सुट्टीच्या दिवशी सकाळ सकाळी ऊन घरात आलं. अजूनही थंडी होतीच तशी. उठून उत्साहाने मस्त झाडून घर साफसूफ केलं. सगळ्यांची तब्येत जरा नाजूकच होती. मग गरम गरम मुगाच्या डाळीची साधी खिचडी बनवली. तूप आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत परत परत घेऊन, पोटभरून खाल्ली. आणि सकाळी आवरलेल्या गादीवर,अंगावर पांघरूण घेऊन, बाहेरून येणाऱ्या उन्हाला पडद्यांनी अडवत, आडवी झाले . भरलेल्या पोटाने, डोळे जड झाले. उघडायचं म्हंटलं तरी पापण्यांवर मणामणाचे दगड बसले होते.
कधीतरी कुठल्यातरी क्षणी झोप लागून गेली. जाग आली तेंव्हा ३ तास उलटून गेले होते. पोरांनी एकदाही उठवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी काय केलं हेही माहीत नाही. उन्हं उतरतीला आली होती. आळस द्यावा तितका कमीच. उठल्यावर एकदम अनेक वर्षांनी अशी मस्त झोप झाल्यासारखं वाटलं. गरम गरम चहा घेतला आणि जागी झाले.
खरंच, स्वर्गसुख यापेक्षा अजून काय असतं?
विद्या भुतकर.
मस्त लेख नेहमीप्रमाणेच...
मस्त लेख नेहमीप्रमाणेच...
IMO - Saturday morning हेच खरे स्वर्गसुख...
हे सगळं स्वप्नात होतं का ?
हे सगळं स्वप्नात होतं का ?
वाचूनच मस्त वाटले
वाचूनच मस्त वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्री, नाही. उलट चहा पण
श्री, नाही.
उलट चहा पण नवर्यानेच केला.
म्हनुन्च म्हटले ना, स्वर्ग्सुख!
thank you for the comments.
विद्या.
ओह , ते शेवटचं वाक्य < गरम
ओह , ते शेवटचं वाक्य < गरम गरम चहा घेतला आणि जागी झाले. > वाचुन थोडा गोंधळलो.
छान लिहिलयं.
असे स्वर्गसुख अनुभवल्याचे
असे स्वर्गसुख अनुभवल्याचे क्षण जपून ठेवावे. कधी फार त्रासदायक गोष्टी घडू लागल्या तर मधून मधून आठवावे, बरे वाटते.
रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या गोष्टींवर लिहायला आवडते.
सध्या मी असेच एक पुस्तक वाचतो आहे - पॉण्ड. लेखिका क्लेअर-लुइस बेनेट. रिव्हरहेड बुक्स, न्यू यॉर्क.
स्वर्गसुख किंवा दु:ख नव्हे पण नुसतेच तिचे विचार, साध्या रोजच्या आयुष्यात घडणार्या गोष्टींच्या बाबत, क्षुल्लक गोष्टी, पण किती ते विचार त्याबद्दल! तरी पण वाचतोच आहे.
असे स्वर्गसुख अनुभवल्याचे
असे स्वर्गसुख अनुभवल्याचे क्षण जपून ठेवावे. कधी फार त्रासदायक गोष्टी घडू लागल्या तर मधून मधून आठवावे, बरे वाटते.>> +१. अगदी खरे आहे.
धन्यवाद.
किती बोर
किती बोर
मस्त ! अशा छोट्या छोट्या
मस्त ! अशा छोट्या छोट्या गोष्टींमधेच तर स्वर्गसुख !
Aashu, sorry for your
Aashu, sorry for your disappointment.
मनिमाऊ, धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
खरंच, स्वर्गसुख यापेक्षा अजून काय असतं? >>>> खरंच