नवीव वर्षाच्या आदल्या रात्री बेंगलोरला जे घडले ते बातम्यांमधून कानावर आलेले. आज जरा वेळ होता, ते आठवले तर त्या संबंधित बातम्या आणि यू ट्यूब विडिओ पाहिले. शॉकिंग. शब्द नाहीयेत माझ्याकडे. त्यातला एकही विडिओ पुर्ण बघवला नाही. थिल्लरपणाच्याही पलीकडे काहीतरी किळस येणारी दृष्ये. थरकाप उडवणारी. मला बघतानाही घरी बसल्या असुरक्षित वाटू लागले. संबंधित बातम्या आधीही ऐकलेल्या पण या समजात होते की नवीन वर्ष आहे तर घडले असतील काही मद्यधुंद तरुणांकडून नेहमीसारखे गैर प्रकार, अश्यावेळी मुलींनीच काळजी घेणे योग्य. पण आज पाहिले तर माझ्याकडे निषेधालाही शब्द नाहीयेत. कुठेतरी खदखद काढायला मायबोलीवर संबंधित धागा आहे का शोधू लागले तर नाही मिळाला म्हणून नवीन धागा काढून लिहितेय. या प्रकारांना जर केवळ नवीन वर्षाचे निमित्ताने झालेले गैरप्रकार म्हणून सोडून दिले तर हे लोण देशभरात पसरायला वेळ लागणार नाही. अरे येतेच कुठून हे धाडस एखाद्या परस्त्रीच्या अंगावर बिनबोभाट हात टाकायचे. ते हात मूळापासून उखडले जातील याची भिती मनात नाही म्हणून? काही विडिओंमध्ये एक गोष्ट जाणवली आणि डोक्यात गेली की या घटनेनंतर मुलींना आपले चेहरे लपवून जावे लागत होते तर ज्यांनी हे केले, त्यांच्या दंडाला पकडून पोलिस नेत असतानाही त्यांना ना चेहरा लपवायची गरज भासत होती ना त्या चेहर्यावर कसली शरम होती. फार वेगाने घसरत चाललो आहोत आपण. कुठेतरी थांबवायला हवे हे. बेंगलोरसारख्या शहरात पोलिस हजर असताना ही स्थिती उद्भवत असेल तर ईतर ठिकाणांचे बोलायलाच नको. भ्रष्टाचार, महागाई, देशभक्ती आणि जातपात अश्या मुद्यांना घेऊन निवडणूका लढवल्या जाणार्या या देशात स्त्रियांच्या सुरक्षिततेलाही तितकाच महत्वाचा मुद्दा बनवायची वेळ आली आहे. जशी आपल्या घरच्या मुलीची ईज्जत सांभाळली जाते त्याच प्रामाणिकपणे देशातील प्रत्येक महिलेची जबाबदारीची सरकारने उचलायच हवी. दुर्दैवाने हा तितका महत्वाचा मुद्दा बनत नाही कारण आपण महिला अल्पसंख्यांक नाही आहोत. आपला स्वत:चा कोणता राजकीय पक्ष वा राजकीय संघटना नाहीये.,.
विडिओच्या लिंक ईथे शेअर करवत नाहीयेत. तरी bengaluru girls / women molested असे शोधल्यास सापडतील.
शेमफुल !
हे त्याच घटनेबद्दल लिहिलंय
हे त्याच घटनेबद्दल लिहिलंय का? ज्यात त्या मुलीची आणि मेव्हण्याची मिलीभगत होती असं आढळलंय?
बाप रे! फार भयानक आहे
बाप रे! फार भयानक आहे हे!
कामाच्या लोड मुळे असेल, आधी वाचनात / कानावरही आले नव्हते.
हे प्रकार अत्यंत गंभीरतेने घेउन तातडीने कडक कारवाई व्हायला हवी.
ज्यात त्या मुलीची आणि
ज्यात त्या मुलीची आणि मेव्हण्याची मिलीभगत होती असं आढळलंय? >>
बँगल्रोर मधे तीन घटना झाल्या आहे.
एक ३१ डिसेंबर ला मॉब ने केलेला प्रकार ज्यात पोलीस समोरासमोर असुन सुद्धा
दुसरी एक मुलगी रात्री येताना दोन मुल स्कुटरवरून आली आणि त्यांनी छेडछाड केली.
तिसरी जी सस्मित यांनी उल्लेख केला आहे.
सस्मित यांनी उल्लेखलेली घटना
सस्मित यांनी उल्लेखलेली घटना मला माहीत नाही.
स्कूटर घटनेचा विडिओ पाहिलेला. संतापजनक आणि काळजीत टाकणारा होता. मुलगी रिक्षातून उतरली म्हणजे घर कदाचित जवळच असावे. आणि तरीही.. अश्यांना पकडून फटके दिले पाहिजेत आणि त्याचे विडिओ व्हॉटसपवर फिरायला हवेत..
मॉबने केलेल्या प्रकाराबद्दल उडत उडत कानावर आलेले. त्याचे व्हॉटसपपोस्ट किंवा फोटोही फारसे फिरल्याचे आठवत नाही. विडिओज यू ट्यूबवर असतील तर आता चेक करतो, त्यानंतरच बोलायला हवे. कारण थर्टीफस्ट्रला मुंबई गेटवेला सुद्धा बरेच गैरप्रकार चालतात असे ऐकून आहे. कधी तिथे बघायला गेलो नाही. एखादा भाग आधीच बदनाम असेल तर अश्यावेळी तिथे जाऊच नये.
बँगलोर बरोबर हरियाणा मधे आणि
बँगलोर बरोबर
हरियाणा मधे आणि छत्तीसगड मधे सुध्दा याहून भयानक प्रकार घडला आहे.
मुली काय कपडे घालतात,यावर
मुली काय कपडे घालतात,यावर कोणच बोलत नाही.परवाचीच गोष्ट ,कोल्हापुरात एका उफाड्याच्या मुलीने पिंक कलरचा टीशर्ट घातला होता व शर्टवर पुढे लिहीले होते,catch me if you can! असल्या मुली पुरुषांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतात व बळी जातात त्या सामन्य मुली.मला असे म्हणायचे नाही की मुलींनी तोकडे कपडे घालु नयेत ,पण थोडी decency असावी त्यात
अजुन एक ,मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास असे प्रकार कमी होतील या मताचा मी आहे,यावर एक धागा काढला होता तिथे एकही बाई फिरकली नाही ,या प्रश्नावर दोन्ही बाजूने उघड मंथन झाले पाहीजे.
मुली काय कपडे घालतात,यावर
मुली काय कपडे घालतात,यावर कोणच बोलत नाही.>>> पुन्हा मुलीच दोषी का?
पुरुषांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण>> असले घाणेरडे दृष्टीकोण असणारे 'पुरुष' लहान बाळापासून ते म्हाता-या बाई पर्यंत जी कोण जराही उघडी दिसेल तिला हात लावणार काय? मानसिकता बदला तुमची. लवकर बरे व्हा!!!
सिंजी तुम्ही दुसरा व्हिडीओ
सिंजी तुम्ही दुसरा व्हिडीओ पाहिला का ? त्यात त्या मुलीने बुरखा सदृश काही तरी घातले होते. कसले कपडे आणि कसले काय ओ ?
सिं जि, थोडी डिसेंसी म्हणजे
सिं जि, थोडी डिसेंसी म्हणजे नक्की किती? किती कपडे घतले तर असे प्रकार होणार नाहीत हे सांगता का जरा?
<<उफाड्याच्या मुलीने पिंक कलरचा टीशर्ट घातला होता>> कुठल्या रंगाचे कपडे घालावे, टी शर्ट (वापरण्यास तुमची परवानगी असेल तर) त्यावर काय लिहीले असावे आणि काय नाही हे पण सांगून टाका....म्हणजे तुमच्या नियमात न बसणारे कपडे कोणा मुलीने चुकून घातले आणि काही विपरीत घडले तर त्यांनाच दोष द्यायला तुम्ही मोकळे.. असाही दोष मुलींना/बायकांनाच दिला जातो...तुम्ही त्याला नियमांच्या चौकटीत बसवा....गेला बाजार मुलींची वाहन चालवण्याची परवानगी पण काढून टाका..म्हणजे कसं, त्या घरी असल्या की सर्वात सेफ...एक मिनीट, घरी पण परीचयाच्या लोकांकडून अत्याचाराच्या बातम्या वाचल्यात...आता काय करावे बरं??
अहो टंच टीशर्ट मुलींनी घातले
अहो टंच टीशर्ट मुलींनी घातले तरी मला आक्षेप नाही,थोड हॉट आणि सेक्सि दिसण्यात काहीच हरकत नाही.पण टीशर्टवर catch me if you can!,only ball should bounce!,sweet pie !असलं हलकटपणा केलेलं कशाला घालायचं ? यातुन ही मुलगी available आहे असा मेसेज जात नाही का? आजकालच्या मुली चालू असतात असाही निष्कर्ष काहीजण काढतात.माझा आक्षेप कपड्यांवर नाही त्याच्या सुयोग्य वापरावर आहे.
आजकालच्या मुली चालू असतात
आजकालच्या मुली चालू असतात असाही निष्कर्ष काहीजण काढतात >> आहो हा त्या मुलांच्या दृष्टीकोनाचा दोष नाही का ? त्यात कपड्यांचा संबंधच येतो कुठे ?? नॉर्मल सलवार-कमीज घालणार्या मुलींनाही चालू समजतातच ना ? उगीच मुलांच्या वागण्याचा दोष मुलींच्या कपड्यांवर घालू नका !!
<<यातुन ही मुलगी available
<<यातुन ही मुलगी available आहे असा मेसेज जात नाही का? >> अजिबात नाही...कुठल्याही प्रकारच्या, रंगाच्या, ढंगाच्या कपडयांनी ही मुलगी available आहे असा मेसेज जात नाही....ज्यांना असे उद्योग करायचे असतात ते लोकं कुठल्याही गोष्टीचा आपल्या सोयीने अर्थ लावून घेतात.... "कंसेट" ह्या प्रकाराचा अर्थ तुमच्या आणि तुमच्या सारख्याच इतर लोकांच्या डोक्यात कसा शिरत नाही....का तो शिरवूनच घ्यायचा नाहीये? असो, लौकर बरे व्हा...
अतिशय घाणेरडा आणि लज्जास्पद
अतिशय घाणेरडा आणि लज्जास्पद प्रकार.
आपल्याकडे पुरुषांची हीन मानसिकता पदोपदी आढळते. ३१ च्या पार्ट्या असो, गणपतीची मिरवणूक असो, प्लॅटफॉर्म असो.
कधी सुधारणार आपला समाज आणि कायदे व्यवस्था.
.पण टीशर्टवर catch me if you
.पण टीशर्टवर catch me if you can!,only ball should bounce!,sweet pie !असलं हलकटपणा केलेलं कशाला घालायचं ? यातुन ही मुलगी available आहे असा मेसेज जात नाही का? >>> अजिबात असला कसलाही मेसेज जात नाही , त्यांना जसे कपडे घालयचे असतील तसे त्या घालतील , बेंगलोरमध्ये जे झालं ते असल्या कोत्या विचारसरणीतुनच झालयं.
सर्वांनी PINK सिनेमा
सर्वांनी PINK सिनेमा पहावा....
टिशर्ट वर बरेचदा चित्रपटाची
टिशर्ट वर बरेचदा चित्रपटाची नावे लिहिलेली असतात.. Catch me if you can हा सुद्धा चित्रपटच.. कपड्यांमुळे असले प्रकार होतात अस तुम्हाला म्हणायच असेल तर पाकिस्तान सगळ्यात जास्त सेफ आहे का स्त्रियांकरीता ?
आणि सिंजी, मुळात मॉलेस्टेशन तंग अन् सेक्सी कपडे घातल्याने होते अस तुम्हाला वाटत असेल तर लहान मुली अन् म्हातार्या स्त्रिया यांपैकी काय घालतात? अन् समजा हा धागा अश्यांपैकी एखाद्यावरील अत्याचाराबाब्त असता तर तुमचा प्रतिवाद काय असता?
जिनियस ची सिंथेटिक काडी....
जिनियस ची सिंथेटिक काडी....
टीशर्ट्स वर काही
टीशर्ट्स वर काही प्रिंटेड/लिहिलेले असणे हे इनवायटिंग वाटणे ईथपर ठीक आहे पण म्हणुन काय लगेच मुलीच्या अंगाला हात लावायचा? (हे विक्रुतीचे जस्टिफिकेशन देणे बंद करा आधी). मुलांच्या कपड्यांवरही काहिही लिहिलेले असते पण म्हणुन आम्ही ते आमंत्रण समजुन त्यांच्या अंगाशी येत नाही, किती धागे झालेत यावर तरी बथ्थड ते बथ्थड.
नानाकळा +१
धागा आणि प्रतिसाद यात काहीच
धागा आणि प्रतिसाद यात काहीच नाविन्य नाही. शेवटी तेच ते दोषारोप स्त्रियांवर.
काहीतरी नवीन बोला, नवीन सुचवा, नवीन करा. सुरवात स्वतःपासून करा.
नो मिन्स नो
नो मिन्स नो
बाकी कुठल्या घटना? लिंक आहेत
बाकी कुठल्या घटना? लिंक आहेत का?
तिच्या गो-या उघड्या मांड्यानी
तिच्या गो-या उघड्या मांड्यानी
समाज बिथरलाय म्हणे...पण
अगदी अलिकडेच ऐकलं होत
चार महिन्याच्या बालिकेच्या मांडयानी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी....
सात वर्षाची चिमुरडी काका म्हणते
ज्याला...
त्याचाही देह मजबूर होतो तिचे
निरागसत्व बघून....
तेरा वर्षाची शाळकरी पोरी
युनिफाॅर्म का घालते उगाच
तिलाही पाहून तेच वाटतय
सभ्य (?)पुरुषांना
माझ्या घरी समीना येते कामाला
बुरखा घालून...नखशिखान्त
नालायक बाई...शरीर झाकून चेतवते
निष्पाप पुरूषी देहांना...नाही का?
साडी नेसून , कुंकू लावून ऑफिसात
जाणारी मीना पण तशीच....
साली ...साडीतून उतू जाते
अन निष्पाप पुरूषांची माती होते
सलवार कुरता,साडी किंवा असो
मिनी स्कर्ट...बाईच असते चवचाल...छपरी, छचोर.. छम्मकछल्लो किंवा आयटम......
अश्लील बोलणारा पुरूष मात्र ठरतो मर्द ....मित्रांमध्ये
पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेइमान झाला तो
अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर,सिग्नलला
शेजारी,शाळेत अन... जोहार होतो पद्मिनीचा
सगळीकडेच..
पण माझ्या संवेदनशील मित्रा....
तुझ्या शरीराच्या संवेदना ह्या मेंदूच्या
कह्यात हव्यात...ज्या सांगतील
योग्य जागा योग्य भावनांसाठी
असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली ,हतबल
सुभेदाराची सून ..आई म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली
त्यालाही होते मर्दाचे शरीर..
अल्लादिन खिलजीसारखेच..किंबहुना
त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता त्या शरीराचा
आणि मनाचा
म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची.
तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तोकडा थिच्या कपड्यांइतकाच पण तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी ....
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहीली.
म्हणूनच जाताजाता इतकच सांगेन,मित्रा
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या बंधनाशिवाय.....
नूतन शेटे
- f w d
बेंगलोर छेडखानी प्रकरणाबद्दल
बेंगलोर छेडखानी प्रकरणाबद्दल आणि त्याच्या गंभीरतेबद्दल आधी फारसे माहीत नव्हते. मात्र त्यावर आमीर, अक्षय, विराट कोहली वगैरे बरेच सेलिब्रेटी प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरूखची प्रतिक्रिया फार कडक आहे.
शाहरूख म्हणतो... महिलांना दुखवलं, तर पोटच्या मुलाचंही मुंडकं उडवीन
http://dhunt.in/1RkWR
via NewsHunt.com
त्या अबू आझमीने मात्र महिलांच्या मॉडर्न पेहरावाला घेऊन मुक्ताफळे उधळली आहेत.
गंमत म्हणजे त्याची सून आयेशा ताकिया हिने त्याच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या बंधनाशिवाय.....
खरे आहे.
स्वतःचे मन असे भरकटू दिले तर उद्या लोभ न आवरल्याने चोरी कराल! राग न आवरल्याने कुणाचा खून कराल!!
मग काय काय मुक्त स्वीकारायचे?
त्यापेक्षा आपल्या मनाला शिस्त लावा.
म्हणूनच जाताजाता इतकच सांगेन
म्हणूनच जाताजाता इतकच सांगेन,मित्रा
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या बंधनाशिवाय.....>>>> + १००
वरची फॉरवर्ड पोस्ट आवडली.
बाकीचा सगळा नेहमीचा काथ्याकुट निर्भया च्या धाग्यावर झालाच आहे.
काहीतरी नवीन बोला, नवीन सुचवा, नवीन करा. सुरवात स्वतःपासून करा.>>> + १
नानबा, एकदम पर्फेक्ट.
नानबा, एकदम पर्फेक्ट.
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन
आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या
बंधनाशिवाय.....>>> +१
अरे हे काय ? सिंजि कुठे गेले
अरे हे काय ? सिंजि कुठे गेले ?
आहा! ती कविता कसली सुंदर आहे.
आहा! ती कविता कसली सुंदर आहे... वाचुन काटा आला अंगावर!
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या बंधनाशिवाय.....
>>>>
याला प्लस वन
आणि एकूणच पोस्ट आवडली.
हे व्हॉटसपवर्चे फॉर्वड असेल तर मी सुद्धा तिथे ढकलते.
Pages