१. आवाहन…
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते. बघ तर खरं, मजा येईल.”
पुजाने वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्त्या बाहेर काढल्या. पांढऱ्या रंगाची कसलीतरी भुकटी बाहेर काढून भराभर वेगवेगळे आकार रेखाटायला सुरुवात केली. नंतर त्या आकृत्यांमध्ये तिने वेगवेगळ्या ठिकाणी मेणबत्त्या ठेवल्या अन पेटवल्या.
“ भारी वाटतंय यार हे. हॅम्लेटच्या बापाच्या भूताला बोलवू चल.”
दिशा मिश्किल हसत म्हणाली
“तुला गंमत वाटतीये का ही.”
“नाही बाबा आपण तर एकदम सिरीयस आहे.” दिशा तोंडाचा चंबु करत म्हणाली. पुजाने तिकडे दुर्लक्ष केलं. अजून बरचसं सामान मांडून तिने विधिवत सगळी तयारी पूर्ण केली. टेबलाच्या दोन्ही बाजूंनी दोन खुर्च्या मांडल्या.
“झालं सगळं. बैस इथे.” पुजा एका खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली.
“मी कशाला, तू बोलाव न.”
“मग मंत्र कोण म्हणणार ? मला तुझी मदत लागेल. जवळपास जर एखादं भूत फिरत असेल तर त्याचं आपण आवाहन करू, बैस पटकन.”
“आणि बाटलीतही बंद करून ठेवू, ते पछाडलेला मुव्हीसारखं. मजा येईल.”
दिशा खुर्चीवर बसत म्हणाली.
“ आता या गोळ्याच्या वर हवेत तळहात धर, अहं टेकवू नकोस. अर्धा फूट वर, ह बरोबर.”
पुजा तोंडाने मंत्र पुटपुटत तिच्याजवळ आली. ते अगम्य भाषेतले मंत्र वातावरणात घुमू लागले. दिशाच्या पाठीमागे येऊन तिने तिचं मनगट हातात पकडलं अन काही लक्षात येण्याच्या आतच दुसऱ्या हातातल्या चाकूने सपकन तिच्या तळहाताला चिरा दिला.
दिशा वेदनेने कळवळली. पण पुजाने तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिचा मंत्र म्हणण्याचा आवाज वाढला होता, टिपेला पोहोचला होता.
आता तो गुढगोल निळसर प्रकाशाने चमकू लागला, त्यावर सांडलेलं रक्त गायब झालं होतं. प्रकाश वाढला, वाढत गेला, मेणबत्त्यांच्या ज्योती हेलकावे घेऊ लागल्या अन काही क्षणांतच गपकन विझल्या. त्याचबरोबर पुजाच्या तोंडून बाहेर पडणारा मंत्रोच्चारही थांबला. सगळीकडे फक्त रहस्यमयी निळसर प्रकाश होता, तरीही आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. दिशाची मिश्किल हसणारी मुद्रा आता भीतीने काळवंडू लागली होती.
“दिशा S” काळजावर चरे उमटवणारा आवाज कानांवर पडला.
“क…कोण?”
काहीच उत्तर नाही
“दिशाSS “ यावेळचा आवाज जवळून आलेला
“क…कोण आहेस तू ?”
“आत्मा.” कुणीतरी कानात बोलतंय इतक्या जवळून ऐकू आलेला तो बर्फगार आवाज.
दिशाने चारिबाजूंने गरगर मान फिरवली पण कुणीच नव्हतं. पुजा डोळे मिटून बसलेली होती.
“तुझा मृत्यू कसा झाला ?” स्वतःला सावरत तिने खंबीर आवाजात विचारलं.
“कार अॅक्सीडेंट.”
“पुजा S हा जर प्रॅक्टिकल जोक असेल तर बंद कर प्लीज."
पण पुजा मात्र काहीच उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती.
कुणीतरी आपल्या अगदी जवळ आहे असा आभास दिशाला होऊ लागला
"निघून जा इथून.” ती ओरडली
काहीच प्रत्युत्तर नाही
“आय से गो टू द हेल.”
“घाबरू नकोस बाळा…. मी तुझी आई आहे.”
आत दिशा धाय मोकलून रडत होती अन बाहेर हातात टोपी अन मान खाली घातलेले इन्स्पेक्टर ‘तिला ही बातमी कशी सांगावी’ या विवंचनेत फसले होते.
-------------------------------------------
२. पार्टी आणि ते दोघे
प्रमोशन झाल्याबद्दल निखिलने जंगी पार्टी ठेवली होती. सगळेजण आपल्या बायकामुलांसोबत ठेवणीतले पोशाख घालून आले होते. प्रत्येकाने उंची गिफ्ट्स आणले होते. आफ्टरऑल निखिल त्यांचा बॉस बनला होता. निखिल आणि त्याची बायको आलेल्यां पाहुण्यांचं अगत्याने स्वागत करत होते. कंपनीचे CEO आले अन पार्टीची शान वाढली. मंद संगीताच्या तालावर अन उंची मद्याच्या संगतीने अनौपचारिक गप्पा सुरू होत्या.
अन तेवढ्यात निखिलच्या पाच वर्षांच्या दोन जुळ्या मुलांनी हॉलमध्ये प्रवेश केला. ते दोघंही चक्क नागडे होते ! निखिल अन त्याच्या बायकोला मेल्याहून मेल्यासारखं झालं पण त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं.
ते दोघे आधी दबकत आले नंतर बिनधास्तपणे हिंडु लागले. नंतर जेवणाच्या टेबलांवर चढून तंगड्या वर करून नाचले, CEO च्या ढेरीवर बकाबक बुक्क्या मारल्या, नकली झाडांच्या कुंडीत भळाभळा मुतले. सर्वांनी बाहेर पडणारं हसू ओठांतच दाबलं. न राहवून शेवटी मुलांची आई त्यांना पकडायला धावली पण त्याआधीच त्यांनी हॉलबाहेर धूम ठोकली.
बाहेर पडता पडता एकजण दुसऱ्याला म्हणाला – “बघ म्हटलं नव्हतं, हे तेल लावल्यावर आपण अदृश्य होतो म्हणून.”
-----------------------------------------
मस्त !!
मस्त !!
छान
छान
मला पहिली कथा थोडीशी कळलेली
मला पहिली कथा थोडीशी कळलेली नाही . दुसरी मस्त आहे
मस्त
मस्त
भारी आहेत....
भारी आहेत....
पहिलेने दचकवलेले... दुसरीने मूड बदलवला
पहिल्या कथेने अंगावर काटा आला
पहिल्या कथेने अंगावर काटा आला. दुसरीने गंमत वाटली.
छान!
छान!
पण ' गुलमोहर - विनोदी लेखन' ??
दुसरी विनोदी आहे की....
दुसरी विनोदी आहे की....
खुप मस्त
खुप मस्त
पहिल्या कथेने भिति वाटली. दुसरि मजेशिर होती.
दुसरी विनोदी आहे की.... >>
दुसरी विनोदी आहे की.... >> मला नै वाटली विनोदी. अदृश्य असल्यास माणूस मिस्टर इंडीयासारखे चांगले काहीतरी करेल की उगाच लोकांना त्रास देइल असा गंभीर प्रश्न पडला
पहिल्या कथेने अंगावर काटा आला
पहिल्या कथेने अंगावर काटा आला. दुसरीने गंमत वाटली. >>>> + १
दुसरी नाही कळली
दुसरी नाही कळली
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
जाई आणि प्राजक्ता तुम्हाला विपूवर संदेश पाठवला आहे.
दृश्य असल्यास माणूस मिस्टर
दृश्य असल्यास माणूस मिस्टर इंडीयासारखे चांगले काहीतरी करेल की उगाच लोकांना त्रास देइल
>> पाच वर्षांची मुलं आहेत ही. त्यांच्याकडून बालिश गोष्टींचीच अपेक्षा करणार :))
विनय, मला तुमची विपु आलेली
विनय, मला तुमची विपु आलेली नाही
आता बघा check करून
आता बघा check करून
पहिलीने खरंच अंगावर काटा आला.
पहिलीने खरंच अंगावर काटा आला.. बराच वेळ विचार घोळत होते डोक्यात...
दुसरी तितकीशी नाही कळली ... म्हणजे मुलांना उघड-नागडं का ठेवलं होत?
मयुरीजी, तुम्हाला विपू केलेला
मयुरीजी, तुम्हाला विपू केलेला आहे
पहिली आवडली... दुसरी नाही
पहिली आवडली... दुसरी नाही कळालि