वडील

Submitted by वृन्दा१ on 26 December, 2016 - 11:09

डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...
आपल्या आयुष्यात आई-वडील दोघांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे.आपण सगळेच आईचे गुणगान गात असतो,वडीलांबद्दल फार कमी बोललं जात,खरतर आपले वडील कणखरपणे आपल्या पाठीशी उभे असतात,त्यांना दुःख झाले तरी अगदी सहजपणे लपवून आपल्याला हसवतात .
मला दादांबद्दल सांगायला आवडेल,ते नेहमी आधी आमचा विचार करतात ,आम्हाला काय पाहिजे,काय आवडत,काय नको हे सर्व आधी आणि नंतर मग त्यांचा.
मी स्वतःला खूप नशीबवान समजते माझ्याकडे आई आणि दादा दोघेही आहे,शेवटी एवढंच म्हणेन
"मातृदेव भव ,पितृदेव भव"

लहान आहे. पण मनाला भिडली.
आयुष्यात खुप महत्वाची व्यक्ती असते पप्पा. जेव्हा असतात तेव्हा आपण कळत नकळत दुर्लक्ष करतो. पण जेव्हा ती अचानक पणे सोडुन जाते ना तेव्हा संपुर्ण जग पाठीशी असतं पण आपण पोरके झालेलो असतो...
>>बाबा मला कळलेच नाही, तुझ्या मनी वेदना कशी मी राहू, बोल कुठे जाऊ मला काही समजेना साद हि घालते, लाडकी तुला जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा बाबा.. थांब...ना रे तु.. बाबा.. जाऊ नको दुर.. बाबा..>>
हे गाणं मी रोज गुणगुणते.

तृष्णा,हे दुःख आपल्याबरोबरच जातं.तुम्हाला वेळ मिळाला तर जाहिरात विभागात मी काही लिहिलंय ते वाचा.मला वाटतं आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतात.

@तृष्णा,
आयुष्यात खुप महत्वाची व्यक्ती असते पप्पा. जेव्हा असतात तेव्हा आपण कळत नकळत दुर्लक्ष करतोपण जेव्हा ती अचानक पणे सोडुन जाते ना तेव्हा संपुर्ण जग पाठीशी असतं पण आपण पोरके झालेलो असतो... अगदी.. मी पण यातून जातेय सध्या..त्यामूळे हे वाक्य अगदीच रिलेट झालेय ..!