चान्स मारो आजोबा! या धाग्याला प्रतिक्रिया लिहिताना मला माझ्या बाबत घडलेला जो अनुभव आठवला त्या अनुषंगाने हा धागा.
एकदा सिटी बस मधून प्रवास करत होतो. बसमध्ये गर्दी तुडुंब भरली होती. मी उभा होतो. माझ्या पुढे अगदी थोड्या अंतरावर एक लेडी उभी होती. तीस-पस्तिशीची असेल. पुढच्या स्टोप वर बसमध्ये अजून खूप जण चढले. त्यामुळे सर्वांना पुढे सरकावे लागले. तसा मीही पुढे सरकलो. तर आता इतकी गर्दी होती आणि मागील प्रवासी ढकला ढकली करत असल्याने दोन व्यक्तींच्या मध्ये जागा राहणे जवळजवळ अशक्यच होते. तरीही त्या महिलेला स्पर्श होऊ नये याची मी काळजी घेत होतो. पण नंतर अचानक बसला ब्रेक लागल्यामुळे उभे असलेले सर्वच जण पुढील प्रवाश्यांवर रेलले. त्यामुळे निकराचा प्रयत्न करूनही माझा त्या आंटीला धक्का लागलाच. मी पुरता घाबरलो. सावरेपर्यंत तिने माझ्यकडे रागारागाने मागे माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. मी तिला सॉरी म्हणालो. आणि मागच्या माणसांना मागे रेटून तिच्या आणि माझ्या मध्ये बरीच जागा सोडून उभा राहिलो.
इथून पुढे जे घडले ते थोडे विचित्रच. काही वेळाने बसच्या धक्क्याचे निमित्त झाले आणि ती मागे सरकली. मला चिकटली. मी घाबरून अजून मागे सरकायचा आटोकाट प्रयत्न केला. थोडीशी जागा मध्ये निर्माण करून उभा राहिलो. तर थोड्याच वेळात काहीही कारण नसताना ती अजून मागे सरकली. आता मला मागे सरकायला जागाच नव्हती. पण तिला मी मागे चिकटून उभा आहे याचे काहीच वाटत नव्हते. अन्यथा तिने माघासारखे रागाने पहिले असते. आता मात्र मला ऑकवर्ड व्हायला लागले. घाम फुटला. पण मी हलूच शकत नव्हतो. स्पीड ब्रेकर व खड्ड्यांमुळे बसचे धक्के बसत होते. पण तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. त्या अवस्थेत खूप वेळ गेला. त्या वेळेत बरेच काही घडले. ते सगळे या फोरम वर लिहू शकत नाही. पण आपण समजू शकता.
मग गर्दी अगदी थोडी कमी झाली. थोडीशी जागा असूनही तिने पुढे सरकायचे नाव घेतले नाही.
आता मनात काही प्रश्न उपस्थित होतात:
१. सर्वच पुरुषांना कधी न कधी असे अनुभव येत असावेत हा माझा समज आहे. त्याविषयी तुमचे काय मत आहे? तुम्ही पण तुमचे असे अनुभव शेअर कराल का प्लीज.
२. गर्दीत स्त्रीने पुरुषाला धक्का दिला तर पुरुष बदनाम होत नाही. पण पुरुषाने स्त्रीला धक्का दिला आणि तिने ओरडा केला नाही तर ती स्त्री बदनाम होते. म्हणून स्त्रीला ओरडा करावाच लागतो. याचा अर्थ पुरुषाचा गर्दीतला स्पर्श स्त्रीला नैसर्गिकरीत्या खरंच आवडत नाही कि केवळ बदनामी होईल म्हणून ती विरोध करते?
३. स्त्रीला स्पर्श झाल्यावर तिने ओरड केली तर जे लोक तिथे तिची बाजू घेऊन जमतात आणि त्या पुरुषाला दमदाटी करतात त्यांना खरेच स्त्री च्या इज्जतीची काळजी असते कि "आम्हाला मजा करायला परवानगी नाही आणि तू मात्र करतोस" हि भावना असते?
सर्वच पुरुषांना कधी न कधी असे
सर्वच पुरुषांना कधी न कधी असे अनुभव येत असावेत हा माझा समज आहे. >>>असं काही नाही एक मित्रजी ...हे असले अनुभव स्त्री व पुरुष दोघांनाही येतात...
पण अश्या परिस्थितीत पुरुषांची जरा काळजी वाटते...कारण त्याने जर तिला विरोध केला किंवा रागाने पहिले तर हि बाई त्याच्यावरच आरोप करू शकते(सर्वच पुरुष वाईट नसतात तसेच सर्वच महिला चांगल्या असतातच असं नाही ना..)
स्त्री बरोबर जेव्हा असं काही होत तेव्हा सगळे तिच्या बाजूने असतात .तुम्ही काही बोलले नाही हेच योग्य केलं...
आणि तुम्ही एक नोटीस केलंय का???तुमचा तुमच्या रागावर कंट्रोल येऊ लागला आहे...छान...जशी परिस्तिथी असेल तसे वागा...
पुरुषांचाही विनयभंग होतो !
पुरुषांचाही विनयभंग होतो ! असा धागा मी काढला होता.बायकाही बर्याच बर्या चालू असतात.मिडथर्टी किंवा अर्ली फोर्टीमध्ये त्यांचे रिप्रोड्क्टीव प्रॉस्पेक्ट संपत आल्याने त्या जरा सेक्श्युली एक्स्प्रीमेंटल होतात असा माझा अनुभव आहे.
लिंगपिसाट पुरुषांकडून
लिंगपिसाट पुरुषांकडून स्त्रीयाच नव्हे तर पुरुषांचाहि विनयभंग होतो. प्रमाण कमी असेल, पण आहे.
"लिंगपिसाट" हे पिसाटलेलेच असतात, तिथे दादा/काका/मामा/आजोबा अशी वयपरत्वे वाटणी होऊ शकत नाही.
हेच लिंगपिसाट वेळीच आवरले नाहीत, तर संधि मिळाल्यास पुढे बलात्काराच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतात.
हे विधान धाडसी आहे, की, यच्चयावत पुरुषजमात ( तृतियपंथियांच्या जवळपास जाणारे एखाद अर्धा टक्का सोडले तर) केव्हाही "लिंगपिसाट" बनु शकते, जर तसे बनण्यास अनुकुल वातावरण/संधी त्यास मिळेल.
अन त्याचमुळे, मुली वयात आल्याबरोबर पहिली शिकवण "पुरुषांपासून" लांब व सावध रहाण्याचीच दिली जाते (जायची? ) . धोका कुठुनही कुणाकडूनही कुठेही होऊ शकतो.
पुरुषाना लिंगपिसाट म्हणतात ..
पुरुषाना लिंगपिसाट म्हणतात .. बायकाना योनीपिसाट म्हणायचे का?
असे अनुभव कमी असले तरी येतात
असे अनुभव कमी असले तरी येतात हे खरं आहे.
हा धागा 'शह' ला 'काट्शह'
हा धागा 'शह' ला 'काट्शह' म्हणून काढलेला वाटतोय.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बाकी चालू द्या.
स्त्री असो वा पुरूष जिथे भावना असणार तिथे इच्छा असणार, कधी त्या नियन्त्रित तर कधी अनियंत्रित असणार.
त्यामुळे पुरूषांनाही असे अनुभव येऊ शकतात. पण निव्वळ चर्चेने काय होउ शकते?
ज्यांना ज्यांना असे अनुभव येतात त्यांनी ठणकावून सांगा एकदाच.
ज्यांना ज्यांना असे अनुभव
ज्यांना ज्यांना असे अनुभव येतात त्यांनी ठणकावून सांगा एकदाच.
>>
एखादी बाई पुरूषाशी लगट करत असेल, चान्स मारत असेल आणि त्या पुरुषाने ठणकावून सांगितले तर?
ती बाई उलट कांगावा नाही का करणार? अश्यावेळी आजुबाजुची माणसं पण त्या बाईचीच बाजू घेतील, नव्हे घेतातच!
पुरूषांच्या नशिबाचे भोग आहेत हे. तुम्हाला नाही कळणार बाई!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुरुषाना लिंगपिसाट म्हणतात ..
तुमचा तुमच्या रागावर कंट्रोल येऊ लागला आहे...छान...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
--> इथे राग येण्यासारखी परिस्थिती नव्हती. awkward होण्यासारखी होती.
पुरुषाना लिंगपिसाट म्हणतात .. बायकाना योनीपिसाट म्हणायचे का?
--> आक्षेपार्ह विधान. लिंग कोणतेही असू शकते पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. इंग्लिश मधील Gender या अर्थाचा हा शब्द आहे.
ज्यांना ज्यांना असे अनुभव येतात त्यांनी ठणकावून सांगा एकदाच.
--> एकतर असे सांगण्याची किंवा न सांगता तो अनुभव एन्जॉय करण्याची मोकळीक स्त्री व पुरुष दोघांनाही असावी नाही का?
प्रतिसादांबद्दल सर्वांचे
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद. पण मी जे प्रश्न उपस्थित केलेत ते कोणी वाचलेले दिसत नाहीत.
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा
तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥
https://www.youtube.com/watch?v=mBOs3e3HaJE
अरे देवा ! खरंच धागा काढलात
अरे देवा ! खरंच धागा काढलात की
इतकी पटकन प्रेरणा घेऊन नवीन धागा तो आपला... हा पण काढत नाही !
असो..आता काढलाय तर उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो..
१. अनेक मचाक वाली ठिकाणं आहेत म्हणे , तिकडे जा... लय लय अनुभव वाचायला मिळतील !
२. हे त्या त्या स्त्रीवर अवलंबून आहे. पुढच्या वेळी असा काही अनुभव आला, तर त्या स्त्री बरोबर तिच्या बसस्टॉप वर उतरा आणि तिथल्या तिथे विचारुन टाका.. की बाई मगासचा स्पर्श नैसर्गिक रित्या आवडला की नाही ????
काय आहे, हा प्रश्न विचारल्यावर त्या स्त्री च्या प्रत्युत्तराने आजूबाजूच्या अनेक जणांचं एकदमच या बाबतीतलं शंका निरसन होऊन जाईल ना. म्हणजे भविष्यात कोणाला परत धागा काढायला नको... काय ?
३. स्त्री समोर शायनिंग मारायला मिळते ही भावना असावी..
प्रश्नोत्तरांनंतर आता एक फुकट सल्ला.... पुढच्या वेळी असं काही जाणवलं ( म्हणजे स्त्री ने मुद्दाम केलेला स्पर्श वगैरे).. तर जोर जोरात 'झुरळ' 'झुरळ' असं ओरडायला सुरुवात करा. याने काय होईल ? एकतर तीच काय, बसमधली कोणतीही स्त्री तुमच्या जवळ येणार नाही. किंवा तुमचा धनंजय माने होईल !!!! काय?????
झगड्या,
झगड्या,
प्रतिसाद आवडला.
'झुरळ, झुरळ' हे म्हणायची आयडिया भारी आहे.
मचाक म्हणजे काय हो?
मचाक म्हणजे काय हो?
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुमच्या बरेच प्रश्नांची
तुमच्या बरेच प्रश्नांची ऊत्तरे तुमच्याच या वाक्यात दडली आहेत.
>>>>>>
इथे राग येण्यासारखी परिस्थिती नव्हती. awkward होण्यासारखी होती.
>>>>>>
राग, संताप, चीड, किळस, शिसारी, तिरस्कार, दु:ख, असहाय्यता, वगैरे अनेक भावना व्यक्त करायला असताना तुम्हाला एक पुरुष म्हणून फक्त ऑकवर्ड वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मचाक म्हणजे काय हो? >>>
मचाक म्हणजे काय हो? >>> जेवताना जो आवाज निघतो तो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राग, संताप, चीड, किळस, शिसारी
राग, संताप, चीड, किळस, शिसारी, तिरस्कार, दु:ख, असहाय्यता, वगैरे अनेक भावना व्यक्त करायला असताना तुम्हाला एक पुरुष म्हणून फक्त ऑकवर्ड वाटले >> बेक्कार
तू निव्वळ महान आहेस यार..
मचाक - मराठी चावट कथा.
मचाक - मराठी चावट कथा.
असा याहूवर ग्रुप होता/ आहे.
गुगलवर mck group टैप करा
>>>>>
>>>>>
राग, संताप, चीड, किळस, शिसारी, तिरस्कार, दु:ख, असहाय्यता, वगैरे अनेक भावना व्यक्त करायला असताना तुम्हाला एक पुरुष म्हणून फक्त ऑकवर्ड वाटलेQ{A
>>>>>>>>
भिन्न लिंगी संबंधाला समाजिक मान्यता आहे,
पुरुष पुढाकार घेतो, स्त्रीचे शोषण करतो हे सोशल कण्डिशनिंग आहे,
जेव्हा त्यांना कंडिशनिंग ला छेद देणारी घटना दिसली, (मात्र सामाजिक मान्यता असणारी) त्यांनी सांगितलेला प्रसंग काठावरचाच म्हणायला लागेल, ज्यात त्यांचा विनय भंग होतोय असा त्यांना संशय आला, ते सुद्धा 100%खात्रीने सांगू शकत नाहीयेत. म्ह्णून ते फक्त akward झाले असावेत.
जर सामाजिक मान्यता नसणारी,taboo असणारी घटना झाली असती , एखादे चान्स मारो काका भेटले असते तर राग, संताप, चीड, किळस, शिसारी, तिरस्कार, दु:ख, असहाय्यता, या भावना आल्या असत्या कदाचित.
काय हो, सिंथेटेक जिनिअस, त्या
काय हो, सिंथेटेक जिनिअस, त्या धाग्यावर आपले वेगळेच मत आहे. आपली यातली कुठली पोस्ट खरी समजायची,
>>>>>>>>>>>>
पुरुषांचाही विनयभंग होतो ! असा धागा मी काढला होता.बायकाही बर्याच बर्या चालू असतात.मिडथर्टी किंवा अर्ली फोर्टीमध्ये त्यांचे रिप्रोड्क्टीव प्रॉस्पेक्ट संपत आल्याने त्या जरा सेक्श्युली एक्स्प्रीमेंटल होतात असा माझा अनुभव आहे.
नवीन Submitted by सिंथेटिक जिनियस on 7 February, 2017 - 05:12
>>>>>>>>>>>>>>
एखादे युग असे ही यावे जिथे पुरुष बायकांच्या नजरेत
मटेरियल,माल असावे.>>>>>जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत हे शक्य नाही.पुरुषांचा सेक्स ड्राईव natural आहे,स्त्रीयांचा instrumental असतो.त्यामुळे हे शक्य नाही.
Submitted by सिंथेटिक जिनियस on 6 February, 2017 - 02:29
>>>>>>>>>>>>>>
स्त्रीयांना सेक्स ड्राइव्ह
स्त्रीयांना सेक्स ड्राइव्ह नसतो असे मी कुठे म्हणटलेले नाही ,फक्त तो instrumental असतो एव्हढेच म्हंणटले आहे.
एखादे चान्स मारो काका भेटले
एखादे चान्स मारो काका भेटले असते तर राग, संताप, चीड, किळस, शिसारी, तिरस्कार, दु:ख, असहाय्यता, या भावना आल्या असत्या कदाचित. >>>
हो तसाहि एक अनुभव खूप पूर्वी आला होता. मी दहा बारा वर्षाचा होतो. शाळेला बस मधून जात होतो. ह्यातले काहीही न कळण्याचे ते वय होते. तर एकदा बसमध्ये एक "काका" माझ्या शेजारी येऊन बसले. थोड्या वेळाने त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला (शाळेचा ड्रेस म्हणजे पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. त्यामुळे त्या वयात मुलांच्या मांड्या व पाय उघडेच असतात). काही वेळाने ते माझी मांडी दाबू लागले. त्यांचे लक्ष मात्र समोर होते. मला त्यांचे वागणे कळेना. मी त्यांचा हात बाजूला केला. तर थोड्या वेळाने पुन्हा तेच सुरु. मांडी पोटरी असे दाबत राहिले. मला कळत नव्हते तरी प्रकार विचित्र आहे इतके लक्षात नक्की आले होते. मला अजूनहि आठवते मी घरी गेल्यानंतर मांडी हात पाय साबणाने स्वच्छ धुतले होते. माझ्या बालबुद्धीला तेंव्हा असे वाटले कि हे कोणीतरी दुष्ट काका आहेत व आपल्याला काहीतरी पावडर लाऊन गेले. पण आज आठवतो तेंव्हा तो काय प्रकार होता हे लक्षात येते आणि किळस शिसारी नक्की येते अशा लोकांची.
सिंथेटीक जिनिअस,
सिंथेटीक जिनिअस,
१चला नेमकी वाक्ये कोट करते.
१) पुरुषांचाही विनयभंग होतो ! बायकाही बर्याच बर्या चालू असतात.
२) एखादे युग असे ही यावे जिथे पुरुष बायकांच्या नजरेत मटेरियल,माल असावे.>>>>>जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत हे शक्य नाही.
हे जरा मला परस्परविरोधी वाटतेय.
पहिल्या वाक्यात तुम्हीही काही कमी नाही असा आवेश होता, पण दुसर्या वेळी या बायका आपल्याला मटेरीअल माल समजून बघणार हे ऐकताच कुठेतरी पुरुषी अहंकार दुखावल्यासारखे पटकन हे शक्य नाही असे बोललात. ते सिद्ध करायला पुढे जे काही सेक्स ड्राईव्ह वगैरे कारण दिलेत ते ईथे गौण आहे. मुद्दा विरोधाभासाचा आहे
आज्जीचा पण धागा येणार आहे का?
आज्जीचा पण धागा येणार आहे का?
सरकार किती वेळ तुम्हीच
सरकार किती वेळ तुम्हीच ब्याटींग करणार , आमच्या ऋन्म्याला पण ब्याटींग करु द्या की जरा .
श्री
श्री![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता झगड्या येणार खुन्नस काढायला. शुभेच्छा !