बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
काय मौजेची ती लंगडी
आणि पकडा पकडी
शिकवण त्यात भरूनी राहिली
दु:खातही सुखे पकडण्याची ओढी
खेळता मित्रांसंगे लगोरी
त्याची तरहा अजुनी न्यारी
नेम साधुनी घेतलास तू
संकटावर मात आणि उद्दिष्टे सारी
एकीचे बळ अनुभवले
खेळताना मी कबड्डी
सप्त -चक्रांचे महत्व ठसवलेस
उपयोगी पडले घडोघडी
किती कौतुक सांगावे
त्या सूर पारंब्या आणि
आंधळी कोशिम्बीरीची
आयुष्याचे मार्ग शोधावे
वाट चोखाळावी दृष्टी पलीकडची
आठवते तुझी प्रेमळ छाया
आम्ही दमता ज्या वृक्षाखाली
निसर्ग प्रेमाचे धडे गिरवले
जंगल पावसाचे नाते अनुभवले
लिहिता वाचता आयुष्य सरेल
परी न ओहोटी तुझ्या करणी
बालपण देगा देवा
हीच प्रार्थना तुझ्या चरणी
-अंबज्ञ
छानच....
छानच....
धन्यवाद कावेरी
धन्यवाद कावेरी
सुंदर अप्रतिम !!
सुंदर अप्रतिम !!
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
मस्त!
मस्त!
धन्यवाद अश्विनी
धन्यवाद अश्विनी