बेंगळूरूमध्ये घडलेला लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 13 January, 2017 - 06:08

नवीव वर्षाच्या आदल्या रात्री बेंगलोरला जे घडले ते बातम्यांमधून कानावर आलेले. आज जरा वेळ होता, ते आठवले तर त्या संबंधित बातम्या आणि यू ट्यूब विडिओ पाहिले. शॉकिंग. शब्द नाहीयेत माझ्याकडे. त्यातला एकही विडिओ पुर्ण बघवला नाही. थिल्लरपणाच्याही पलीकडे काहीतरी किळस येणारी दृष्ये. थरकाप उडवणारी. मला बघतानाही घरी बसल्या असुरक्षित वाटू लागले. संबंधित बातम्या आधीही ऐकलेल्या पण या समजात होते की नवीन वर्ष आहे तर घडले असतील काही मद्यधुंद तरुणांकडून नेहमीसारखे गैर प्रकार, अश्यावेळी मुलींनीच काळजी घेणे योग्य. पण आज पाहिले तर माझ्याकडे निषेधालाही शब्द नाहीयेत. कुठेतरी खदखद काढायला मायबोलीवर संबंधित धागा आहे का शोधू लागले तर नाही मिळाला म्हणून नवीन धागा काढून लिहितेय. या प्रकारांना जर केवळ नवीन वर्षाचे निमित्ताने झालेले गैरप्रकार म्हणून सोडून दिले तर हे लोण देशभरात पसरायला वेळ लागणार नाही. अरे येतेच कुठून हे धाडस एखाद्या परस्त्रीच्या अंगावर बिनबोभाट हात टाकायचे. ते हात मूळापासून उखडले जातील याची भिती मनात नाही म्हणून? काही विडिओंमध्ये एक गोष्ट जाणवली आणि डोक्यात गेली की या घटनेनंतर मुलींना आपले चेहरे लपवून जावे लागत होते तर ज्यांनी हे केले, त्यांच्या दंडाला पकडून पोलिस नेत असतानाही त्यांना ना चेहरा लपवायची गरज भासत होती ना त्या चेहर्‍यावर कसली शरम होती. फार वेगाने घसरत चाललो आहोत आपण. कुठेतरी थांबवायला हवे हे. बेंगलोरसारख्या शहरात पोलिस हजर असताना ही स्थिती उद्भवत असेल तर ईतर ठिकाणांचे बोलायलाच नको. भ्रष्टाचार, महागाई, देशभक्ती आणि जातपात अश्या मुद्यांना घेऊन निवडणूका लढवल्या जाणार्‍या या देशात स्त्रियांच्या सुरक्षिततेलाही तितकाच महत्वाचा मुद्दा बनवायची वेळ आली आहे. जशी आपल्या घरच्या मुलीची ईज्जत सांभाळली जाते त्याच प्रामाणिकपणे देशातील प्रत्येक महिलेची जबाबदारीची सरकारने उचलायच हवी. दुर्दैवाने हा तितका महत्वाचा मुद्दा बनत नाही कारण आपण महिला अल्पसंख्यांक नाही आहोत. आपला स्वत:चा कोणता राजकीय पक्ष वा राजकीय संघटना नाहीये.,.

विडिओच्या लिंक ईथे शेअर करवत नाहीयेत. तरी bengaluru girls / women molested असे शोधल्यास सापडतील.

शेमफुल !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages