सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.
उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.
ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.
अर्धवट तुटलेल्या पट्ट्यांची
अर्धवट तुटलेल्या पट्ट्यांची किंवा तलवारींचे पाते वापरून पुढे त्यापासून खंजीर /बिचवा /कट्यार अशी हातघाई (जवळच्या अंतरावर होणारी लढाई) च्या लढाई ची शस्त्र बनवत. ब्रिटिशांच्या राजवटीत देखील विविध प्रकारच्या हत्यारांचे डाव पेच आखाड्यात /तालमीत शिकवले जात, पण १८५७ च्या उठावा नंतर हि सगळी शस्त्र तालमीत वापरण्यावर/शिकवण्यावर बंदी आली.
पुढे हि कला नामशेष होऊ नये म्हणून पट्ट्याच्या वापर करून लिंबू कापणे, तोंडात धरलेली लवंग कापणे, टाचेखाली असलेले लिंबू मारणे, हवेत उडवलेले लिंबू हवेत कापणे अश्या प्रकारचे खेळ सुरु झाले. वराती मध्ये / गावच्या जत्रेमध्ये हि कला सादर करणे असे प्रकार होऊ लागले आणि एक प्रकारे ह्या शस्त्राचे पुनर्रज्जीवन झाले.
प्रचि : दांडपट्टा (आंतरजालावरून साभार )

मी फक्त एक शॉट बघितला तो
मी फक्त एक शॉट बघितला तो पूर्ण फिल्मी वाटला मला. काही संस्कृतीरक्षक बाजीरावच्या आईचं केशवपन करायला येतात तेव्हा ती जबरदस्त विरोध करते आणि बाजीरावचे बाबा तिथे प्रकट होतात. मग मी नाही बघितलं पुढे.
मी एकच एपिसोड बघितला. बाळाजी
मी एकच एपिसोड बघितला. बाळाजी विश्वनाथ झालेला अभिनेता छान काम करतो. अनुजा साठे गोखले खूप सुंदर दिसली. डायलॉग एकदम बुलेट राजाची आठवण करून देणारा होता. बाळाजी एकटा सगळ्या शत्रूंना मारतो आणि म्हणतो - शास्त्र धारण करणारा ब्राम्हण वेळ पडल्यास हातात शस्त्र घेऊ शकतो.
असो पण मस्तानी आली की चित्रपटाप्रमाणे इथेही कटकटी रडारड पती पत्नी वोह चं दळण चालू होईल. त्यामुळे बघणार नाहीये मालिका.
चांगली माहीती दिलीत तोफखाना ,
चांगली माहीती दिलीत तोफखाना , धन्यवाद .
बायदवे तोफखाना आयडी घेण्यामागे काही कारण आहे का ?
आतापर्यन्त चांगली वाटली ही
आतापर्यन्त चांगली वाटली ही सिरियल. आता लेटेस्ट भागांमधे राधाबाईच्या साड्या मस्त होत्या, पैठण्या वगैरे. नेसण्याची पद्धत, खोपा इ. बरं जमलय. मलाही तो बाळाजीचे काम करणरा अॅक्टर आवडला. नॉन मराठी वाटलाच नव्हता मला.
मस्तानी इ. ला अजून खूप अवकाश असावा.
मस्तानी आली की
मस्तानी आली की
मी ऐकले की बाजीराव मोठा होइस्तवर काय झाले यावरच फक्त सिरियल आहे. त्यामुळे ते मस्तानी प्रकरण पुनः बघावे लागणार नाही. त्या प्रकरणावर शेकडो गोष्टी वाचल्या. आता पुरे ते.
मस्त चाललीय सिरियल , लहान
मस्त चाललीय सिरियल , लहान मुलांची कामं , प्रसंग मस्त दाखवलेत.
खूप छान आहे सिरीयल बाजीचा रोल
खूप छान आहे सिरीयल बाजीचा रोल छान आहे
या मालिकेचे भाग
या मालिकेचे भाग पुनःप्रक्षेपित होतात का ? असल्यास किती वाजता ? अन्यथा मला जालावर शोधून बघण्याशिवाय पर्याय नाही.
रात्री १० वाजता रिपीट टे.
रात्री १० वाजता रिपीट टे. असतो.
मालिका सध्या तरी आवडतेय.
मालिका सध्या तरी आवडतेय. तीनही मुलं अत्यंत गोड आहेत. especially चिमणा. casting अगदी छान जमून आलेय. मधे मधे पेरलेली मराठी छान वाटतेय. especially बाळाजींचं 'सरकार' आणि ताराराणींचं ' समजलं का?".
वरील अनेक प्रतिसादामध्ये
वरील अनेक प्रतिसादामध्ये मस्तानी आली कि हि मालिका बघु असे म्हटले आहे. अत्यंत कर्तबगार शुरवीर अश्या बाजीरावांची ओळख हि आपणांस फक्त बाजीराव मस्तानी प्रेमप्रकरणापुरतीच का व्हावी ?
४० वर्षाच्या आयुष्यात विजयी ४१ लढाया लढणार्या ह्या योद्ध्याची आपण मराठी माणसेच कदर नाही करत आहोत. सहज म्हणुन नेटवर पेशवे बाजीरावांची आणखी माहिती शोधत असताना एक पाकिस्तानी वेबसाइट नजरेस पडली. (http://defence.pk/threads/bajirao-the-destroyer-of-the-mughal-empire.267...) आपल्या शत्रुराष्ट्रानेही त्यांचे वर्णन 'Bajirao the destroyer of the Mughal Empire' अशी करावी आणी आम्ही मात्र त्यांच्या कर्तबगारीकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करुन त्यांच्या प्रेमप्रकरणातच अडकुन पडलो आहोत. आपल्या पुर्वजांबद्दल त्यांच्या उत्तुंग कर्तबगारीचे गोडवे आपण का नाही करत ?
४० वर्षाच्या आयुष्यात विजयी
४० वर्षाच्या आयुष्यात विजयी ४१ लढाया लढणार्या ह्या योद्ध्याची आपण मराठी माणसेच कदर नाही करत आहोत. सहज म्हणुन नेटवर पेशवे बाजीरावांची आणखी माहिती शोधत असताना एक पाकिस्तानी वेबसाइट नजरेस पडली. (http://defence.pk/threads/bajirao-the-destroyer-of-the-mughal-empire.267...) आपल्या शत्रुराष्ट्रानेही त्यांचे वर्णन 'Bajirao the destroyer of the Mughal Empire' अशी करावी आणी आम्ही मात्र त्यांच्या कर्तबगारीकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करुन त्यांच्या प्रेमप्रकरणातच अडकुन पडलो आहोत. आपल्या पुर्वजांबद्दल त्यांच्या उत्तुंग कर्तबगारीचे गोडवे आपण का नाही करत ?>>>>>>
+१००००
<> एकदम मस्त! आवडलं!
shalaka.m on 31 January, 2017 - 13:15 --> एकदम मस्त! आवडलं!
या सिरीयलच्या संवादांत
या सिरीयलच्या संवादांत आत्तापर्यंत एक विचित्र जाणवलेली गोष्ट म्हणजे - "मराठा"साम्राज्य, "मराठे"शाहि असा उल्लेख न होता 'मराठी'साम्राज्य, मराठिशाहि, मराठियंव, मराठित्यंव असा होतोय. काय कारण असेल बरं?..
४० वर्षाच्या आयुष्यात विजयी
४० वर्षाच्या आयुष्यात विजयी ४१ लढाया लढणार्या ह्या योद्ध्याची ............
>>>>
हिच आपेक्षा ठेउन आम्ही "बाजीराव मस्तानी" पाहयला गेलो.. पण काय दिसल तिथे...!!!!
प्रत्येकजण इतीहास वाचायला नाही जाणार ..जे दाखवलय / दाखवतात त्या वरुनच तर आपण आपली मत बनवतो...
त्या सिनेमाचं नाव भन्सालीने
त्या सिनेमाचं नाव भन्सालीने बाजीराव मस्तानीच दिलं आहे की प्रामाणिक पणे! त्याला तेच दाखवायचे होते. पेशवा बाजीराव आणि त्याची कारकीर्द नव्हे.

तरी पण त्याच्या सिनेमामुळे नॉन मराठी पब्लिक मधे बाजीराव नावाचा वीर योद्धा होता ही माहिती तरी झाली हे खरंच
मराठी , पेशवाई, पैठण्या, नथ इत्यादींना ग्लॅमरच आलं आमच्याइकडल्या पार्ट्यांमधे
येस.. थेन्क्स तो भन्सलि...
येस.. थेन्क्स तो भन्सलि...
सिरीयल दिवसेंदिवस रंगतदार
सिरीयल दिवसेंदिवस रंगतदार होते आहे आणि मूळ विषयाला धरून आहे असे वाटते. आणि अजूनपर्यंत तरी इतिहासाशी प्रामाणिक वाटते आहे.
पण एक विचारावेसे वाटते: पेशवा बाजीराव यांनी खरेच इतक्या लहान असतांना घोडा जिंकला होता का?
बच्चे कंपनी खरेच उत्स्फूर्त
बच्चे कंपनी खरेच उत्स्फूर्त आणि नैसर्गिक अभिनय करत आहेत
लहानपणीचा बा़जीराव ' रुद्र
लहानपणीचा बा़जीराव ' रुद्र सोनी' आहे त्याने संलीभ च्या ,' बाजीराव मस्तानी' मध्ये नानासाहेबचं काम केलं होतं.>>>>
मला वाटतं, संलीभ च्या 'बाजीराव मस्तानी' मध्ये नानासाहेबचं काम "आयुष टंडन" याने केलं होतं. ('लाईफ ऑफ पाय' या चित्रपटातील बालकलाकार होता तो)
सिरीयल अधिकाधिक कल्पक आणि
सिरीयल अधिकाधिक कल्पक आणि रंगतदार होत आहे. आपण बघताय ना?
सिरीयल अधिकाधिक कल्पक आणि
सिरीयल अधिकाधिक कल्पक आणि रंगतदार होत आहे. आपण बघताय ना?>>>>>>> कल्पक शब्द अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे.
मला फक्त एकच उत्सुकता आहे -
मला फक्त एकच उत्सुकता आहे - आधी ताराबाई कडे असणारा बाळाजी विश्वनाथ पुढे शाहूकडे कसा आला?
लहानपणीचा बा़जीराव ' रुद्र
लहानपणीचा बा़जीराव ' रुद्र सोनी' आहे त्याने संलीभ च्या ,' बाजीराव मस्तानी' मध्ये नानासाहेबचं काम केलं होतं.>>>>
मला वाटतं, संलीभ च्या 'बाजीराव मस्तानी' मध्ये नानासाहेबचं काम "आयुष टंडन" याने केलं होतं.>> दोघे पण होते वाटतं...
आगे आगे देखो होता है क्या?
आगे आगे देखो होता है क्या?

बाजीच्या मनातुन अल्पायुष्याची भीती घालवण्यासाठी आई जे काही करते ते काल एका झलक मधे पाहिलं. धन्य धन्य.
नवरा आवडीने १० वाजता बघत होता. काल म्हणे च्यायला! झाली ह्यांची पकावगिरी सुरु.
बाजीराव लहान होते तेंव्हा
बाजीराव लहान होते तेंव्हा महाराष्ट्रात कमोडो ड्रॅगन होते
>>बाजीराव लहान होते तेंव्हा
>>बाजीराव लहान होते तेंव्हा महाराष्ट्रात कमोडो ड्रॅगन होते
आणि बाजी ने त्यांना वेताने फोडून काढले
बाळाजी विश्वनाथ छानच अभिनय करतात..!
बाकी, कल्पक आणि रंजक याखेरीज आजकाल कुठलीच मालिका चालत नाही.. अजून तरी, पोषाख,, शेंड्या, आणि दाढी हे योग्य जागी टीकून आहेत हेच खूप आहे
मलाही कळेना छोटे डायनॉसॉर कसे
मलाही कळेना छोटे डायनॉसॉर कसे काय आले पेशवेकालीन महाराष्ट्रात!
बाळाजी विश्वनाथबद्दल सहमत. छान दिसतो व काम करतो तो अभिनेता. Character ही चांगलं स्केच केलंय ते. बालक बाजीरावपेक्षा राधा-बाळाजी विश्वनाथ हेच मेन लीड्स वाटतात.
डायनॉसोर कुठे "वहाँ जहरीले
डायनॉसोर कुठे "वहाँ जहरीले घोरपड है" असे मुघल सैनिक म्हणतात ना!
घोरपडी होत्या त्या .
बाकी त्या राधा ला जरा जास्तच ड्रामा करायला स्कोप मिळतो नेहमी. उठ सूठ ते केस मोकळे सोडून कुणा कुणाला झोडपणे वगैरे
Pages