ही तीच तर नाही?
नताशा ! टी वाय बी कॉम, ब्यूटीक्वीन ..
ह्मम, तीच तर दिसतेय .. बाहेरची ती लाल गाडी, तिचीच असणार. आजही चेहर्यावरचा अॅटीट्यूड काही कमी दिसत नाही.. प्रदीप स्वत:शीच बोलत होता,
कॉलेजच्या फायनल ईयरला असताना शेजारच्या क्लासमधील ज्या मुलीला त्याने प्रपोज केले होते ती आज त्याला सहा वर्षांनी दिसत होती. ती एक कमालीची सुंदर मुलगी होती, तर हा यथातथाच. तरीही चान्स घेतला होता. लागला तर जॅकपॉट. नाहीतर नकार ऐकायची मनाची तयारी ठेवली होतीच. अपेक्षेप्रमाणे नकारच आला होता. तो ही पहिल्याच फटक्यात. समोरून त्याच्या मनाचा जराही विचार न करता. त्यामुळे नाही म्हटले तरी दुखावला गेला होता. त्याचे साधारण रूप, ज्याचे तो काहीही करू शकत नव्हता ते त्याच्या प्रेमाच्या आड आले होते. पण त्याचवेळी तो सुद्धा तिच्या रुपालाच भुलला होता हे देखील एक सत्य होतेच. तीच नताशा आज अचानक ईतक्या काळाने त्याला पुन्हा दिसत होती. हृद्यात एक कालवाकालव तर होणारच होती. आपला अर्धा संपलेला कोल्ड्रींकचा ग्लास त्याने पुढचा घोट न घेता तसाच खाली ठेवला. आता त्याला ते सावकाश संपवायचे होते.
इतक्यात त्याला हॉटेलच्या दारातून एक टक्कल पडलेला थोराड वाटणारा ईसम आत येताना दिसला. ऊंची सूट आणि पेहराव पाहून कोणीतरी मोठी असामी असावी हे ओळखू येत होते. तो थेट तिच्याच दिशेने जात होता. त्याला पाहून तिच्याही चेहर्यावर हास्य पसरले. त्याने तिच्या जवळ जात बसल्याजागीच तिला एक आलिंगन दिले आणि तिच्या कानात हळूवारपणे काही कुजबुजून मागे फिरला. ईथे याला अंदाज बांधणे अवघड नव्हते..
पैसा! जर तुमच्याकडे सौंदर्य नसेल तर त्याजागी पैसा हवा. पैसा ही एकच अशी गोष्ट आहे जी सौंदर्याची कमतरता भरून काढते. आपणही तो कमावू शकलो असतो, कमावू शकतो. पण तोपर्यंत आपल्या वयाची पस्तिशी उजाडेल. तिशीच्या आत असा रुबाब झाडायला बापजाद्यांचीच मिळकत हवी. याच नैराश्यात त्याने कोल्ड्रींकचा ग्लास उचलला आणि एक मोठा घोट घेतला.
तेवढ्यात त्याला तिचा आवाज ऐकू आला. ईतक्या वर्षांनीही त्याने तो बरोबर ओळखला. त्या मगासच्या माणसालाच तिने पाठीमागून हाक मारलेली.., दादा !
ओह्ह दादा, आणि आपण उगाचच तिच्याबद्दल वेडावाकडा विचार केला. पैश्यासाठी ती अशीच कोणाबरोबरही लग्न करणार नाही. तिच्या सौंदर्याला साजेसाच शोधणार....
ती आपली नाही तर नाही, पण एखाद्या आपल्यापेक्षाही साधारण दिसणार्या थोराड माणसाला ती मिळाली नाहीये याचा त्याला आनंदच झाला होता.
त्याची नजर आता तिच्या गळ्याभोवती भिरभिरत होती. त्यात कोणाच्याही नावाचे लायसन नव्हते. स्टिल सिंगल!
आणि इतक्यात ती आपली कॉफी संपवून उठली..
एवढ्या वेळ त्याच्या नजरेस न पडलेल्या कुबड्या उचलून निघाली..
किंचितशी लंगडत च् ...
आणि इथे याच्या मनात आशा पल्लवित झाल्या..
- ऋन्मेष
ऋ, हो मी त्या तुझ्या काल्पनिक
ऋ, हो मी त्या तुझ्या काल्पनिक कथानायका बाबत बोलतोय! तुझ्या बद्दल नाही! डोळा मारा तुझ्या असे का मनात आले??>>> चोराच्या मनात चांदणे
छान लिहिले आहे. आवडलं! १४३
छान लिहिले आहे. आवडलं!
१४३ सारखं ३७५ आहे काय?
छान लिहिलयस ऋ. मला फार आवडली
छान लिहिलयस ऋ. मला फार आवडली कथा.
रिया थँक्स गं. डोक्याचा भुंगा घालवल्या बद्दल.
छान आहे कथा. पण याच
छान आहे कथा. पण याच कथानकाच्या बऱ्याच कथा वाचल्या आहेत असं आठवतय. देजावू नव्हे खरच.
तू 24 लिहायला हवे होते, हा
तू 24 लिहायला हवे होते, हा आकडा जाम फेमस आहे माबो वर
छान आहे कथा.
छान आहे कथा.
हे असलं ३७८, २२५ असलं काही
हे असलं ३७८, २२५ असलं काही असतं का खरचंच? का हा काहीही नवा ट्रेंड काढतोय?
मला वाटत भारतिय दन्ड सहिता
मला वाटत भारतिय दन्ड सहिता चे कलम ३७५ बद्दल असेल.
हे असलं ३७८, २२५ असलं काही
हे असलं ३७८, २२५ असलं काही असतं का खरचंच? का हा काहीही नवा ट्रेंड काढतोय?
>>>>
काहीही??
अरे उलट मी तुम्हाला फॅसिलिटी देतोय, शीर्षक बघूनच आत किती शब्द झेलायचे याचा अंदाज घ्यायला तर तुम्हाला हे नको का झालेय?
roll no asava ticha may
roll no asava ticha may be..shakyata darshvali
भाऊ, ती शब्दांची संख्या आहे
भाऊ, ती शब्दांची संख्या आहे हो ..
सचिन काळे यांच्याशी सहमत.
सचिन काळे यांच्याशी सहमत. मानवी मन खुप गुंतागुंतीचे असते हे तर खरेच..
पण जन्माचा जोडीदार निवडतांना ते इतके व्यवहारी होते कि आपले आपल्यालाच आश्चर्य वाटावे.
इथे नायकाने किती सहजपणे..
"तिचे सौंदर्य - तिचे अपंगत्व = आपले अॅव्हरेज दिसणे + आपले अॅव्हरेज उत्पन्न + आपले धडधाकट असणे"
हे समीकरण व्यवहाराच्या तागडीत टाकलेय.
अहो ३७५ प्रतिसाद यायला
अहो ३७५ प्रतिसाद यायला पाहिजेत असे सांगताहेत ऋ.
त्या दुसर्या धाग्याला तर ८२५ प्रतिसाद पाहिजेत म्हणे.
तेव्हढे नाही दिलेत तर ऋ धागे काढायचे बंद करतील!
तेव्हढे नाही दिलेत तर ऋ धागे
तेव्हढे नाही दिलेत तर ऋ धागे काढायचे बंद करतील! स्मित
>>>>
ईथे जरा उलटे करूया, दिलेत तर धागा काढायचा बंद ! ईट्स डील
तुझी खोटं बोलायची सवय माहितेय
तुझी खोटं बोलायची सवय माहितेय सगळ्यांना.
छान लिहिलयं
छान लिहिलयं
कऊ धन्यवाद, आणि जुना धागा
कऊ धन्यवाद, आणि जुना धागा वर काढल्याबद्दल आभार
प्रतिसाद पुन्हा वाचून काढले, जल्ले मेले निम्मे तर ३७५ बद्दलच आहेत
Pages