आमचे ऑफिस स्टेशनपासून लांब असल्याने बसला पर्याय नाही. त्या परिसरात बरेच ऑफिसेस असल्याने आणि सर्वांच्या वेळा थोड्याफार फरकाने सारख्याच असल्याने बसला बरीच गर्दी असते. अगदी रोजच असते. बस्स तिथेच भेटतात हे. आमचे चान्स मारो आजोबा.
हे ऑफिसला जात नसावेत. पेहरावावरून तरी वाटत नाहीत. बसमधून सकाळी साडेआठ पावणेनऊच्या दरम्यान कुठे प्रभातफेरी मारायला जातात याची कल्पना नाही. पण बसमधील प्रत्येक पोरीबाळींना यांचा आशीर्वाद असतो.
परीसरात दोनचार कॉलेजेसही आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची बसमध्ये रेलचेल असते. काही छोट्यामोठ्या कंपन्या आहेत जिथे काही फ्रेशर्स म्हणून काही तरुण मुले कामाला आहेत. आम्हाला या कोणाची काहीच भिती वाटत नाही. पण चान्स मारो आजोबांची वाटते. भिती, किळस, की आणखी काही, कल्पना नाही.
हे चान्स मारो आजोबा एकुलते एक नाहीयेतच मुळी. यांची बरीच भावंडे आहेत. हे कधी लग्नसमारंभात आशीर्वाद देताना दिसतात. कधी एखाद्या कार्यक्रमात पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पुढे सरसावतात. तर कधी कुटुंब स्नेहसंमेलनात गालगुच्चे घेण्यापर्यंत यांची माया ओसंडून वाहते.
आजोबांना आज्जींची फार आठवण येत असते. त्यांचे भिरभिरणारे निष्पाप डोळे प्रत्येक मुलीत आज्जींनाच शोधत असतात. पण स्पर्श केल्याशिवाय त्यांचा हा शोध पुर्ण होत नाही. आणि आज्जींना काही मोक्ष मिळत नाही.
पण एक दिवस सांगायचे आहे या आजोबांना. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून. त्यांच्या नजरेत नजर मिळवून. त्यांचा थरथरता हात हातात घेऊन. अगदी खडसावून.... एऽऽऽऽऽ, आता बस्स!
खरच आता बस्स..
खरच आता बस्स..
बाकि तुमचं लेखन रुन्मेषभौ ला टफ फाईत हं
चान लिहिता आपन
सध्या ऑफिसला पोहोचत असल्याने
सध्या ऑफिसला पोहोचत असल्याने ईथे रूमाल.
पण हे व्हॉटस्सपवर आपल्या नावासह आणि ईथल्या लिंकसह शेअर केले तर चालेल का?
अगं मग सांगून टाक ना...
अगं मग सांगून टाक ना... शुभस्य शीघ्रम...
एक दिवस सांगायचे आहे या
एक दिवस सांगायचे आहे या आजोबांना>>>> एक दिवस म्हणजे कधी खडसावणार आहात?
अर्चना जी तुम्ही बँग-बँग हा
अर्चना जी तुम्ही बँग-बँग हा चित्रपट बघितला आहे क?
त्यात हरलीन त्या एका दिवसाच्या शोधात असते, ह्र्तिक तिला सांगतो तो एक दिवस आजच आहे.....
अस शोधत बसल तर तो एक दिवस कधीच येनार नाही.
ऋरुन्मेष तुम्हाला हवे तिथे
ऋरुन्मेष तुम्हाला हवे तिथे फॉर्वर्ड करा. नो प्रोब्लेम.
निर्झरा ऋतिक आवडतो पण तो चित्रपट ट्रेलर बघून पुढे बघावासा वाटला नाही. आपण म्हणता ती स्टोरीलाईन असेल तर नक्की बघेन. आणि ते अमलातही आणेन.
मयुरी, सस्मित, हो आमच्यात कोणी खडसवायची हिंमत राखून आहे ते मीच आहे. पण मैत्रीणिंमध्येच एकमत नाही की मी असे करायला हवे, की नको ? ईथे चार ओळी लिहून हलके झाले समजा किंवा यालाच पोल समजा. पण सुनावल्याशिवाय चैन नाही पडणार हे नक्की
ऋरुन्मेष तुम्हाला हवे तिथे
ऋरुन्मेष तुम्हाला हवे तिथे फॉर्वर्ड करा. नो प्रोब्लेम. >>> लोल ऋम्न्या तुमच्या नावाने फॉर्वर्ड करणार , कसला भारी जोक मारलात .
पन्नाशी पुढचे सगळेच काका व
पन्नाशी पुढचे सगळेच काका व आजोबा बुबुक्षीत असतात,एक वेळ तरुण मुले नजर खाली घालतील पण हे थेरडे वयाचा फायदा उठवून चान्स मारतात.
एक साठीचे आजोबा मला लायब्ररीत भेटायचे.आम्हा तरुणांच्या ग्रुपमध्ये येऊन बसायचे,आधी इकड तिकडच्या गप्पा मारयचे.एकदा आम्हाला प्रश्न विचारला त्यांनी,तुम्ही सेक्स केला आहे का? फारच मजा वगैरे असते त्यामध्ये (तेव्हा आम्ही २०,२२ वर्षाचे होतो).नंतर म्हणाले तरुण मुली बघितल्या की आम्हालाही "घ्याव्या" वाटतात.बायको म्हातारी झाल्यावर तिच्यात मजा नसते वगैरे.
या म्हातर्याच्या रोजच्या गप्पा ऐकुण हे कीति तुंबलेलं गटार आहे हे लक्षात आल्यावर आम्हीच मग कट्टा बदलला.
@ अर्चना ,असले म्हातारे अंगचटीला आल्यास फाडकण्ण् कानाखाली ठेऊन द्या ,सांगुण ऐकणार्यातले नसतात हे sex maniac.
सगळ्यांच्या देखत
सगळ्यांच्या देखत खडसावल्याशिवाय त्यांना समज मिळणार नाही. ओळखीचा , वयाचा फायदा घेउन गैरवर्तन करणारे लोकं सगळ्यात जास्त हरामखोर. अशांना आपण सुद्धा ओळखीचा/वयाचा मुलाहिजा न बाळगता लवकरात लवकर समज दिलेली उत्तम. इतर कुणी असतील तर त्यांना पण मेसेज मिळेल.
अरारा हा प्रकार माहिती नव्हता
अरारा हा प्रकार माहिती नव्हता
खरे आहे. आणि हे काहीवेळेला
खरे आहे. आणि हे काहीवेळेला दिसतात इतके बिचारे की आपला आपल्यालाच संभ्रम पडावा की आपली समजण्यात तर चुक झाली नाही ना? काही बोलताही येत नाही. ईतर लोकांची सहानुभुती यांनाच असते. ईतर वेळी साट्कन कानाखाली आवाज काढतो, तेही करता येत नाही.
>>>>>>>सध्या आवडत असेल असे कौतुक करून घ्यायला. तोपर्यंत चालू दे. तीसेक वर्षांनी मग खडसावता येईल.---
ही अतिशय फालतु कमेंट आहे. निषेध!
>>एक दिवस म्हणजे कधी खडसावणार
>>एक दिवस म्हणजे कधी खडसावणार आहात?
सध्या आवडत असेल असे कौतुक करून घ्यायला. तोपर्यंत चालू दे. तीसेक वर्षांनी मग खडसावता येईल.>>
या प्रतिसादाचा निषेध!
अशा आजोबा कॅटेगरीतल्या लोकांना वेळीच खडसावावे. असे लंपट आजोबा ज्या कुटुंबाचा भाग आहेत तिथल्या मुलीबाळींना किती त्रास होत असेल या विचारानेच कसेतरी होते.
फटकवायचा हो सरळ. स्त्रियांना
फटकवायचा हो सरळ. स्त्रियांना स्पर्श कळतात ना मग दुसरा विचार कशाला करायचा...
मागे एकदा बांद्रा स्टेशनला उतरत असतांना मी बघितले.. तोल जाण्याचं नाटक करुन एक खतुरड्याने एका अल्पवयीन मुलीच्या छातीला धरले सरळ... खूप सणकवला तिथे पब्लिकने...
सोडायचेच नाही हरामखोरांना. म्हातारं माणूस झालं म्हणून काय कोणाच्या अब्रूवर हात घालायचे लायसन नाही मिळाले...
पण एक दिवस सांगायचे आहे या
पण एक दिवस सांगायचे आहे या आजोबांना.>>> अजिबात वेळ वाया घालवू नका. सगळ्यांसमोर चांगले खडसावून सांगा. कोणाला हात लावताना दिसले कि लगेच फोटो काढा आणि यापुढे असे काही दिसले तर सरळ क्र. १०३ ला पुराव्यासहीत तक्रार करेन म्हणायचे किंवा तक्रार कराच. असल्यांपासून दूर जायचे नाही, त्यांनाच दूर करायचे.
ताबडतोप सरळ करा त्या
ताबडतोप सरळ करा त्या व्यक्तिला...
अरे मी ईथे रुमाल टाकलेला, एक
अरे मी ईथे रुमाल टाकलेला, एक अनुभव लिहीण्यासाठी..
तर थोडक्यात असे,
आपल्याच बोरीवली स्टेशनवरची घटना. एक वयस्कर गृहस्थ, बरेपैकी आजोबा टाईप व्यक्तीमत्व. प्लॅटफॉर्मवरच्या महिलांच्या डब्यासमोरच्या एका बाकड्यावर महिलांना सोबत द्यायला बसायचे. बहुधा रोजच. आणि ते देखील असेच चान्स मारो असावेत. अर्थात त्या आधी ते माझ्या फारश्या गिणतीतही नव्हते. बस्स एक ओळखीचा चेहरा कुठेतरी वरचेवर दिसणारा ईतकेच. पण त्यादिवशी अचानक त्यांच्या शेजारी बसलेली बाई त्यांच्यावर भडकली. बसल्याबसल्याच त्यांनी तिला कोपराने ढोमसले असे ती म्हणत होती. आणि असे ते सारखे करतात असेही तिचे म्हणने होते. बस्स, तिने त्यांच्यावर चढायला सुरुवात करताच आजूबाजुच्या तिच्या ओळखीच्या नसलेल्या पण बहुधा नेहमीच त्या वेळेला असणार्या आणि आजोबांच्या शिकार झालेल्या बायकाही एकापाठोपाठ एक असे तीनचार जणी त्यांच्यावर तुटून पडल्या. आता हे उत्स्फुर्तपणे घडले की ठरवून केले हे त्यांनाच ठाऊक, पण फुल्ल मनोरंजक तमाशा. आजोबा पुरते गडबडले होते. गयावया करू लागले. त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट समजत होते की त्यांनी तो गुन्हा केला होता. त्यामुळे कोणालाही त्यांच्याबद्दल सहानुभुती वाटली नसावी. मी तर त्या नादात एक ट्रेनही सोडली. ते सुद्धा हलले नाहीत. कदाचित पळाल्यास पकडून मारतील अशी भिती त्यांना वाटत असावी. किंवा ते या प्रतिहल्य्यासाठी कधी तयारच नसावेत. असो, त्यानंतर मी कधी त्या टाईमाला असलो कि त्यांना शोधायचो. पण कधी दिसले नाहीत. कदाचित स्टेशन बदलले असावे किंवा कानाल कायमचा खडा लावला असावा. पण एक नक्की, त्या वेळेला ज्यांनी तो प्रकार पाहिला ते आयुष्यात कधी असा प्रकार करणार नाहीत.
जर ईथे सल्ला अपेक्षित असेल तर हाच,
जर तुम्हाला बरेच जणींना असे अनुभव असतील, त्या चुकीच्या स्पर्शाची शंभर टक्के खात्री असेल, तर एकाचवेळी ठरवून हल्ला करा. आणि एकाही पोराची यात मदत घेऊ नका. निव्वळ मैत्रीणी मुली बायकाच .. मिळून सार्याजणी ..
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते केलिय क?
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते केलिय क?>>> जरा कष्ट घ्या कि चांगले मराठी मधून लिहायला. नाहीतर लिहू नका.
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते केलिय क? >>>>>फ़क्त एकदा वाचा स्वत: लिहलेल... अणि तुम्हालाच जरी समजले काय म्हणायचे आहे ते तर पोस्ट करा...
वाट पाहु नकोस अर्चना. अश्याना
वाट पाहु नकोस अर्चना. अश्याना सरळ करायलाच पाहीजे. आवडत नाही हे बॉडी लॅन्गवेज ने कळवलच असेल. पण एकदा स्पष्ट सांगण गरजेच आहे.
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते केलिय क?
mi lihileli comment delete keliy ka?
तुम्चि चोम्मेन्त अद्मिञ्च
तुम्चि चोम्मेन्त अद्मिञ्च देलेते करु शकनर न?
त्यंन विचरवे विपु करुन, अस क केल म्हनुन
@ च्रप्स, तुम्हाला फुल
@ च्रप्स, तुम्हाला फुल परवानगी. तुम्ही मराठी रोमन लिपीतच लिहा. तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही. सर्वांनाच वाचायला बरं पडेल.
>>>>>>सध्या आवडत असेल असे
>>>>>>सध्या आवडत असेल असे कौतुक करून घ्यायला. तोपर्यंत चालू दे. तीसेक वर्षांनी मग खडसावता येईल.-->>>>>>>>>>> हे कुणी लिहिलंय?
मी शाळा-कॉलेजात असताना
मी शाळा-कॉलेजात असताना पार्ल्याच्या हनुमान रोडवर रस्त्यावर चुकून स्पर्श होईल इतकी लोकंही नसताना एक आजोबा सकाळ-संध्याकाळ फिरायला बाहेर पडायचे. अगदी चांगल्या, सुखवस्तू घरातला माणूस ! रस्त्यावर गर्दीच नसल्यामुळे मुली बेसावध असायच्या त्यात हे एकदम हात मारुन जायचे. एकदा आईला अनुभव आला ( ती ह्या गृहस्थांच्या मुलीच्या वयाची, आम्ही नातींच्या ! ) तिने लगेच आम्हाला सांगितले पण तोपर्यंत मीही अनुभव घेऊन झाला होता. मग दुरुनच ते येताना दिसले की सावध राहायला लागलो. तसे गर्दीच्या रस्त्यांवर सावध राहायला लागतेच एरवी ( तरीही असे स्पर्श १०० टक्के टाळता येत नाहीत हे वेगळे. )
आता वाटते आरडाओरडा करायला पाहिजे होता एकदा. पण ते इतके साळसूद होते चेहेर्यावरुन की स्वतः खबरदारी घेणेच योग्य वाटले बहुधा !
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते
मि लिहिलेलि चोम्मेन्त देलेते केलिय क? >>>>> hahahaha mala watate tumhi asech lihit jaa... wachtana mja yete... shbd n shbd wachla jaato ani to kalto suddha he wishesh... amhala ase lihita yet nahi... manav ni try kelay pan tumchya itke chaan jamele nahi... mi tar chraps yancha fan ch zaloy
लिहू कि नको असा विचार करत
लिहू कि नको असा विचार करत होते पण धीर करून लिहितेय हे मी घरी बोलले नाही ( चार शब्द मलाच ऐकायला मिळाले असते म्हणून).
एक वर्षभरापूर्वीची गोष्ट, दुपारची वेळ असल्याने ऊन बरच होतं , बस ची वाट बघत उभी होते, बस स्टॉप वर बरीच माणसं होती. स्टॉप च्या बाजूला फूटपाथ वर सावलीत एक आजोबा बसले होते. सत्तरीचे असतील चांगल्या घरचे दिसत होते कपड्यांवरून, तब्बेतीने भक्कम, त्यांचे डोळे लाल झालेहोते आणि घाम फुटला होता. काहीतरी त्रास होतोय त्यांना असं दिसलं म्हणून मी विचारायला गेले म्हटलं, विचारपूस केली आणि विचारला घरच्या कोणाचा नंबर असेल तर द्या बोलावून घेते, तर नाही म्हणाले अमुक अमुक ठिकाणी जायचा आहे बरं नाही वाटत, मग रिक्षा थांबवू का विचारला तर हो म्हणाले. चार रिक्षा वाल्याना विचारल्यानंतर एक जण तयार झाला. आजोबाना रिक्षात येऊन बस असं म्हटलं ते आले आणि स्वतः न बसताच मला म्हणाले तू बस मी सोडतो तुला. म्हटलं आजोबा मी जाईन मला वेगळ्या ठिकाणी जायचा आहे तुम्ही जा तर नाही जबरदस्तीनं मला हात पकडून बस म्हणायला लागले, हे काहीतरी विचित्र वागतायेत हे दिसल आणि मी पटकन हात ओढून घेऊन तिथून निघाले. नंतर एक बाई मागून आल्या आणि म्हणाल्या पोरी तो प्यायलेला आहे.
परवाचीच गोष्ट एक आजोबा हातात काठी घेऊन रिक्षा थांबवत होते पण ठिकाण जवळचा असल्याने रिक्षावाले तय्यार होत नव्हते. मग थोडा वेळ वाट बघीतली आणि कोणीच जात नाही हे बघून त्यांना नाही म्हणालेल्या रिक्षावाल्याला थांबून जायला तय्यार केले, तर आजोबा बसायला तय्यार नाहीत तो आधी का नाही म्हणाला त्याला स्टेशनचा भाडं पाहिजे... म्हटलं आजोबा तुम्ही इथेच उभे राहाल असेच बस आत्ता नाहीतर हा पण पाळेल, आजोबा हळूहळू बसत होते तेवढ्यात एक जण आला आणि रिक्षावाल्याला दम द्यायला लागला काय रे का नाही म्हणत होतास फलाना... बिस्ताना.... त्याच्या मागून अजून एक दोन जण. मी जाऊन माझ्या बस ची वाट बघत उभी राहिले. ( हे थोडं अवांतर )
हे दोन्ही प्रसंग आणि अनुभव दोन
आता कोणाला मदत करताना सुद्धा विचार करायला हवा हे ठरवलंय.
पहिल्या प्रसंगात आजूबाजूपैकी एकजण पुढे आला नाही कि काय चाललंय म्हणून विचारायला आणि दुसऱ्या प्रसंग त्या रिक्षावाल्याला जोर दाखवायला लगेच माणसं तय्यार असतात (घोर कलियुग )
विषय नाजूक आहे. ओके. दोन
विषय नाजूक आहे. ओके. दोन मुद्दे आहेत...
१. छेड काढणे हि कृतीच घृणास्पद आहे. कुणी काढली त्याच्या वयाचा संबंध नाही. अशा सर्वच लोकांपासून (वयाचा विचार न करता) मुलींनी/स्त्रियांनी काळजी घेणे आवश्यकच.
२. पण "प्रौढ वयात तरुण मुलींविषयी (किंवा तरुण मुलीला प्रौढ पुरुषाविषयी) आकर्षण वाटणे अयोग्य आहे" हा समज आदर्शवादी असला तरी वास्तववादी नाही. कारण असे आकर्षण असू शकते हे यापूर्वी वांरवार सिद्ध झालेले आहे. त्यावर हिंदीत दोन अख्खे चित्रपट पण येऊन गेले आहेत व ते गाजलेलेही आहेत. त्यात हेच दाखवले आहे. त्यामुळे "वयस्क माणूस आहे. त्यांना आपल्याविषयी असे काही वाटणे शक्य नाही" हा समज बाळगताना सावध असणेच गरजेचे.
"वयस्क माणूस आहे. त्यांना
"वयस्क माणूस आहे. त्यांना आपल्याविषयी असे काही वाटणे शक्य नाही" हा समज बाळगताना सावध असणेच गरजेचे.>>>>>>>>अगदी बरोबर बोललात आपण
गेल्यावर्षी घडलेला किस्सा हा
गेल्यावर्षी घडलेला किस्सा हा मी माझ्या एफबी पेज वर टाकला होता. बोरिवली ईस्ट ला गर्दीतून मी वाट काढत स्टेशन कडे निघाले होते, मागून एक व्यक्ती घाई घाईत आली आणि माझ्या पार्शवभागावर हात फिरवून पुढे गेली मी गर्दी आहे चुकून हात लागला असेल असे समजून त्याला फक्त शिव्या घालत त्याच्याच मागून चालू लागले, अचानक त्या नालायकाने समोरून येणाऱ्या शालेय विद्यार्थिनीच्या फ्रंट साईडला हात लावला म्हणण्यापेक्षा जोरात दाबला, ते बघून माझी इतकी सटकली मी माझ्या हातातली टिफिन बॅग त्याचा पाठीत मारली, तो पळू लागला (हे सर्व भर गर्दीत बर का ) आणि त्याने रास्ता चेंज केला पण मी मात्र त्याचा पिच्छा नाही सोडला त्याच्या मागे जाऊन त्याला मारणे चालूच ठेवले गर्दीत कोणीच माझी साथ देत न्हवते हे त्याला कळले आणि त्याने वळून माझी टिफिन ब्याग पकडली आणि मला शिव्या देत विचारू लागला क्यूँ मार रही हो ? मला जितक्या शिव्या येत होत्या तितक्या देऊन त्याची कृती सांगितली तशी आजूबाजूचे लोक थांबले, हे बघून तो हि माझ्या हाताला हिसडा देऊन पळाला माझ्या टिफिन ब्यागेचे बंध तुटले. आणि मी थोडी धावले अजून मारायला पण मग थांबले म्हंटले एवढा पराक्रम पुरे झाला. ज्या मुलींसाठी हे केले ती पुढे निघून गेली होती एव्हाना लोकांना वाटले होते कि माझा मोबाईल हिसकावला गेला म्हणून मी त्या माणसाला मारत होते. मला मात्र मी एका लिंगपिसाटला धडा शिकवला याचे समाधान होते.
Pages