सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

Submitted by निमिष_सोनार on 24 January, 2017 - 05:09

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, त्या 'घोरपडी' होत्या.

तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाण्यावर (आत्ताचा सिंहगड) चढाई करून गेले, तेव्हा किल्लेदार उदयभानास गाफील ठेवण्यासाठी काही मावळ्यांसह उभा कडा चढून गेले होते. त्यासाठी त्यांनी आधी आपल्या घोरपडीला ('यशवंती' हे आपल्या तिचे नाव होते) एक दोर बांधून वर पाठवले होते आणि घोरपडीची पकड खूप पक्की असल्याकारणाने तानाजी आणि इतर मावळे मंडळी सरसर तो कडा चढून किल्ल्यावर दाखल झाली. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारापाशी त्यांचे बंधू सुर्याजी तयारच होते. उर्वरित इतिहास तर आपणास ठाऊकच आहे.

घोरपडी होत्या त्या काळात.>>.

सह्याद्रीच्या डोंगर कपारीत अजुनी घोरपडी आहेत! बर्‍याच वेळा पाहिल्यात! पण ह्या जरा आकाराने मोठ्याच दाखविल्या!

काही असो झी मराठी च्या तद्दन भिकार मालिकांपेक्षा काही प्रमाणात अतीरंजित असली तरी अजुनी सुसह्य वाटते ही मालिका!

घोरपडी होत्या त्या काळात.>>.
सिरिअल मधे घोरपडी नसुन ते "Comodo Dragon" आहेत!
असो.. पण मालीका उत्त्तम चालु आहे!

सिरिअल मधे घोरपडी नसुन ते "Comodo Dragon" आहेत!

गुगल नव्हते तेव्हा खपून गेले असते. आजकाल नेट मूळे सगळा फोकस च बदलतो प्रेक्षकांचा.
जाऊदे झालं.
कमोडो, वा घोरपडो, गेल्या पळून. आता मालिका बघा. Happy

सुरुवातीचे थोडे दिवस चांगली वाटली.. गेल्या ३-४ भागांत अनुजा साठे ने न्हाउन येणे त्यावर बाळाजींचा तिच्याशी प्रेमळ वार्तालाप, त्या लहान मुलाची बडदास्त ठेवण्यात अख्खा खाल्लेला एपिसोड, तिखटाची पूड बंद डोळ्यावर ओतणे... ही सगळी मालिकेचा टीआरपी वाढल्याने, पहिल्यापेक्षा जास्ती एपीसोड्स दाखवायची परवानगी मिळाली आता पाणी घालवून पाणचट करा.. याची लक्षणं दिसू लागली आहेत !!! Happy

Shalaka ला अनुमोदन...बाजीराव फक्त मस्तानी साठी ओळखला जावा याची खंत वाटते..
सिरीयल अजून पर्यन्त तरी छान वाटते....संवाद आवडले

"झी मराठी च्या तद्दन भिकार मालिकांपेक्षा काही प्रमाणात अतीरंजित असली तरी अजुनी सुसह्य वाटते ही मालिका!"
अगदी बरोबर!

Pages