श्रुतीने फोनकडे नजर टाकली. सारिकामावशीचा अजून एक मेसेज येऊन पडला होता. "चार वाजता. वेळेवर पोच. पत्ता.."
तिने स्क्रीनच्या कोपर्यातल्या घडयाळाकडे नजर टाकली. तीन. अजून वेळ होता. तरी तिने कामं आवरायला सुरुवात केली. लवकर जायचं असल्याचं बॉसला सांगितलं होतं तरी आसपासच्या मंडळींच्या भुवया उंचावल्याच. "डेंटिस्टची अपॉईंटमेंट आहे-" तिने सांगितलं आणि काढता पाय घेतला.
ठरलेल्या कॉफीशॉपकडे रिक्षा चालली होती. आपण लग्नासाठी कोणाला भेटायला जातोय ते आता बर्याच अंतराने- शेवटची अशी भेट जवळजवळ दहा महिन्यांपूर्वी होती- तिच्या डोक्यात चक्र चालू होतं. हा मुलगा- आता पस्तिशीच्या पुढे पोचलेल्या माणसाला मुलगा म्हणावं का- पण तरी अशा वेळी मुलगाच म्हणतात- माधवकाकांचा म्हणजे सारिकामावशीच्या यजमानांचा ऑफिसमधला कलिग. म्हणून मावशीनेच भेट ठरवली होती. पत्रिकाबित्रिका सगळं तिने बघितलं होतंच. मुलाचा बायोडेटा व्हॉट्सअॅपवर श्रुतीला पाठवलाही होता. त्यातला फोटो डाऊनलोड झाला नव्हता पण ठीकच आहे- आता प्रत्यक्ष भेटतोच आहोत.
"मॅडम पुढे सगळा जॅम आहे- इथेच उतरा!" रिक्षावाल्याने फर्मान सोडलं. पैसे देऊन ती उतरली. काय हे मे महिन्यातलं रणरणतं ऊन..खरंतर तिला कॅब मिळेल असं वाटलं होतं पण आमचं नशिब हे असंच. तरी बरं इथपर्यंत तरी रिक्षा मिळाली. कॉफीशॉपपर्यंत तंगडतोड करत पोचेपर्यंत श्रुती घामाघूम झाली होती, दमली होती, वैतागली होती. चेहरा रापला असेल, धुळीने भरला असेल. ओह गॉड. या 'मुलाशी' लग्नबिग्न होणार नसलं तरी अगदीच बावळट दिसायची तिची इच्छा नव्हती.
कॉफीशॉपच्या एसीत जरा तिच्या जिवात जीव आला. पाणी प्यायल्यावर तरतरी आली. तेव्हढयात त्या मुलाचाही 'पोचतोय' असा मेसेज आला. सौमित्र नाव त्याचं. तो आला आणि तिच्याकडे गोंधळूनच बघू लागला. तिनेही आधी जरा तिरप्या नजरेने आणि मग धास्तावून थेटच त्याचा चेहरा निरखला. ओह नो नो नो नो. हा..हा सौमित्र? सॅम? राजिवचा मित्र सॅम? अरे देवा!
आता अजून काय शोभा व्हायची शिल्लक होती? राजिवचे जे असंख्य ग्रुप्स होते व त्यात अगणित मित्र होते त्यात हाही एक होता. म्हणजे याला तिच्या आणि राजिवच्या बद्दल माहीत असणार. राजिवने तिला सोडून देऊन दुसर्याच मुलीशी लग्न केलं व अमेरिकेत सेटल झाला हेही माहीत असणार.
"श्रुती - I swear I had no idea-मला तेव्हा तुझं आडनाव माहीत नव्हतं त्यामुळे आता लिंक लागली नाही."
"इट्स ओके. मलाही तुझं नाव सॅम इतकंच माहीत होतं. मलाही नाही कळलं."
"बट दॅट वॉज- माय गॉड- दहा वर्षं झाली. तू लग्न का नाही केलंस इतकी वर्षं?"
"नाही भेटला कोणी मनासारखा."
सॅम- नव्हे- सौमित्रने तिच्याकडे नजर टाकली आणि त्याच्या चेहर्यावर सगळं कळल्याचं सांगणारी पुसट स्मितरेषा आली.
"राजिवने असं केलं म्हणून तू लग्न केलं नाहीस. धन्य आहेस. आजकाल कशा असतात मुली प्रॅक्टिकल..आणि तू कशी आहेस..चेहरा बघ कसा झालाय तुझा मी राजिवचं नाव घेतल्यावर!"
"यू नो व्हॉट सॅम- धिस इज ऑकवर्ड!"
"पण असं असायलाच हवं असं नाही. म्हणजे तेव्हा आपली जेमतेम हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. राजिव वॉज अॅन इडियट. त्याने तुझ्याबाबतीत जे केलं ते चूकच होतं. माझा तर तेव्हापासूनच काही संपर्क नाहीये त्याच्याशी. तेव्हा तरी काय- आमचा कॉमन मित्र होता कुणाल त्याच्यामुळेच टॉलरेट करायचो मी राजिवला."
तिला एकेक जुनं आठवत होतं. सगळे राजिव नामक ग्रुपमधील हिरोच्या अवतीभोवती जमले असले तरी राजिवला अजिबात भाव न देता पुस्तकांत डोकं खुपसून बसणारा, पुस्तकांवर भरभरुन बोलणारा हा एरव्ही अबोल असणारा मुलगा. कधीतरी गायचा आग्रहही झाला होता तेव्हा चक्क मराठी गायला होता तो. रेअर होतं ते त्या ग्रुपमध्ये. तेव्हा जाडया, ढापण्या होता तो. आता मात्र छान फिट दिसत होता. चष्मा होता अजूनही पण तो चांगला दिसत होता आता त्याच्या चेहर्यावर. एकूणच तेव्हाच्या मानाने एकदम स्मार्ट - जवळपास हँडसमच दिसत होता आता.
"राजिवने जे केलं म्हणजे काय? वेगळे झालो आम्ही. पण प्लॅटोनिक होतं आधीही. इट्स नॉट लाईक-"
"आय नो व्हॉट यू मीन. प्लॅटोनिक होतं तरी दहा वर्षं काढलीस त्याच्या आठवणीत. तू अजून राजिवला विसरली नाहीस - सो टिपिकल ऑफ यू. "
"तू पण आहेस की सिंगल अजूनही."
"मी इतका ट्रॅव्हल करत होतो गेली काही वर्षं की कुठे सेटल झालोच नाही. आता गेली तीन वर्षं पुण्यात स्थायिक आहे, आमचा फ्लॅट होताच इथे आधीपासून तिथेच राहतो, पण आता 'सर्च' चालू आहे! शिवाय- मध्ये आईच्या आजारपणात काही काळ गेला. असो. तू कॉफी घेणारेस ना?"
हे मावशीने सांगितलं होतं..जाण्यापूर्वी तीनेक वर्षं त्याची आई खूप आजारी होती- त्याने तिची खूप सेवा केली, खूप वेळ दिला आईला वगैरे.
मग कॉफी आली. सध्या तू काय करतोस, मी काय करते, मावशी-काका कसे त्याचे फॅमिली फ्रेंड / स्थानिक पालकच झाले आहेत, बाहेर काय ऊन प्रचंड आहे इथपासून ते खरं प्रेम विसरणं कसं अवघड आहे, आयुष्यात एका जागी स्थिरता हवी वगैरे वगैरे फिलॉसॉफिकल गप्पा झाल्या.
नंबर एक्स्चेंज करुन, पुन्हा भेटायचं ठरवून दोघं बाहेर पडले, त्याने तिला मावशीच्या घरी सोडलं. "माझा होकार आहे, तू हवा तितका वेळ घे निर्णय घ्यायला" हे सांगून पुन्हा कारमध्ये बसला व निघूनही गेला. आता ऊनही गेलं होतं. छान गारवा होता चक्क हवेत.
श्रुतीला गणित सुटल्यासारखं वाटत होतं. राजिवमुळे दुसर्या कोणाला स्वीकारु न शकणं..पण सौमित्र त्या भूतकाळाचा साक्षी होता..आणि त्याने हे किचकट गणित सोपं करुन टाकलं होतं. दहा वर्षं उन्हात चालल्यावर अचानक सुखद सावलीत ती शिरली होती. मावशीला तिचा चेहरा पाहून काय कळलं कसं कळलं काय माहीत, तिने गोडाचा शिरा करायला घेतला.
आवडली... पोसिटीव्ह आहे... लोक
आवडली... पोसिटीव्ह आहे... लोक मोव ऑन वयाला इतका वेळ का लावतात कळत नाही...
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
शॉर्ट अँड स्वीट. मस्त आहे.
शॉर्ट अँड स्वीट. मस्त आहे. आवडली.
खूप छान. आव्डली.
खूप छान.
आव्डली.
शॉर्ट अँड स्वीट.... आवडली.+१
शॉर्ट अँड स्वीट.... आवडली.+१
छान आहे! आवडली.
छान आहे! आवडली.
चांगली आहे कथा.
चांगली आहे कथा.
Waah, , khup chan
Waah, , khup chan
मस्त....!
मस्त....!
छान आहे, आवडली
छान आहे, आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच जमलीए...सुट्सुटीत एकदम
छानच जमलीए...सुट्सुटीत एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Mast, khup awadli
Mast, khup awadli
मस्त...खुप छान
मस्त...खुप छान
आवडली
आवडली
खुप गोड होती कथा
खुप गोड होती कथा
Cute, positive story. Nicely
Cute, positive story. Nicely written. Keep writing.
हा हा आवडली
हा हा आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे गोष्ट! सुखांत आवडला.
छान आहे गोष्ट! सुखांत आवडला.
मस्त शॉर्ट अअॅड स्वीट
मस्त शॉर्ट अअॅड स्वीट
सर्वांना धन्यवाद छान
सर्वांना धन्यवाद छान कमेंट्ससाठी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मायबोलीवर लिहिलेली ही पहिलीच कथा. तुमच्या प्रोत्साहनामुळे नक्कीच उत्साह वाढला आहे.
दहा वर्ष मुव्ह ऑन व्हायाला
दहा वर्ष मुव्ह ऑन व्हायाला ठीक वाटले नाही.
छान आहे, आवडली
छान आहे, आवडली
क्युट.
क्युट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच जमलीए...सुट्सुटीत एकदम >
छानच जमलीए...सुट्सुटीत एकदम >>> +१
धन्यवाद !
सर्वांचे धन्यवाद !
मीरा, दहा वर्षं जास्त आहेत खरी पण असू शकतात ना अशीही माणसं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मायबोलीवर लिहिलेली ही
मी मायबोलीवर लिहिलेली ही पहिलीच कथा. >>> वाटत नाही, फार छान लिहिली आहे. कथेतील नायिकेसारखे फार वेळ घेतलात पहिली कथा लिहायला आणि लिखाणातून व्यक्त व्हायला .. आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान गोड कथा
छान गोड कथा
छान
छान
सुंदर ।।
सुंदर ।।
Pages