Submitted by सेन्साय on 9 March, 2017 - 01:44
अक्षरांची ओळख नेत्रांपासुनी
आकलन जेव्हा बुद्धीला
प्रगट उच्चार होतो त्याचा
श्रेय जाते जिव्हेला
सुग्रास भोजने मुखी पडता
चवीचे गोडवे जियेला
नामाचा लळा नसेल तर
काय म्हणावे अशा जिव्हेला
नटखट म्हणुनी वाकुल्या दाखवीत
बाल सवंगडी एकमेकाला
मोठे होताच हीच मंडळी
ओठात दडवीत सत्याला
क्रोधाने जेव्हा अर्वाच्य बोले
बंधन नीतीचे पाळेना
दुशब्दानी आसमंत भरुनी राहिला
काय म्हणावे ह्या जिव्हेला
विश्वोत्पत्तीच्या प्रथम दिनी
नारायण नारायण जियेचा आरंभ
काय तिची झाली दैना
कलियुगाच्या या अंतिम चरणा
वदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध
हाची उपाय शुद्धीचा उरला
अन्यथा काय अर्थ जगण्या
काय म्हणावे या जिव्हेला
- अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर
अप्रतिम
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
छान!
छान!
मस्त!
मस्त!
धन्यवाद मानव आणि कावेरी
धन्यवाद मानव आणि कावेरी
छान !
छान !
धन्यवाद. पल्लवी
धन्यवाद. पल्लवी