त्या काळ्या अंधारात, तेही अशा भयाण जंगलात राञ काढणं नाही म्हटलं तरी धोक्याचंच होतं. शेवटी अनेक विचाराअंती त्यांनी जंगलातच राहण्याचं ठरवलं होतं खरं. पण तरीही प्रतेकाच्याच मनात घरी पोहोचण्याची पूसटशी आशा माञ अजूनही जिवंत असावी.
फ्लँश लाईटच्या मंद प्रकाशात आता ती पोरं झोपण्यासाठी एका कोरड्या जागेच्या शोधात ईतरञ वेड्यासारखी भटकत होती. कारण पावसाने सगळीकडेच मातीत ओलावा करून ठेवला होता. झाडांची हिरवी ओली पानं देखील त्या दाट जंगलात पावलो-पावली आपलं अस्तीत्व प्रस्थापीत करू पाहत होती. त्यात कधीकधी हवेतील दमट गारठा अंगावर शहारे आणत होता.
त्या अरूंद वाटेवरून थोडं पूढे गेल्यावर त्यांना अचानकच कसलातरी हलकासा आवाज एेकू येऊ लागला.
" हा कसला आवाज आहे गं ?"
आवाजाच्या दिशेने सावकाश पाऊलं टाकत रॉन ज्युलीला विचारत होता.
" मला काय माहीत. चल बघूया "
ते तीघंही जसजसे आवाजाचा मागोवा घेत पूढे जात होते. तसतशी त्यांच्या ह्रदयाची धडधड हळूहळू वाढू लागली होती.
" आय थीकं कदाचीत हा वाहत्या पाण्याचा अावाज असावा "
जँकचा अंदाज सहसा कधीच चूकत नसे.
" देव करो आणी तूझं बोलणं खरं होवो " ज्युली
आणी खरोखरच तीथे जँकच्या म्हणन्यानूसार एक छोट्याशा नदीचा प्रवाह वाहत होता.
पाणी पाहताच तीघांचेही चेहरे आनंदाने फूलले.
पोरांच्या जीवात जीव आला. मग क्षणाचाही विलंब न करता ती दमलेली पोरं धावतच नदीपाशी गेली. व हाताच्या ओंजलीने नदीतील थंडगार पाणी पीऊ लागली.
" कीती थंड पाणी आहे रे हे ! थोडं बरं वाटतंय आता " ज्युली
" मला तर कधीपासून तहान लागली होती " रॉन
त्या ठीकाणी नदीच्या अस्तीत्वाने वातावरणात विलक्षण बदल जाणवत होता.
" ईथे कीती मस्त थंड वारा वाहतोय ना "
" हो, ईथे मोकळी जागा पण आहे. आपण त्या झाडाखाली झोपूया " नदीकाठच्या एका मोठ्या झाडाकडे ईशारा करत जँक बोलत होता.
" मग चला पटकन मला तर कधी एकदाचं डोळे मिटतोय असं झालयं " रॉन
अगदी पोटभर पाणी पीऊन झाल्यावर तिघंहीजण त्या हिरव्या झाडाखाली झोपण्याच्या तयारीला लागले. ती जागा ईतर जागांपेक्षा वास्तव्यासाठी खूपच योग्य वाटत होती. शिवाय त्या ठीकाणी मातीमध्ये ओलावा देखील कमी होता.
" मी तर असं एकलयं की राञीच्या वेळी जंगली प्राणी नदीवर पाणी प्यायला येतात म्हणे "
खाली झोपण्यासाठी मातीवर झाडाची सूकलेली पिवळी पानं पसरवत जँक ज्युलीला घाबरवत होता.
" असं काही नसतं हा जँक " ज्यूलीने डोळे चोळतच जँकला प्रतीऊत्तर दिलं.
" झोप आता गं. मला पण झोप येतेय. आणी पून्हा अजून कूठे फिरण्याची ताकद माञ आता माझ्यात उरली नाही.
सो गूड नाईट माय डिअर फ्रेड्स " रॉन
तिघंही पोरं त्या हिरव्या झाडाखाली गार वाऱ्याचा थंडावा सहन करत झोपण्याचा प्रयन्त करत होती. त्यावेळी जँकला त्याच्या घरातील ऊबदार गोधडीची आठवण आली नसती तरच नवल.
डोळ्यांवर झोप होती परंतू कदाचीत त्या सूखद झोेपेचा आस्वाद घेण्याचा योग त्यांच्या नशीबी अजूनही आला नसावा. कारण त्या दाट झाडीतून काळ्या अंधाराचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्या दिशेने जवळ येत होतं. त्यांच्या पायाच्या हलक्या आवाजाने जँकला जागं केलं. डोळे ऊघडताक्षणी चंद्राच्या मंद प्रकाशात सात-आठ माणंस आपल्या दिशेने येताना जँकला दिसत होती. अंधारात त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले, तरीही त्यांच्यासोबत असलेल्या त्या लाल जँकेटवाल्या माणंसाला माञ जँकने ओळखलं.
हो तो वेबच होता. जो झाडाच्या मागून अचानक पसार झाला होता. म्हणजेच ज्यूलीचा संशय खरा ठरला होता तर.
जँक हाक मारून वेबला आपल्याजवळ बोलवणार, तेवढ्यात त्याने थोडं लक्षपूर्वकच पाहीलं. वेब व त्याच्या सोबतची ती अनोळखी माणसं अगदी सावधपणे त्या तीघानां पकडण्यासाठीच त्यांच्या जवळ येत होती.
अगदी क्षणभरात पूर्वी घडलेल्या सर्वच घटना त्याला आता आठवत होत्या. वेब असं काहीतरी करेल याची त्याने कधी कल्पना देखील केली नसावी. त्याला वेबची खूपच चीढ येत होती. पण ती चीढ व्यक्त करण्याची ती योग्य वेळ नव्हतीच मूळी. कारण जँकच्या शेजारी रॉन व ज्युली दोघं अजूनही गाढ झोपेतच होते.
" आता काहीही झालं तरी आपण यांच्या हाती लागायचं नाही " जँक स्वतःशीच पूटपूटला.
त्याने रॉनला व ज्युलीला ऊठवेपर्यतं वेबने त्या तीघांना केव्हांच पकडलं असतं. त्याला त्या क्षणी काय करावं काहीच सूचत नव्हतं.
" मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. नाहीतर आपण आयतेच वेबच्या तावडीत सापडू " जँक स्वतःलाच धीर देण्याचा निष्फल प्रयत्न करत होता.
वेब व ती माणसं आता त्या तिघांच्याही खूपच जवळ येऊन पोहोचली होती.
अखेर जँकने क्षणाचाही विलबं न करता झोपलेल्या अवस्थेतच सावकाशपणे रॉनच्या तोडांवर हात ठेवून त्याला जागं केलं. आणी त्याला वेबबद्दल थोडक्यात कल्पना दिली.
त्यावेळी ज्युलीला ऊठवून सर्वच हकीकत सांगत बसणं म्हणजे खूपच मूर्खपणाचं काम होतं. हे जँक जाणत होता.
त्यामूळे त्याने विचार करण्यात फार वेळ वाया न घालवता लगेचच तीचा हात पकडून वेब त्याच्यांपर्यतं पोहोचण्याच्या अगोदरच त्या काळ्या अंधारातून वाट मीळेल तशी धाव घेतली. मग रॉनही जँकच्या मागे धावला. ते तीघंही ईतक्या जलद गतीने धावत सूटले होते, की वेबला देखील त्यांना पकडणं आता कठीण होऊन बसलं होतं.
झाडे तूडवत, काटे मोडत जीव मूठीत घेऊन अतीशय जलद वेगाने ती पोरं सारखी धावतच होती, त्यातच बोचरा गार वारा अंगावर शहारे आणत होता.
त्या भयाण जंगलात त्यांच्या अस्तीत्वाला आता वाव उरला नव्हता.
थोड्या वेळाने ते तीघंही धावतच त्या मोकळ्या गवताळ जागेवर येऊन पोहोचले. जीथे ते सूरवातीला येवून थांबले होते.
" आपण वेबपासून दूर का पळतोय ?"
ज्युली अजूनही झोपेतच होती.
सूटकेचा श्वास घेत धापा टाकत असतानाच वेब व ती अनोळखी माणसं त्या तीघांचा पाठलाग करत तीथेही येऊन पोहोचली. हे पाहताच ती पोरं पून्हा दूसऱ्या दिशेने धावत सूटली. अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं पण वेबने पून्हा त्या तीघांचा पाठलाग सूरू केला.
वेब व ती अनोळखी माणसं त्यांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग का करत होती याची त्यांना थोडीफार तरी कल्पना होती का ?
पण घडलेल्या सर्वच घटनांशी याचा नक्कीच काहीतरी संबध आहे. याची जाणीव माञ त्यांना आता झाली असावी. ते तीघहीजणं दाट झाडीतून, दगड चिखलातून, फांद्या काट्यातून, नूसते वेड्यासारखे धावत होते.
पण यावेळी माञ ते तीघं धावतच त्या झाडांपर्यत येऊन पोहोचले. जेथून वेब अचानकच गायब झाला होता.
" जँक वेब असा आपला पाठलाग का करतोय, सांगशील का मला ? " ज्युली
" माझं डोकं तर आता फूटण्याची वेळ आली आहे " रॉन
" पण एवढं माञ नक्की की आपल्याला या ठीकाणी जंगलात अडकवण्यात नक्कीच वेबचा हात असेल.
बघं ना आपण जेव्हां पाऊस पडायचा थांबल्यावर खाली ऊतरू लागलो. तेव्हाचं नेमका वेब आपल्याला भेटला. आणी मग आपली दीशाभूल करून तो अचानक झाडामागून गायबही झाला. " जँक
" पण तो असं का करेल ?" रॉन
" काय माहीत ?
तो आपल्या कडून कोणत्या जल्मीचा बदला घेतोय देव जाणे "
एवढं बोलून जँक अचानकच वेगाने खाली बसला. कारण कदाचीत अनअपेक्षीतपणे वेगात धावल्यामुळे त्याच्या छातीत धडधडू लागलं होते. त्याला दम लागला होता. तो क्षणभर खालीच बसून राहीला.
ते तीघंहीजणं घाईघाईत बोलत असतानाच ती माणसं यावेळीही त्यांचा पाठलाग करत तीथेही येऊन पोहोचली. वेबला पाहताच पोराचां जीव पून्हा गारठला नसता तरच नवल.
जँक मध्ये तर आता पुन्हा ऊठून धावण्याचे प्राणही ऊरले नव्हते.
" वेब तू आमचा पाठलाग का करतोयेस ? आम्ही नक्की तूझं काय बिघंडवलय ?" जँकने दमलेल्या आवाजातच वेबला आपला पाठलाग करण्याचं कारण विचारलं.
पण त्यावेळी देखील वेब शांतचं होता. त्याने कोणतंच प्रतीऊत्तर दिलं नाही. कदाचीत काहीही झालं तरी शांत राहणे हा त्याच्या स्वभावाचाच एक भाग असावा.
वेब व ती अनोळखी माणसं त्यांच्या पासून जवळजवळ सात-आठ फूट दूर असावीत. तेव्हा जँक कसातरी पाय टेकत पुन्हा ऊभा राहीला. पण आता धावण्यातही काहीच अर्थ उरला नव्हता. ते मूर्खपणाचंच ठरलं असतं.
कारण वेब व त्याचे साथीदार त्या तिघांच्या खूपच जवळ येऊन पोहोचले होते.
दमल्यामूळे जँक झाडालाच टेकून ऊभा होता. मग त्याचं पाहून रॉननेही त्या झाडाच्या एका फांदीचा आधार घेण्यासाठी हात वर केला. त्याने फांदीला खेचताच दैवाने साथ द्यावी तशी अचानकच त्या तिघांच्या पायाखालची जमीन आत सरकली अनं क्षणार्धात ते तिघंही एका विशाल गूहेत जावून पडले. व ताबडतोब वरची सरकलेली जमीन देखील पून्हा पुर्ववत झाली.
ही घटना एवढ्या जलद गतीने घडली होती की त्या तीघांना काहीच समजण्यास मार्ग ऊरला नव्हता. खंरतर रॉनने त्या झाडाच्या फांदीवर नकळत जोर दिल्यामूळे त्यांच्या पायाखालची जमीन म्हणजेच स्टीलची मोठी प्लेट सरकली होती. व ते तीघंही त्या विशाल गूहेत पडले होते. कारण त्या गूहेत गूप्तपणे प्रवेश करण्यासाठीच तो मार्ग तयार करण्यात आला होता.
वेबही त्याच मार्गाचा वापर करून अचानक त्या झाडामागून गायब झाला होता. पण हे माञ त्या अजाण पोरानां ईतक्यात समजणं कठीण होतं.
" आई गं "
आपल्या पँटंच्या खीशातून मोबाईल काढत ज्युली ऊठली. व तीने जँकलाही हात धरून ऊठवलं. ते एवढ्या जलद गतीने त्या गूहेत पडले होते. की त्यांना नक्की काय घडलं हेच नेमंक समजलं नव्हतं. मग रॉन ही पून्हा ऊठून ऊभा राहीला.
" जँक चल पटकन नाहीतर वेब ईथेपण येईल " दमलेल्या जँककडे पाहत रॉन बोलत होता.
जँक थोडा वेळ शांतच राहीला मग म्हणाला.
" आपल्याला आता वेबपासून पळण्याची काहीही गरज नाही "
" का ? वेडा झालायेस की काय तू, चल लवकर नाहीतर ती लोकं आपल्याला पून्हा पकडतील " रॉन
" अरे आपल्याला खंरच धावण्याची आता आवशक्यता नाही.
कारण ते आपल्यापर्यतं आता पोहोचूच शकणार नाहीत. आपण जेव्हा या गूहेत पडत होतो. तेव्हां वेब त्याच्या साथीदाराना काय म्हणाला होता. आठवंतय तूला ?" जँक
" काय ?" रॉन
" 'आता पून्हां आपल्याला एक तास थांबावं लागेल '
ती वरची स्टीलची प्लेट, म्हणजेच आपण जीथून या गूहेत पडलो. तो जमीनीचा तूकडा एका तासानंतरच पून्हा त्या मशीनद्वारे सरकवता येऊ शकतो.
कारण अशा मशीनमध्ये प्लेट सरकवण्यासाठी खूप सैरऊर्जेची निर्मीती होणं आवश्यक असतं. ही मशीन दिवसभरात सूर्यकीरणांकडून भरपूर सैरऊर्जा एकञ साठवून ठेवते. पण तीचा वापर आपल्याला ठरावीक काळानंतरच पून्हा-पून्हा करता येतो. "
" पण जँक आपण या गूहेत अचानक कसे काय पडलो. " ज्युली
" अगं रॉनकडून जेव्हां नकळत त्या झाडाची फांदी ओढली गेली. तेव्हां मशीनद्वारे आपल्या पायाखालची जमीन आत सरकली, व आपण या गूहेत पडलो.......म्हणजेच त्या झाडाच्या फांद्या त्या मशीनला जॉईन असाव्यात.
मी स्टीव्हन रॉक्सच्या पूस्तकात अशाच सैर ऊर्जेवर चालणाऱ्या मशीनविषयी वाचलं होतं. पण अशा मशीन्स बनवण्याचं काम खूपच खर्चीक असल्यामूळे याचं प्रोडक्शन करण्यावरच स्टीव्हन रॉक्सनी निर्बधं घातले होते. "
" ग्रेट यार, हे माञ एकाआर्थी बंर झालं. " ज्युली
" पण शेवटी राहून-राहून एका प्रश्नाचं ऊत्तर माञ मला अजूनही सापडलं नाही " जँक
" कोणत्या ?" रॉन
" वेबला व त्याच्या साथीदाराना अशा दाट जंगलात या मशीनची गरजच का भासली असावी ?"
जँकच्या या प्रश्नावर माञ सर्वच शांत होते.
कारण वेब व ती अनोळखी माणंस त्यांचा पाठलाग का करत होती. हे देखील अजूनपर्यत कोणालाच समजलं नव्हतं.
" असो जे झालं ते झालं. आपल्याला आता लवकरात लवकर या गूहेतून बाहेर पडलं पाहीजे " पून्हा शांततेचा भंग करत जँकने सर्वाना सावध केलं.
" हो वेब यायच्या अगोदरच "
रॉनच्या या वाक्याबरोबरच ताबडतोब त्या अंधाऱ्या गूहेतून मोबालच्या फ्लँश लाईटच्या अपूऱ्या प्रकाशात त्या तिघांनीही पूढचा मार्ग पत्करला.
त्या गूहेत पावसाचं पाणी साचून-साचून नैसर्गीकरीत्या एक छोटंसं तळ तयार झालं होतं.
त्यातच मातीच्या ओबडधोबड साच्याचे विविध आकार त्या तळ्याभवती तयार होऊन गूहेची भीती आणखीनच वाढवत होते.
पायाखाली छोट्या-मोठ्या दगडीही पसरल्या होत्या. व त्यावरच लहानशी बेडकं आवाज करून अलगद ऊड्या मारून पाण्यात नाहीशी होत होती. पण तरीही त्या ठीकाणी वातावरणात कमालीची शांतता आपलं अस्तीत्व प्रस्थापीत करून नांदत होती.
नाही म्हटलं तरी आता प्रत्येकाच्याच जीवाचे ठोके क्षणाक्षणाला वाढू लागले होते. काहीच कळण्यास मार्ग नव्हता. ती पोरं अशा कोणत्या परीस्थीतीत अडकतील याची त्यांना थोडीफार जरी कल्पना असती. तर त्यांनी कधीही त्या डोगंरावर येण्याचा साधा विचार देखील केला नसता.
त्या दगडांनी व्यापलेल्या मातीतून थोडं पूढे गेल्यावर त्यांना गूहेच्या एका कोपऱ्यात विजेच्या बल्बच्या तेजस्वी प्रकाशाचं दर्शन घडलं.
त्या बल्ब खाली एका मोठ्या टेबलावर दोघंजण बसून वहीवर कसलातरी हिशोब लावण्यात गूंतले होते. त्याच्यांच शेजारी पाच-सहा मडंळीनी पत्याचां डाव मांडला होता. कोणी डाराडूर झोपला होता. तर कोणी सीगारेटचे झूरके मारण्यात आपली राञ वाया घालवता होता.
पहावं ते नवल, हेच म्हणायचं आता बाकी राहीलं होतं. कारण ईतक्या राञीही त्या गूहेत माणसांच्या अस्तीत्वाला वाव होता.
क्रमशः
पुढील भाग लवकरच............
वा वा... मस्त
वा वा... मस्त
मस्त..
मस्त..
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
तूमचे प्रतीसाद असेच येत राहू द्या
गुड गोईंग...
गुड गोईंग...
छन आहे.
छन आहे.
मस्त....!!! कथेतला गुढ वाढत
मस्त....!!! कथेतला गुढ वाढत चाललय....!!!
किती वाट पाहायला लावणार...
किती वाट पाहायला लावणार...
पुढचा भाग लवक्कर येऊ दे
हो लवकरच अपलोड करतो
हो लवकरच अपलोड करतो