तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला.
“आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात.
“आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ
“सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका
“जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन
“ते आपले मित्र असावेत.” भारत
“ही भारताची चाल.” पाकिस्तान
काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला-
“लढायला तयार रहा.”
यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला.
जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून-
किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले.
ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.
---------------------------------------------------------
ह्या कथेला नुकत्याच मिसळपाववर घेण्यात आलेल्या शतशब्दकथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
----------------------------------------------------------
मस्तच... काही तरी वेगळे आहे..
मस्तच... काही तरी वेगळे आहे... पारितोषिकासाठी अभिनंदन
अर्थात ही apocalypse (end of
अर्थात ही apocalypse (end of life ) आणणारी समस्या आहे असं मला वाटत नाही कारण मनुष्यप्राणी स्वतःला वाचवेल.>>> मनुष्याच्या शरीरात पण अगणित सुक्ष्मजिव राहत असतात,त्यांच्या वरही शरीर अवलंबून असत . कल्पना विलास करायला एक छान concept.
त्यानंतर लक्षावधी फार्मसी
त्यानंतर लक्षावधी फार्मसी इन्डस्ट्री, डॉक्टर्स उपासमारीने मेले!
फूड चेन मधला पायाच नाहीसा झाल्यावर वरील डोलारा कोसळायला कितीसा वेळ लागणार?
त्यांचे यान त्यांच्या ग्रहावर परत पोचण्या आधीच त्यांना कळले - पृथ्वी आता वस्ती करायला लायक झाली आहे.
काही हि हा
काही हि हा
Mala tar avadali khup
Mala tar avadali khup
Congratulations for first prize
Pages