Submitted by santosh watpade on 23 March, 2017 - 06:37
कोरडवाहू आयुष्याला वावर म्हटलो...चुकले का?
अन दुःखाला लोखंडाचा नांगर म्हटलो...चुकले का?
नको भिती शत्रूची ठेवू नको कोणत्या शस्त्राची
मात्र तुझ्या कपटी मित्रांना घाबर म्हटलो...चुकले का
याला आत्म्याच्या वळणीवरती.. टांगुन प्राक्तन गेले
म्हणून या नश्वर देहाला लक्तर म्हटलो..चुकले का?
तिचा नि माझा वाद मिठीतिल या घटनेने पेटवला
ओठांना मी ओठ भिडवले ...नंतर म्हटलो..चुकले का?
रुसवे फुगवे याची कटकट कशी.. किती सांभाळू मी
अखेर वैतागून सुखाला अडसर म्हटलो...चुकले का?
मेल्यानंतर पाप आपले शिल्लक उरते हातावर
मग मी जरका या पापाला स्थावर म्हटलो..चुकले का?
प्रश्न असा की.." उपाय कुठला भूक गरीबी मरणावर?"
मी "जगण्याला" या प्रश्नाचे उत्तर म्हटलो...चुकले का?
-- संतोष वाटपाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...
काहिहि चुकले नाही..
काहिहि चुकले नाही..
सुरेखच !!
सुरेखच !!
बरोबर कावेरि......काही चुकले
बरोबर कावेरि......काही चुकले नाही...सगळे एकदम बरोबर
...मस्त
बरोबर कावेरि......काही चुकले
बरोबर कावेरि......काही चुकले नाही...सगळे एकदम बरोबर
...मस्त