Submitted by सत्यजित... on 18 February, 2017 - 15:58
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!
तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!
चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!
कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!
मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा...
अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा...
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वाव ! सुंंदर !!
व्वाव ! सुंंदर !!
प्रेमात पडल्याशिवाय अशी कविता होत नाही.
व्वाव ! सुंंदर !!!
व्वाव ! सुंंदर !!!
किती छान लिहिलिये.....मस्त...
अप्रतिम !!
अप्रतिम !!
काय सुंदर वर्णन केले आहे !!
तुमच्या शब्दांमधे जादु आहे जणु !!
गझल आवडली !!
धन्यवाद!
धन्यवाद!
अशक्य सुंदर यार!
अशक्य सुंदर यार!
अप्रतिम गझल !!
अप्रतिम गझल !!
Waah , behad khub
Waah , behad khub
व्वा खुपच सुन्दर
व्वा खुपच सुन्दर
धन्यवाद!
धन्यवाद!
ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द
ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर!! , आफ्टर ऑल.........

मस्त रे!
मस्त रे!
खरया प्रेमाच अर्थ....
खरया प्रेमाच अर्थ....
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतिम! निःशब्द!!
अप्रतिम! निःशब्द!!
>>तिचे दोन डोळे तिच्या
>>तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!
वाह वा!
बहुत दिनो बाद.. मिंया.
राहुल,योग मनःपूर्वक धन्यवाद!
राहुल,योग मनःपूर्वक धन्यवाद!
मस्तच...
मस्तच...
धन्यवाद!
धन्यवाद!