Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल फर्डिनँड पाहिला.. टायगर
काल फर्डिनँड पाहिला.. टायगर ला डावलून
(ट्यूबलाईट चा भयाण अनुभव गाठीशी असल्याने).
अजून एक सुंदर अॅनिमेशन मूव्ही पाहिल्याचे समाधान वाटले.
मुला मुळे हल्ली बरेच अॅनिमेशन मूव्ही पाहिले गेले. पीट्स ड्रॅगन, झूटोपिया, जंगल बूक, कोको आणि आता फर्डिनँड ! मजा येते हे सिनेमे पाहताना, अॅनिमेशन ची क्वालिटी जबरदस्त चांगली होऊ लागली आहे, बारीक सारीक डिटेलिंग पण सुंदर असतं !
एकदम बच्चा एंजॉय करेगा, उसका माँ-बाप भी एंजॉय करेगा कॅटेगरी !
कीप क्वाएट - इंटरेस्टिंग
कीप क्वाएट - इंटरेस्टिंग माहिती!
फर्डीनांड मीपन बघीतला..
फर्डीनांड मीपन बघीतला..
एका खर्या बुलवर आधारीत स्टोरीलाईन आहे ही..
पूर्णच्या पूर्ण नाही फक्त इन्स्पीरेशन.. अधिक एका स्टोरी बुक वरुन घेतलेली कथा..
तो खरा फर्डिनांड आणि त्याची ह्युमन Juan पन छानच आहे..
आम्ही टायगर बघून आलो रे!
आम्ही टायगर बघून आलो रे!
भाईजान आणि त्या अबू असिम साठी बघाच .
बाकी सविस्तर नंतर
मी पण पाहिला , टायगर जिन्दा
मी पण पाहिला , टायगर जिन्दा है
पहिल्या' एक था टायगर' ची अजिबात सर नाही पण सलमान खान फॅन्सनी एकदा नक्की बघावा असा.
टु मच डोस ऑफ इंडीया पाक दोस्ती , राष्ट्रिय एकात्मता पण तरीही सलमान खानच्या स्क्रीन प्रेझेन्स मुळे टाळ्या शिट्ट्या दंगा करून थिएटर डोक्यावर घ्यायचे भरपूर सीन्स !
टायगर रायडींग हॉर्स बघायला मज्जा आली.
सब कुछ सलमान खान, कॅट अजिबात लक्षात रहात नाही.
परेश रावळ चा रोल खरं तर मस्तं आहे, अजुन थोडा मोठा हवा होता त्याचा रोल , भारी जमलाय त्याचा गेटप आणि र्क्टींग मधे आहेच तो बापमाणूस !
>>टु मच डोस ऑफ इंडीया पाक
>>टु मच डोस ऑफ इंडीया पाक दोस्ती , राष्ट्रिय एकात्मता >> नssssssssssको.
Tiger zinda hai frustrated
Tiger zinda hai frustrated tweets
http://theindianidiot.com/tiger-zinda-hai-savage-reviews/?utm_source=Tro...
काल मी ranjhanaa पाहिला.
काल मी ranjhanaa पाहिला. पहिला भाग बरा आहे पण अभय देवलच्या एन्ट्रीनंतरचे पुढचे सगळे अति अविश्वसनीय आहे. काहीच्याकाही आहे सगळे.
धनुषने अभिनयात कमाल केलीय. कुठेही तो जराही चुकलेला नाहीय. लग्नाच्या मांडवात घुसून तो अभय देवलला उघडा पाडतो तेव्हा सोनम कपूरच्या चेहऱ्यावर फारसे काहीही दिसत नाही पण नेमकी तीच भावना जेव्हा सोनम त्याला खूप जवळ बोलावून तोंडावर थुंकते तेव्हा धनुषच्या वाट्याला येते. एकही शब्द न बोलता तो चेहऱ्याने जे बोलतो ते अप्रतिम. शेवटच्या दृश्यात तो सोनमशी जे बोलतो तेव्हाही चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम. तो चेहऱ्यावर जे दाखवतो त्यामागची भावना नंतर कळते तेव्हा (माझ्या) लक्षात आले तो असे का करतो ते.
फक्त धनुषसाठी सहन करण्याजोगा चित्रपट.
मी पण पाहिला टायगर जिंदा है.
मी पण पाहिला टायगर जिंदा है.
आवडला. सबकुछ भाईजान!
भाभी पण ठीक आहे. जराssssssssशी अॅक्टींग पण केलीये तिने.
टु मच डोस ऑफ इंडीया पाक दोस्ती>>>>>>+१
Finally टायगर जिंदा पहिला,
Finally टायगर जिंदा पहिला, बेस्ट अकटिंग केलीय भाई ने.
अजून 1दा बघणार थेटरात.
बरेली की बर्फी, हिंदी मिडियम
बरेली की बर्फी, हिंदी मिडियम आणि इत्तेफाक हे ३ सिनेमे पाहिले सुट्टीच्या कृपेने.
बर्फी फार भारी! इत्तेफाक पण काही ग्रेट नसला तरी एकदा पाहणेबल.
हिंदी मिडियम बद्दल फार अपेक्षा होत्या. पहिला अर्धा - पाउण तास मजा आलीही पण उरलेला अर्धा भाग संपता संपेना. इर्फान हाती लागलाय तर वसूल करा म्हणून काहीही करून घेतलंय असे वाटले त्याच्याकडून. उगीच त्यांचे झोपडपट्टीत रहायला जाणे , राशन, पाणी, फॅक्टरीत नोकरी, धट्टीकट्टी गरिबी वि. लुळीपांगळी श्रीमंती,गरीब शाळेतले गुणी विद्यार्थी वगैरे प्रकार डॉक्युमेन्टरी असल्यासारखे येतात. पार फसलाय अर्धा भाग. बोरिंग झाले फार.
स्टार वॉर्स द लास्ट जेडाय
स्टार वॉर्स द लास्ट जेडाय पाहिला. स्पेस मारामारीचे सीन अतोनात मस्त. लूक राह्तो ते बेट फार आवड ले. वेगन वान प्रस्थाश्रम घेउन राहायला पर फेक्ट आहे. पण इथले त्या मुलीचे ट्रेनिंग वाले सीन्स फार फूटेज खातात व जरा बोअर आहेत.
सर्व मारामार्या परफेक्ट.
नेट्फ्लिक्स वर विल स्मिथ चा ब्राइट ट्रेलर बघून व जुन्या लॉयल्टीला स्मरऊन लिस्टीत घालून ठेवला होता. अर्धा कसातरी बघितला. चित्रपटाचे संगीत मस्त मस्ताहे व ब्लॅक होमी कॉज हाय्लाइट केले आहे. ह्या जमे च्या बाजू आहेत.
पण पिक्चर अतोनात फालतू आहे. कुंडल कराने पुढील लेख ह्यावर लिहावा असा माझा संदेश आहे.
हिंदी मिडीयम मलाही असाच फुस्स
हिंदी मिडीयम मलाही असाच फुस्स वाटला. बरेच दिवस बघायचा आहे म्हणून वाट बघत होतो. बघितल्यावर अपेक्षाभंगच झाला.
कुंडल कराने पुढील लेख ह्यावर
कुंडल कराने पुढील लेख ह्यावर लिहावा असा माझा संदेश आहे.>>> कोण कुंडलकर?
मी सद्ध्या X-Men Marathon मधे
मी सद्ध्या X-Men Marathon मधे होती..
.
सगळी सिरीज बघीतली दोन दिवसात लेटेस्ट लोगन सोडून.. ह्यु ला/लोगन ला मरताना बघवत नाही मला
थेटरात बघुन आली होती लोगन..
अमा, नेफिवर तिकडे "गॉडलेस"
अमा, नेफिवर तिकडे "गॉडलेस" आली असेल तर पाहा. भन्नाट वेस्टर्न आहे.
इततेफक खरच चांगला आहे।
इततेफक खरच चांगला आहे।
चप्रस, कान्याचा योग्य वापर
चप्रस, कान्याचा योग्य वापर करा हो!!! ध चा मा होतोय ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
मी इत्तफाक पहायला घेतला, फार
मी इत्तफाक पहायला घेतला होता मागे एकदा, काही उत्कंठावर्धक वाटेना मग् बंद करून रुद्रमचे ५-६ एपिसोड्स पाहिले मग समाधान झालं थ्रिलर पाहिल्याचे
इत्तेफाक तसा वाइट नाहीये, पण
इत्तेफाक तसा वाइट नाहीये, पण ओल्ड फॅशन्ड आहे. प्रेडिक्टेबल हाताळणी. थोडा ट्विस्ट आहे शेवटी पण तोही अट्टल थ्रिलर ऑडियन्स ला फार चकित करणार नाही .
टायगर जिंदा है मध्ये त्या
टायगर जिंदा है मध्ये त्या आयसिसच्या दहशतवाद्याची भूमिका कोणीं केलीये ? भारीच acting केलीये .
बाकी चित्रपट अचाट आणि अतर्क्य आहे . अमेरिका उगाच ते एवढे ड्रोन ऍटॅक वगैरे करते .त्या पेक्षा भाईला पाठवायचं की ! काम तमाम
टायगर जिंदा है मध्ये त्या
टायगर जिंदा है मध्ये त्या आयसिसच्या दहशतवाद्याची भूमिका कोणीं केलीये ? भारीच acting केलीये . >>> हो हो . मस्तच आहे तो . किती थंडपणे क्रूर दाखवला आहे तो . " शूत हर !" .
गूगलल्यावर कळल की तो ईराणी अॅक्टर आहे. यापूर्वी तो "बेबी" मध्ये काही सेकंदासाठी दिसला होता . अल्ताफचा हॉस्पिटलमध्ये "मॅनेज" केलेला डॉक्टर म्हणून होता तो .
अमा, नेफिवर तिकडे "गॉडलेस"
अमा, नेफिवर तिकडे "गॉडलेस" आली असेल तर पाहा. भन्नाट वेस्टर्न आहे.>> शोधते. सध्या उना बाँबर मॅन हंट बघून झाली. पार्टी वीक असल्याने बसून बघणे होत नाहीये. नये सालमे देखेंगे. नव्या वर्शात पूर्ण स्टारवॉर्स व पूर्ण गेम ऑफ थ्रोन्स असा सं कल्प आहे. ( सॉरी इथे थोडे अवांतर) स्टार वॉर्स चा वेगळा धागा काढते.
अरे हो ! बरोबर स्वस्ति .
अरे हो ! बरोबर स्वस्ति .
पूर्णा - Courage has no limit
पूर्णा - Courage has no limit पाहिला विमानात. खूप आवडला.
सत्यकथा आहे.
पूर्णा Mt Everest चढणारी सर्वात लहान मुलगी, वय वर्षे १३. अगदी गरीब घरातून वर आलेली.
पूर्णाचे, तिच्या चुलत बहिणीचे roles मस्त.
राहुल बोसचेही काम छान.
शुभ मंगल सावधान
शुभ मंगल सावधान
एक चांगला चित्रपट होता होता......
झेलम धन्यवाद. पूर्णाचे काम
झेलम धन्यवाद. पूर्णाचे काम जिने केले आहे ती आदिती इनामदार, माझी नातेवाईक आहे.
थकलेल्या वुल्वरीनचा शिणलेला
थकलेल्या वुल्वरीनचा शिणलेला चित्रपट "लोगन"
हॉलिवूडमध्ये सूमार चित्रपटांची कमतरता नाही. कदाचित तंत्रामुळे ते चित्रपटही सुसह्य वाटत असावेत. पण अगदी अलिकडे एक्समेन सिरिजचे आधीचे चित्रपट आवडल्याने उत्सुकतेपोटी "लोगन" पाहिला आणि घोर निराशा झाली. बाँडपट पाहायला गेल्यावर जर तुम्हाला माहेरची साडी चित्रपट पाहावा लागला तर कसं वाटेल? आपल्याकडे हिन्दुमुस्लिम ऐक्य ज्याप्रमाणे हिन्दी सिनेमावाल्यांचा आवडता (आणि काहीवेळेला धंद्यासाठी फायदेशीर) मसाला आहे त्याचप्रमाणे एखादी सिरिज लोकप्रिय झाली म्हणजे त्यातील जुन्या प्रसिद्ध पात्रांना म्हातारे करून त्यांचे थकलेपण दाखवणे आणि तरीही त्यांना तरुणांपेक्षा जास्त हुशार आणि चपळ दाखवणे हे हॉलिवूडचा एक ठरलेले तंत्र आहे. डाय हार्ड, बाँडपट सारे काही त्याच वाटेने गेले. इथे तर लोगनला मरणच हवंय त्यामुळे मुद्दाम काही करण्याची गरजच नाही.
आपल्याकडे नायिका सोडून गेली कि हिरो दारु प्यायला लागतो आणि मग त्याचं जे काही होतं, त्याच आवेशात लोगन हा संपूर्ण चित्रपटभर वावरला आहे. सतत लोकांवर डाफरत राहणे हा एकसूत्री कार्यक्रम त्याला दिलेला आहे. एकेकाळी सर्व म्युटन्टसना सांभाळणारा त्यांचा गुरु पॅट्रीक स्टुअर्ट तर रिटायर्ड झालेल्या आणि सतत मूळव्याधीचा त्रास असलेल्या म्हातार्यासारखा चिरचिरत राहतो. त्या पात्रातील हवा पारच काढून टाकली आहे. चित्रपटातील लहान मुलगी म्हणजे गोड काम करणारी असा आपला समज हा गोड गैरसमज आहे हे येथे लोगनच्या मुलीचे काम करणार्या अभिनेत्रीने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या कामामुळे अनेकदा आपलीच चीडचीड होते. तांत्रिक बाबीही यथातथाच वाटल्या. अभिनयाबद्दल काय सांगणार? कसलेले अभिनेते वाईट अभिनय करीत नाहीत. वेळ मारून नेतातच. मात्र कथेत दम नसल्याने सारे काही ओढून ताणून आणल्यासारखे वाटते. यथावकाश लोगन मरतो आणि आपल्यालाही सुटल्यासारखे वाटते.
- थकलेल्या वुल्वरीनचा शिणलेला
- थकलेल्या वुल्वरीनचा शिणलेला चित्रपट "लोगन"....
- आपल्याकडे नायिका सोडून गेली कि हिरो दारु प्यायला लागतो आणि मग त्याचं जे काही होतं.....
- तर रिटायर्ड झालेल्या आणि सतत मूळव्याधीचा त्रास असलेल्या म्हातार्यासारखा चिरचिरत राहतो.....
Submitted by अतुल ठाकुर
>>>>>>>>>>>
खुप हसलो यावर...
मुरांबा सिनेमा अजिबात नाहीं
मुरांबा सिनेमा अजिबात नाहीं आवडला. किती रटाळ. संपतच नव्हता आणि अचानक संपला. मिथिला सोडून सिनेमात काही आवडलं नाही आणि मिथिला पण त्या वेब सिरीज मध्ये जास्त छान वाटली, ह्या सिनेमापेक्षा. खोदा पहाड निकला चुहा कारण ब्रेकप च. तिनी तीन वर्षे वाट पाहिली म्हणजे किती इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स असणार तिला. आणि तरीही त्याने ब्रेकप केला. तिला अजून वाट बघायची तयारी होती, बापरे!
अंनिव्हर्सरी चे पाहुणे म्हणून अचानक लोंढा आला घरांत! आणि आल्या आल्या लगेच दारात हिरोच्या नोकरी ची चौकशी.
Pages