
मला बोवा कधी धाग्याची अडचण होत नाही.
हे म्हणजे कस आहे? घरातील चिल्लीपिल्ली दुपारचा कालवा करू लागली की वामकुक्षी घेणारे कसे करवादतात, तसे वाटते.... अहो घरात चिल्लीपिल्ली आहेत, ती गोंधळ घालणारच... चिल्लीपिल्ली आहेत म्हणजे घर कसं, जागते वाटते.... तर भरपुर निघणारे धागे म्हणजे मला तरी बोवा जागतेपणाचे लक्षण वाटते.. Happy कदाचित पटणार नाही हे... पण आहे हे असे आहे... !

चिल्लीपिल्ली >>>> चिल्ल्यापिल्ल्यांचे विषय पहा किती निरागस आहेत.

धागे काढणार्‍याच्या वेळेच्या वायफळ खर्चाशी आपल्याला काय घेणंदेणं आहे? त्याचा / तीचा वेळ आहे तो. आणि वाचणार्‍याचं म्हणाल, तर तुमच्यावर कोणी सक्ती केली आहे का त्याने / तिने काढलेले सगळे धागे वाचायची? नसेल तुम्हाला वेळ तर नका वाचू. >>>>> हेच करतो. पण दुसर्यान्च्या धाग्यवर उगाच गोधंळ घालुन चर्चा का बरे भरकटवयाची ? दर वेळि आपलाच अजेन्डा का पुढे पुढे करायचा?

एक वाचक म्हणून इतकेच म्हणेन की मायबोली वरील धाग्यांचा दर्जा खालावला आहे. चांगले धागे येतात पण ज्यावर चर्चा करावी, वाचावी असे धागे कमी.

लिंबूतिंबूनशी सहमत... धागे निघालाच पाहिजेत, ट्रॅफिक पाहिजे भाई...
सिंथेटिक, रुंमेश यांचे धागे आले की मायबोली ट्रॅफिक ला पीक येत असेल

आशुचँप
तुमचे मत योग्य आहे.
नवीन धागा काढा,नवीन विषयावर काढा.
काही अडचण नाही.
पण ज्या आयडी चे काही विषयावर स्वतःची मत नाहीत मानसिक रोगी आहेत,पूर्वग्रह आहेतं.वेगळी मतं स्वीकारण्याची क्षमता नाही.
त्यांनी कोणतेच धागे काढू नयेत.

हा धागा या धाग्यावरून आलेला का? Happy

लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?

https://www.maayboli.com/node/62579

दोन्ही धागे आणि त्यावरचे प्रतिसाद आवडले Happy

Pages