आमचे ऑफिस स्टेशनपासून लांब असल्याने बसला पर्याय नाही. त्या परिसरात बरेच ऑफिसेस असल्याने आणि सर्वांच्या वेळा थोड्याफार फरकाने सारख्याच असल्याने बसला बरीच गर्दी असते. अगदी रोजच असते. बस्स तिथेच भेटतात हे. आमचे चान्स मारो आजोबा.
हे ऑफिसला जात नसावेत. पेहरावावरून तरी वाटत नाहीत. बसमधून सकाळी साडेआठ पावणेनऊच्या दरम्यान कुठे प्रभातफेरी मारायला जातात याची कल्पना नाही. पण बसमधील प्रत्येक पोरीबाळींना यांचा आशीर्वाद असतो.
परीसरात दोनचार कॉलेजेसही आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची बसमध्ये रेलचेल असते. काही छोट्यामोठ्या कंपन्या आहेत जिथे काही फ्रेशर्स म्हणून काही तरुण मुले कामाला आहेत. आम्हाला या कोणाची काहीच भिती वाटत नाही. पण चान्स मारो आजोबांची वाटते. भिती, किळस, की आणखी काही, कल्पना नाही.
हे चान्स मारो आजोबा एकुलते एक नाहीयेतच मुळी. यांची बरीच भावंडे आहेत. हे कधी लग्नसमारंभात आशीर्वाद देताना दिसतात. कधी एखाद्या कार्यक्रमात पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पुढे सरसावतात. तर कधी कुटुंब स्नेहसंमेलनात गालगुच्चे घेण्यापर्यंत यांची माया ओसंडून वाहते.
आजोबांना आज्जींची फार आठवण येत असते. त्यांचे भिरभिरणारे निष्पाप डोळे प्रत्येक मुलीत आज्जींनाच शोधत असतात. पण स्पर्श केल्याशिवाय त्यांचा हा शोध पुर्ण होत नाही. आणि आज्जींना काही मोक्ष मिळत नाही.
पण एक दिवस सांगायचे आहे या आजोबांना. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून. त्यांच्या नजरेत नजर मिळवून. त्यांचा थरथरता हात हातात घेऊन. अगदी खडसावून.... एऽऽऽऽऽ, आता बस्स!
बापरे का करत असावेत लोक असे
बापरे का करत असावेत लोक असे? मला तर कळतंच नाही बॉ
बापरे का करत असावेत लोक असे?
बापरे का करत असावेत लोक असे? मला तर कळतंच नाही बॉ>>>>>> तुम्ही मंगळावरचे का? कसंय हवा पाणी तिकडे ,यंदा जोरात पाउस पडला म्हणे ,सुगी झाली की नाही?
सिंजी तुम्हाला माझा मुद्दा
सिंजी तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. तुमच्या इकडे माबो वरच्या लिंक चालत नसाव्यात बहुतेक.
बापरे का करत असावेत लोक असे?
बापरे का करत असावेत लोक असे? मला तर कळतंच नाही बॉ>>>>>> तुम्ही मंगळावरचे का? कसंय हवा पाणी तिकडे ,यंदा जोरात पाउस पडला म्हणे ,सुगी झाली की नाही?
>>> ह्य ह्य ह्या याअ... अशक्य हास्लो
खरचं हा विषय खुप नाजुक आहे...
खरचं हा विषय खुप नाजुक आहे... जवळपास प्रत्येक स्त्रीला असे कोणीतरी आजोबा, काका, मामा भेटतात.
हे असे विक्शीप्त (?) सहसा ३५-४० च्या पुढचेच दिसतात ते अगदी म्हातार्यांपर्यंत
अंदाजे ४-५ वर्षांपुर्वी जेव्हा ठाणे स्टेशनचा मधला ब्रिज नव्हता आणी बाकीच्या दोन पुलांवर अफाट गर्दी असायची तेव्हा एक अगदी किळसवाना प्रकार पाहीला होता.
५ नंबर फलाटाकडे जाताना प्रचंड गर्दी होती अगदी चेंगरा चेंगरी, समोरुन एक मुलगी येत होती कदाचीत कॉलेजची असावी अन अचानक एका माणसाने गर्दीचा फायदा घेत सरळ तीच्या टॉपच्या आत घातला... एक क्षण काहीच कळले नाही, ती मुलगी तर बिचारी रडायलाच लागली. तो माणुस तर लगेच सगळ्यांना धक्के देत निघुन पण गेला. आजुबाजुला ईतके लोक असुन ही कोणी काहीच बोलले नाही.
करून दाखवलं
करून दाखवलं
सुनावलं, खडसावलं आजोबांना. ठरवून. ईथे विषय काढल्यापासून संधी शोधतच होते. काल पहिल्यांदा मिळाली. बसमध्ये मी बसले असताना माझ्या खांद्याला पाय लावायचे प्रयत्न चालू होते. जास्त धीर नाही धरला, लगेच ओरडले, "आजोबा जरा सरकून उभे राहा ना. तुमची मुलगीही माझ्यापेक्षा वयाने मोठी असेल" तर चाचरत म्हणाले, "काय झाले?"
बस, मग त्यानंतर मी संधीच दिली नाही, "काय झाले काय, काय झाले? मागेही तुम्हाला हटकले होते. कश्याला सारखे चिकटायला येतात. मीच नाही तर या सगळ्याजणींशी तुमचे हेच चाळे असतात. थांबवा आता जरा हे. वय बघा आपले. त्यानुसार वागा जरा. तुमच्या वयाकडे बघून आता फक्त बोलून सोडून देतेय. पुढच्यावेळी करा असं, मग बघा काय करते ते.." एका दमात सारे बोलून झाले.
मुद्दामच म्हातार्या, थेरड्या, निर्ल्लज, नालायक वगैरे अपशब्द वापरायचे टाळले. कारण आपल्याकडे मुलांनी शिव्या देणे म्हणजे संताप व्यक्त करणे एवढाच अर्थ घेतला जातो, पण जेव्हा मुली संतापाने शिव्या देतात तेव्हा तिच्यावर असंस्कृतपणाचा शिक्का तर बसतोच पण तिच्या कॅरेक्टरबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. बघणारे लोकं ही मुलगी सुद्धा काही बरोबर नाही असा अर्थ काढून मोकळे होतात. मला माझ्याबद्दल कोण काय विचार करते याची पर्वा नव्हती. पण उगाच त्यामुळे त्या माणसाबद्दल कोणाच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हावा असे घडू द्यायचे नव्हते. म्हणून अगदी ओठांवर आलेल्या शिव्याही महतप्रयासाने रोखून धरल्या.
कदाचित आजोबांनी हुज्जत घातली असती तर तोल गेलाही असता, पण आजोबांनी पुढे वादच घातला नाही. नेहमी आमच्या कंपनीच्या स्टॉपनंतर पुढे कुठेतरी उतरणारे आजोबा आज मधल्याच स्टॉपला उतरले. आता सोमवारपासून दिसले नाहीत तर बरे.. दिसलेच तर त्यांचे नाही आता काही खरे ..
मी मुद्दामच हे सल्ला हवाय,
मी मुद्दामच हे सल्ला हवाय, मदत हवीय अश्या पद्धतीने ईथे मांडले नव्हते. कारण मुळात ती तशी नकोच होती. करायचेच आहे हे ठरलेच होते. तरी ईथे जे आपलेपणाचे सल्ले आले त्यांचे मनापासून आभार. काही मैत्रीणींनी कसलाही संकोच न बाळगता आपले अनुभव शेअर केले ते जास्त आवडले. खरे तर याचीच गरज आहे. आपल्याबद्दल लोक काय विचार करतील, यातून पुढे आपलीच तर बदनामी होणार नाही ना, असले विचार आपल्याला मागे खेचतात आपल्याशी काय घडले हे तपशीलवार कसे सांगायचे याचा विचार करत आपण चार पुरुषांसमोर हे सांगायलाही कचरत असू तर त्याचा विरोध करायला तरी कसे तोंड उघडणार. आपणच आपल्या शीलाचा बाऊ करणे सोडायला हवे तर ईतरांचे दृष्टीकोन बदलतील.
मला वाटते की अश्यांना धडा शिकवायचे एक फॅड आले पाहिजे. कोणी लगट केली की वळले पटकन आणि मारली थोबाडात. काढला पर्समधून मोबाईल बाहेर आणि घेतला त्याचा फोटो. करायचा अपलोड मग तो फेसबूकवर. शहरभर, भारतभर हे लोण पसरायला हवे. म्हणजे लोक चुकूनही आपला धक्का बायकांना लागणार नाहीत याची काळजी घेऊ लागतील.
अपर्णा, वाह. पाठलाग करून
अपर्णा, वाह. पाठलाग करून मारलेत. आपल्या धाडसाचे कौतुक
अतुलजी, आपला हा मुद्दा >>> १. छेड काढणे हि कृतीच घृणास्पद आहे. कुणी काढली त्याच्या वयाचा संबंध नाही. अशा सर्वच लोकांपासून (वयाचा विचार न करता) मुलींनी/स्त्रियांनी काळजी घेणे आवश्यकच.>>>
प्रश्न तो नाही,. काळजी जगातल्या प्रत्येक पुरुषापासून घ्यायची हे बायकांना समजतेच. पण आपल्या वयामुळे आपल्यावर कोणी संशय घेणार नाही किंवा कोणी उलटून बोलताना विचार करेल याचा फायदा घेत असले हिडीस प्रकार केले जातात हा मुद्दा आहे. अश्यांचा हा गैरसमज तोडणे गरजेचे आहे. त्यानंतर हे पुर्ण थांबेलच असे नाही. पण राजरोसपणे घडणार नाही. प्रमाण नक्की कमी होईल.
अर्चना तुम्ही जे केलेत ते
अर्चना तुम्ही जे केलेत ते कौतुकास्पदच आहे, भर बस मध्ये आपला आजोबा शोभेल अशा माणसाला खडसवायला गटस् लागतात,
मात्र
>>>>>
मला वाटते की अश्यांना धडा शिकवायचे एक फॅड आले पाहिजे. कोणी लगट केली की वळले पटकन आणि मारली थोबाडात. काढला पर्समधून मोबाईल बाहेर आणि घेतला त्याचा फोटो
>>>
हि भावना उत्साहाच्या भरात आली असावी असे मी मानतो,
या बाबत 2 गोष्टी चटकन आठवल्या, रोहतक मध्ये एका मुलाला पट्ट्याने फोडून काढणाऱ्या 2 बहिणी, आणि दिल्ली मध्ये पाठलाग करतोय या संशयावरून फेसबुक वर फोटो आलेला मुलगा, या प्रकरणी कुठल्या तरी चॅनेल ला त्या मुलाची माफी सुद्धा मागावी लागली होती.
दोन्ही घटनांमध्ये मुले निर्दोष होती,
स्त्रियांबरोबर फाजील चाळे कारणाऱ्यांबद्दल अजिबात सहानुभूती नाही पण तिथल्या तिथे अपमान करणे, जाब विचारणे हि एक गोष्ट झाली आणि जागतिक फोरम वर बेअब्रू करणे वेगळी गोष्ट,
उत्साहाच्या भारत सुक्या बरोबर ओले जळू नये इतकीच इच्छा,
उत्साहाच्या भारत सुक्या बरोबर
उत्साहाच्या भारत सुक्या बरोबर ओले जळू नये इतकीच इच्छा>>> हो उत्साहाच्या भरातच आली ती भावना. आताच अगदी वरच्या पोस्ट लिहितानाच सुचला तो विचार. तसेच हा ओले सुकेचा मुद्दा लिहित असतानाच माझ्याही डोक्यात आला. पण त्याच उत्साहाच्या भरात पुढे असाही विचार आला की फॅड आहे ते, येईल आणि जाईल. जळू दे थोडे सुकेही त्या काळात. पण त्याचे परीणाम फार काळ टिकतील.
जळू दे थोडे सुकेही त्या काळात
जळू दे थोडे सुकेही त्या काळात. पण त्याचे परीणाम फार काळ टिकतील >>> प्रार्थना करा की त्या सुक्यात तुमच्या जवळच कोणी नसू दे.
प्रार्थना तर रोज घरातून बाहेर
प्रार्थना तर रोज घरातून बाहेर पडताना करावीच लागते.
आजवर बहिणींसाठी केली काही दिवस भावांसाठी करेन.
चार वर्षांपूर्वी एका
चार वर्षांपूर्वी एका कंपनीमध्ये इंटर्नशिप करताना आम्हा मुलींना वयाने दुप्पट तिप्पट असणाऱ्या मॅनेजर लोकांकडून बेकार अनुभव आलेत. आमच्यासोबत फिरायला याल तर तयार प्रोजेक्ट करून देऊ अशी ऑफर दिली जायची. काही मुली चक्क तयार पण व्हायच्या. एका मैत्रिणीला वेंडरला भेटण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची तयारी केली होती एका HOD ने. त्याला आमच्यापेक्षा मोठ्या तीन मुली होत्या. तिने टाळाटाळ करत पळ काढला. तक्रार केल्यानंतर तिचं डिपार्टमेंट बदलण्यात आलं. तिथल्या कॉम्पुटरवर कॅड Drawing बनवताना एका फाईलमध्ये तिथे काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांचे विडिओ बनवलेले पाहिले आणि अंगावर सर्र्कन काटाच आला.
एका फाईलमध्ये तिथे काम
एका फाईलमध्ये तिथे काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांचे विडिओ बनवलेले पाहिले आणि अंगावर सर्र्कन काटाच आला.
>>>
शॉकिंग आहे!
अर्थात ते आधीचेही भयानक आहे. जिथे ऑफर दिली जाते तिथे जबरदस्ती करणारे किंवा धमकावणारेही असतील. बॉलीवूडमधील कास्टींग काऊच बद्दल ऐकले होते. पण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ईंटर्नशिप करणारया मुलींनाही हे भोगावे लागत असेल तर परीस्थिती फार बिकट आहे.
सर्वत्र नसावं कदाचित. आम्ही
पण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ईंटर्नशिप करणारया मुलींनाही हे भोगावे लागत असेल तर परीस्थिती फार बिकट आहे.>>>सर्वत्र नसावं कदाचित. आम्ही ज्या विभागात काम करत होतो तो मेकॅनिकल इंजिनीरिंगशी संबंधित असल्याने तिथे महिला कर्मचारी खूपच कमी होत्या.
प्रतिज्ञा, हो. सर्वत्र नक्कीच
प्रतिज्ञा, हो. सर्वत्र नक्कीच नसावे. आमच्याईथे तरी असे नाही. म्हणजे नसावे नक्कीच. अश्या गोष्टी असल्यास लपत नाही. कुजबूजीतून तरी बाहेर येतात. पण तरीही जिथे कुठे आहे तिथे तरी ते आहे हे भयानक आहे.
एवढ्या खात्रीने नक्कीच नसावा
एवढ्या खात्रीने नक्कीच नसावा बोलू नकोस रे.
हो शभर टक्के खात्री नाहीच
हो शभर टक्के खात्री नाहीच म्हणून पोस्टमध्ये आमच्याईथे असे काही नाही चे नसावे केले. ... काय माहीत बस वाटले तसे.. पण खरे आहे, असण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाही. मागे एकदा ऑफिसच्या पार्टीत दारू चढल्यानंतर ज्या लोकांकडून अपेक्षा केली नव्हती अश्या काही जणांकडून महिला कर्मचार्यांबद्दल नको ती शेरेबाजी ऐकलेली. ते ही एक शॉकिंग होते. दारू उतरल्यावर तेच लोक पुन्हा आदरणीय मोडमध्ये आले होते. कोणते रूप खरे समजावे समजत नव्हते.
मी त्या युगाची वाट पाहत आहे
मी त्या युगाची वाट पाहत आहे जिथे,, एखाद्या पुरुष आयडीने असा धागा काढावा.
एखादे युग असे ही यावे जिथे पुरुष बायकांच्या नजरेत मटेरियल,माल असावे.सुरुवात बहुधा ह्या युगात झाली आहे.
बाकी अर्चना तुझ कौतुक.नेक्ट्स टाईम इथे विचारत बसण्यात वेळ घालवु नकोस.आनि थेरड्या,म्हातार्या हे खुप सभ्य शब्द झाले. भ आनि च च्या भाषेत ही शिव्या देत्या यायला हव्या.अस माझ वैयक्तीक मत आहे.मी बस मधे वापर ही केला आहे.
पुण्यामधले पब्लिक तर नक्कीच सपोर्ट करत बायका ,मुलीना अश्या वेळी.
एखादे युग असे ही यावे जिथे
एखादे युग असे ही यावे जिथे पुरुष बायकांच्या नजरेत
मटेरियल,माल असावे.>>>>>जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत हे शक्य नाही.पुरुषांचा सेक्स ड्राईव natural आहे,स्त्रीयांचा instrumental असतो.त्यामुळे हे शक्य नाही.
थँक्स अर्चना म्याडम.
थँक्स अर्चना म्याडम.
उत्साहाच्या भरात सुक्या बरोबर ओले जळू नये इतकीच इच्छा>>>
ओल्याबरोबर सुके असो किंवा सुक्याबरोबर ओले असो, आपले असो किंवा परके, गर्दीत परपुरुष्याने हात लावणे, अंगचटीला येणे, काहीतरी कमेंट पास करणे, उगीच बघत राहणे हे जर एखाद्या स्त्री ला गैर वाटत असेल तर तिने विरोध करणे आवश्यक आहे. हे स्वतः बाबत असो किंवा इतरांसाठी आपल्याला गैर वाटणे जरुरी आहे. बस.... नाहीतर काही स्त्रिया तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात त्याचे काय, कितीतरी स्त्रियांवर घरी आप्त स्वकीयांकडून हि हे सगळे भोग भोगावे लागतात. सजग राहणे जरुरी. बाकी जे कोणी या गोष्टीला फॅड समजत असतील त्यांनी एकदा या गोष्टी अनुभवाव्यात....
अपर्णा,
अपर्णा,
कुठल्या मुद्द्यांबद्दल कॉशन केले आहे या बाबत गल्लत होतेय का?
>>>>
स्त्रियांबरोबर फाजील चाळे कारणाऱ्यांबद्दल अजिबात सहानुभूती नाही पण तिथल्या तिथे अपमान करणे, जाब विचारणे हि एक गोष्ट झाली आणि जागतिक फोरम वर बेअब्रू करणे वेगळी गोष्ट,
>>>>
विरोध करू नये असे कुठेच म्हंटले नाहीये, तो काय प्रमाणात आणि काय पद्धतीत करावा या बद्दल बोललो आहे.
ओले कसे जळते हे त्या आधी 2 उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे,
दोन्ही गोष्टीत मुले निर्दोष होती, एका गोष्टीत एका चॅनेल ला माफी मागायला लागली, दुसर्यावेळी मुलींना पुरस्कार जाहीर करून सरकारला तोंडघशी पडावे लागले होते.
यात मुलांचा जो अपमान झाला , त्यांच्यावर फुकट molester म्हणून शिक्का बसला त्याचे काय?
आणि या ओल्या मध्ये तुमचा भाऊ, मुलगा, नवरा कोणीही असु शकतो,
त्याचा (अगदी त्याने खरच विनयभांग केला असे गृहीत धरले तरी) तिकडच्या तिकडे अपमान होऊन/कानाखाली बसलेली प्रिफर कराल, कि फेसबुक वर viral झालेला फोटो आणि आयुष्यभरासाठी मोलेस्टर म्हणून बसलेला शिक्का प्रिफर कराल?
असो... हे माझे या विषयावरचे शेवटचे पोस्ट.
मला वाटते धगकर्ती ला माझा मुद्दा कळला आहे, त्यामुळे मी या पुढे प्रतिसाद देणे थांबवतो.
त्याचा (अगदी त्याने खरच
त्याचा (अगदी त्याने खरच विनयभांग केला असे गृहीत धरले तरी) तिकडच्या तिकडे अपमान होऊन/कानाखाली बसलेली प्रिफर कराल, कि फेसबुक वर viral झालेला फोटो आणि आयुष्यभरासाठी मोलेस्टर म्हणून बसलेला शिक्का प्रिफर कराल?
>>>>>
सिम्बा हे बोल्ड केलेले काही पटले नाही. खरंच विनयभंग केला असतानाही हे मत का?
आणि प्रीफर कराल म्हणजे त्या गुन्हेगारालाच आपल्या आवडीचा पर्याय देत आहात का?
मला याचे उत्तर विचाराल तर अश्यांच्या (म्हणजे खरेच विनयभंग केलेल्यांच्या) कानाखाली जाळ काढण्यापेक्षा वा शारीरीक मारहाण करण्यापेक्षा (किंवा त्यासोबत) त्यांची इज्जत चव्हाट्यावर आणा, बदनामी करा, त्यांना शरमेने मान खाली घालायची वेळ आणा तरच तो न्याय झाला.
बाकी सुके ओले मुद्याशी काही अंशी सहमत.
काही अंशी म्हणालो कारण ज्या मुलीला असा घाण अनुभव येतो ती काय विचार करते ते तिच्यावर सोडावे, आपण त्या वंशाला गेल्याशिवाय त्या परिस्थितीत आदर्श विचार काय आणि ते करणे किती सोपे किती अवघड हे समजू शकत नाही.
फेसबुक वर viral झालेला फोटो
फेसबुक वर viral झालेला फोटो आणि आयुष्यभरासाठी मोलेस्टर म्हणून बसलेला शिक्का प्रिफर कराल>>> असे केले तरच पुढे कोणीही गैरवर्तन करणार नाही. नाही तर ईथे आपल्याला कोण ओळखते? आज इथे अपमान झाला, उद्या दुसरीकडे जाऊ तिथे कोणाला माहीती कि आपण कसे आहोत ते असा विचार करून फालतुगिरी चालूच रहील. तसेच बदनामीची एव्हढीच भिती वाटते तर असे करूच नये ना.
चान्स मारो आंटी!
चान्स मारो आंटी!
या बाबत माझा अनुभव जरा वेगळा आणि दुसरी बाजू मांडणारा आहे म्हणून इथे लिहित आहे. एकदा सिटी बस मधून प्रवास करत होतो. बसमध्ये गर्दी तुडुंब भरली होती. मी उभा होतो. माझ्या पुढे अगदी थोड्या अंतरावर एक लेडी उभी होती. तीस-पस्तिशीची असेल. पुढच्या स्टोप वर बसमध्ये अजून खूप जण चढले. त्यामुळे सर्वांना पुढे सरकावे लागले. तसा मीही पुढे सरकलो. तर आता इतकी गर्दी होती आणि मागील प्रवासी ढकला ढकली करत असल्याने दोन व्यक्तींच्या मध्ये जागा राहणे जवळजवळ अशक्यच होते. तरीही त्या महिलेला स्पर्श होऊ नये याची मी काळजी घेत होतो. पण नंतर अचानक बसला ब्रेक लागल्यामुळे उभे असलेले सर्वच जण पुढील प्रवाश्यांवर रेलले. त्यामुळे निकराचा प्रयत्न करूनही माझा त्या आंटीला धक्का लागलाच. मी पुरता घाबरलो. सावरेपर्यंत तिने माझ्यकडे रागारागाने मागे माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. मी तिला सॉरी म्हणालो. आणि मागच्या माणसांना मागे रेटून तिच्या आणि माझ्या मध्ये बरीच जागा सोडून उभा राहिलो.
इथून पुढे जे घडले ते थोडे विचित्रच. काही वेळाने बसच्या धक्क्याचे निमित्त झाले आणि ती मागे सरकली. मला चिकटली. मी घाबरून अजून मागे सरकायचा आटोकाट प्रयत्न केला. थोडीशी जागा मध्ये निर्माण करून उभा राहिलो. तर थोड्याच वेळात काहीही कारण नसताना ती अजून मागे सरकली. आता मला मागे सरकायला जागाच नव्हती. पण तिला मी मागे चिकटून उभा आहे याचे काहीच वाटत नव्हते. अन्यथा तिने माघासारखे रागाने पहिले असते. आता मात्र मला ऑकवर्ड व्हायला लागले. घाम फुटला. पण मी हलूच शकत नव्हतो. स्पीड ब्रेकर व खड्ड्यांमुळे बसचे धक्के बसत होते. पण तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. त्या अवस्थेत खूप वेळ गेला.
मग गर्दी अगदी थोडी कमी झाली. थोडीशी जागा असूनही तिने पुढे सरकायचे नाव घेतले नाही.
कोण हाय रे तिकडे..
कोण हाय रे तिकडे..
'चान्स मारो आन्टी ' धागा काढा जरा कोणीतरी !!!!!!!!!!!!
तेच काढतील की. आणि कुणाला
तेच काढतील की. आणि कुणाला कशाला बोलवताय.
एक मित्र तुम्ही तुमची व्यथा मांडण्यासाठी चान्स मारो आंटी असा धागा काढा.
एक मित्र तुम्ही तुमची व्यथा
एक मित्र तुम्ही तुमची व्यथा मांडण्यासाठी चान्स मारो आंटी असा धागा काढा. >>>
ओके. काढतो.
लिंगपिसाट पुरुषांकडून
लिंगपिसाट पुरुषांकडून स्त्रीयाच नव्हे तर पुरुषांचाहि विनयभंग होतो. प्रमाण कमी असेल, पण आहे.
"लिंगपिसाट" हे पिसाटलेलेच असतात, तिथे दादा/काका/मामा/आजोबा अशी वयपरत्वे वाटणी होऊ शकत नाही.
हेच लिंगपिसाट वेळीच आवरले नाहीत, तर संधि मिळाल्यास पुढे बलात्काराच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतात.
हे विधान धाडसी आहे, यच्चयावत पुरुषजमात ( तृतियपंथियांच्या जवळपास जाणारे एखाद अर्धा टक्का सोडले तर) केव्हाही "लिंगपिसाट" बनु शकते, जर तसे बनण्यास अनुकुल वातावरण/संधी त्यास मिळेल.
अन त्याचमुळे, मुली वयात आल्याबरोबर पहिली शिकवण "पुरुषांपासून" लांब रहाण्याचीच दिली जाते (जायची? ) . धोका कुठुनही कुणाकडूनही कुठेही होऊ शकतो.
खूप पूर्वी एका शिकवणीच्या
खूप पूर्वी एका शिकवणीच्या ठिकाणी मीही असे आजोबा किंवा थोराड काका म्हणता येतील अशी व्यक्ती पाहिली आहे. क्लासमध्ये परिस्थितीने गरीब असलेल्या (म्हणजे आई-वडील मोलमजूरी करत असलेल्या) घरातून आलेल्या मुलीशी ते विनाकारण लगट करायचे. कोणाचे लक्ष नाही असे बघून चुकून लागला असे भासवत हात लावायचे. रिक्षाने सोबत जायचे असल्यास रिक्षात मुद्दाम ती मागच्या सीटवर त्यांच्या बाजूला बसेल आणि मागच्या सीटवर दाटी होईल असे बघायचे. (जवळच्या ठिकाणी मुलांना घेऊन रिक्षाने जायचे असल्याने एखादे मुल पुढे ड्रायव्हरशेजारीही बसत असे.) ती मुलगी अगदी सातवी आठवीत शिकणारी होती. तिला त्या माणसाचा हेतू कळत होता की नाही याबद्दल शंकाच होती. पण मला ते सरळ सरळ दिसत होते आणि आतून खूप चीड येत होती. ती व्यक्ती म्हणजे तिथली बरीच जुनी, जेष्ठ आणि आदरणीय ( मुलांच्या पालकांच्या नजरेतही ) अशी प्रतिमा असलेली होती. त्यामुळे हे सगळे तिथल्या जबाबदार व्यक्तीला विश्वासात घेऊन हे तिच्या लक्षात आणून दऊन, तिने ते स्वतः पाहून तिची खात्री करून घेतल्याशिवाय काही करता येण्यासारखे नव्हते. कारण ते सगळे खोटे आहे असा कागावा त्या आजोबांनी/काकांनी सहज केला असता. भिडेखातर ती मुलगी त्यांच्याविरुद्ध काही बोललीही नसती (उलट तिचीच शिकवणी बंद झाली असती). दुर्दैवाने लवकरच माझा त्या संस्थेशी संबंध तुटला आणि ते तिथल्या कोणाच्या तरी कानावर घालणे राहून गेले, याची बोच वाटत राहते.
Pages