सुंदर चित्रं काढता न येणं, गाण्यासाठी आवाज चांगला नसणं या दोन गोष्टी करता आल्या असतं तर..... असा विचार लाखो वेळा मनात येऊन गेला, अगदी लहान असल्यापासून. आमच्या शाळेत रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा असायची. तिथे आपल्याच वर्गातल्या मुला-मुलींनी काढलेली सुंदर रांगोळी, सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात दिसणारी बोट आणि त्याचं परफेक्ट प्रतिबिंब पाहून चॅन वाटायचंच पण आपल्याला हे जमत नाही याचं दुःखही. चित्रकलेच्या बाकी मुलांची वही पाहूनही तेच वाटायचं.
पहिल्या नोकरीत सेट्ल झाल्यावर एक मोठी चित्रकलेची वही, रंग सर्व घेऊन आले. त्या वहीची कल्पना मात्र मला स्वतःलाच खूप आवडली होती. प्रत्येक पानावर एक चित्र काढायचं बॅकग्राऊंडसाठी आणि त्यावर एक पुढे एक कविता. मोठ्या उत्साहाने त्यात अनेक कविता लिहिल्या. अनेक वर्षे ती सोबत घेऊन फिरलेही भारत, अमेरिका कॅनडाला. पुण्यात राहिलो तेव्हा मात्र ती तिथेच घरी ठेऊन आले. एका भारतवारी मध्ये त्यातली उरलेली पानेही पूर्ण केली. ती वही संपली तेंव्हा फार समाधान वाटलं अनेक वर्षांनंतरही ती वही पूर्ण करू शकले आणि दुःखही त्यात नवीन पान जोडता न येण्याचं.
शिकागो मध्ये असताना नवीनच वेड होतं, पेन्सिल स्केच शिकायचं. मग दोनेक पुस्तकं, अनेक पेन्सिलीचा सेट, असे सर्व घेऊन आले. त्यात थोडे स्केचेस काढलेही. पण या सर्व गोष्टी वेळेच्या प्रवाहात मागे पडून जायच्या. नोकरी बदल, मुलं झाली किंवा काय तर ब्लॉग लिहायला सुरुवात केली किंवा पळायला... अशा अनेक कारणांत नियमितपणे चित्रकलेवर कधी भर दिलाय असे झालेच नाही. पेन्सिल स्केच बद्दल कधीतरी ब्लॉग पोस्टही लिहिली एक. पण हौस काही टिकली नाही. पुढे काही वर्षांनी पुण्यात असताना मायबोलीवर जलरंग कार्यशाळेच्या पोस्ट वाचण्यात आल्या. त्या पाहून मग पुन्हा नवीन जलरंग, हँडमेड पेपर, ब्रश हे साहित्य व्हिनस मधून घेऊन आले. त्या कार्यशाळेच्या पहिल्या चारेक भागांपर्यंत नियमित शिकण्याचा प्रयत्नही केला. त्यापुढे काही नियमितपणा टिकला नाही आणि नेहमीप्रमाणे तेही बंद पडले.
आता तिथेच असताना दिवाळीच्या वेळी मैत्रिणीने दिवे रंगविण्याची कल्पना दिली आणि ते काम जोमाने सुरु झालं. गेले तीनेक वर्ष दिवाळीत पणत्या रंगविणे नियमित चालू आहे. त्यावरून छोटे फ्लॉवरपॉट रंगवून त्यांचा सेट बनवायची कल्पनाही सुचली. त्याप्रमाणे दोन रंगविलेही. अजून ४-५ बाकी आहेत पण तोवर दिवाळी आली आणि ते काम मागे राहिलं. मागच्या वर्षी काही अडल्ट कलरिंग पुस्तके घेऊन आले होते. त्यातही मन थोडे रमले. पण रंग भरण्यापेक्षा चित्र काढणे जास्त आवडत आहे असे वाटले. सोपे वाटले म्हणून वारली पेंटींगचाही प्रयत्न केला. एक छान वारली पेंटिंग बनवायचा विचारही आहे. थोड्या दिवसांपूर्वी मंडला डिझाईनचे कॅनवास बनवायची कल्पना सुचली आणि तेही करून पाहिलं. त्याचे मोठं कॅनवास बनवायचे होते तेही पूर्ण केले. बरेच दिवसांपासून daisy चे चित्रं काढायचे होते. गेल्या ५-६ दिवसांत लिहायचे सोडून ते करत बसले. आता ते पूर्ण झाल्यावर जरा शांत वाटत आहे.
या सर्वातल्या एकेकाचे फोटो इथे शेअर करतेय. एक तर नक्की आहे की अनेक चित्रकार, कलाकार मी पाहिले आहेत त्यामुळे मला त्यांच्यापुढे अगदीच सामान्य वाटते. पण त्याचसोबत चित्रांची, रंगांची नेहमी भूल पडते. आपणही प्रयत्न करावेत असं वाटत राहतं. आज पोस्ट लिहिताना जाणवलं की गेल्या १२-१४ वर्षांत वेळ मिळालाय तेंव्हा काही न काही करण्याचा प्रयत्न नक्की केलाय. या कलेशी नक्कीच काहीतरी नातं आहे माझं. अनेक मोठ्या कलाकारांसारखे खूप सुंदर जमत नसल्याने कल्पनाशक्ती आणि कलाकृती मर्यादीत राहतेच. ती मर्यादा नेहमी जाणवत राहते. प्रश्न असा आहे की या इच्छेचं काय करायचं? ती इच्छा पुन्हा पुन्हा वर येतेच.
खरंच पुढे काय शिकता येईल, एखादी दिशा कशी देता येईल यावर कुणी काही सुचवले तर खूपच छान होईल. अर्थात जे काही करायचे ते आठवड्यातून २-३ तास देता येईल असे हवे. त्यात सलगता आणि प्रगती दोन्हीही पाहता आले पाहिजे असे वाटते. तुमच्या सूचना जरूर सांगा. कदाचित हे असं अधे मध्ये काही न करता एक मार्ग मिळेल अशी अपेक्षा आहे.
Thank you.
विद्या भुतकर.
हे कवितेच्या वहितले एक पानः
पुढे पेन्सिल स्केचचा सरावः
पणत्या रंगविणे
कलरिंग बुक
डूडल्स
नवे चित्र
छान आहे सर्व. इच्छा झाली की
छान आहे सर्व. इच्छा झाली की ती पुर्ण करने महत्वाचे. त्यातूनच नविन शिकत रहायचे.
विद्या, ह्या प्रश्नाचं उत्तर
विद्या, ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त सराव, सराव आणि सराव. कधीही चित्र काढायचा मूड झाला तर लगेच काढायला बसायचं. अगदी डूडल करत राहिलं तरी चालेल. तुम्हाला जे मिडीयम आवडते त्याचाच सराव करत राहिले तर हात चांगला बसतो. चित्रकलेचे सामान शक्यतो पटकन हाताशी येईल अश्या जागी ठेवा म्हणजे शोधण्यात वेळ जायला नको.
पुढिल पेंटिंगसाठी शुभेच्छा!
विद्या, तुम्ही मला खुप आवडता.
विद्या, तुम्ही मला खुप आवडता. i can see my idol in u.
असले उद्योग करायला मला पण खुप आवडतात.
मस्त आहेत सगळीच चित्रं.
मस्त आहेत सगळीच चित्रं. चित्रकला, रंगवणं हे नॉट माय चहाचा कप. आमच्याकडे एक चित्रकार आहे घरात. पण स्वतः कधी शिकावं असं वाटलं नाही.
तू सतत काहीतरी करत स्वतःला बिझी ठेवतेस ह्याचं कौतुक वाटतं.
Thank you all.
Thank you all.
खरेच ही पोस्ट लिहिताना जाणवले आहे की एक आवड म्हणुन याबाबत काहीतरी करायची इच्छा खूपच आहे. काहीतरी मार्गदर्शन मिळायची अपेक्शा आहे.
मॅगी, थँक्स.
मस्त मस्त आनि मस्तच सर्वच
मस्त मस्त आनि मस्तच सर्वच अप्रतिम. नवे चित्र, पेन्सिल स्केच, आणि कविता विशेष आवडलि कलरिंग बूक हि अप्रतिम
साष्टांग नमस्कार ___/\___
लय भारी सगळेच पैंटिंगस भारी
लय भारी सगळेच पैंटिंगस भारी आहेत. टॅलेंटचा खजिनाच आहे तुमच्याकडे. एखादी गोष्ट आवडणे ह्यापेक्षा आवड पूर्ण करणे महत्वाचे नाहीतर बरेचजण मला हे आवडत पण हल्ली वेळच मिळत नाही वगैरे सबब देतात. बाकी तुमच्या आवडीला शुभेच्छा} आणि पु ले शु
Thank you Mr Pandit and
Thank you Mr Pandit and Akshay.
सर्वच सुंदर.. पण पेन्सिल
सर्वच सुंदर.. पण पेन्सिल स्केच जास्तच आवडलं !
कलरबुक मस्त झालेय. अशी
कलरबुक मस्त झालेय. अशी ग्राफीकल बॅक्ग्राउंडस तयार करुन खूप ठिकाणी वापरता येतील. पेन्सिल स्केच पण छान झालेय. थ्रीडीचा इफेक्ट परफेक्ट.
छान. पणत्या, पेन्सील स्केच,
छान. पणत्या, पेन्सील स्केच, कवितेचं पान आवडले.
सुंदर आहे सर्व. सर्जनशील आहात
सुंदर आहे सर्व. सर्जनशील आहात.
सुंदर आहे सर्व. >> + 1
सुंदर आहे सर्व. >> + 1
सुंदर आहे सर्व. सर्जनशील आहात
सुंदर आहे सर्व. सर्जनशील आहात. >>>> हो ना, अगदीच.
लेख वाचुन आणि कलाकृती पाहुन काही तरी क्रिएटीव्ह करायची उर्मी आली आहे.