“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.”
रशियाच्या बर्फाळ भागातल्या त्या गुहेत काही मुलं हिटलरला स्टालिनच्या मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत होती. त्यांच्या डोक्यावर रशिया अन जर्मनीच्या लष्करी विमानांचं घनघोर युद्ध सुरु होतं.
रशियाचा फ्लाइट कमांडर इगॉर सर्वाँच्याच आवडीचा होता. आतपर्यंत शत्रुंची अनेक विमानं त्यानं हा हा म्हणता नेस्तनाबूत केली होती. आतासुद्धा तो प्रचंड वेगानं शत्रुच्या विमानाकडे झेपावला. रॉकेट लॉन्चरचं तोंड जर्मन विमानाकडे वळवून तो बटण दाबणार तेवढ्यात एक मिसाईल त्याला प्रचंड वेगाने त्याच्याच रोखाने येतांना दिसलं. त्याने झटपट निर्णय घेऊन वेगाने हालचाली केल्या, दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ते रॉकेट लॉन्चर त्याच्या विमानाला घासून गेलंच. दिशादर्शक यंत्रणा क्षणात कोलमडली, विमान हेलकावे खाऊ लागलं खुप कमी वेळ होता त्याच्याकडे. त्याने आपल्या सिटखालचं Emergency Exit बटण दाबलं; पण दुर्दैव. विमान वेगाने भिरभिरत खाली जायला लागलं. त्याचं आयुष्य आता आठ वर्षांच्या स्वेतलॅनाच्या हातांत होतं.
स्वेतच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली. उजव्या हातात स्टालिनची मिशी घेऊन ती डाव्या हाताने हिटलरचा फोटो चाचपडू लागली. गुहेतल्या सर्वांचा श्वास रोखला गेला. स्वेतने हिटलरच्या नाकाचा बरोबर अंदाज घेतला अन मिशी चिकटवणार एवढ्यात एक बॉम्बगोळा गुहेपासून अगदी जवळ फुटला. स्वेत फोटोपासून दूर फेकली गेली. तिचे कान अन शरीर सुन्न झालं होते. तरीसुद्धा ती उठली अन जखमी पावलांनी पुढे जाऊ लागली.
दोनेक पावलं जाउन ती परत कोसळली. पण कुणीच तिला आधार द्यायला पुढे गेलं नाही. ती स्वतःच सावरली, टोंगळ्यांवर घासत कशीबशी फोटोपर्यंत जाउन पोहोचली. डोळ्यांसमोरचं सगळं अंधुक दिसत होतं. तरीसुद्धा तिने चाचपडत अंदाज घेतला अन थरथरत्या हातांनी नाकाच्या बरोबर खाली मिशी चिकटवून टाकली. गुहेत प्रचंड जल्लोष उसळला. लहान-मोठी सगळी मुलं नाचू लागली.
अन त्याचक्षणी इगॉरच्या विमानाचं Emergency Exit बटण दबलं अन तो पॅराशूटबरोबर विमानाबाहेर पडला. जाताजाता त्याने मिसाईल लॉन्चरचं बटण दाबलं. एक रॉकेट सरळ जाऊन शत्रुविमानाच्या शेपटीत जाउन घुसलं.
“चला नेक्स्ट.कुणाचा नंबर आहे?”
साडेनऊ वर्षांचा चुणचुणित येफीम समोर आला. त्याच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली.
आकाशात शत्रुची विमानं आग ओकंत होती. आता मुलांना गाफील राहून चालणार नव्हतं. त्यांनी जास्तीत जास्त मिशा चिकटवायला हव्यात. कारण दूSर जर्मनीमध्ये, अशाच एखाद्या गुहेत जर्मन मुलं स्टालिनला मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत असतील.
--------------------------------------------------------
छान लीहीलं आहे
छान लीहीलं आहे
नाही कळली
नाही कळली
आशय छान आहे...वाढवा अजून!
आशय छान आहे...वाढवा अजून!
भन्नाट! मेंदू सुन्न झाला एक
भन्नाट! मेंदू सुन्न झाला एक क्षण..
रीयली विअर्ड! आणि शॉकींग!
रीयली विअर्ड! आणि शॉकींग! आवडलीच.
खरचं विचित्र विनोदी कथा...!!!
खरचं विचित्र विनोदी कथा...!!! आवडली...!!! हासुन हसुन पोट दुखलं रे बाबा..!!!
विनोदी
विनोदी
कथा विनोदी वाटली हाच मोठा
कथा विनोदी वाटली हाच मोठा विनोद आहे
नाही कळली :(.
नाही कळली :(.
नाका जवळ मिसाईल च बटण आहे की
नाका जवळ मिसाईल च बटण आहे की काय?
Weird fiction is a subgenre
Weird fiction is a subgenre of speculative fiction originating in the late 19th and early 20th century in Britain. It can be said to encompass the ghost story and other tales of the macabre. Weird fiction is distinguished from horror and fantasy in its blending of supernatural, mythical, and even scientific tropes.
Like fantasy and science fiction, it has a logic of its own.
- Source: Wikipedia
Famous author H.P.Lovercraft
Famous author H.P.Lovercraft said:
"In true weird tale, certain atmosphere of breathless and unexplainable dread of outer, unknown forces must be present. There is logic and a supernatural happenings. There must be a hint, expressed with a seriousness and portentousness becoming its subject, of that most terrible conception of the human brain--a malign and particular suspension or defeat of those fixed laws of Nature which are our only safeguard against the assaults of chaos and the daemons of unplumbed space.
विचित्रकथा हा प्रकार
विचित्रकथा हा प्रकार मराठीमध्ये नवीन असल्यामुळे आणि असं लिखाण वाचण्याची सवय नसल्याने काही विचित्र प्रतिक्रियासुद्धा येतील हे मी गृहीत धरलं होतं
विनय.. आम्हाला पण समजवा ना
विनय.. आम्हाला पण समजवा ना कथा. विपु करा हवं तर.
दुसरं महायुद्ध लढणारे प्रमुख
दुसरं महायुद्ध लढणारे प्रमुख देश म्हणजे जर्मनी आणि रशिया. त्यावेळी दोन्ही देशांमधील प्रत्येक स्त्री आणि पुरुष त्याच्या परीने युद्धात योगदान देत होता. यातून सुटले होते फक्त लहान मुलं. ( हिटलरने काही लहान मुलांनासुद्धा गुप्तहेर बनण्याच्या कामाला लावलं होतं. यात अनेकांचा जीव गेला)
माझ्या डोक्यात विचार आला की जर शक्य झालं असतं तर या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी मुलांचापण वापर करून घेतला असता का? घेतला असता असं वाटतं कारण त्यावेळी माणुसकी निच्चतम पातळीला पोहोचली होती. यासंबंधी दोन शक्यता डोक्यात होत्या -
१. आपल्याकडे भुलाबाई नावाची छोट्या मुलींची देवी असते, ती त्यांच्या इच्छा पुर्ण करते असा समज आहे. जर्मनी आणि रशिया दोन्ही देशांच्या धर्मग्रंथांमध्ये छोट्या मुलांचे देव आहेत असं ऐकलं होतं. महायुद्धाच्या धामधुमीत जर एखाद्या अघोरी विद्या जाणणाऱ्याने त्या देवांना प्रसन्न केलं असेल आणि त्यांनी मुलांना वरदान दिलं असेल तर?( तुमच्या शत्रुना तुम्ही मारू शकाल आणि तुमच्या सैनिकांना वाचवू शकाल अशा प्रकारचं काहीतरी.)
छोटी मुलं युद्धभूमीवर जाऊ शकत नाहीत म्हणून मग एखाद्या गुप्त बसून मुलांना सगळ्या गोष्टी नियंत्रित असं ठरलं असेल. मग डोक्यात आला एखादा खेळ. खेळ खेळताना task पुर्ण करावे लागतील. जितके जास्त लोक task पुर्ण करतील तितका जास्त फायदा. Task जेवढं अवघड असेल तेवढा फायदा जास्त. ( म्हणजे स्वेतला कमी अडचणी आल्या असत्या तर फायदाही कमी मिळाला असता. फक्त इगॉर वाचला असता, जर्मन विमान उड़ालं नसतं)
शक्यता २. भूतांसोबत डील करणे हा प्रकार युरोप अमेरिकेत प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला एखादं काम करून हवं असेल तर ( अगदी कुणाला मारयचं असेल किंवा जिवंत करायचं असेल तरीसुद्धा) एका विशिष्ट प्रकारच्या सैतानाला बोलवायचं ( Demons of crossroad) आणि काय हवंय ते मागायचं. अर्थात या मोबदल्यात त्यांना काहीतरी द्यावंपण लागायचं. उदा: अ व्यक्तीला जिवंत करायचं असेल तर ब ला आपल्या आयुष्यातील क्ष वर्ष सैतानाला द्यावे लागतील.
दुसऱ्या महायुद्धात एखादी डील केली असेल तर? आम्ही तुमच्या सैनिकांना वाचवू पण शत्रुचे आत्मे आमच्या ताब्यात घेऊ असं काहीतरी.
मिशा चिकटवण्याचा खेळ त्यावेळी तिकडे प्रसिद्ध होता म्हणून निवडलाय.
अर्थात हा माझ्या डोक्यातला विचार होता. वाचकांना वेगळा अर्थही लागू शकतो. Logical मांडणी असल्याने विचार केल्यास पुसट का होईना अर्थ लागावा अशी अपेक्षा.
कथेत जास्त explaination दिलं असतं तर weird feel निघून गेला असता असं वाटलं
मस्त ...
मस्त ...
काय असेल ते लक्षात आले होतेच.
काय असेल ते लक्षात आले होतेच. पण उलगडा मस्त!
झक्कास!!
झक्कास!!
मस्त कथा!
मस्त कथा!
तुम्ही दिलेला उलगडा माझ्या अंदाजापेक्षा वेगळा आहे. मी 'वर्तमानकाळातील व्हर्चुअल/व्हिडीओ गेममधल्या मिशा लावण्याच्या खेळातून भूतकाळातील रिअलीटी/खर्या युद्धघटना मैनिप्युलेट होतात' असा अर्थ लावलेला.
बादवे मआंजावर यावर्षी डेब्यु केलेल्या लेखकांत तुम्ही सगळ्यात भारी आहात हेमावैम. किपीटप
Thanks अॅमीजी.
Thanks अॅमीजी.
तुम्ही लावलेला अर्थही खुप interesting आहे.