Submitted by प्रफुल्ल सुर्वे on 23 March, 2017 - 15:01
कर्जमुक्त श्वासांची जेंव्हा तयारी होते.
दुप्पट अलगद दु:खाची ही उधारी होते.
त्या गरुडांचे भाग्य किती निष्ठुर म्हणावे,
अखंड तडफड हीच जयांची भरारी होते.
आग्रह सहवासाचा मी ही केला नव्हता,
दु:खच रमले. सुख नेमके फरारी होते.
संवादाचे सूर समजले निघण्यापूर्वी,
शब्द रेशमी सारे, संदर्भ विषारी होते.
लाख तडाखे लाटांचे सोसूनी परतलो.
नेम साधुनी लपले मित्र किनारी होते.
पुन्हा कशाला नियतीशी तो वाद नकोसा?
विजय शेलका होतो, मात्र हार करारी होते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह् वाह् वाह्...अत्यंत
वाह् वाह् वाह्...अत्यंत प्रभावी गझल!
त्यातही शेवटचे तीन शेर ज ब र द स्त!
बाकी,शेवटची ओळ संपादित केलीत हे बरे झाले!टायपो असावा असे वाटले होतेच पण मक्ता असावा म्हंटले तर अर्थ लागत नव्हता!
धन्यवाद सत्यजितजी, खूप आभार
धन्यवाद सत्यजितजी, खूप आभार आपल्या प्रोत्साहनाबद्दल!
हो टायपो होता. उशिरा लक्षात आले.